< मीखा 3 >

1 मी म्हणालो, “याकोबाच्या अधिकाऱ्यांनो, आणि इस्राएल घराण्याच्या सरदारांनो, ऐका,
Nimesema'”Sasa sikilizeni, ninyi viongozi wa Yakobo na kutawala nyumba ya Israeli: Je siyo sahihi kwenu kuielewa haki?
2 जे तुम्ही चांगल्याचा तिरस्कार करता आणि वाईटावर प्रेम करता. जे तुम्ही लोकांची चामडी सोलता आणि त्यांच्या हाडांवरुन मांस ओढून काढता.
Ninyi manaochukia mazuri na kupenda uovu, ninyi mnaoambua ngozi yao, miili yao kutoka kwenye mifupa yao-
3 जे तुम्ही माझ्या लोकांचे मांस खाता आणि त्यांची कातडी सोलता व त्यांची हाडे मोडता. भांड्यात घालण्यासाठी ज्याप्रमाणे मांस चिरतात, आणि जसे पातेल्यांत घालण्यासाठी त्याचे तुकडे करता, तशी जे तुम्ही त्यांची हाडे ठेचता व त्यांचे तुकडे करता, त्या तुम्हास न्याय कळत नाही काय?
ninyi mnaokula pia miili ya watu wangu, na kuambua ngozi yao, kuvunja mifupa yao, na kuwakatakata katika vipande vipande, kama nyama kwenye chungu, kama nyama kwenye sufuria kubwa.
4 आता, तुम्ही अधिकारी कदाचित परमेश्वराची प्रार्थना कराल. पण तो तुम्हास उत्तर देणार नाही. त्या वेळेस तो आपले तोंड तुमच्यापासून लपवेल. कारण तुम्ही दुष्कृत्ये केली आहेत.”
Kisha ninyi watawala mtalia kwa Yahwe, lakini hatawajibu. Atauficha uso wake kutoka kwenu kipindi hicho, kwasababu mmefanya matendo maovu.”
5 जे संदेष्टे माझ्या लोकांस बहकवितात, ज्यांनी अन्नपाणी दिले त्यांच्यासाठी, ते घोषणा करतात की, समृद्धी नांदेल. पण जर कोणी त्यांच्या मुखांत काही घातले नाही, तर हे संदेष्टे किंचाळतात, युध्दाला तयार होतात, त्यांच्या विषयी परमेश्वर असे म्हणतो.
Yahwe asema hivi kuhusu manabii ambao wawafanyao watu wangu kushindwa, “Kwa wale wawalishao wanatangaza, 'Kutakuwa na ustawi.' Lakini kwa wale wasioweka kitu kwenye vinywa vyao, wanaanzisha vita dhidi yake.
6 “म्हणून ही जणू काही तुमची रात्र असेल, पण तुम्हास दृष्टांत होणार नाही. तुम्ही अंधारात असाल, पण त्यामुळे तुम्ही भविष्य पाहणार नाही. संदेष्ट्यांच्या माथ्यांवरचा सूर्य मावळेल, आणि दिवस त्यांच्यावर काळोख असा होईल.
Kwa hiyo, itakuwa usiku kwenu usiokuwa na maono juu yenu; itakuwa giza ili kwamba msiweze kubashiri. Jua litakwenda chini juu ya manabii, na siku itakuwa giza juu yao.
7 द्रष्टे लाजविले जातील आणि ज्योतिषी गोंधळून जातील. ते सर्व आपले ओठ झाकतील, कारण माझ्याकडून त्यांना उत्तर मिळणार नाही.
Waonaji watawekwa kwenye aibu, waaguzi wa watachanganyikiwa. Wote watafunga midomo yao, kwa kuwa hakuna jibu kutoka kwangu.”
8 पण मी तर परमेश्वराच्या आत्म्याकडून पराक्रमाने, चांगुलपणा व सामर्थ्याने परिपूर्ण आहे, ह्यासाठी की याकोबाला त्याचा अपराध व इस्राएलाला, त्याचे पाप दाखवावे.”
Lakini kwangu, nimejazwa nguvu kutoka kwa Roho wa Yahwe, na nimejaa haki na uweza, kumwambia Yakobo kosa lake, na Israeli dhambi yake.
9 याकोबाच्या घराण्यातल्या पुढाऱ्यांनो आणि इस्राएल घराण्याच्या अधिकाऱ्यांनो, जे तुम्ही योग्य चालीरीतीचा तिरस्कार करता व सरळ गोष्टीला वाकडी करता, आता हे ऐका,
Sasa sikieni hii, ninyi viongozi wa nyumba ya Yakobo, na watawala wa nyumba ya Israeli, ninyi ambao mnaochukia haki, na kupotosha kila haki.
10 १० तुम्ही सियोन रक्ताने आणि यरूशलेम अन्यायाने बांधले आहे.
Mnaijenga Sayuni kwa damu na Yerusalemu kwa uovu.
11 ११ तुझे अधिकारी लाच घेण्यासाठी न्याय करतात, आणि तिचे याजक मोबदल्यासाठी शिकवण देतात. आणि तुझे भविष्य बघणारे पैशासाठी भविष्य बघतात. तरीही ते परमेश्वरावर अवलंबून राहतात व म्हणतात, “परमेश्वर आम्हाबरोबर नाही काय? आम्हांवर अनिष्ट येणार नाही.”
Viongozi wenu huhukumu kwa rushwa, makuhani wenu hufundisha kwa hijara, na manabii wenu hufanya utabiri kwa ajili ya pesa. Hata hivyo bado mtamtegemea Yahwe na kusema, “Je hayupo Yahwe pamoja nasi? Hakuna uovu utakaokuja juu yetu.”
12 १२ ह्यास्तव, तुमच्यामुळे सियोन शेतासारखे नांगरले जाईल, यरूशलेम नासधुशीचा ढीग होईल, आणि मंदिराचा पर्वत जंगलातल्या टेकडीसारखा होईल.
Kwa hiyo, kwasababu yenu, Sayuni italimwa kama shamba, Yerusalemu itakuwa rundo la kifusi, na mwinuko wa hekalu utakuwa kama mwinuko wa msituni.

< मीखा 3 >