< मीखा 3 >
1 १ मी म्हणालो, “याकोबाच्या अधिकाऱ्यांनो, आणि इस्राएल घराण्याच्या सरदारांनो, ऐका,
И речет: слышите убо сия, власти дому Иаковля и оставшии дому Израилева: не вам ли есть еже разумети суд?
2 २ जे तुम्ही चांगल्याचा तिरस्कार करता आणि वाईटावर प्रेम करता. जे तुम्ही लोकांची चामडी सोलता आणि त्यांच्या हाडांवरुन मांस ओढून काढता.
Ненавидящии добра, а ищущии зла, похищающии кожы их с них и плоти их от костей их:
3 ३ जे तुम्ही माझ्या लोकांचे मांस खाता आणि त्यांची कातडी सोलता व त्यांची हाडे मोडता. भांड्यात घालण्यासाठी ज्याप्रमाणे मांस चिरतात, आणि जसे पातेल्यांत घालण्यासाठी त्याचे तुकडे करता, तशी जे तुम्ही त्यांची हाडे ठेचता व त्यांचे तुकडे करता, त्या तुम्हास न्याय कळत नाही काय?
якоже объядоша плоти людий Моих, и кожы их от костей их одраша, и кости их столкоша и содробиша яко плоти в коноб и яко мяса в горнец:
4 ४ आता, तुम्ही अधिकारी कदाचित परमेश्वराची प्रार्थना कराल. पण तो तुम्हास उत्तर देणार नाही. त्या वेळेस तो आपले तोंड तुमच्यापासून लपवेल. कारण तुम्ही दुष्कृत्ये केली आहेत.”
тако возопиют ко Господу, и не послушает их и отвратит лице Свое от них в то время, понеже слукавноваша в начинаниих своих на Ня.
5 ५ जे संदेष्टे माझ्या लोकांस बहकवितात, ज्यांनी अन्नपाणी दिले त्यांच्यासाठी, ते घोषणा करतात की, समृद्धी नांदेल. पण जर कोणी त्यांच्या मुखांत काही घातले नाही, तर हे संदेष्टे किंचाळतात, युध्दाला तयार होतात, त्यांच्या विषयी परमेश्वर असे म्हणतो.
Сия глаголет Господь на пророки льстящыя людий Моих, угрызающыя зубы своими и проповедающыя мир на них, и не вдася во уста их, возставиша на них рать:
6 ६ “म्हणून ही जणू काही तुमची रात्र असेल, पण तुम्हास दृष्टांत होणार नाही. तुम्ही अंधारात असाल, पण त्यामुळे तुम्ही भविष्य पाहणार नाही. संदेष्ट्यांच्या माथ्यांवरचा सूर्य मावळेल, आणि दिवस त्यांच्यावर काळोख असा होईल.
сего ради нощь будет вам от видения, и тма будет вам от волхвования, и зайдет солнце на пророки, и померкнет на ня день:
7 ७ द्रष्टे लाजविले जातील आणि ज्योतिषी गोंधळून जातील. ते सर्व आपले ओठ झाकतील, कारण माझ्याकडून त्यांना उत्तर मिळणार नाही.
и усрамятся видящии сония, и посмеяни будут волсви, и возглаголют на них вси сии, зане не будет послушаяй их.
8 ८ पण मी तर परमेश्वराच्या आत्म्याकडून पराक्रमाने, चांगुलपणा व सामर्थ्याने परिपूर्ण आहे, ह्यासाठी की याकोबाला त्याचा अपराध व इस्राएलाला, त्याचे पाप दाखवावे.”
Аще аз не наполню силы Духом Господним и судом и силою, еже возвестити Иакову нечестия его и Израилеви грехи его.
9 ९ याकोबाच्या घराण्यातल्या पुढाऱ्यांनो आणि इस्राएल घराण्याच्या अधिकाऱ्यांनो, जे तुम्ही योग्य चालीरीतीचा तिरस्कार करता व सरळ गोष्टीला वाकडी करता, आता हे ऐका,
Слышите сия, старейшины дому Иаковля и оставшии дому Израилева, гнушающиися судом и вся правая развращающии,
10 १० तुम्ही सियोन रक्ताने आणि यरूशलेम अन्यायाने बांधले आहे.
созидающии Сиона кровьми и Иерусалима неправдами:
11 ११ तुझे अधिकारी लाच घेण्यासाठी न्याय करतात, आणि तिचे याजक मोबदल्यासाठी शिकवण देतात. आणि तुझे भविष्य बघणारे पैशासाठी भविष्य बघतात. तरीही ते परमेश्वरावर अवलंबून राहतात व म्हणतात, “परमेश्वर आम्हाबरोबर नाही काय? आम्हांवर अनिष्ट येणार नाही.”
старейшины его на дарех суждаху, и жерцы его на мзде отвещаваху, и пророцы его на сребре волхвоваху, и на Господе почиваху, глаголюще: не Господь ли в нас есть? Не приидут на ны злая.
12 १२ ह्यास्तव, तुमच्यामुळे सियोन शेतासारखे नांगरले जाईल, यरूशलेम नासधुशीचा ढीग होईल, आणि मंदिराचा पर्वत जंगलातल्या टेकडीसारखा होईल.
Сего ради вас дела Сион якоже нива изорется, и Иерусалим яко овощное хранилище будет, и гора дому якоже луг дубравный.