< मीखा 2 >

1 जे पाप करण्याचे योजीतात व आपल्या पलंगावर दुष्ट बेत करतात, त्यांना हायहाय. आणि सकाळ होताच ते आपले योजलेले वाईट काम करतात, कारण त्यांच्याजवळ सामर्थ्य आहे.
उन पर अफ़सोस, जो बदकिरदारी के मंसूबे बाँधते और बिस्तर पर पड़े — पड़े शरारत की तदबीरें ईजाद करते हैं, और सुबह होते ही उनको 'अमल में लाते हैं; क्यूँकि उनको इसका इख़्तियार है।
2 आणि ते शेतांची इच्छा धरतात व ती हरण करून मिळवतात; आणि घरांची इच्छा धरतात व ती मिळवतात. ते पुरुषावर व त्याच्या घराण्यावर, मनुष्यावर व त्याच्या वतनावर जुलूम करतात.
वह लालच से खेतों को ज़ब्त करते, और घरों को छीन लेते हैं; और यूँ आदमी और उसके घर पर, हाँ, मर्द और उसकी मीरास पर ज़ुल्म करते हैं।
3 ह्यास्तव परमेश्वर असे म्हणतो, “पाहा! या कुळाविरुद्ध विपत्ती आणण्याचे योजीत आहे, ज्यामधून तुम्ही तुमची मान काढू शकणार नाही, आणि तुम्ही गर्वाने चालणार नाही. कारण ही वाईट वेळ आहे.
इसलिए ख़ुदावन्द यूँ फ़रमाता है कि देख, मैं इस घराने पर आफ़त लाने की तदबीर करता हूँ जिससे तुम अपनी गर्दन न बचा सकोगे, और गर्दनकशी से न चलोगे; क्यूँकि ये बुरा वक़्त होगा।
4 त्या दिवशी लोक तुमच्यावर गाणी रचतील, आणि भारी विलाप करून म्हणतील: ‘आम्हा इस्राएलवासीयांचा विनाश झाला आहे; परमेश्वराने माझ्या लोकांचा प्रांत पालटून टाकला आहे. त्याने तो माझ्यापासून कसा दूर केला? त्याने आमची शेते घेऊन आमच्या शत्रूंमध्ये त्यांची वाटणी केली.
उस वक़्त कोई तुम पर ये मसल लाएगा और पुरदर्द नौहे से मातम करेगा, और कहेगा, “हम बिल्कुल ग़ारत हुए; उसने मेरे लोगों का हिस्सा बदल डाला; उसने कैसे उसको मुझ से जुदा कर दिया! उसने हमारे खेत बाग़ियों को बाँट दिए।”
5 अहो श्रीमंत लोकांनो, म्हणून, आता चिठ्ठ्या टाकून प्रदेशात मोजमाप करेल, असा कोणी तुझ्यासाठी परमेश्वराच्या सभेत राहणार नाही.”
इसलिए तुम में से कोई न बचेगा, जो ख़ुदावन्द की जमा'अत में पैमाइश की रस्सी डाले।
6 “तुम्ही भविष्य सांगू नका, असे ते म्हणतात, या गोष्टीविषयी भविष्य सांगू नये; अप्रतिष्ठा सरून जाणार नाही.”
बकवासी कहते हैं, “बकवास न करो! इन बातों के बारे में बकवास न करो। ऐसे लोगों से रुस्वाई जुदा न होगी।”
7 पण याकोबाचे घराणे हो, परमेश्वराचा आत्मा रागिष्ट आहे काय? त्याची ही कृत्ये आहेत की नाही? जो सरळ चालतो त्यास माझी वचने बरे करीत नाहीत काय?
ऐ बनी या'क़ूब, क्या ये कहा जाएगा कि ख़ुदावन्द की रूह क़ासिर हो गई? क्या उसके यही काम हैं? क्या मेरी बातें रास्तरौ के लिए फ़ायदेमन्द नहीं।
8 तरीसुद्धा माझे लोक शत्रूसारखे उभे राहिले आहेत. ज्यांना युद्ध आवडत नाही, असे सहज जवळून जात असता तुम्ही अंगरख्यावरून घातलेला त्यांचा झगा काढून घेता.
अभी कल की बात है कि मेरे लोग दुश्मन की तरह उठे; तुम सुलह पसंद — ओ — बेफ़िक्र राहगीरों की चादर उतार लेते हो।
9 तुम्ही माझ्या लोकांच्या स्त्रियांना त्यांच्या मनोरम घरांतून काढून टाकता; त्यांच्या लहान मुलांपासून माझे आशीर्वाद काढून घेता.
तुम मेरे लोगों की 'औरतों को उनके मरग़ूब घरों से निकाल देते हो, और तुमने मेरे जलाल को उनके बच्चों पर से हमेशा के लिए दूर कर दिया।
10 १० ऊठा आणि चालते व्हा! कारण अशुद्धता ही मोठ्या विनाशाने नष्ट करते, ह्याकरणाने ही तुमची विसाव्याची जागा नाही.
उठो, और चले जाओ, क्यूँकि ला'इलाज — ओ — मोहलिक नापाकी की वजह से ये तुम्हारी आरामगाह नहीं है।
11 ११ जर एखादा असत्याच्या आत्म्याने चालतांना खोटे सांगून म्हणेल की, “मी द्राक्षरस आणि मद्य यांविषयी भविष्य सांगेन,” तर तो देखील या लोकांचा भविष्यावादी होईल.
अगर कोई झूट और बतालत का पैरो कहे कि मैं शराब — ओ — नशा की बातें करूँगा, तो वही इन लोगों का नबी होगा।
12 १२ हे याकोबा, खचित मी तुझ्या सर्वांना एकत्र करीन. खरोखर मी इस्राएलाच्या उरलेल्यांना एकत्र करीन. कुरणातील कळपाप्रमाणे वा मेंढवाड्यातील मेंढराप्रमाणे, तसे त्यांना मी एकत्र ठेवीन. मग पुष्कळ लोक असल्यामुळे ती मोठा गोंगाट करतील.
ऐ या'क़ूब, मैं यक़ीनन तेरे सब लोगों को इकठ्ठा करूँगा, मैं यक़ीनन इस्राईल के बक़िये को जमा' करूँगा मैं उनको बुसराह की भेड़ों और चरागाह के गल्ले की तरह इकठ्ठा करूँगा और आदमियों का बड़ा शोर होगा।
13 १३ फोडणारा त्यांच्यापुढे जाईल व लोकांच्या पुढे चालेल. ते सुटून वेशीजवळ जाऊन तिच्यातून निघाले आहेत; आणि त्यांचा राजा त्यांच्यापुढे चालून गेला आहे. परमेश्वर त्यांचा पुढारी आहे.
तोड़ने वाला उनके आगे — आगे गया है; वह तोड़ते हुए फाटक तक चले गए, और उसमें से गुज़र गए; और उनका बादशाह उनके आगे — आगे गया, या'नी ख़ुदावन्द उनका पेशवा।

< मीखा 2 >