< मत्तय 9 >
1 १ तेव्हा येशू तारवात बसून पलीकडे गेला व परत आपल्या स्वतःच्या नगरात आला.
И влез в корабль, прейде и прииде во Свой град.
2 २ तेव्हा काही लोकांनी पक्षघात झालेल्या कोणाएका मनुष्यास येशूकडे आणले. तो मनुष्य बाजेवर पडून होता. येशूने त्यांचा विश्वास पाहून त्या पक्षघाती मनुष्यास म्हटले, “मुला, धीर धर. तुझी पापे क्षमा करण्यात आली आहेत.”
И се, принесоша Ему разслаблена (жилами), на одре лежаща: и видев Иисус веру их, рече разслабленному: дерзай, чадо, отпущаются ти греси твои.
3 ३ काही नियमशास्त्राच्या शिक्षकांनी हे ऐकले आणि ते आपसात म्हणाले, “हा मनुष्य तर देवाविरुद्ध दुर्भाषण करीत आहे.”
И се, нецыи от книжник реша в себе: Сей хулит.
4 ४ येशूला त्यांचे विचार कळाले व तो त्यांना म्हणाला, “तुमच्या अंतःकरणात तुम्ही वाईट विचार का करता?
И видев Иисус помышления их, рече: вскую вы мыслите лукавая в сердцах своих?
5 ५ कारण, तुझी पापे क्षमा करण्यात आली आहे, असे म्हणणे किंवा उठ व चालू लाग, असे म्हणणे यातून कोणते सोपे आहे?
Что бо есть удобее рещи: отпущаются ти греси: или рещи: востани и ходи?
6 ६ परंतु, मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे, हे तुम्ही जाणावे म्हणून,” मग येशू त्या पक्षघाती मनुष्यास म्हणाला, “ऊठ! आपली बाज उचलून घेऊन घरी जा.”
Но да увесте, яко власть имать Сын Человеческий на земли отпущати грехи: тогда глагола разслабленному: востани, возми твой одр и иди в дом твой.
7 ७ मग तो उठून आपल्या घरी गेला.
И востав, (взем одр свой, ) иде в дом свой.
8 ८ हे पाहून लोकसमुदाय थक्क झाला आणि ज्या देवाने मनुष्यास एवढा अधिकार दिला त्याचे त्यांनी गौरव केले.
Видевше же народи чудишася и прославиша Бога, давшаго власть таковую человеком.
9 ९ मग येशू तेथून पुढे निघाला असता, तेव्हा त्याने मत्तय नावाच्या मनुष्यास, जकात गोळा करतात त्या नाक्यावर बसलेले पाहिले. तेव्हा येशू त्यास म्हणाला, “माझ्यामागे ये.” तेव्हा तो उठला आणि त्याच्यामागे गेला.
И преходя Иисус оттуду, виде человека седяща на мытнице, Матфеа глаголема: и глагола ему: по Мне гряди. И востав по Нем иде.
10 १० येशू मत्तयाच्या घरी जेवत असता, पुष्कळ जकातदार व पापी तेथे आले आणि येशू व त्याचे शिष्य यांच्याबरोबर जेवायला बसले.
И бысть Ему возлежащу в дому, и се, мнози мытари и грешницы пришедше возлежаху со Иисусом и со ученики Его.
11 ११ जेव्हा परूशांनी ते पाहिले तेव्हा त्यांनी येशूच्या शिष्यांना विचारले, “तुमचा गुरू जकातदार व पापी लोक यांच्याबरोबर का जेवतो?”
И видевше фарисее, глаголаху учеником Его: почто с мытари и грешники Учитель ваш яст и пиет?
12 १२ येशूने त्यांना हे बोलताना ऐकले, तेव्हा तो त्यांना म्हणाला, “वैद्याची गरज जे निरोगी आहेत त्यांना नाही, तर जे आजारी आहेत त्यांना आहे.
Иисус же слышав рече им: не требуют здравии врача, но болящии:
13 १३ मी तुम्हास सांगतो, जा आणि याचा अर्थ काय ते शिका; मला दया हवी आहे आणि यज्ञ नको, कारण मी नीतिमानांना नव्हे, तर पाप्यांना पश्चात्तापासाठी बोलावण्यास आलो आहे.”
шедше же научитеся, что есть: милости хощу, а не жертвы? Не приидох бо призвати праведники, но грешники на покаяние.
14 १४ मग योहानाचे शिष्य त्याच्याकडे आले आणि त्यांनी त्यास विचारले, “आम्ही व परूशी पुष्कळ उपवास करतो. पण तुझे शिष्य उपवास करीत नाहीत. ते का?”
Тогда приступиша к Нему ученицы Иоанновы, глаголюще: почто мы и фарисее постимся много, ученицы же Твои не постятся?
15 १५ येशूने त्यांना उत्तर दिले, “जेव्हा वर सोबत असतो तेव्हा त्याच्या वऱ्हाड्यांना दुःखी कसे राहता येईल? परंतु अशी वेळ येईल जेव्हा वराला त्यांच्यापासून दूर केले जाईल तेव्हा ते उपवास करतील.
И рече им Иисус: еда могут сынове брачнии плакати, елико время с ними есть жених? Приидут же дние, егда отимется от них жених, и тогда постятся.
16 १६ कोणी नव्या कापडाचे ठिगळ जुन्या कापडाला लावीत नाही, कारण ते ठिगळ त्या कापडाला फाडते व छिद्र अधिक मोठे होते.
Никтоже бо приставляет приставления плата небелена ризе ветсе: возмет бо кончину свою от ризы, и горша дира будет.
17 १७ तसेच कोणीही नवा द्राक्षरस जुन्या कातडी पिशवीतघालीत नाहीत, घातला तर त्या पिशव्या फुटतात व द्राक्षरस सांडतो; तर नवा द्राक्षरस नव्या कातडी पिशव्यांत घालतात. म्हणजे दोन्हीही टिकून राहतात.”
Ниже вливают вина нова в мехи ветхи: аще ли же ни, то просадятся меси, и вино пролиется, и меси погибнут: но вливают вино ново в мехи новы, и обое соблюдется.
18 १८ येशू या गोष्टी त्यांना सांगत असता यहूद्यांच्या सभास्थानाचा एक अधिकारी त्याच्याकडे आला व येशूच्या पाया पडून म्हणाला, “माझी मुलगी आताच मरण पावली आहे. परंतु आपण येऊन आपला हात तिच्यावर ठेव म्हणजे ती पुन्हा जिवंत होईल.”
Сия Ему глаголющу к ним, се, князь некий пришед кланяшеся Ему, глаголя, яко дщи моя ныне умре: но пришед возложи на ню руку Твою, и оживет.
19 १९ तेव्हा येशू उठून आपल्या शिष्यांबरोबर त्याच्यामागे जाऊ लागला.
И востав Иисус по нем иде, и ученицы Его.
20 २० मग पाहा, वाटेत बारा वर्षापासून रक्तस्राव होत असलेली एक स्त्री येशूच्या मागे येऊन त्याच्या वस्त्राच्या काठाला शिवली.
И се, жена кровоточива дванадесяте лет, приступльши созади, прикоснуся воскрилию ризы Его,
21 २१ कारण ती आपल्या मनात म्हणत होती, “मी केवळ त्याच्या वस्त्राला शिवले तरी बरी होईन.”
глаголаше бо в себе: аще токмо прикоснуся ризе Его, спасена буду.
22 २२ तेव्हा येशूने मागे वळून तिला पाहून म्हणाला, “मुली, धीर धर! तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.” आणि ती स्त्री त्याच क्षणी बरी झाली.
Иисус же обращься и видев ю, рече: дерзай, дщи, вера твоя спасе тя. И спасена бысть жена от часа того.
23 २३ मग येशू त्या यहूदी सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घरात आला. तेव्हा त्याने बासरी वाजविणाऱ्या व रडून गोंधळ करणाऱ्या जमावाला पाहीले,
И пришед Иисус в дом княжь, и видев сопцы и народ молвящь,
24 २४ तो म्हणाला, “वाट सोडा, कारण मुलगी मरण पावलेली नाही; ती झोपेत आहे.” तेव्हा ते त्यास हसू लागले.
глагола им: отидите, не умре бо девица, но спит. И ругахуся Ему.
25 २५ मग त्या जमावाला बाहेर पाठवल्यावर त्याने आत जाऊन तिचा हात आपल्या हातात घेतला आणि ती मुलगी उठली.
Егда же изгнан бысть народ, вшед ят ю за руку: и воста девица.
26 २६ आणि ही बातमी त्या सर्व प्रांतात पसरली.
И изыде весть сия по всей земли той.
27 २७ तेव्हा येशू तेथून जात असता दोन आंधळे त्याच्यामागे ओरडत चालले. म्हणू लागले, “हे दाविदाच्या पुत्रा, आम्हावर दया कर.”
И преходящу оттуду Иисусови, по Нем идоста два слепца, зовуща и глаголюща: помилуй ны, (Иисусе) сыне Давидов.
28 २८ येशू त्या घरात गेला तेव्हा ते आंधळेही त्याच्याकडे त्याच्यामागे आत आले. त्याने त्यांना विचारले, “मी तुम्हास दृष्टी देऊ शकेन असा तुमचा विश्वास आहे का?” “होय, प्रभू,” त्यांनी उत्तर दिले.
Пришедшу же Ему в дом, приступиста к Нему слепца, и глагола има Иисус: веруета ли, яко могу сие сотворити? Глаголаста Ему: ей, Господи.
29 २९ मग त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला आणि म्हणाला, “तुमच्या विश्वासाप्रमाणे तुमच्यासोबत घडो.”
Тогда прикоснуся очию их, глаголя: по вере ваю буди вама.
30 ३० आणि त्यांना पुन्हा दृष्टी आली. येशूने त्यांना सक्त ताकीद दिली, “पाहा, हे कोणाला कळू देऊ नका.”
И отверзостася очи има: и запрети има Иисус, глаголя: блюдита, да никтоже увесть.
31 ३१ परंतु ते बाहेर गेले आणि त्यांनी त्या सर्व प्रदेशात त्याची किर्ती गाजवली.
Она же изшедша прослависта Его по всей земли той.
32 ३२ मग ते दोघे तेथून निघून जात असताना लोकांनी एका मुक्या, भूतबाधा झालेल्या मनुष्यास येशूकडे आणले.
Тема же исходящема, се, приведоша к Нему человека нема беснуема.
33 ३३ जेव्हा येशूने भूत काढून टाकले तेव्हा पूर्वी मुका असलेला तो मनुष्य बोलू लागला. लोकांस याचे आश्चर्य वाटले व ते म्हणाले, “इस्राएलामध्ये यापूर्वी असे घडलेले कधीही पाहण्यात आले नव्हते.”
И изгнану бесу, проглагола немый. И дивишася народи, глаголюще, яко николиже явися тако во Израили.
34 ३४ परंतु परूशी म्हणाले, “हा भुतांच्या अधिपतीच्या साहाय्याने भूते काढतो.”
Фарисее же глаголаху: о князи бесовстем изгонит бесы.
35 ३५ येशू त्यांच्या सभास्थानामध्ये शिक्षण देत व राज्याच्या सुवार्तेची घोषणा करत आणि सर्वप्रकारचे रोग व सर्वप्रकारचे आजार बरे करत, प्रत्येक नगरातून व प्रत्येक गावातून फिरला.
И прохождаше Иисус грады вся и веси, учя на сонмищих их, и проповедая Евангелие Царствия, и целя всяк недуг и всяку язю в людех.
36 ३६ आणि जेव्हा त्याने लोकांचे समुदाय पाहिले तेव्हा त्यास त्यांचा कळवळा आला कारण ते चिंताक्रांत व गोंधळलेले होते व मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे ते गांजलेले व पांगलेले होते.
Видев же народы, милосердова о них, яко бяху смятени и отвержени, яко овцы не имущыя пастыря.
37 ३७ तो आपल्या शिष्यांना म्हणाला, “पीक खरोखर फार आहे, पण कामकरी थोडे आहेत.
Тогда глагола учеником Своим: жатва убо многа, делателей же мало:
38 ३८ म्हणून पिकाच्या धन्याकडे प्रार्थना करा की, त्याने आपल्या पिकाची कापणी करायला कामकरी पाठवावेत.”
молитеся убо Господину жатвы, яко да изведет делатели на жатву Свою.