< मत्तय 9 >

1 तेव्हा येशू तारवात बसून पलीकडे गेला व परत आपल्या स्वतःच्या नगरात आला.
于是耶稣上了一艘船,渡过海来到他住过的城。
2 तेव्हा काही लोकांनी पक्षघात झालेल्या कोणाएका मनुष्यास येशूकडे आणले. तो मनुष्य बाजेवर पडून होता. येशूने त्यांचा विश्वास पाहून त्या पक्षघाती मनुष्यास म्हटले, “मुला, धीर धर. तुझी पापे क्षमा करण्यात आली आहेत.”
城里有人将一个躺在垫子上的瘫痪之人带到耶稣面前,耶稣看到他们很相信他,就对床上的瘫痪之人说:“我的朋友,开心点!你的罪被饶恕了!”
3 काही नियमशास्त्राच्या शिक्षकांनी हे ऐकले आणि ते आपसात म्हणाले, “हा मनुष्य तर देवाविरुद्ध दुर्भाषण करीत आहे.”
有几位宗教老师对彼此说:“这人说的是亵渎上帝之语!”
4 येशूला त्यांचे विचार कळाले व तो त्यांना म्हणाला, “तुमच्या अंतःकरणात तुम्ही वाईट विचार का करता?
耶稣看出他们的想法,于是询问道:“为什么你们心中存有恶念呢?
5 कारण, तुझी पापे क्षमा करण्यात आली आहे, असे म्हणणे किंवा उठ व चालू लाग, असे म्हणणे यातून कोणते सोपे आहे?
说‘你的罪被原谅了’,或‘站起来行走吧’,哪一个更容易?
6 परंतु, मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे, हे तुम्ही जाणावे म्हणून,” मग येशू त्या पक्षघाती मनुष्यास म्हणाला, “ऊठ! आपली बाज उचलून घेऊन घरी जा.”
但我想要让你们信服的是,人子也有宽恕罪的权利......”他对瘫痪之人说:“起来,拿起你的垫子回家去吧。”
7 मग तो उठून आपल्या घरी गेला.
那男人于是起身回家去了。
8 हे पाहून लोकसमुदाय थक्क झाला आणि ज्या देवाने मनुष्यास एवढा अधिकार दिला त्याचे त्यांनी गौरव केले.
民众看到眼前的一切,顿生敬畏之心,赞颂上帝能够赋予人类这样的力量。
9 मग येशू तेथून पुढे निघाला असता, तेव्हा त्याने मत्तय नावाच्या मनुष्यास, जकात गोळा करतात त्या नाक्यावर बसलेले पाहिले. तेव्हा येशू त्यास म्हणाला, “माझ्यामागे ये.” तेव्हा तो उठला आणि त्याच्यामागे गेला.
耶稣随后继续走下去,看见一个名叫马太之人,坐在交税亭处,于是对他说:“跟我走吧!”马太于是起身跟随了耶稣。
10 १० येशू मत्तयाच्या घरी जेवत असता, पुष्कळ जकातदार व पापी तेथे आले आणि येशू व त्याचे शिष्य यांच्याबरोबर जेवायला बसले.
耶稣在马太家中吃饭的时候,很多税吏和罪人也前来,坐在桌前与他和门徒一起吃饭。
11 ११ जेव्हा परूशांनी ते पाहिले तेव्हा त्यांनी येशूच्या शिष्यांना विचारले, “तुमचा गुरू जकातदार व पापी लोक यांच्याबरोबर का जेवतो?”
法利赛人看到这一幕,就询问耶稣的门徒说:“你们的老师为什么跟税吏和罪人一起吃饭呢?”
12 १२ येशूने त्यांना हे बोलताना ऐकले, तेव्हा तो त्यांना म्हणाला, “वैद्याची गरज जे निरोगी आहेत त्यांना नाही, तर जे आजारी आहेत त्यांना आहे.
耶稣听见这个问题就回答:“健康的人不需要医生,有病的人才需要,
13 १३ मी तुम्हास सांगतो, जा आणि याचा अर्थ काय ते शिका; मला दया हवी आहे आणि यज्ञ नको, कारण मी नीतिमानांना नव्हे, तर पाप्यांना पश्चात्तापासाठी बोलावण्यास आलो आहे.”
去想想这是什么意思:我只希望你们能够悲悯,并非带给我献祭,我来此并非为了感召正道之人,而是为了感召罪人。”
14 १४ मग योहानाचे शिष्य त्याच्याकडे आले आणि त्यांनी त्यास विचारले, “आम्ही व परूशी पुष्कळ उपवास करतो. पण तुझे शिष्य उपवास करीत नाहीत. ते का?”
这时,约翰的门徒前来问耶稣:“我们和法利赛人常常禁食,你的门徒为什么不禁食呢?”
15 १५ येशूने त्यांना उत्तर दिले, “जेव्हा वर सोबत असतो तेव्हा त्याच्या वऱ्हाड्यांना दुःखी कसे राहता येईल? परंतु अशी वेळ येईल जेव्हा वराला त्यांच्यापासून दूर केले जाईल तेव्हा ते उपवास करतील.
耶稣回答:“在婚礼中,宾客与新郎在一起时怎能面露哀伤呢?但如果到时候新郎被带走,他们就会禁食了。
16 १६ कोणी नव्या कापडाचे ठिगळ जुन्या कापडाला लावीत नाही, कारण ते ठिगळ त्या कापडाला फाडते व छिद्र अधिक मोठे होते.
没有人会拿一块新布补在旧衣服上,因为补丁会把衣服扯破,裂开更大的口子。
17 १७ तसेच कोणीही नवा द्राक्षरस जुन्या कातडी पिशवीतघालीत नाहीत, घातला तर त्या पिशव्या फुटतात व द्राक्षरस सांडतो; तर नवा द्राक्षरस नव्या कातडी पिशव्यांत घालतात. म्हणजे दोन्हीही टिकून राहतात.”
也没有人用旧的羊皮袋装新酒,因为皮袋会被胀破,酒漏出来,皮袋也损坏了。人们总是会把新酒装在新皮袋里,这样两样都可以保全。”
18 १८ येशू या गोष्टी त्यांना सांगत असता यहूद्यांच्या सभास्थानाचा एक अधिकारी त्याच्याकडे आला व येशूच्या पाया पडून म्हणाला, “माझी मुलगी आताच मरण पावली आहे. परंतु आपण येऊन आपला हात तिच्यावर ठेव म्हणजे ती पुन्हा जिवंत होईल.”
耶稣对他们说话的时候,有一位当地的官员走来跪在他面前说:“我的女儿刚刚死去了,能不能请你来将手放在她身上,我知道这样她一定会重获生命。”
19 १९ तेव्हा येशू उठून आपल्या शिष्यांबरोबर त्याच्यामागे जाऊ लागला.
于是耶稣和门徒起身跟着他走去。
20 २० मग पाहा, वाटेत बारा वर्षापासून रक्तस्राव होत असलेली एक स्त्री येशूच्या मागे येऊन त्याच्या वस्त्राच्या काठाला शिवली.
这时人群中一个女人患血漏病已有十二年,她走到耶稣背后,摸他衣服的褶边。
21 २१ कारण ती आपल्या मनात म्हणत होती, “मी केवळ त्याच्या वस्त्राला शिवले तरी बरी होईन.”
她在心里默念:“只要摸到他的衣服,我就会痊愈。”
22 २२ तेव्हा येशूने मागे वळून तिला पाहून म्हणाला, “मुली, धीर धर! तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.” आणि ती स्त्री त्याच क्षणी बरी झाली.
耶稣转过身看着她,说:“开心起来!你对我的信心让你痊愈。”那女人便立刻好了。
23 २३ मग येशू त्या यहूदी सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घरात आला. तेव्हा त्याने बासरी वाजविणाऱ्या व रडून गोंधळ करणाऱ्या जमावाला पाहीले,
耶稣向那官员的家走去,看见有吹笛的乐人和大声哭泣的民众。
24 २४ तो म्हणाला, “वाट सोडा, कारण मुलगी मरण पावलेली नाही; ती झोपेत आहे.” तेव्हा ते त्यास हसू लागले.
于是他对众人说:“请离开吧!这女孩并非死去,只是睡着了。”众人纷纷嘲笑他。
25 २५ मग त्या जमावाला बाहेर पाठवल्यावर त्याने आत जाऊन तिचा हात आपल्या हातात घेतला आणि ती मुलगी उठली.
耶稣让众人离开后,进屋拉着女孩的手,女孩便苏醒并下了床。
26 २६ आणि ही बातमी त्या सर्व प्रांतात पसरली.
这消息传遍整个地区。
27 २७ तेव्हा येशू तेथून जात असता दोन आंधळे त्याच्यामागे ओरडत चालले. म्हणू लागले, “हे दाविदाच्या पुत्रा, आम्हावर दया कर.”
耶稣随后继续前行,有两名盲人跟随他,喊着说:“大卫的子孙,可怜可怜我们吧!”
28 २८ येशू त्या घरात गेला तेव्हा ते आंधळेही त्याच्याकडे त्याच्यामागे आत आले. त्याने त्यांना विचारले, “मी तुम्हास दृष्टी देऊ शकेन असा तुमचा विश्वास आहे का?” “होय, प्रभू,” त्यांनी उत्तर दिले.
耶稣走进了他居住的房屋,盲人也走进去。 耶稣问他们:“你们相信我能这样做吗?” 他们回答:“主啊,是的。”
29 २९ मग त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला आणि म्हणाला, “तुमच्या विश्वासाप्रमाणे तुमच्यासोबत घडो.”
于是耶稣触摸他们的眼睛说:“有你们对我的信任,它就会发生。”
30 ३० आणि त्यांना पुन्हा दृष्टी आली. येशूने त्यांना सक्त ताकीद दिली, “पाहा, हे कोणाला कळू देऊ नका.”
于是盲人就看见了。耶稣嘱咐他们:“千万不可告诉他人这件事。”
31 ३१ परंतु ते बाहेर गेले आणि त्यांनी त्या सर्व प्रदेशात त्याची किर्ती गाजवली.
但他们却把耶稣的事迹传遍这片地区。
32 ३२ मग ते दोघे तेथून निघून जात असताना लोकांनी एका मुक्या, भूतबाधा झालेल्या मनुष्यास येशूकडे आणले.
耶稣和门徒们离开时,有人带着一个被魔鬼附体的哑巴见耶稣。
33 ३३ जेव्हा येशूने भूत काढून टाकले तेव्हा पूर्वी मुका असलेला तो मनुष्य बोलू लागला. लोकांस याचे आश्चर्य वाटले व ते म्हणाले, “इस्राएलामध्ये यापूर्वी असे घडलेले कधीही पाहण्यात आले नव्हते.”
耶稣赶走他身上的魔鬼,哑巴就说话了。众人都很惊奇,纷纷说:“在以色列从未发生过这样的事。”
34 ३४ परंतु परूशी म्हणाले, “हा भुतांच्या अधिपतीच्या साहाय्याने भूते काढतो.”
但法利赛人说:“他不过是利用魔鬼之王的力量驱赶魔鬼而已。”
35 ३५ येशू त्यांच्या सभास्थानामध्ये शिक्षण देत व राज्याच्या सुवार्तेची घोषणा करत आणि सर्वप्रकारचे रोग व सर्वप्रकारचे आजार बरे करत, प्रत्येक नगरातून व प्रत्येक गावातून फिरला.
耶稣走遍各处,造访城镇乡村,在会堂里教导人,宣扬天国的福音,医治各种疾病。
36 ३६ आणि जेव्हा त्याने लोकांचे समुदाय पाहिले तेव्हा त्यास त्यांचा कळवळा आला कारण ते चिंताक्रांत व गोंधळलेले होते व मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे ते गांजलेले व पांगलेले होते.
看见人群,耶稣感到深深的怜悯,因为他们困苦无依,一如没有牧羊人的羊群。
37 ३७ तो आपल्या शिष्यांना म्हणाला, “पीक खरोखर फार आहे, पण कामकरी थोडे आहेत.
他于是对门徒说:“收成多,工人少。
38 ३८ म्हणून पिकाच्या धन्याकडे प्रार्थना करा की, त्याने आपल्या पिकाची कापणी करायला कामकरी पाठवावेत.”
所以你们应向丰收之上帝祈祷,派更多工人收割他的庄稼。”

< मत्तय 9 >