< मत्तय 8 >
1 १ येशू डोंगरावरून खाली उतरल्यावर असंख्य लोकांचे समुदाय त्याच्यामागे जावू लागले.
So when He came down from the mountain large crowds followed Him.
2 २ तेव्हा पाहा, एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला व त्यास नमन करून म्हणाला, “प्रभूजी, आपली इच्छा असल्यास आपण मला शुद्ध करायला समर्थ आहात.”
And then, a leper came and worshiped Him saying, “Lord, if You are willing, You can make me clean.”
3 ३ तेव्हा येशूने आपला हात पुढे करून त्यास स्पर्श केला व म्हटले, “माझी इच्छा आहे, शुद्ध हो;” आणि लगेचच त्याचा कुष्ठरोग जाऊन तो बरा झाला.
So reaching out His hand Jesus touched him, saying, “I am willing; be cleansed!” And immediately his leprosy was cleansed.
4 ४ मग येशूने त्यास म्हटले, “पाहा, हे कोणाला सांगू नको; तर जाऊन स्वतःस याजकाला दाखव आणि त्यांना सत्यतेची साक्ष पटावी म्हणून तुझ्या शुद्धीकरता, मोशेने नेमलेले अर्पण वाहा.”
And Jesus says to him: “See that you tell no one; but go, show yourself to the priest and offer the gift that Moses commanded, as a proof to them.”
5 ५ मग येशू कफर्णहूम शहरात आल्यावर एक शताधिपती त्याच्याकडे आला व त्यास विनंती करत म्हणाला,
As He entered Capernaum a centurion came to Him, pleading with Him
6 ६ “प्रभूजी, माझा चाकर पक्षाघाताने अतिशय आजारी होऊन घरात पडून आहे.”
and saying, “Lord, my servant is lying at home paralyzed, being terribly tormented.”
7 ७ येशू त्यास म्हणाला, “मी येऊन त्यास बरे करीन.”
And Jesus says to him, “I will go and heal him.”
8 ८ तेव्हा शताधिपतीने उत्तर दिले की, “प्रभूजी, आपण माझ्या छपराखाली यावे अश्या योग्यतेचा मी नाही; पण आपण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल.
But in answer the centurion said: “Lord, I am not worthy that you should come under my roof; but only speak a word and my servant will be healed.
9 ९ कारण मीही एक अधिकारी असून माझ्या हाताखाली शिपाई आहेत. मी एकाला ‘जा’ म्हणले की तो जातो, दुसर्याला ‘ये’ म्हणले की तो येतो आणि माझ्या दासास ‘हे कर’ म्हणले की तो ते करतो.”
For I also am a man under authority, having soldiers under me. And I say to this one, ‘Go,’ and he goes; and to another, ‘Come,’ and he comes; and to my slave, ‘Do this,’ and he does.”
10 १० हे ऐकून येशूला आश्चर्य वाटले व आपल्यामागे येत असलेल्या लोकांस तो म्हणाला, “मी तुम्हास खरे सांगतो, मला इस्राएलात एवढा विश्वास आढळला नाही.
Upon hearing him Jesus marveled, and said to those who were following: “Assuredly I say to you, not even in Israel have I found such great faith!
11 ११ मी तुम्हास सांगतो की, पूर्वेकडून व पश्चिमेकडून पुष्कळजण येतील आणि स्वर्गाच्या राज्यात अब्राहाम, इसहाक व याकोब याच्या पंक्तीस बसतील;
And I say to you that many will come from east and west and sit down with Abraham, Isaac and Jacob in the kingdom of the heavens;
12 १२ परंतु राज्याचे पुत्र बाहेरील अंधारात टाकले जातील, तेथे रडणे व दात खाणे चालेल.”
but the sons of the kingdom will be thrown out into the darkness farthest away. There, there will be weeping and gnashing of teeth.”
13 १३ मग येशू शताधिपतीला म्हणाला, “जा, तू जसा विश्वास ठेवला तसे तुला मिळाले आहे.” आणि त्याच घटकेस तो चाकर बरा झाला.
Then Jesus said to the centurion, “Go; and let it be done for you just as you believed.” And his servant was healed in that very hour.
14 १४ नंतर येशू पेत्राच्या घरात गेला आणि त्याची सासू तापाने आजारी पडली आहे असे त्याने पाहिले.
Now when Jesus had come into Peter's house, He saw his mother-in-law laid up and burning with fever.
15 १५ तेव्हा त्याने तिच्या हाताला स्पर्श केला व तिचा ताप निघाला; मग ती उठून त्याची सेवा करू लागली.
So He touched her hand and the fever left her; and she got up and began to serve Him.
16 १६ मग संध्याकाळ झाल्यावर लोकांनी असंख्य दुष्ट आत्म्याने ग्रासलेल्यांना त्याच्याकडे आणले; तेव्हा त्याने भूते केवळ शब्दाने घालवली व सर्व आजाऱ्यांना बरे केले.
And when evening came they brought to Him many who were demonized. And He cast out the spirits with a word, and healed all who were sick,
17 १७ “त्याने स्वतः आमचे विकार घेतले आणि आमचे रोग वाहिले,” असे जे यशया संदेष्ट्याच्याद्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले.
so that what was spoken through Isaiah the prophet should be fulfilled, namely: “He Himself took our infirmities and bore our diseases.”
18 १८ मग येशूने आपल्या सभोवती लोकसमुदाय आहे असे पाहून त्यांना गालीलच्या सरोवरापलीकडे जाण्याची आज्ञा केली.
Seeing large crowds around Him Jesus gave an order to depart for the opposite shore.
19 १९ तेव्हा कोणीएक शास्त्री येऊन त्यास म्हणाला, “गुरूजी, आपण जेथे कोठे जाल तेथे मी आपल्यामागे येईन.”
Then a certain scribe approaching said to Him, “Teacher, I will follow you wherever you may go.”
20 २० येशू त्यास म्हणाला, “खोकडांस बिळे व आकाशातील पाखरांस घरटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला आपले डोके टेकण्यास ठिकाण नाही.”
So Jesus says to him, “The foxes have dens and the birds of the air have nests, but the Son of the Man does not have where He may lay His head.”
21 २१ मग त्याच्या शिष्यांपैकी आणखी एकजण त्यास म्हणाला, “प्रभूजी, मला पित्याच्या मरणापर्यंत त्याच्याजवळ राहून, त्याच्या मरणानंतर त्यास पुरून येऊ द्या.”
Then a different one of the disciples said to Him, “Lord, permit me first to go and bury my father.”
22 २२ येशूने त्यास म्हटले, “तू माझ्यामागे ये आणि जे मरण पावलेले आहेत त्यांना आपल्या मरण पावलेल्यांना पुरू दे.”
But Jesus said to him, “Follow me, and leave the dead to bury their own dead.”
23 २३ मग तो तारवात चढल्यानंतर त्याचे शिष्यही त्याच्यामागे चढले.
Now when He got into the boat, His disciples followed Him.
24 २४ तेव्हा पाहा, सरोवरात एवढे मोठे वादळ उठले की ते तारू लाटांनी झाकू लागले; तेव्हा येशू तर झोपेत होता.
And then—a great tempest arose on the sea, so that the boat was covered by the waves. But He was sleeping.
25 २५ तेव्हा ते त्याच्याजवळ येऊन त्यास जागे करून म्हणाले, प्रभूजी, वाचवा. आम्ही बुडत आहोत.
So the disciples came and awakened Him saying, “Lord, save us! We are perishing!”
26 २६ तो त्यांना म्हणाला, “अहो अल्पविश्वासी, तुम्ही का घाबरला?” मग तो उठला आणि त्याने वारा व सरोवर यास धमकावले. मग सर्व अगदी शांत झाले.
And He says to them, “Why are you cowardly, you little-faiths?” Then rising He rebuked the winds and the sea, and there was a great calm.
27 २७ तेव्हा त्या मनुष्यांना फार आश्चर्य वाटले व ते म्हणाले, “हा कोणत्या प्रकारचा मनुष्य आहे की वारे व लाटा ही याचे ऐकतात.”
So the men marveled, saying, “What sort of being is this, that even the winds and the sea obey Him?”
28 २८ मग तो पलीकडे गदरेकरांच्या देशात गेल्यावर त्यास दोन भूतग्रस्त कबरांतून निघून येत असतांना भेटले; ते भयंकर हिंसक होते म्हणून त्या वाटेने कोणालाही जाणे शक्य नव्हते.
Upon His coming to the other side, to the region of the Gergesenes, two demonized men met Him, coming out from the tombs, very dangerous, so that no one could pass that way.
29 २९ तेव्हा पाहा, ते ओरडून म्हणाले, “हे देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? नेमलेल्या समयापूर्वी तू आम्हास पीडा द्यायला येथे आलेला आहेस काय?”
And then—they cried out saying: “What do you have to do with us, Jesus, Son of God? Have you come here to torment us before the time?”
30 ३० तेथे त्यांच्यापासून दूर अंतरावर डुकरांचा मोठा कळप चरत होता.
Now a good way off from them there was a herd of many pigs feeding.
31 ३१ मग ती दुष्ट आत्मे त्यास विनंती करू लागली की, तू जर आम्हास काढीत असलास तर त्या डुकरांच्या कळपात आम्हास पाठवून दे.
So the demons kept imploring Him saying, “Since you are going to cast us out, permit us to go into the herd of pigs.”
32 ३२ त्याने त्यास म्हटले, “जा,” मग ती निघून डुकरांत शिरली; आणि पाहा, तो संपुर्ण कळप कड्यावरून धडक धावत जाऊन समुद्रात पाण्यात बुडून मरण पावला.
So He said to them, “Go!” And coming out they went off into the herd of pigs. And then—the whole herd of pigs rushed down the steep bank into the sea and died in the water!
33 ३३ मग त्या डुकरांना चारणारे नगरांत पळाले आणि त्यांनी जाऊन भूतग्रस्तांच्या गोष्टीसकट सर्व वर्तमान जाहीर केले.
So the swineherds ran away, and going into the town they told everything, including about the demonized men.
34 ३४ तेव्हा पाहा, सर्व नगर येशूला भेटावयास निघाले आणि त्यास सीमेबाहेर जाण्याची विनंती केली.
And then, the whole town went out to meet with Jesus; and upon seeing Him they begged Him to depart from their borders.