< मत्तय 6 >
1 १ लोकांनी आपले न्यायीपण पाहावे म्हणून तुम्ही तुमची न्यायीपणाची कृत्ये त्यांच्यासमोर करु नये याविषयी जपा, अन्यथा तुम्हास तुमच्या स्वर्गातील पित्याकडून प्रतिफळ मिळणार नाही.
“Be careful not to do your charitable giving before the people so as to be seen by them. Otherwise you have no reward from your Father who is in the heavens.
2 २ म्हणून ज्यावेळेस तू दानधर्म करतोस तेव्हा लोकांनी आपली स्तुती करावी म्हणून ढोंगी जसे सभास्थानात व रस्त्यात आपणापुढे कर्णा वाजवतात तसे करू नको. मी तुम्हास खरे सांगतो त्यांना आपले प्रतिफळ मिळालेच आहे.
Therefore, whenever you do charitable giving do not sound a trumpet before you, as the hypocrites do in the synagogues and in the streets, so that they may be praised by the people. Assuredly I say to you, they already have their reward.
3 ३ म्हणून जेव्हा तुम्ही दान कराल, तेव्हा ते गुप्तपणे करा. तुमचा उजवा हात काय करतो हे तुमच्या डाव्या हाताला कळू देऊ नका.
But when you do charitable giving do not let your left hand know what your right hand is doing,
4 ४ जेणेकरून तुझे दान देणे गुप्तपणे व्हावे, कारण तुझा स्वर्गीय पिता जो गुप्तदर्शी आहे, तो त्याचे प्रतिफळ तुला देईल.
so that your charitable giving may be in secret; and your Father who sees in secret will Himself repay you openly.
5 ५ जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा ढोंग्यांसारखे होऊ नका कारण आपण लोकांस दिसावे म्हणून ते सभास्थानांमध्ये व रस्त्याच्या कोपऱ्यांवर उभे राहून प्रार्थना करणे त्यांना आवडते. मी तुम्हास खरे सांगतो की, त्यांना आपले प्रतिफळ प्राप्त झाले आहे.
And whenever you pray do not be like the hypocrites; for they love to pray standing in the synagogues and on the street corners, so that they may be seen by the people. Assuredly I say to you that they already have their reward.
6 ६ पण तू जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा आतल्या खोलीत जावून दरवाजा लावून घे व जो तुझा पिता गुप्तवासी आहे त्याची प्रार्थना कर. मग तुझा स्वर्गीय पिता जो गुप्तदर्शी आहे तो तुला प्रतिफळ देईल.
But you, whenever you pray, go into your room, and having shut the door pray to your Father who is in secret; and your Father who sees in secret will repay you openly.
7 ७ आणि जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा परराष्ट्रीय लोकांसारखी निरर्थक बडबड करू नका कारण आपण फार बोलल्याने आपले म्हणणे ऐकले जाईल असे त्यांना वाटते.
“But when you pray do not babble like the heathen; for they think that they will be heard for their many words.
8 ८ तर तुम्ही त्यांच्यासारखे असू नका कारण तुम्हास कशाची गरज आहे हे तुमच्या पित्याला तुम्ही त्याच्याकडे मागण्यापूर्वीच ठाऊक आहे.
So do not be like them, because your Father knows what you need before you ask Him.
9 ९ म्हणून तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुम्ही अशाप्रकारे प्रार्थना करावीः हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो.
Therefore, you pray like this: ‘Our Father who is in the heavens, let Your name be reverenced;
10 १० तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.
let Your kingdom come, let Your will be done, on the earth just as in heaven.
11 ११ आमची रोजची भाकर आज आम्हास दे.
Give us today our daily bread;
12 १२ जशी आम्ही आमच्या ऋण्यांस त्यांची ऋणे सोडली आहेत, तशीच तू आमची ऋणे आम्हांस सोड.
and forgive us our debts, as we also forgive our debtors.
13 १३ आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास त्या दुष्टापासून सोडव. (कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरवही सर्वकाळ तुझीच आहेत.)
And do not bring us into testing, but rescue us from the evil one; because Yours is the kingdom and the power and the glory forever. Amen.’
14 १४ कारण जर तुम्ही इतरांचे अपराध क्षमा कराल तर तुमचा स्वर्गातील पिता तुम्हासही क्षमा करील;
For if you forgive people their trespasses, your heavenly Father will also forgive you.
15 १५ पण जर तुम्ही इतरांच्या अपराधांची क्षमा करणार नाही, तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही.
But if you do not forgive people their trespasses, neither will your Father forgive your trespasses.
16 १६ जेव्हा तुम्ही उपवास करता तेव्हा तुम्ही ढोंगी लोकांसारखे उदास चेहऱ्याचे राहू नका कारण आपण उपवास करीत आहोत हे लोकांस दिसावे म्हणून ते आपली मुखे उदास करतात. मी तुम्हास खरे सांगतो त्यांना त्यांचे प्रतिफळ प्राप्त झाले आहे.
“Also, whenever you fast do not become gloomy like the hypocrites, because they disfigure their faces so that people will notice that they are fasting. Assuredly I say to you that they already have their reward.
17 १७ तू जेव्हा उपवास करतो तेव्हा आपल्या डोक्याला तू तेल लाव आणि आपले तोंड धुवा.
But when you fast anoint your head and wash your face,
18 १८ यासाठी की, तू उपवास करता हे लोकांस दिसू नये तर तुमच्या गुप्त पित्याला दिसावे. मग तुमचा गुप्त पिता तुम्हास उघडपणे प्रतिफळ देईल.
so that you do not appear to the people to be fasting, but to your Father who is in secret; and your Father who sees in secret will repay you.
19 १९ तुम्ही पृथ्वीवर स्वतःसाठी संपत्ती साठवू नका कारण येथे कसर व जंग लागून तिचा नाश होईल आणि चोर घर फोडून ती चोरून नेतील.
“Do not lay up for yourselves treasures on the earth, where moth and rust ruin and where thieves break in and steal;
20 २० म्हणून त्याऐवजी स्वर्गात आपणासाठी संपत्ती साठवा.
but lay up for yourselves treasures in heaven, where neither moth nor rust ruins and where thieves neither break in nor steal;
21 २१ जेथे तुमचे धन आहे तेथे तुमचे मनही लागेल.
because where your treasure is there your heart will be also.
22 २२ डोळा शरीराचा दिवा आहे. म्हणून जर तुमचे डोळे निर्दोष असतील तर तुमचे संपुर्ण शरीर प्रकाशमय होईल.
“The lamp of the body is the eye. So if your eye is sound, your whole body will be full of light.
23 २३ पण जर तुमचे डोळे सदोष असतील, तर तुमचे संपुर्ण शरीर अंधकारमय होईल. जर तुम्हाठायी असणारा प्रकाश हा वास्तविक अंधकार आहे, तर खरोखरचा अंधार किती असणार!
But if your eye is evil, your whole body will be full of darkness. So if the light that is in you is darkness, how great is that darkness!
24 २४ कोणालाही दोन धन्यांची चाकरी एकावेळी करणे शक्य नाही. तो एकाचा तिरस्कार करील तर दुसऱ्यावर प्रीती करील किंवा तो एका धन्याशी एकनिष्ठ राहील व दुसऱ्याला तुच्छ लेखेल. तसेच तुम्हास देवाची आणि पैशाचीसेवा एकाच वेळी करता येणार नाही.
“No one is able to serve two masters; for either he will hate the one and love the other, or he will be loyal to the one and despise the other. You cannot serve God and money.
25 २५ म्हणून मी तुम्हास सांगतो की, तुम्ही आपल्या जीवनाविषयी काळजी करु नका की आपण काय खावे आणि काय प्यावे किंवा आपल्या शरीराविषयी आपण काय पांघरावे अशी चिंता करू नका. जीव अन्नापेक्षा आणि शरीर वस्त्रांपेक्षा अधिक महत्त्वाचे आहे की नाही?
Therefore, I say to you not to worry about your life, what you will eat or what you will drink; nor about your body, what you will put on. Is not life more than food and the body more than clothing?
26 २६ आकाशातील पक्ष्यांकडे पाहा! ती पेरीत नाहीत, कापणी करीत नाहीत किंवा कोठारात साठवूनही ठेवत नाहीत, तरी तुमचा स्वर्गातील पिता त्यांना खावयास देतो. तुम्ही त्यांच्यापेक्षा अधिक मौल्यवान आहात की नाही?
Look at the birds of the air, that they neither sow nor reap nor gather into barns; yet your heavenly Father feeds them. Are you not superior to them?
27 २७ आणि चिंता करून आपले आयुष्याची लांबी हाथभरही वाढवणे तुम्हापैकी कोणाला शक्य आहे का?
And which of you can add one cubit to his stature by worrying?
28 २८ आणि तुम्ही वस्त्रांविषयी का काळजी करता? रानातील फुलांविषयी विचार करा, ती कशी वाढतात? ती कष्ट करीत नाहीत आणि ती कापड विणीत नाहीत,
And why do you worry about clothes? Consider the lilies of the field, how they grow; they neither labor nor spin,
29 २९ तरी मी तुम्हास सांगतो की, शलमोन राजादेखील त्याच्या भर वैभवाच्या काळात यांतील एकासारखा ही सजला नव्हता.
and yet I say to you that not even Solomon in all his splendor was arrayed like one of these.
30 ३० तर अहो अल्पविश्वासी लोकांनो, जी रानफुले आज अस्तित्वात आहेत आणि उद्या भट्टीत टाकली जातात त्यांना जर देव त्यांना असा पोशाख घालतो तर त्याहीपेक्षा विशेष असा पोशाख तो तुम्हास घालणार नाही काय?
Now if God so clothes the grass of the field, which exists today and tomorrow is thrown into the oven, will He not much more clothe you, you little-faiths?
31 ३१ ‘आम्ही काय खावे’ किंवा ‘काय प्यावे’, अथवा ‘आम्ही काय पांघरावे’ असे म्हणून काळजीत करु नका.
Therefore do not worry saying, ‘What shall we eat?’ or ‘What shall we drink?’ or ‘What shall we wear?’
32 ३२ कारण या सर्व गोष्टी मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय करत असतात, कारण तुमच्या स्वर्गातील पित्याला तुम्हास या गोष्टींची गरज आहे हे ठाऊक आहे.
For the pagans seek all these things, and your heavenly Father knows that you need each of these things.
33 ३३ तर पहिल्याने तुम्ही देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्याचा प्रयत्न करा म्हणजे त्याबरोबर या सर्व गोष्टीही तुम्हास मिळतील.
Rather, seek first the kingdom of God and His righteousness, and all these things will be added to you.
34 ३४ म्हणून उद्याची चिंता करू नका कारण प्रत्येक दिवस काही ना काही चिंता घेऊनच उगवतो. म्हणून उद्याची चिंता उद्या स्वतः करेल. ज्या दिवसाचे जे दुःख ते त्या दिवसासाठी पुरेसे आहे.
Therefore do not worry about tomorrow, for tomorrow will worry about its own affairs. Each day has enough trouble of its own.