< मत्तय 5 >
1 १ जेव्हा येशूने त्या लोकसमुदायांना पाहीले तेव्हा तो डोंगरावर चढला, मग तो तेथे खाली बसला असता त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले.
Vida pak Ježíš zástupy, vstoupil na horu; a když se posadil, přistoupili k němu učedlníci jeho.
2 २ त्याने आपले तोंड उघडले व त्यांना शिकवले. तो म्हणाला;
I otevřev ústa svá, učil je, řka:
3 ३ “जे आत्म्याने ‘दीन’ ते धन्य आहेत, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.
Blahoslavení chudí duchem, nebo jejich jest království nebeské.
4 ४ ‘जे शोक करतात’, ते धन्य आहेत, कारण ‘त्यांचे सांत्वन करण्यात येईल.’
Blahoslavení lkající, nebo oni potěšeni budou.
5 ५ ‘जे सौम्य’ ते धन्य आहेत, कारण ‘त्यांना पृथ्वीचे वतन मिळेल.’
Blahoslavení tiší, nebo oni dědictví obdrží na zemi.
6 ६ जे न्यायीपणाचे भुकेले व तान्हेले ते धन्य आहेत, कारण ते संतुष्ट होतील.
Blahoslavení, kteříž lačnějí a žíznějí spravedlnosti, nebo oni nasyceni budou.
7 ७ जे दयाळू ते धन्य आहेत, कारण त्यांच्यावर दया करण्यात येईल.
Blahoslavení milosrdní, nebo oni milosrdenství důjdou.
8 ८ जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य आहेत, कारण ते देवाला पाहतील.
Blahoslavení čistého srdce, nebo oni Boha viděti budou.
9 ९ जे शांती करणारे ते धन्य आहेत, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील.
Blahoslavení pokojní, nebo oni synové Boží slouti budou.
10 १० न्यायीपणाकरता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य आहेत, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.
Blahoslavení, kteříž protivenství trpí pro spravedlnost, nebo jejich jest království nebeské.
11 ११ जेव्हा लोक माझ्यामुळे तुमचा अपमान करतात व छळ करतात आणि तुमच्याविरुध्द सर्वप्रकारचे वाईट लबाडीने बोलतात तेव्हा तुम्ही धन्य आहात.
Blahoslavení budete, když vám zlořečiti budou a protivenství činiti, a mluviti všecko zlé o vás, lhouce, pro mne.
12 १२ आनंद व उल्लास करा, कारण तुम्हास स्वर्गात मोठे प्रतिफळ आहे, कारण तुमच्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचाही लोकांनी अशाचप्रकारे छळ केला.
Radujte se a veselte se, nebo odplata vaše hojná jest v nebesích. Takť zajisté protivili se prorokům, kteříž byli před vámi.
13 १३ तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, पण जर मिठाचा खारटपणा गेला तर ते पुन्हा कसे खारट बनवता येईल? ते तर पुढे कोणत्याही उपयोगाचे न राहता केवळ फेकून देण्याच्या व मनुष्यांच्या पायदळी तुडवले जाण्यापुरते उपयोगाचे राहील.
Vy jste sůl země. Jestliže sůl zmařena bude, čím bude osolena? K ničemuž se nehodí více, než aby byla ven vyvržena a od lidí pošlapána.
14 १४ तुम्ही जगाचा प्रकाश आहात; डोंगरावर वसलेले नगर लपवता येत नाही.
Vy jste světlo světa. Nemůžeť město na hoře ležící skryto býti.
15 १५ आणि दिवा लावून तो कोणी टोपलीखाली लपवून ठेवत नाही, उलट तो दिवठणीवर ठेवतात म्हणजे तो दिवा घरातील सर्वांना प्रकाश देतो.
Aniž rozsvěcují svíce a stavějí ji pod kbelec, ale na svícen; i svítí všechněm, kteříž jsou v domě.
16 १६ तुमचा प्रकाश इतरांसमोर याप्रकारे प्रकाशू द्या की जेणेकरून त्यांनी तुमची चांगली कामे पाहावी आणि तुमचा पिता जो स्वर्गात आहे त्याचे गौरव करावे.
Tak svěť světlo vaše před lidmi, ať vidí skutky vaše dobré, a slaví Otce vašeho, kterýž jest v nebesích.
17 १७ नियमशास्त्र किंवा संदेष्ट्यांचे ग्रंथ रद्द करावयास मी आलो आहे असा विचार करु नका; मी ते रद्द करावयास नव्हे तर ते पूर्ण करावयास आलो आहे.
Nedomnívejte se, že bych přišel rušiti zákona aneb proroků. Nepřišelť jsem rušiti, ale naplniti.
18 १८ कारण मी तुम्हास खरे सांगतो, आकाश व पृथ्वी ही नाहीशी होतील, परंतु सर्वकाही पूर्ण झाल्याशिवाय, नियमशास्त्रातील एकही काना किंवा मात्रा रद्द होणार नाही.
Amen zajisté pravím vám: Dokudž nepomine nebe i země, jediná literka aneb jeden puňktík nepomine z zákona, až se všecky věci stanou.
19 १९ यास्तव जो कोणी या लहान आज्ञातील एखादी आज्ञा रद्द करील व त्याप्रमाणे लोकांस शिकवील त्यास स्वर्गाच्या राज्यात अगदी लहान म्हणतील; पण जो कोणी त्या पाळील व शिकवील त्यास स्वर्गाच्या राज्यात महान म्हणतील.
Protož zrušil-li by kdo jedno z přikázaní těchto nejmenších, a učil by tak lidi, nejmenší slouti bude v království nebeském. Kdož by pak koli činil i učil, ten veliký slouti bude v království nebeském.
20 २० म्हणून मी तुम्हास सांगतो, शास्त्री व परूशी यांच्या न्यायीपणापेक्षा तुमचे न्यायीपण अधिक झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यांत तुमचा प्रवेश होणारच नाही.
Nebo pravím vám: Nebude-liť hojnější spravedlivost vaše nežli zákonníků a farizeů, nikoli nevejdete do království nebeského.
21 २१ ‘खून करू नको आणि जो कोणी खून करतो तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल,’ असे प्राचीन लोकांस सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे.
Slyšeli jste, že říkáno jest starým: Nezabiješ. Pakli by kdo zabil, povinen trpěti soud.
22 २२ मी तर तुम्हास सांगतो, जो कोणी आपल्या भावावर (उगाच) रागावेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल; जो कोणी आपल्या भावाला, ‘अरे वेडगळा,’ असे म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या पात्र होईल आणि जो कोणी त्याला, ‘अरे मूर्खा,’ असे म्हणेल, तो नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र होईल. (Geenna )
Ale jáť pravím vám: Že každý, kdož se hněvá na bratra svého bez příčiny, musí trpěti soud. Kdož by pak řekl bratru svému: Rácha, povinen bude před radou státi; a kdož by řekl: Blázne, musí pekelný oheň trpěti. (Geenna )
23 २३ यास्तव तू आपले अर्पण वेदीवर अर्पिण्यास आणीत असता आपल्या भावाच्या मनात आपल्याविरूद्ध काही आहे अशी तुला तेथे आठवण झाली,
Protož obětoval-li bys dar svůj na oltář, a tu bys se rozpomenul, že bratr tvůj má něco proti tobě:
24 २४ तर आपले अर्पण तसेच वेदीसमोर ठेव आणि आपल्या मार्गाने परत जा व प्रथम आपल्या भावासोबत समेट कर आणि मग येऊन आपले अर्पण वेदीवर अर्पण कर.
Nechejž tu daru svého před oltářem a odejdi; prvé smiř se s bratrem svým, a potom přijda, obětuj dar svůj.
25 २५ तुझा फिर्यादी तुझ्याबरोबर वाटेवर आहे तोच त्याच्याशी समेट कर, नाही तर कदाचित फिर्यादी तुला न्यायाधीशाच्या हाती देईल, न्यायाधीश तुला शिपायांच्या हाती देईल आणि तू तुरूंगात पडशील.
Vejdi v dobrou vůli s protivníkem svým rychle, dokudž jsi s ním na cestě, aťby snad nedal tebe protivník tvůj soudci, a soudce dal by tě služebníku, a byl bys uvržen do žaláře.
26 २६ मी तुला खरे सांगतो शेवटची दमडी फेडीपर्यंत तू त्याच्यातून सुटणारच नाहीस.
Amen pravím tobě: Nevyjdeš odtud, dokudž i posledního haléře nenavrátíš.
27 २७ ‘व्यभिचार करू नको,’ म्हणून सांगितले होते हे तुम्ही ऐकले आहे,
Slyšeli jste, že říkáno bylo starým: Nezcizoložíš.
28 २८ मी तर तुम्हास सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामवासनेने पाहतो त्याने आपल्या अंतःकरणात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे;
Ale jáť pravím vám: Že každý, kdož by pohleděl na ženu ku požádání jí, již zcizoložil s ní v srdci svém.
29 २९ तुझा उजवा डोळा तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करीत असेल तर तो उपट आणि फेकून दे; कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात टाकले जावे यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे. (Geenna )
Jestliže pak oko tvé pravé horší tě, vylup je a vrz od sebe; neboť jest užitečněji tobě, aby zahynul jeden oud tvůj, než by celé tělo tvé uvrženo bylo do ohně pekelného. (Geenna )
30 ३० तुझा उजवा हात तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करीत असेल तर तो तोडून टाकून दे; कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात पडावे, यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे. (Geenna )
A pakli ruka tvá pravá horší tě, utni ji a vrz od sebe; nebo užitečněji jest tobě, aby zahynul jeden oud tvůj, než by všecko tělo tvé uvrženo bylo do pekelného ohně. (Geenna )
31 ३१ ‘कोणी आपली पत्नी सोडून देतो तर त्याने तिला सूटपत्र द्यावे’ हे सांगितले होते.
Též řečeno jest: Kdož by koli propustil manželku svou, aby jí dal lístek rozloučení.
32 ३२ मी तर तुम्हास सांगतो की, जो कोणी आपल्या पत्नीला व्यभिचाराच्या कारणाशिवाय टाकतो, तो तिला व्यभिचारिणी करतो आणि जो कोणी अशा टाकलेल्या पत्नीबरोबर लग्न करतो तो व्यभिचार करतो.
Jáť pak pravím vám: Že kdožkoli propustil by manželku svou, kromě příčiny cizoložstva, uvodí ji v cizoložstvo, a kdož propuštěnou pojme, cizoloží.
33 ३३ आणखी ‘खोटी शपथ वाहू नको’ तर ‘आपल्या शपथा परमेश्वरापुढे खऱ्या कर’ म्हणून प्राचीन काळच्या लोकांस सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे.
Opět slyšeli jste, že říkáno bylo starým: Nebudeš křivě přisahati, ale splníš Pánu přísahy své.
34 ३४ मी तर तुम्हास सांगतो शपथ वाहूच नका; स्वर्गाची नका, कारण ते देवाचे आसन आहे;
Ale jáť pravím vám: Abyste nepřisahali všelijak, ani skrze nebe, nebo trůn Boží jest;
35 ३५ पृथ्वीचीही वाहू नका, कारण ती त्याचे पादासन आहे; यरूशलेमेचीहि वाहू नका कारण ती थोर राजाची नगरी आहे.
Ani skrze zemi, nebo podnož jeho jest; ani skrze Jeruzalém, nebo město velikého toho Krále jest.
36 ३६ आपल्या मस्तकाचीही शपथ वाहू नको, कारण तू आपला एकही केस पांढरा किंवा काळा करू शकत नाहीस.
Ani skrze hlavu svou budeš přisahati, nebo nemůžeš jednoho vlasu učiniti bílého aneb černého.
37 ३७ तर तुमचे बोलणे, होय तर होय आणि नाही तर नाही एवढेच असावे; याहून जे अधिक ते त्या दुष्टापासून आहे.
Ale buď řeč vaše: Jistě, jistě; nikoli, nikoli. Což pak nad to více jest, to od zlého jest.
38 ३८ ‘डोळ्याबद्दल डोळा’ व ‘दाताबद्दल दात’ असे सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे.
Slyšeli jste, že říkáno bylo: Oko za oko, a zub za zub.
39 ३९ परंतु मी तर तुम्हास सांगतो, दुष्टाला अडवू नका. जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारतो, त्याच्याकडे दुसरा गाल कर;
Jáť pak pravím vám: Abyste neodpírali zlému. Ale udeří-li tě kdo v pravé líce tvé, nasaď jemu i druhého.
40 ४० जो तुझ्यावर आरोप करून तुझी बंडी घेऊ पाहतो त्यास तुझा अंगरखाही घेऊ दे;
A tomu, kdož se s tebou chce souditi a sukni tvou vzíti, nech mu i pláště.
41 ४१ आणि जो कोणी तुला बळजबरीने धरून एक कोस नेईल त्याच्याबरोबर दोन कोस जा.
A nutil-li by tě kdo míli jednu, jdi s ním dvě.
42 ४२ जो कोणी तुझ्याजवळ काही मागतो त्यास दे आणि जो तुझ्यापासून उसने घेऊ पाहतो त्यास पाठमोरा होऊ नको.
A prosícímu tebe dej, a od toho, kdo by chtěl vypůjčiti od tebe, neodvracuj se.
43 ४३ ‘आपल्या शेजार्यावर प्रीती कर व आपल्या वैऱ्याचा द्वेष कर’, असे सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे.
Slyšeli jste, že říkáno bylo: Milovati budeš bližního svého, a nenáviděti budeš nepřítele svého.
44 ४४ मी तर तुम्हास सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा.
Ale jáť vám pravím: Milujte nepřátely své, dobrořečte těm, kteříž vás proklínají, dobře čiňte nenávidícím vás, a modlte se za ty, kteříž vás utiskují a vám se protiví,
45 ४५ अशासाठी की, तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे; कारण तो दुष्टांवर व चांगल्यांवर आपला सूर्य उगवतो आणि नीतिमानांवर व अनीतिमानांवर पाऊस पाडतो.
Abyste byli synové Otce svého, kterýž jest v nebesích; nebo slunci svému velí vzchoditi na dobré i na zlé, a déšť dává na spravedlivé i na nespravedlivé.
46 ४६ कारण जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर तुम्हास काय प्रतिफळ मिळावे? जकातदारही तसेच करतात की नाही?
Nebo milujete-li ty, kdož vás milují, jakou odplatu máte? Zdaliž i publikáni téhož nečiní?
47 ४७ आणि तुम्ही आपल्या बंधुजनांना मात्र सलाम करीत असला तर त्यामध्ये विशेष ते काय करता? परराष्ट्रीय लोकही तसेच करीतात ना?
A budete-li pozdravovati toliko bratří svých, což více činíte? Však i publikáni to činí.
48 ४८ यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता परिपूर्ण आहे तसे तुम्ही परिपूर्ण व्हा.
Buďtež vy tedy dokonalí, jako i Otec váš, kterýž jest v nebesích, dokonalý jest.