< मत्तय 4 >
1 १ मग सैतानाकडून येशूंची परीक्षा व्हावी म्हणून देवाच्या आत्म्याने त्यांस अरण्यात नेले.
AYO nae quinene si Jesus ni Espiritu para y jalomtano para umatienta ni anite;
2 २ चाळीस दिवस आणि चाळीस रात्री उपवास केल्यानंतर येशूंना भूक लागली.
Ya estaba umayunat cuarenta na jaane yan cuarenta na puenge ya despues ñalang.
3 ३ तेव्हा परीक्षक येशूंची परीक्षा घेण्यासाठी त्यांच्याकडे आला व म्हणाला, “जर तू देवाचा पुत्र आहेस तर या दगडांना भाकरी होण्याची आज्ञा कर.”
Ya mato guiya güiya y manienienta, ya ilegña: Yaguin jago lajin Yuus, tago este y acho ya ufamapan.
4 ४ परंतु येशूंनी उत्तर दिले, “कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘मनुष्य केवळ भाकरीने जगेल असे नाही तर, देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल.’”
Güiya manope ilegña: Matugue esta: Ti y panja uninalâlâ y taotao, lao y todo y sinangan ni y jumuyong gui pachot Yuus.
5 ५ मग सैतानाने त्यांस यरूशलेम या पवित्र शहरात नेले व परमेश्वराच्या भवनाच्या टोकावर उभे केले.
Ayo nae ninamalofan ni anite gui santa na siuda; pinelo gui jilo torren diquique, iyon y templo.
6 ६ आणि त्यास म्हणाला, “जर तू देवाचा पुत्र आहेस तर खाली उडी घे, कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की; ‘देव त्याच्या दूतांना तुझ्यासाठी आज्ञा करील आणि तुझे पाय दगडावर आपटू नयेत म्हणून ते तुला आपल्या तळहातावर झेलून घेतील.’”
Y ilegña: Yaguin jago lajin Yuus, yutejao güine papa, sa matugue esta: Y angjet sija uninadje ya unquinajat ni canaeñija, para chaña y adengmo umatotpe contra y acho.
7 ७ येशूंनी त्यास म्हटले, “असेही लिहिले आहे की, ‘तुझा देव, जो प्रभू, याची परीक्षा पाहू नको.’”
Si Jesus ilegña: Locue esta matugue, chamo tietienta y Señot, Yuusmo.
8 ८ मग सैतानाने त्यांस एका अतिशय उंच पर्वतावर नेले व त्याने त्यांस जगाची सर्व राज्ये, त्यांतील सर्व ऐश्वर्यासहीत दाखवली.
Tumalo ninamalofan ni anite gui un sabana na sentáquilo ya jafanue todo y raeno sija gui jilo y tano yan y minagofñija,
9 ९ आणि तो त्यांस म्हणाला, “जर तू मला नमन करशील व माझी उपासना करशील तर हे सर्व काही मी तुला देईन.”
Ya ilegña: Todo este sija junaejao yaguin dumimojao ya unadora yo.
10 १० येशूंनी त्यास म्हटले, “अरे सैताना, माझ्यापासून दूर हो! कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘देव जो तुझा प्रभू त्याचीच उपासना कर आणि त्यालाच नमन कर.’”
Ayonae si Jesus ilegña nu güiya: Janao Satanas, sa matugue esta, y Señot Yuusmo na güiyaja unadora yan güiyaja unsetbe.
11 ११ मग सैतान येशुंना सोडून निघून गेला आणि देवदूत येऊन येशुंची सेवा करू लागले.
Ayo nae diningo ni anite, ya y angjet sija manmato ya masetbe güe.
12 १२ योहानाला तुरूंगात टाकले आहे हे जेव्हा येशूने ऐकले तेव्हा तो गालील प्रांतात निघून गेला.
Anae jajungog si Jesus na si Juan esta mapongle, tumalo guato Galilea.
13 १३ नासरेथ सोडून जबुलून व नफताली यांच्या सीमेतील, गालीलच्या सरोवराच्या कफर्णहूमात तो जाऊन राहिला.
Ya jadingo Nasaret, mato Capernaum ya sumaga gui oriyan tase gui oriyan tanon Sabulon yan Neftalim.
14 १४ यशया संदेष्ट्याने पूर्वी जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे यासाठी हे झाले. ते असे होते की,
Para umacumple y guinin jasangan y profeta Isaias, na ilegña:
15 १५ “जबुलून आणि नफताली हा प्रांत, सरोवराच्या किनाऱ्यावरील, यार्देनेच्या पलीकडील प्रदेश व परराष्ट्रीय गालील
Y tano Sabulon yan y tano Neftalim, chalan tase yan para otro banda guiya Jordan, Galilea y Gentiles.
16 १६ जे लोक काळोखांत बसत होते त्यांनी, मोठा प्रकाश पाहिला. मरणाचे सावट असलेल्या सावलीत दव प्रदेशात राहणाऱ्या लोकांवर, ज्योति उदय पावली आहे.”
Ya y taotao sija nu y mañasaga gui jemjom, dangculo na manana liniiñija; y ayo sija nu y mañasaga tanon anineng y finatae, candet ufaninina.
17 १७ तेव्हापासून येशूने उपदेश करणे सुरु केले व तो म्हणू लागला की; “पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य तुमच्या जवळ आले आहे.”
Desde ayo jatutujon si Jesus sumetmon ya ilegña: Fanmañotsot, sa y raenon langet jijijot.
18 १८ नंतर तो गालीलच्या सरोवराजवळून जात असता, पेत्र म्हटलेला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया या दोघांना त्याने जाळे टाकतांना पाहिले कारण ते मासे पकडणारे होते.
Ya anae jumajanao si Jesus gui tasen Galilea, jalie dos chumelo; si Simon mafanaan Pedro yan si Andres cheluña, na janatutunog y lagua gui tase sa manpescadot.
19 १९ येशू त्यांना म्हणाला, “माझ्यामागे या, म्हणजे मी तुम्हास माणसे धरणारे करीन.”
Ya ilegña nu sija: Dalalag yo ya junafanpescadot taotao jamyo.
20 २० मग ते लगेचच जाळे सोडून देऊन त्याच्यामागे चालू लागले.
Sija japolo y lagua sija ya madalalag güe.
21 २१ येशू तेथून पुढे चालत जात असता त्याने दुसरे दोघे भाऊ; जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान यांना त्यांचे वडील जब्दी याच्याबरोबर होडीत पाहीले. ते जाळे नीट करत होते. त्याने त्यांना बोलावले,
Anae jumanao güije, jalie otro dos chumelo, si Santiago lajin Sebedeo, yan si Juan cheluña, gui sajyan yan si tatañija as Sebedeo na jalememenda y laguañija; ya jaagang.
22 २२ तेव्हा ते दोघेही लगेचच आपली होडी व आपले वडील यांना सोडून त्याच्यामागे गेले.
Sija enseguidas japolo y sajyan yan si tatañija ya madalalag güe.
23 २३ गालील प्रांतात सगळीकडे फिरत, येशूने त्यांच्या सभास्थानात जाऊन शिकविले, देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली आणि लोकांचे सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारचे विकार बरे केले.
Ya jalilicue si Jesus iya Galilea mamanagüe gui sinagoga sija ya sumetmetmon ni raenon y evangelio, ya janafanjomlo todo y chetnot yan todo y pinite gui taotao;
24 २४ येशूविषयीची बातमी सर्व सिरीया प्रांतभर पसरली; मग जे आजारांनी व अनेक प्रकारच्या रोगांनी पीडीत होते, ज्यांना भूतबाधा झाली होती, जे फेफरेकरी व पक्षघात झाला होता अशा सर्वांना लोकांनी त्याच्याकडे आणले आणि येशूने त्यांना बरे केले.
Ya y matunaña matungo todo guiya Siria; ya maquenenee güe guato todo manmalango, ni guaja todo clasen chetnot yan pinite; y maninanite yan y manbababa yan y manparalitico; ya janafanjomlo.
25 २५ मग गालील प्रांत, दकापलीस नगर, यरूशलेम शहर, यहूदीया प्रांत व यार्देन नदीच्या पलीकडून आलेल्या लोकांचे मोठे समुदाय त्याच्यामागे चालू लागले.
Ya madalalag güe linajyan taotao, guinin Galilea, yan guinin Decapolis, yan guinin Jerusalem, yan guinin Judea, yan y otro banda guiya Jordan.