< मत्तय 3 >

1 बाप्तिस्मा करणारा योहान त्या दिवसात, यहूदीया प्रांताच्या अरण्यात येऊन अशी घोषणा करू लागला की,
A waɗancan kwanaki, Yohanna Mai Baftisma ya zo, yana wa’azi a Hamadan Yahudiya
2 “पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.”
yana cewa, “Ku tuba, gama mulkin sama ya yi kusa.”
3 कारण यशया संदेष्ट्याच्याद्वारे त्याच्याचविषयी असे सांगितले होते की, “अरण्यात घोषणा करणार्‍याची वाणी झाली; ‘परमेश्वराचा मार्ग तयार करा,’ त्याच्या ‘वाटा सरळ करा.’”
Wannan shi ne wanda aka yi maganarsa ta wurin annabi Ishaya cewa, “Ga murya mai kira a hamada tana cewa, ‘Ku shirya wa Ubangiji hanya, ku miƙe hanyoyi dominsa.’”
4 या योहानाचे वस्त्र उंटाच्या केसाचे होते, त्याच्या कमरेस कातड्याचा कमरबंद होता. त्याचा आहार टोळ व रानमध होता.
Tufafin Yohanna kuwa an yi su da gashin raƙumi ne, yana kuma daure da ɗamara ta fata. Abincinsa kuwa fāri ne da zumar jeji.
5 तेव्हा यरूशलेम शहर, सर्व यहूदीया प्रांत व यार्देन नदीच्या आसपासचा संपुर्ण प्रदेश त्याच्याकडे आला.
Mutane suka zo wurinsa daga Urushalima da dukan Yahudiya da kuma dukan yankin Urdun.
6 ते आपआपली पापे पदरी घेत असता, त्यांना त्याच्या हाताने यार्देन नदीत बाप्तिस्मा देण्यात आला.
Suna furta zunubansu, ya kuma yi musu baftisma a Kogin Urdun.
7 परंतु परूशी व सदूकी यांच्यापैकी अनेक लोकांस आपणाकडे बाप्तिस्म्यासाठी येताना पाहून तो त्यांना म्हणाला, “अहो विषारी सापांच्या पिलांनो, येणाऱ्या क्रोधापासून पळावयास तुम्हास कोणी सावध केले?
Amma da Yohanna ya ga Farisiyawa da Sadukiyawa da yawa suna zuwa inda yake yin baftisma, sai ya ce musu, “Ku macizai! Wa ya gargaɗe ku ku guje wa fushin nan mai zuwa?
8 तर पश्चात्तापाला शोभेल असे योग्य ते फळ द्या;
Ku yi ayyukan da suka dace da tuba.
9 आणि अब्राहाम तर ‘आमचा पिता आहे’, असे आपसात म्हणण्याचा विचार आपल्या मनात करू नका; कारण मी तुम्हास सांगतो, देव या दगडांपासून अब्राहामासाठी मुले निर्माण करण्यास समर्थ आहे.
Kada ma ku yi tunani a ranku cewa, ‘Ai, Ibrahim ne mahaifinmu.’ Ina gaya muku cewa Allah zai iya tā da’ya’ya wa Ibrahim daga cikin duwatsun nan.
10 १० आणि झाडांच्या मुळांशी आताच कुऱ्हाड ठेवलेली आहे; जे प्रत्येक झाड चांगले फळ देत नाही ते तोडले जाईल व अग्नीत टाकले जाईल.
An riga an sa bakin gatari a gindin itatuwa, kuma duk itacen da bai ba da’ya’ya masu kyau ba, za a sare shi a jefa cikin wuta.
11 ११ मी तुमचा बाप्तिस्मा पश्चात्तापासाठी पाण्याने करत आहे; परंतु माझ्यामागून येणारा आहे तो माझ्याहून अधिक सामर्थ्यवान आहे आणि त्याच्या चपला उचलून घेवून चालण्याची देखील माझी योग्यता नाही; तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने व अग्नीने करणार आहे.
“Ina muku baftisma da ruwa domin tuba. Amma wani yana zuwa a bayana wanda ya fi ni iko, wanda ko takalmansa ma ban isa in ɗauka ba. Zai yi muku baftisma da Ruhu Mai Tsarki da kuma wuta.
12 १२ त्याच्या हातात त्याचे सूप आहे, तो आपले खळे अगदी स्वच्छ करील व आपले गहू कोठारात साठवील; पण भूस न विझणाऱ्या अग्नीने जाळून टाकील.”
Yana riƙe da matankaɗinsa, zai tankaɗe hatsinsa, yă kuma tattara alkamarsa a cikin rumbu, amma zai ƙone yayin da wutar da ba a iya kashewa.”
13 १३ यानंतर येशू गालील प्रांताहून यार्देन नदीवर योहानाच्या हातून बाप्तिस्मा घेण्याकरीता त्याच्याकडे आला;
Sai Yesu ya zo daga Galili, ya je Urdun don Yohanna yă yi masa baftisma.
14 १४ परंतु योहान त्यास थांबवत म्हणाला, मला आपल्या हातून बाप्तिस्मा घेण्याची गरज आहे, असे असता आपण माझ्याकडे येता हे कसे?
Amma Yohanna ya so yă hana shi, yana cewa, “Ina bukata ka yi mini baftisma, yaya kake zuwa wurina?”
15 १५ येशूने त्यास उत्तर दिले, “आता हे होऊ दे; कारण याप्रकारे सर्व न्यायीपण पूर्णपणे करणे हे आपणास योग्य आहे.” तेव्हा त्याने ते होऊ दिले.
Yesu ya amsa ya ce, “Bari yă zama haka yanzu; ya dace mu yi haka don mu cika dukan adalci.” Sa’an nan Yohanna ya yarda.
16 १६ मग येशूंचा बाप्तिस्मा झाल्यावर, येशू पाण्यातून वर आले आणि पाहा, त्यांच्यासाठी आकाश उघडले; तेव्हा त्यांनी देवाच्या आत्म्याला कबुतरासारखे उतरताना व आपणावर येताना पाहीले,
Nan da nan da aka yi wa Yesu baftisma, sai ya fito daga ruwa. A wannan lokaci sama ya buɗe, sai ya ga Ruhun Allah yana saukowa kamar kurciya ya kuwa sauka a kansa.
17 १७ आणि आकाशातून वाणी झाली की, “हा माझा प्रिय ‘पुत्र’ आहे, याच्याविषयी मी फार संतुष्ट आहे.”
Sai murya daga sama ta ce, “Wannan shi ne Ɗana wanda nake ƙauna; wanda kuma nake jin daɗinsa ƙwarai.”

< मत्तय 3 >