< मत्तय 3 >
1 १ बाप्तिस्मा करणारा योहान त्या दिवसात, यहूदीया प्रांताच्या अरण्यात येऊन अशी घोषणा करू लागला की,
In those days came John the Immerser, preaching in the wilderness of Judea,
2 २ “पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.”
and saying: Repent, for the kingdom of heaven is at hand.
3 ३ कारण यशया संदेष्ट्याच्याद्वारे त्याच्याचविषयी असे सांगितले होते की, “अरण्यात घोषणा करणार्याची वाणी झाली; ‘परमेश्वराचा मार्ग तयार करा,’ त्याच्या ‘वाटा सरळ करा.’”
For this is he that was spoken of by Isaiah the prophet, saying: The voice of one crying in the wilderness, Prepare the way of the Lord, make his paths straight.
4 ४ या योहानाचे वस्त्र उंटाच्या केसाचे होते, त्याच्या कमरेस कातड्याचा कमरबंद होता. त्याचा आहार टोळ व रानमध होता.
But the same John had his clothing of camel’s hair, and a girdle of leather around his loins, and his food was locusts and wild honey.
5 ५ तेव्हा यरूशलेम शहर, सर्व यहूदीया प्रांत व यार्देन नदीच्या आसपासचा संपुर्ण प्रदेश त्याच्याकडे आला.
Then went out to him Jerusalem, and all Judea, and all the region round about the Jordan,
6 ६ ते आपआपली पापे पदरी घेत असता, त्यांना त्याच्या हाताने यार्देन नदीत बाप्तिस्मा देण्यात आला.
and were immersed by him in the Jordan, confessing their sins.
7 ७ परंतु परूशी व सदूकी यांच्यापैकी अनेक लोकांस आपणाकडे बाप्तिस्म्यासाठी येताना पाहून तो त्यांना म्हणाला, “अहो विषारी सापांच्या पिलांनो, येणाऱ्या क्रोधापासून पळावयास तुम्हास कोणी सावध केले?
But when he saw many of the Pharisees and Sadducees coming to his immersion, he said to them: Generation of vipers, who has warned you to flee from the coining wrath?
8 ८ तर पश्चात्तापाला शोभेल असे योग्य ते फळ द्या;
Bring forth, therefore, fruit worthy of repentance:
9 ९ आणि अब्राहाम तर ‘आमचा पिता आहे’, असे आपसात म्हणण्याचा विचार आपल्या मनात करू नका; कारण मी तुम्हास सांगतो, देव या दगडांपासून अब्राहामासाठी मुले निर्माण करण्यास समर्थ आहे.
and think not to say within yourselves, We have Abraham for our father; for I say to you that God is able from these stones to raise up children to Abraham.
10 १० आणि झाडांच्या मुळांशी आताच कुऱ्हाड ठेवलेली आहे; जे प्रत्येक झाड चांगले फळ देत नाही ते तोडले जाईल व अग्नीत टाकले जाईल.
Even now the ax is lying at the root of the trees: therefore, every tree that does not bring forth good fruit is cut down and thrown into the fire.
11 ११ मी तुमचा बाप्तिस्मा पश्चात्तापासाठी पाण्याने करत आहे; परंतु माझ्यामागून येणारा आहे तो माझ्याहून अधिक सामर्थ्यवान आहे आणि त्याच्या चपला उचलून घेवून चालण्याची देखील माझी योग्यता नाही; तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने व अग्नीने करणार आहे.
I immerse you in water, in order to repentance; but he that comes after me is mightier than I, whose sandals I am not worthy to carry. He will immerse you in the Holy Spirit and in fire:
12 १२ त्याच्या हातात त्याचे सूप आहे, तो आपले खळे अगदी स्वच्छ करील व आपले गहू कोठारात साठवील; पण भूस न विझणाऱ्या अग्नीने जाळून टाकील.”
whose winnowing-shovel is in his hand, and he will thoroughly cleanse his thrashing-floor, and gather his grain into his granary; but the chaff he will burn with unquenchable fire.
13 १३ यानंतर येशू गालील प्रांताहून यार्देन नदीवर योहानाच्या हातून बाप्तिस्मा घेण्याकरीता त्याच्याकडे आला;
Then came Jesus from Galilee to the Jordan to John, to be immersed by him.
14 १४ परंतु योहान त्यास थांबवत म्हणाला, मला आपल्या हातून बाप्तिस्मा घेण्याची गरज आहे, असे असता आपण माझ्याकडे येता हे कसे?
But John forbade him, saying: I have need to be immersed by thee, and comest thou to me?
15 १५ येशूने त्यास उत्तर दिले, “आता हे होऊ दे; कारण याप्रकारे सर्व न्यायीपण पूर्णपणे करणे हे आपणास योग्य आहे.” तेव्हा त्याने ते होऊ दिले.
But Jesus answering said to him: Permit it now; for thus it becomes us to perform fully every righteous act. Then he permitted him.
16 १६ मग येशूंचा बाप्तिस्मा झाल्यावर, येशू पाण्यातून वर आले आणि पाहा, त्यांच्यासाठी आकाश उघडले; तेव्हा त्यांनी देवाच्या आत्म्याला कबुतरासारखे उतरताना व आपणावर येताना पाहीले,
And after Jesus was immersed, he came up immediately from the water; and lo, the heavens were opened to him, and he saw the Spirit of God descending like a dove, and coming upon him.
17 १७ आणि आकाशातून वाणी झाली की, “हा माझा प्रिय ‘पुत्र’ आहे, याच्याविषयी मी फार संतुष्ट आहे.”
And lo, a voice from heaven, saying: This is my beloved Son, in whom I delight.