< मत्तय 28 >
1 १ मग शब्बाथानंतर आठवड्याचा पहिला दिवस उजडतांच पहाटेस मग्दालीया नगराची मरीया, याकोब व योसेफ यांची आई मरीया कबर पाहावयास तेथे गेल्या
ตต: ปรํ วิศฺรามวารสฺย เศเษ สปฺตาหปฺรถมทินสฺย ปฺรโภเต ชาเต มคฺทลีนี มริยมฺ อนฺยมริยมฺ จ ศฺมศานํ ทฺรษฺฏุมาคตาฯ
2 २ त्यावेळी पाहा, तेथे मोठा भूकंप झाला. परमेश्वराचा दूत स्वर्गातून उतरून तेथे आला. त्याने कबरेच्या तोंडावरची धोंड बाजूला लोटली व तो तीवर बसला.
ตทา มหานฺ ภูกมฺโป'ภวตฺ; ปรเมศฺวรียทูต: สฺวรฺคาทวรุหฺย ศฺมศานทฺวาราตฺ ปาษาณมปสารฺยฺย ตทุปรฺยฺยุปวิเวศฯ
3 ३ त्याचे रूप चमकणाऱ्या विजेसारखे व त्याचे कपडे बर्फासारखे शुभ्र होते.
ตทฺวทนํ วิทฺยุทฺวตฺ เตโชมยํ วสนํ หิมศุภฺรญฺจฯ
4 ४ पहारा करणारे शिपाई खूप घाबरले, ते थरथर कापू लागले आणि ते मरण पावलेल्या मनुष्यांसारखे झाले.
ตทานีํ รกฺษิณสฺตทฺภยาตฺ กมฺปิตา มฺฤตวทฺ พภูว: ฯ
5 ५ देवदूत त्या स्त्रियांना म्हणाला, “भिऊ नका, कारण मी जाणतो की, ज्याला वधस्तंभावर खिळले होते त्या येशूला तुम्ही शोधत आहात.
ส ทูโต โยษิโต ชคาท, ยูยํ มา ไภษฺฏ, กฺรุศหตยีศุํ มฺฤคยเธฺว ตทหํ เวทฺมิฯ
6 ६ पण तो इथे नाही कारण तो म्हणाला होता, त्याप्रमाणे त्यास मरणातून उठविण्यात आले आहे. या आणि जेथे त्यास ठेवले होते ती जागा पाहा.
โส'ตฺร นาสฺติ, ยถาวทตฺ ตโถตฺถิตวานฺ; เอตตฺ ปฺรโภ: ศยนสฺถานํ ปศฺยตฯ
7 ७ आता लवकर जा आणि त्याच्या शिष्यांना सांगा, तो मरणातून उठला आहे आणि बघा, तो तुमच्यापुढे गालील प्रांतात जात आहे आणि तुम्ही त्यास तेथे पाहाल. पाहा, मी तुम्हास सांगितले आहे.”
ตูรฺณํ คตฺวา ตจฺฉิษฺยานฺ อิติ วทต, ส ศฺมศานาทฺ อุทติษฺฐตฺ, ยุษฺมากมเคฺร คาลีลํ ยาสฺยติ ยูยํ ตตฺร ตํ วีกฺษิษฺยเธฺว, ปศฺยตาหํ วารฺตฺตามิมำ ยุษฺมานวาทิษํฯ
8 ८ तेव्हा त्या स्त्रिया भयाने व मोठ्या आनंदाने कबरेजवळून घाईने निघाल्या व त्याच्या शिष्यांना हे वर्तमान सांगण्यासाठी त्या धावत गेल्या.
ตตสฺตา ภยาตฺ มหานนฺทาญฺจ ศฺมศานาตฺ ตูรฺณํ พหิรฺภูย ตจฺฉิษฺยานฺ วารฺตฺตำ วกฺตุํ ธาวิตวตฺย: ฯ กินฺตุ ศิษฺยานฺ วารฺตฺตำ วกฺตุํ ยานฺติ, ตทา ยีศุ รฺทรฺศนํ ทตฺตฺวา ตา ชคาท,
9 ९ मग पाहा; येशू त्यांना भेटला आणि तो त्यांना म्हणाला, “शांती असो!” त्या त्याच्याजवळ आल्या. त्यांनी त्याचे पाय धरले आणि त्यास नमन केले.
ยุษฺมากํ กลฺยาณํ ภูยาตฺ, ตตสฺตา อาคตฺย ตตฺปาทโย: ปติตฺวา ปฺรเณมุ: ฯ
10 १० तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “भिऊ नका, जा, माझ्या भावांना सांगा की त्यांनी गालील प्रांतात जावे. ते तिथे मला पाहतील.”
ยีศุสฺตา อวาทีตฺ, มา พิภีต, ยูยํ คตฺวา มม ภฺราตฺฤนฺ คาลีลํ ยาตุํ วทต, ตตฺร เต มำ ทฺรกฺษฺยนฺติฯ
11 ११ त्या स्त्रिया शिष्यांना सांगण्यासाठी गेल्या. तेव्हा कबरेवरील पहारेकरी शिपायांतील काहीजण नगरात गेले आणि त्यांनी घडलेले सर्व मुख्य याजकांना सांगितले.
สฺตฺริโย คจฺฉนฺติ, ตทา รกฺษิณำ เกจิตฺ ปุรํ คตฺวา ยทฺยทฺ ฆฏิตํ ตตฺสรฺวฺวํ ปฺรธานยาชกานฺ ชฺญาปิตวนฺต: ฯ
12 १२ नंतर याजक जाऊन वडीलजनांना भेटले आणि त्यांनी एक कट रचला. त्यांनी शिपायांना पुष्कळ पैसे देऊन असे म्हणण्यास सांगितले.
เต ปฺราจีไน: สมํ สํสทํ กฺฤตฺวา มนฺตฺรยนฺโต พหุมุทฺรา: เสนาโภฺย ทตฺตฺวาวทนฺ,
13 १३ ते म्हणाले, “लोकांस असे सांगा की, आम्ही रात्री झोपेत असताना येशूचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचे शरीर चोरुन नेले.
อสฺมาสุ นิทฺริเตษุ ตจฺฉิษฺยา ยามินฺยามาคตฺย ตํ หฺฤตฺวานยนฺ, อิติ ยูยํ ปฺรจารยตฯ
14 १४ हे जर राज्यापालाच्या कानावर गेले तर आम्ही त्याच मन वळवू देऊ आणि तुम्हास काही होऊ देणार नाही.”
ยเทฺยตทธิปเต: โศฺรตฺรโคจรีภเวตฺ, ตรฺหิ ตํ โพธยิตฺวา ยุษฺมานวิษฺยาม: ฯ
15 १५ मग शिपायांनी पैसे घेतले व याजकांनी सांगितले तसे केले आणि ही गोष्ट यहूदी लोकात आजवर बोलण्यात येते.
ตตเสฺต มุทฺรา คฺฤหีตฺวา ศิกฺษานุรูปํ กรฺมฺม จกฺรุ: , ยิหูทียานำ มเธฺย ตสฺยาทฺยาปิ กึวทนฺตี วิทฺยเตฯ
16 १६ पण अकरा शिष्य गालील प्रांतात येशूने त्यांना सांगितलेल्या डोंगरावर निघून गेले.
เอกาทศ ศิษฺยา ยีศุนิรูปิตาคาลีลสฺยาทฺรึ คตฺวา
17 १७ आणि त्यांनी त्यास बघितले तेव्हा त्यांनी त्याची उपासना केली. पण काहींना संशय आला.
ตตฺร ตํ สํวีกฺษฺย ปฺรเณมุ: , กินฺตุ เกจิตฺ สนฺทิคฺธวนฺต: ฯ
18 १८ तेव्हा येशू त्यांच्याकडे आला आणि म्हणाला, “स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला देण्यात आला आहे.
ยีศุเสฺตษำ สมีปมาคตฺย วฺยาหฺฤตวานฺ, สฺวรฺคเมทิโนฺย: สรฺวฺวาธิปติตฺวภาโร มยฺยรฺปิต อาเสฺตฯ
19 १९ म्हणून तुम्ही जा आणि राष्ट्रांतील लोकांस माझे शिष्य करा. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावाने बाप्तिस्मा द्या.
อโต ยูยํ ปฺรยาย สรฺวฺวเทศียานฺ ศิษฺยานฺ กฺฤตฺวา ปิตุ: ปุตฺรสฺย ปวิตฺรสฺยาตฺมนศฺจ นามฺนา ตานวคาหยต; อหํ ยุษฺมานฺ ยทฺยทาทิศํ ตทปิ ปาลยิตุํ ตานุปาทิศตฯ
20 २० आणि जे काही मी तुम्हास शिकविले आहे ते त्या लोकांस पाळायला शिकवा आणि पाहा, युगाच्या शेवटापर्यंत मी सदोदित तुमच्याबरोबर आहे.” (aiōn )
ปศฺยต, ชคทนฺตํ ยาวตฺ สทาหํ ยุษฺมาภิ: สากํ ติษฺฐามิฯ อิติฯ (aiōn )