< मत्तय 25 >

1 तेव्हा त्या दिवसात स्वर्गाचे राज्य दहा कुमारींसारखे असेल, त्यांनी त्यांचे दिवे घेतले व वराला भेटण्यास गेल्या.
「その時,天の王国は,自分のともし火を持って花婿を迎えに出た十人の処女のようになる。
2 त्यांच्यातल्या पाच मूर्ख होत्या आणि पाच शहाण्या होत्या.
そのうち五人は愚かで,五人は賢かった。
3 मूर्ख कुमारींनी आपले दिवे घेतले, पण दिव्यासाठी तेल घेतले नाही.
愚かな者たちは,ともし火を持って行くとき,一緒に油を持って行かなかった。
4 शहाण्या कुमारींनी दिव्याबरोबर आपल्या भांड्यात तेल घेतले.
だが,賢い者たちは,ともし火と一緒に油を器に入れて持って行った。
5 आता वराला उशीर झाल्याने त्या सर्वांना डुलक्या लागल्या व त्या झोपी गेल्या
さて,花婿が遅れている間に,彼女たちはみな,うとうとして眠り込んでしまった。
6 मध्यरात्री कोणीतरी घोषणा केली, वर येत आहे! बाहेर जाऊन त्यास भेटा!
ところが,真夜中に,『見よ! 花婿が来た! 彼を迎えに出よ!』という叫びが上がった。
7 सर्व कुमारिका जाग्या झाल्या आणि त्यांनी आपले दिवे तयार केले.
その時,それらの処女たちはみな起き上がり,自分たちのともし火を整えた。
8 तेव्हा मूर्ख शहाण्यांना म्हणाल्या, तुमच्या तेलातून आम्हास द्या. आमचे दिवे विझत आहेत.
愚かな者たちは賢い者たちに言った,『あなた方の油を少し分けてください。わたしたちのともし火は消えそうですから』。
9 पण शहाण्यांनी उत्तर देऊन म्हणले; ते तुम्हास आणि आम्हास कदाचित पुरणार नाही; त्यापेक्षा तुम्ही विकणाऱ्यांकडे जा आणि तुमच्यासाठी विकत घ्या.
だが,賢い者たちは答えて言った,『わたしたちとあなた方に足りるほどはないかも知れません。それより,商人たちのところに行って,自分のために買いなさい』。
10 १० त्या तेल विकत घ्यायला गेल्या तेव्हा वर आला. तेव्हा ज्या तयार होत्या त्या मेजवानीसाठी त्याच्याबरोबर आत गेल्या. मग दरवाजा बंद झाला.
彼女たちが買いに出ている間に,花婿が来た。そして,用意ができている者たちは,彼と共に婚宴の部屋に入った。それから戸が閉められた。
11 ११ नंतर दुसऱ्या कुमारींकाही आल्या आणि म्हणाल्या, प्रभूजी प्रभूजी आमच्यासाठी दरवाजा उघडा
その後,ほかの処女たちもやって来て,『主よ,主よ,わたしたちに開けてください』と言った。
12 १२ पण त्याने उत्तर देऊन म्हटले, मी तुम्हास खरे सांगतो, मी तुम्हास ओळखत नाही.
だが,彼は答えた,『本当にはっきりとあなた方に告げる。わたしはあなた方を知らない』。
13 १३ म्हणून नेहमी तयार असा, कारण मनुष्याचा पुत्र कधी येणार तो दिवस व ती वेळ तुम्हास माहीत नाही.
だから,見張っていなさい。あなた方は人の子が来るその日もその時も知らないからだ。
14 १४ कारण हे दूरदेशी जाणाऱ्या मनुष्यासारखे आहे, ज्याने प्रवासास जाण्याअगोदर आपल्या चाकरांना बोलावून आपली मालमत्ता त्यांच्या हाती दिली.
「それは,外国に出かけるとき,自分の召使いたちを呼んで,彼らに自分の財産を託した人のようだからだ。
15 १५ त्यांच्यातील एकाला त्याने पाच हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या, दुसऱ्याला त्याने दोन हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या आणि तिसऱ्याला त्याने एक हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या दिल्या. प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्याने पैसे दिले. मग तो आपल्या प्रवासास गेला.
それぞれの能力に応じて,ある者には五タレント,別の者には二タレント,別の者には一タレントを与えてから,旅に出た。
16 १६ ज्याला पाच हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या दिल्या होत्या त्याने त्याप्रमाणे काम करायला सुरूवात केली आणि आणखी पाच हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या त्याने मिळविल्या.
五タレントを受けた者はすぐに出て行き,それを使って商売をし,ほかに五タレントをもうけた。
17 १७ त्याचप्रमाणे, ज्याला दोन हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या मिळाल्या होत्या त्याने आणखी दोन हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या कमविल्या.
二タレントを受けた者も,同じくほかに二タレントをもうけた。
18 १८ पण ज्याला एक हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या मिळाल्या होत्या, त्याने जमिनीत एक खड्डा खोदला आणि मालकाचे नाणे त्यामध्ये लपवले.
だが,一タレントを受けた者は,出て行って地面に穴を掘り,自分の主人のお金を隠しておいた。
19 १९ बराच काळ लोटल्यानंतर त्या चाकरांचा मालक आला व त्याने त्यांचा हिशोब घ्यायला सुरुवात केली.
「さて,長い時ののち,それらの召使いたちの主人がやって来て,彼らと貸し借りを精算した。
20 २० ज्याला पाच हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या मिळाल्या होत्या, त्याने मालकाकडे आणखी पाच हजार आणून दिल्या, तो म्हणाला, मालक, तुम्ही दिलेल्या नाण्यांवर मी आणखी पाच हजार नाणी मिळविली.
五タレントを受けた者が進み出て,ほかの五タレントを差し出して言った,『ご主人様,あなたはわたしに五タレントを渡されました。ご覧ください,わたしはさらに五タレントをもうけました』。
21 २१ त्याचा मालक म्हणाला, शाब्बास, चांगल्या आणि विश्वासू दासा, तू भरंवसा ठेवण्यायोग्य चाकर आहेस, तू थोड्या नाण्यांविषयी इमानीपणे वागलास, म्हणून मी पुष्कळावर तुझी नेमणूक करीन. आत जा आणि आपल्या मालकाच्या आनंदात सहभागी हो!
「彼の主人は彼に言った,『よくやった,忠実な善い召使いよ。あなたはわずかなものに忠実だったから,多くのものの上に任命しよう。あなたの主人の喜びに入りなさい』。
22 २२ नंतर ज्या मनुष्यास दोन हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या मिळाल्या होत्या, तो मालकाकडे आला आणि म्हणाला; मालक, तुम्ही मला दोन हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या दिल्या होत्या त्यापासून मी आणखी दोन हजार कमवल्या आहेत.
「二タレントを受けた者が進み出て言った,『ご主人様,あなたはわたしに二タレントを渡されました。ご覧ください,わたしはさらに二タレントをもうけました』。
23 २३ मालक म्हणाला, शाब्बास, चांगल्या आणि विश्वासू दासा, तू भरंवसा ठेवण्यायोग्य चाकर आहेस, तू थोड्या नाण्यांविषयी इमानीपणे वागलास, म्हणून मी पुष्कळावर तुझी नेमणूक करीन. आत जा आणि आपल्या मालकाच्या आनंदात सहभागी हो!
「彼の主人は彼に言った,『よくやった,忠実な善い召使いよ。あなたはわずかなものに忠実だったから,多くのものの上に任命しよう。あなたの主人の喜びに入りなさい』。
24 २४ नंतर ज्याला एक हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या मिळाल्या होत्या, तो मालकाकडे आला व म्हणाला, मालक, मला माहीत होते की आपण एक कठीण शिस्तीचे मनुष्य आहात. जेथे पेरणी केली नाही तेथे तुम्ही कापणी करता आणि जेथे बी पेरले नाही तेथे पीक घेता.
「一タレントを受けた者も進み出て言った,『ご主人様,わたしはあなたが厳しい方で,種をまかなかった所で刈り取り,散らさなかった所で集められるということを知っていました。
25 २५ मला आपली भीती होती. म्हणून मी जाऊन तुमच्या एक हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या जमिनीत लपवून ठेवल्या. हे घ्या! हे तुमच्याच आहेत!
わたしは怖くなり,行ってあなたの一タレントを地中に隠しました。ご覧ください,これがあなたのものです』。
26 २६ मालकाने उत्तर दिले, अरे वाईट आणि आळशी चाकरा, मी जेथे पेरणी केली नाही तेथे कापणी करतो आणि जेथे बी पेरले नाही तेथे पीक घेतो, हे तुला माहीत होते.
「だが,彼の主人は彼に答えた,『無精な悪い召使いよ。あなたはわたしが種をまかなかった所で刈り取り,散らさなかった所で集めることを知っていたのか。
27 २७ तर तू माझी नाणी सावकाराकडे ठेवायचे होतेस म्हणजे मी घरी आल्यावर मला ते व्याजासहित मिळाले असते.
それなら,わたしのお金を銀行家に預けておくべきだった。そうすれば,帰って来た時,自分のものを利息と一緒に戻してもらえただろうに。
28 २८ म्हणून मालकाने दुसऱ्या चाकरांना सांगितले, याच्याजवळच्या एक हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या घ्या आणि ज्याच्याजवळ दहा हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या आहेत त्यास द्या.
だから,その一タレントを彼から取り上げて,十タレント持っている者に与えなさい。
29 २९ कारण आपल्याकडे जे आहे, त्याचा वापर करणाऱ्याला आणखी देण्यात येईल आणि त्यास भरपूर होईल, पण जो आपल्याजवळ असलेल्याचा उपयोग करीत नाही त्याच्याजवळ जे काही असेल ते सर्व त्याजपासून काढून घेण्यात येईल.
だれでも持っている者にはさらに与えられて豊かになるが,持っていない者からはその持っているものまでも取り去られることになるからだ。
30 ३० नंतर मालक म्हणाला, त्या निकामी चाकराला बाहेरच्या अंधारात टाक. तेथे रडणे व दात खाणे चालेल, मनुष्याचा पुत्र सर्वांचा न्याय करील.
この役に立たない召使いを外の闇に投げ出せ。そこには嘆きと歯ぎしりとがあるだろう』。
31 ३१ मनुष्याचा पुत्र जेव्हा त्याच्या स्वर्गीय गौरवाने आपल्या देवदूतांसह येईल तेव्हा तो त्याच्या गौरवी राजासनावर बसेल.
「さて,人の子が自分の栄光のうちに到来し,すべての聖なるみ使いたちが彼と共に到来するその時,彼は自分の栄光の座に着くだろう。
32 ३२ मग सर्वं राष्ट्रे त्याच्यासमोर एकत्र जमतील. त्यांना तो एकमेकांपासून विभक्त करील. ज्याप्रमाणे मेंढपाळ मेंढरे शेरडांपासून वेगळी करतो.
すべての民族が彼の前に集められるだろう。そして彼は,羊飼いが羊をヤギからより分けるように,彼らを互いにより分け,
33 ३३ तो मेंढरांना आपल्या उजवीकडे बसवील पण शेरडांना तो डावीकडे बसवील.
羊を自分の右に,ヤギを自分の左に置くだろう。
34 ३४ मग राजा जे त्याच्या उजवीकडे आहेत त्यांना म्हणेल, या, जे तुम्ही माझ्या पित्याचे धन्यवादित आहात! हे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुमच्यासाठी तयार केले आहे त्या राज्याचे वतनदार व्हा.
その時,王は自分の右にいる者たちにこう告げるだろう。『さあ,わたしの父に祝福された者たち,世の基礎が据えられて以来あなた方のために備えられていた王国を受け継ぎなさい。
35 ३५ हे तुमचे राज्य आहे, कारण जेव्हा मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले. मी तहानेला होतो तेव्हा तुम्ही मला प्यावयास दिले. मी परका होतो आणि तुम्ही मला आत घेतले
わたしが飢えると食べ物を与え,わたしが渇くと飲み物を与え,よそから来ると宿を貸し,
36 ३६ मी उघडा होतो तेव्हा तुम्ही मला कपडे दिले. मी आजारी होतो, तेव्हा तुम्ही माझी काळजी घेतली. मी तुरूंगात होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आला.
裸でいると服を着せ,病気でいると見舞い,ろうやにいると来てくれたからだ』。
37 ३७ मग जे नीतिमान आहेत ते उत्तर देतील, प्रभू आम्ही तुला केव्हा भुकेला व तहानेला पाहिले आणि तुला खायला आणि प्यायला दिले?
「その時,義人たちは彼に答えてこう言うだろう。『主よ,いつわたしたちは,あなたが飢えておられるのを見て食物を差し上げたり,渇いておられるのを見て飲み物を差し上げましたか。
38 ३८ आम्ही तुला परका म्हणून कधी पाहिले आणि तुला आत घेतले किंवा आम्ही तुला केव्हा उघडे पाहिले व कपडे दिले?
いつわたしたちは,あなたがよそから来られたのを見て宿を貸し,裸でおられるのを見て服をお着せしましたか。
39 ३९ आणि तू आजारी असताना आम्ही तुला कधी भेटायला आलो? किंवा तुरूंगात असताना कधी तुझ्याकडे आलो?
いつわたしたちは,あなたが病気をなさったり,ろうやにおられるのを見て,あなたのところに参りましたか』。
40 ४० मग राजा त्यांना उत्तर देईल, मी तुम्हास खरे सांगतो येथे असलेल्या माझ्या बांधवातील अगदी लहानातील एकाला तुम्ही केले, तर ते तुम्ही मलाच केले.
「王は彼らにこう答えるだろう。『本当にはっきりとあなた方に告げる。これらわたしの最も小さい兄弟たちの一人にあなた方がしたことは,わたしにしたのだ』。
41 ४१ मग राजा जे आपल्या डाव्या बाजूला आहेत त्यांस म्हणेल, माझ्यापासून दूर जा. तुम्ही शापित आहात, सार्वकालिक अग्नीत जा, हा अग्नी सैतान व त्याच्या दूतांसाठी तयार केला आहे. (aiōnios g166)
それから,王はまた自分の左にいる者たちにこう言うだろう。『のろわれた者たちよ,わたしから離れて,悪魔とその使いたちのために備えられた永遠の火に入りなさい。 (aiōnios g166)
42 ४२ ही तुमची शिक्षा आहे कारण मी भुकेला होतो पण तुम्ही मला काही खायला दिले नाही, मी तहानेला होतो पण तुम्ही मला काही प्यावयास दिले नाही.
わたしが飢えても食べ物を与えず,わたしが渇いても飲み物を与えず,
43 ४३ मी प्रवासी असता माझा पाहुणचार केला नाही. मी वस्त्रहीन होतो. पण तुम्ही मला कपडे दिले नाहीत. मी आजारी आणि तुरूंगात होतो पण तुम्ही माझी काळजी घेतली नाही.
よそから来ても宿を貸さず,裸でいても服を着せず,病気でいたり,ろうやにいても見舞ってくれなかったからだ』。
44 ४४ मग ते लोकसुद्धा त्यास उत्तर देतील, प्रभू आम्ही कधी तुला उपाशी किंवा तहानेले पाहिले किंवा प्रवासी म्हणून कधी पाहिले? किंवा वस्त्रहीन, आजारी किंवा तुरूंगात कधी पाहिले आणि तुला मदत केली नाही?
「その時,彼らも答えてこう言うだろう。『主よ,いつわたしたちは,あなたが飢えておられたり,渇いておられたり,よそから来られたり,裸でおられたり,病気をなさったり,ろうやにおられるのを見て,お世話をしませんでしたか』。
45 ४५ मग राजा त्यांना उत्तर देईल, मी तुम्हास खरे सांगतोः माझ्या अनुयायांतील लहानातील लहानाला काही करण्याचे जेव्हा जेव्हा तुम्ही नाकारले, तेव्हा तेव्हा ते तुम्ही मला करण्याचे नाकारले.
「その時,彼は彼らに答えてこう言うだろう。『本当にはっきりとあなた方に告げる。これらわたしの最も小さい兄弟たちの一人にあなた方がしなかったことは,わたしにしなかったのだ』。
46 ४६ “मग ते अनीतिमान लोक सार्वकालिक शिक्षा भोगण्यास जातील, पण नीतिमान सार्वकालिक जीवन उपभोगण्यास जातील.” (aiōnios g166)
これらの者は永遠の処罰に入り,義人たちは永遠の命に入るだろう」 。 (aiōnios g166)

< मत्तय 25 >