< मत्तय 24 >
1 १ मग येशू परमेश्वराच्या भवनातून बाहेर येऊन पुढे जात होता, त्याचे शिष्य त्याच्याकडे त्यास परमेश्वराचे भवन दाखवायला आले.
Jesús salió del templo y siguió su camino. Sus discípulos se acercaron a él para mostrarle los edificios del templo.
2 २ परंतु त्याने, त्यांना उत्तर देऊन म्हटले, “तुम्ही या सर्व गोष्टी पाहता ना? आता, मी तुम्हास खरे सांगतो, येथे एक दगड दुसऱ्या दगडावर राहू दिला जाणार नाही.”
Pero él les respondió: “¿Veis todo esto, verdad? Os aseguro que no quedará aquí una piedra sobre otra que no sea derribada”.
3 ३ मग तो जैतूनाच्या डोंगरावर बसला असताना, त्याचे शिष्य त्याच्याशी एकांतात येऊन म्हणाले, “आम्हास सांगा की या गोष्टी कधी होतील? आपल्या येण्याचा आणि युगाचा शेवट होण्याचा समय जवळ आला आहे हे आम्ही कोणत्या चिन्हावरून ओळखावे?” (aiōn )
Mientras estaba sentado en el Monte de los Olivos, los discípulos se acercaron a él en privado, diciendo: “Dinos, ¿cuándo serán estas cosas? ¿Cuál es la señal de tu venida y del fin de los tiempos?” (aiōn )
4 ४ येशूने त्यांना उत्तर दिले, “सांभाळ कोणीही तुम्हास फसवू नये.
Jesús les contestó: “Tened cuidado de que nadie os engañe.
5 ५ कारण माझ्या नावाने पुष्कळजण येतील आणि म्हणतील, मी ख्रिस्त आहे आणि ते पुष्कळ लोकांस फसवतील.
Porque vendrán muchos en mi nombre, diciendo: “Yo soy el Cristo”, y engañarán a muchos.
6 ६ सांभाळ, तुम्ही लढायांबद्दल आणि लढायांच्या अफवांबद्दल ऐकाल पण त्यामुळे तुम्ही त्यांना भिऊ नका. या गोष्टी घडल्याच पाहिजेत. तरी इतक्यात शेवट जवळ येणार नाही.
Oiréis hablar de guerras y rumores de guerras. Mirad que no os turbéis, porque es necesario que todo esto ocurra, pero aún no es el fin.
7 ७ कारण, एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर उठेल. अनेक ठिकाणी भूकंप व दुष्काळ येतील.
Porque se levantará nación contra nación, y reino contra reino; y habrá hambres, plagas y terremotos en diversos lugares.
8 ८ पण या सर्व गोष्टी प्रसूतीवेदनांची सुरूवात अशा आहेत.
Pero todas estas cosas son el principio de los dolores de parto.
9 ९ ते तुम्हास छळणुकीसाठी धरून देतील आणि तुम्हास जिवे मारतील आणि माझ्या नावाकरता सर्व राष्ट्रे तुमचा द्वेष करतील.
“Entonces te entregarán a la tribulación y te matarán. Seréis odiados por todas las naciones por causa de mi nombre.
10 १० मग पुष्कळांना अडथळा होईल. ते एकमेकांविरुद्ध उठतील आणि एकमेकांचा द्वेष करतील.
Entonces muchos tropezarán, se entregarán unos a otros y se odiarán.
11 ११ अनेक खोटे संदेष्टे उठतील आणि, ते पुष्कळांना फसवतील.
Se levantarán muchos falsos profetas y llevarán a muchos por el mal camino.
12 १२ सतत वाढणाऱ्या दुष्टाईमुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल.
Porque se multiplicará la iniquidad, el amor de muchos se enfriará.
13 १३ पण जो मनुष्य शेवटपर्यंत टिकून राहिल तोच तारला जाईल.
Pero el que aguante hasta el final se salvará.
14 १४ सर्व राष्ट्रांना साक्ष व्हावी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगभर गाजवली जाईल आणि मग शेवट होईल.
Esta Buena Nueva del Reino será predicada en todo el mundo para testimonio de todas las naciones, y entonces vendrá el fin.
15 १५ तर दानीएल संदेष्ट्याने सांगितले होते, ओसाड करणारी अमंगळ गोष्ट, पवित्र जागी परमेश्वराच्या भवनामध्ये उभी असलेली तुम्ही पाहाल.” (वाचकाने हे ध्यानात घ्यावे.)
“Por tanto, cuando veáis la abominación de la desolación, de la que se habló por medio del profeta Daniel, de pie en el lugar santo (que el lector entienda),
16 १६ त्यावेळी यहूदीया प्रांतातील लोकांनी डोंगरावर पळून जावे.
entonces los que estén en Judea huyan a las montañas.
17 १७ जो कोणी छतावर असेल त्याने घरातील सामान घेण्यासाठी खाली येऊ नये.
Que el que esté en la azotea no baje a sacar las cosas que están en su casa.
18 १८ जर कोणी शेतात असेल तर त्याने आपला सदरा घेण्यासाठी माघारी परत जाऊ नये.
Que el que esté en el campo no regrese a buscar su ropa.
19 १९ त्याकाळी गर्भवती असलेल्या किंवा अंगावर पाजीत असतील अश्या स्त्रियांना फार कठीण जाईल.
Pero ¡ay de las que estén embarazadas y de las madres lactantes en esos días!
20 २० जेव्हा या गोष्टी होतील तेव्हा थंडीचे दिवस अथवा शब्बाथ दिवस नसावा यासाठी प्रार्थना करा.
Rogad que vuestra huida no sea en invierno ni en sábado,
21 २१ कारण जगाच्या आरंभापासून कधीही झाली नाही आणि पुन्हा कधी होणार नाही अशी मोठी संकट त्याकाळी येतील.
porque entonces habrá un gran sufrimiento, como no lo ha habido desde el principio del mundo hasta ahora, ni lo habrá jamás.
22 २२ आणखी, देवाने ते दिवस जर थोडेच ठेवले नसते तर कोणीही मनुष्य वाचला नसता. परंतु त्याच्या निवडलेल्यांसाठी तो ते दिवस थोडे करील.
Si no se acortaran esos días, ninguna carne se habría salvado. Pero por el bien de los elegidos, esos días serán acortados.
23 २३ त्यावेळी जर एखाद्याने तुम्हास म्हटले, पाहा! ख्रिस्त येथे आहे किंवा तो तेथे आहे, तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका.
“Entonces, si alguien les dice: ‘He aquí el Cristo’ o ‘Allí’, no lo crean.
24 २४ खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेष्टे उदयास येतील. ते महान आश्चर्यकारक चिन्हे दाखवतील. देवाच्या निवडलेल्या लोकांस ते चिन्हे दाखवतील व लोकांस एवढेच नव्हे तर देवाच्या निडवलेल्यांना फसविण्याचा प्रयत्न करतील.
Porque se levantarán falsos cristos y falsos profetas, y harán grandes señales y prodigios, para extraviar, si es posible, incluso a los elegidos.
25 २५ या गोष्टी होण्याअगोदरच मी तुम्हास सावध केले आहे.
“He aquí que os lo he dicho de antemano.
26 २६ एखादा मनुष्य तुम्हास सांगेल, पाहा, ख्रिस्त अरण्यात आहे. तर तेथे जाऊ नका. किंवा जर ते म्हणाले, पाहा, तो आतल्या खोलीत आहे, तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका.
“Por tanto, si os dicen: ‘He aquí que está en el desierto’, no salgáis; o ‘He aquí que está en las habitaciones interiores’, no lo creáis.
27 २७ मी हे म्हणतो कारण वीज जशी पूर्वेकडून पश्चिमेकडे चमकताना सर्वांना दिसते तसेच मनुष्याच्या पुत्राचे येणे देखील होईल.
Porque como el rayo que sale del oriente y se ve hasta el occidente, así será la venida del Hijo del Hombre.
28 २८ जेथे कोठे प्रेत असेल तेथे गिधाडेही जमतील.
Porque donde está el cadáver, allí se reúnen los buitres.
29 २९ सांभाळत्या दिवसातल्या छळानंतर लगेच असे घडेल; सूर्य अंधकारमय होईल व चंद्र प्रकाश देणार नाही, आकाशातील तारे गळून पडतील, आकाशातील सर्व बळे डळमळतील, आकाश गुंडाळीसारखे गुंडाळले जाईल.
“Pero inmediatamente después la tribulación de esos días, el sol se oscurecerá, la luna no dará su luz, las estrellas caerán del cielo y las potencias de los cielos serán sacudidas;
30 ३० तेव्हा मनुष्याच्या पुत्राच्या येण्याचे चिन्ह आकाशात दिसेल. तेव्हा जगातील सर्व वंश आपले ऊर बडवून घेतील. मनुष्याच्या पुत्राला आकाशांतल्या मेघांवर आरूढ होऊन सामर्थ्याने आणि मोठ्या गौरवाने येताना पाहतील.
y entonces aparecerá en el cielo la señal del Hijo del Hombre. Entonces todas las tribus de la tierra se lamentarán, y verán al Hijo del Hombre venir sobre las nubes del cielo con poder y gran gloria.
31 ३१ मनुष्याचा पुत्र कर्ण्याच्या मोठ्या नादात आपले देवदूत पृथ्वीभोवती पाठवून देईल. ते पृथ्वीच्या चारही कोपऱ्यातून, आकाशाच्या एका सीमेपासून दुसऱ्या सीमेपर्यंत निवडलेल्यांना गोळा करतील.
Enviará a sus ángeles con gran sonido de trompeta, y reunirán a sus elegidos de los cuatro vientos, desde un extremo del cielo hasta el otro.
32 ३२ अंजिराच्या झाडापासून शिका; अंजिराच्या झाडाच्या फांद्या जेव्हा हिरव्या आणि कोवळ्या असतात आणि पाने फुटू लागतात तेव्हा उन्हाळा जवळ आला हे तुम्हास कळते.
“Aprended ahora de la higuera esta parábola: Cuando su rama ya está tierna y produce sus hojas, sabéis que el verano está cerca.
33 ३३ त्याचप्रमाणे तुम्ही या सर्व गोष्टी पाहाल तेव्हा हे जाणा की, तो दरवाजाजवळ आहे.
Así también vosotros, cuando veáis todas estas cosas, sabed que está cerca, incluso a las puertas.
34 ३४ मी तुम्हास खरे सांगतो, या सर्व गोष्टी पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही.
De cierto os digo que no pasará esta generación hasta que se cumplan todas estas cosas.
35 ३५ आकाश आणि पृथ्वी नाहीशी होतील पण माझी वचने कधीही नष्ट होणार नाहीत.
El cielo y la tierra pasarán, pero mis palabras no pasarán.
36 ३६ पण त्या दिवसाविषयी आणि त्या घटकेविषयी पित्याशिवाय कोणीही काही जाणत नाही. स्वर्गातील देवदूतही जाणत नाही किंवा स्वतः पुत्रही जाणत नाही.
“Pero nadie sabe de ese día y de esa hora, ni siquiera los ángeles del cielo, sino sólo mi Padre.
37 ३७ नोहाच्या काळी घडले तसे मनुष्याच्या पुत्राच्या येण्याच्या वेळेसही होईल.
Como los días de Noé, así será la venida del Hijo del Hombre.
38 ३८ तेव्हा जसे महापूर येण्याअगोदर लोक खातपीत होते, लोक लग्न करीत होते, लग्न करून देत होते. नोहा तारवात जाईपर्यंत लोक या गोष्टी करीत होते.
Porque como en los días anteriores al diluvio estaban comiendo y bebiendo, casándose y dando en matrimonio, hasta el día en que Noé entró en la nave,
39 ३९ आणि महापूर येऊन त्यांना घेऊन गेला तोपर्यंत त्यांना समजले नाही. तसेच मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल.
y no lo supieron hasta que vino el diluvio y se los llevó a todos, así será la venida del Hijo del Hombre.
40 ४० दोघे जण शेतात एकत्र काम करत असतील तर त्यातला एकजण वर घेतला जाईल आणि दुसरा तेथेच राहील.
Entonces dos hombres estarán en el campo: uno será tomado y otro será dejado.
41 ४१ दोन स्त्रिया जात्यावर दळीत असतील तर त्या दोघीतील एक वर घेतली जाईल आणि दुसरी तेथेच राहील.
Dos mujeres estarán moliendo en el molino: una será tomada y la otra será dejada.
42 ४२ म्हणून तुम्ही जागृत असा, कारण तुम्हास माहीत नाही की कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येत आहे,
Velad, pues, porque no sabéis a qué hora vendrá vuestro Señor.
43 ४३ हे लक्षात ठेवा, चोर केव्हा येईल हे जर घराच्या मालकाला माहीत असते तर तो त्यासाठी तयारीत राहिला असता आणि त्याने चोराला घर फोडू दिले नसते.
Pero sabed esto, que si el dueño de la casa hubiera sabido a qué hora de la noche iba a venir el ladrón, habría velado y no habría permitido que entraran en su casa.
44 ४४ या कारणासाठी तुम्हीसुद्धा तयार असले पाहिजे. जेव्हा तुम्हास अपेक्षा नसेल तेव्हा मनुष्याचा पुत्र येईल.
Por tanto, estad también preparados, porque a una hora que no esperáis, vendrá el Hijo del Hombre.
45 ४५ तर ज्याला त्याच्या धन्याने आपल्या परिवाराला, त्यांना त्याचे अन्न वेळेवर द्याव म्हणून नेमल आहे तो विश्वासू आणि विचारी दास कोण आहे?
“¿Quién es, pues, el siervo fiel y prudente al que su señor ha puesto al frente de su casa para que les dé el alimento a su debido tiempo?
46 ४६ जो दास त्याच्या धन्याला तो येईल तेव्हा तसे करताना आढळेल तो धन्य आहे!
Dichoso aquel siervo al que su señor encuentre haciendo eso cuando venga.
47 ४७ मी तुम्हास खरे सांगतो की, मालक आपल्या सर्व मालमत्तेवर त्या चाकराची नेमणूक करील.
Ciertamente os digo que lo pondrá sobre todo lo que tiene.
48 ४८ पण जर तो दुष्ट दास आपल्या मनात असे म्हणेल की, माझा धनी विलंब करीत आहे,
Pero si ese siervo malo dice en su corazón: “Mi señor se demora en venir”,
49 ४९ तो चाकर इतर चाकरांना मारहाण करील आणि आपल्यासारख्या लोकांबरोबर जेवण करील आणि दारू पिऊन मस्त होईल.
y comienza a golpear a sus consiervos, y a comer y beber con los borrachos,
50 ५० आणि तो चाकर तयारीत नसेल तेव्हा मालक येईल.
el señor de ese siervo vendrá en un día en que no lo espera y en una hora en que no lo sabe,
51 ५१ मग मालक त्या चाकराचे तुकडे करील. त्या चाकराला मालक ढोंगी लोकांबरोबर राहायला पाठवील आणि त्याठिकाणी रडणे व दात खाणे चालेल.
y lo despedazará y pondrá su parte con los hipócritas. Allí será el llanto y el rechinar de dientes.