< मत्तय 23 >
1 १ येशू लोकांशी व त्याच्या शिष्यांशी बोलला,
Рече тодї Ісус до народу, та до учеників своїх:
2 २ तो म्हणाला, “नियमशास्त्राचे शिक्षक व परूशी हे मोशेच्या आसनावर बसले आहेत.
глаголючи: На Мойсейових сїдалищах посїдали письменники та Фарисеї.
3 ३ म्हणून ते जसे सांगतात तसे तुम्ही करा आणि पाळा. पण तुम्ही त्यांच्या कृतीप्रमाणे तसे करू नका. याचे कारण ते सांगतात पण त्याप्रमाणे करत नाहीत.
Тим усе, що скажуть вам держати, держіть і робіть; по ділам же їх не робіть: говорять бо, й не роблять.
4 ४ वाहावयास अवघड असे ओझे ते बांधतात व लोकांच्या खांद्यांवर देतात पण स्वतः ते ओझे उचलायला एक बोटदेखील लावत नाहीत.
Вяжуть бо тяжкі оберемки, що важко носити, й кладуть людям на плечі; самі ж і пальцем своїм не хочуть двигнути їх.
5 ५ ते त्यांचे सर्व कामे लोकांनी पाहावे म्हणून करतात कारण ते आपली स्मरणपत्रे रूंद करतात आणि आपल्या झग्यांचे काठ मोठे करतात.
Усї ж дїла свої роблять, щоб бачили їх люде: ширять Филактериї свої, й побільшують поли в одежі своїй,
6 ६ मेजवानीच्या ठिकाणी आपल्याला विशेष मानाची जागा मिळावी असे त्यांना वाटते. तसेच यहूद्यांच्या सभास्थानात मोक्याच्या जागी बसायला त्यांना फार आवडते.
і люблять перші місця на бенкетах, і перші сідання по школах,
7 ७ बाजारातील मुख्य रस्त्याने जाता येता लोकांनी आपल्याला मान द्यावा याची त्यांना फार आवड असते आणि लोकांनी त्यांना ‘रब्बी’ म्हणावे असे त्यांना वाटते.
і витання на торгах, і щоб звали їх люде: Учителю, учителю.
8 ८ परंतु तुम्ही स्वतःला ‘रब्बी’ म्हणवून घेऊ नका. तुम्ही सर्व एकमेकांचे भाऊ आहात, तुमचा गुरू एकच आहे.
Ви ж не зовіть ся учителями, один бо ваш учитель - Христос; усї ж ви брати.
9 ९ आणि जगातील कोणालाही पिता म्हणू नका कारण तुमचा पिता एकच आहे व तो स्वर्गात आहे.
І отця не звіть собі на землї, один бо Отець у вас, що на небі.
10 १० तुम्ही स्वतःला मालक म्हणून घेऊ नका. तुमचा मालक ख्रिस्त आहे.
І не звіть ся наставниками, один бо в вас наставник - Христос.
11 ११ तुमच्यातील जो सेवक बनून तुमची सेवा करतो तो तुमच्यात सर्वात मोठा होय.
Більший же між вами нехай буде вам слугою.
12 १२ जो स्वतःला मोठा समजेल त्यास कमी लेखले जाईल. स्वतःला लहान समजणारा प्रत्येकजण मोठा गणला जाईल.
Хто ж нести меть ся вгору, принизить ся, а хто принизить ся, пійде вгору.
13 १३ अहो, परूश्यांनो आणि नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्हास हाय, तुम्ही ढोंगी आहात! तुम्ही स्वर्गाच्या राज्याचा रस्ता लोकांसाठी बंद करता, तुम्ही स्वतः तर आत जात नाहीच, पण जे आत जाण्याचा प्रयत्न करतात त्यांनाही आत जाऊ देत नाहीत.
Горе ж вам, письменники та Фарисеї, лицеміри! що зачиняєте царство небесне перед людми; ви бо не входите, й тих, що входять, не пускаєте ввійти.
14 १४ अहो परूश्यांनो व नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, ढोंग्यांनो तुमची केवढी दुर्दशा होणार कारण तुम्ही विधवांची घरे खाऊन टाकता व ढोंगाने लांब लांब प्रार्थना करता; यामुळे तुम्हास अधिक शिक्षा होइल.
Горе вам, письменники та Фарисеї, лицеміри! що жерете доми вдовиць, й задля виду довго молитесь; тим ще тяжчий приймете осуд.
15 १५ परूश्यांनो व नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दुःखी व्हाल. तुम्ही ढोंगी आहात कारण तुम्ही एक मतानुसारी करण्यासाठी समुद्र व भूमी पालथी घालता आणि तुम्हास तो मिळाला म्हणजे तुम्ही त्यास आपल्याहून दुप्पट नरकपुत्रासारखे करून टाकता. (Geenna )
Горе вам, письменники та Фарисеї, лицеміри! що проходите море й землю, щоб зробити одного нововірця, і коли станеть ся, робите його сином пекла, удвоє гіршим вас. (Geenna )
16 १६ तुम्हास दुःख होईल. आंधळ्या वाटाड्यांनो, जे तुम्ही म्हणता, जर कोणी परमेश्वराच्या भवनाची शपथ घेतो तर काही नाही; पण जर एखादा त्या भवनातील सोन्याची शपथ घेऊन बोलतो, तर तो बांधलेला आहे.
Горе вам, проводирі слїпі, що кажете: Хто клясти меть ся церквою, нїчого; хто ж покленеть ся золотом Церковним, винуватий!
17 १७ तुम्ही मूर्ख आंधळे आहात. सोने आणि परमेश्वराचे भवन यांपैकी कोणते अधिक महत्त्वाचे आहे? ते सोने किंवा भवन, जे त्या सोन्याला पवित्र बनवते.
Дурні й слїпі: що бо більше: золото, чи церква, що осьвячує золото?
18 १८ आणि तुम्ही असे म्हणता. जर एखादा वेदीची शपथ घेतो तर त्यामध्ये काही वावगे नाही. पण जर एखादा वेदीवरील अर्पणाची शपथ घेतो तर तो बांधलेला आहे.
І: Хто клясти меть ся жертівнею, нічого, хто ж покленеть ся даром, що на нїм, винуватий.
19 १९ तुम्ही आंधळे आहात कारण मोठे काय आहे? ते अर्पण की अर्पणाला पवित्र करणारी वेदी?
Дурні й слїпі: що бо більше: дар, їй жертівня, що осьвячує дар?
20 २० म्हणून जो वेदीची शपथ घेतो तो त्या वेदीबरोबर त्यावरच्या सर्वांची शपथ घेतो.
Оце ж, хто клснеть ся жертівнею, кленсть ся нею і всїм, що зверху неї.
21 २१ तसेच जो परमेश्वराच्या भवनाची शपथ घेतो तो भवन व त्यामध्ये राहणाऱ्या देवाची देखील शपथ घेतो.
І хто кленеть ся церквою, кленеть ся нею й тим, що живе в нїй.
22 २२ जो स्वर्गाची शपथ घेतो तो देवाच्या आसनाची व त्यावर बसणाऱ्याचीही शपथ घेतो.
І хто кленеть ся небом, кленеть ся престолом Божим і тим, хто сидить на нїм.
23 २३ परूश्यांनो, नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दुःखी व्हाल. तुम्ही ढोंगी आहात! तुमचे जे काही आहे त्याचा दशांश तुम्ही देवाला देता; पुदिना, शेप, जिरे यांचा देखील दशांश देता. पण नियमशास्त्राच्या महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे: न्याय, दया व विश्वास या गोष्टी तुम्ही सोडल्या आहेत; पण तुम्ही या करायच्या होत्या आणि त्या सोडावयाच्या नव्हत्या.
Горе вам, письменппки та Фарисеї, лицеміри! що даєте десятину з мяти, й кропу, й кмину, а залишили важнїще в законї: суд, і милость, і віру. Се повинні були робити, да й того не залишати.
24 २४ तुम्ही आंधळे वाटाडे आहात. तुम्ही डास गाळून काढता व उंट गिळून टाकता.
Проводпрі слїпі, що відціджуєте комара, верблюда ж глитаєте.
25 २५ अहो परूश्यांनो, नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दुःखी व्हाल, तुम्ही ढोंगी आहात! तुम्ही आपल्या ताट व वाट्या बाहेरून साफ करता पण ते आतून अपहार आणि असंयम यांनी त्या आतून भरल्या आहेत.
Горе вам, письменники та Фарисеї, лицеміри! що очищаєте зверху чашу й блюдо, у серединї ж повні вони здирства та неправди.
26 २६ अहो परूश्यांनो, तुम्ही आंधळे आहात! अगोदर तुमची वाटी आतून घासा व धुवा म्हणजे ती बाहेरून देखील खरोखर साफ होईल.
Фарисею слїпий, очисти перш середину чаші й блюда, щоб і верх їх став ся чистий.
27 २७ अहो परूश्यांनो नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दुःखी व्हाल. तुम्ही ढोंगी आहात! रंगसफेदी केलेल्या कबरांसारखे तुम्ही आहात. त्या वरून चांगल्या दिसतात पण आतून मरण पावलेल्या मनुष्यांच्या हाडांनी भरल्या आहेत.
Горе вам, письменники та Фарисеї, лицеміри! що подобитесь гробам побіляним, що зверху являють ся гарними, в середині ж повні кісток мертвих і всякої нечисти.
28 २८ तुम्ही सर्व लोकांस बाहेरून नीतिमान दिसता पण तुम्ही आतून ढोंग व दुष्टपणा यांनी भरलेले आहात.
Так і ви зверху являєтесь людям праведні, в серединї ж повні лицемірства та беззаконня.
29 २९ अहो परूश्यांनो, नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दुःखी व्हाल. तुम्ही ढोंगी आहात! तुम्ही संदेष्ट्यांच्या कबरा बांधता आणि जे लोक नीतिमान जीवन जगले त्यांच्या कबरा सजवता.
Горе вам, письменники та Фарисеї, лицеміри! що будуєте гроби пророків та украшаєте памятники праведників,
30 ३० आणि तुम्ही म्हणता जर आम्ही आमच्या वाडवडिलांच्या काळात जिवंत असतो तर संदेष्ट्यांच्या रक्तात त्यांचे भागीदार झालो नसतो.
і мовляєте: Коли б ми були за часів батьків наших, не були б спільниками їх у крові пророків.
31 ३१ पण ज्यांनी ज्यांनी संदेष्ट्यांना जिवे मारले, त्यांचेच तुम्ही वंशज आहात असा स्वतःविषयी पुरावा तुम्ही देता.
Сим же сьвідкуєте самі на себе, що ви сини тих, що вбивали пророків.
32 ३२ पुढे व्हा आणि तुमच्या वाडवडिलांनी सुरू केलेली पापी कामे पूर्ण करा.
І ви доповнюйте міру батьків ваших.
33 ३३ तुम्ही साप व विषारी सापाची पिल्ले आहात. तुम्ही नरकाच्या शिक्षेपासून कसे पळाल? (Geenna )
Змії, кодло гадюче, як утїчете від суду пекельного? (Geenna )
34 ३४ मी तुम्हास सांगतो की मी तुमच्याकडे संदेष्टे, ज्ञानी लोक आणि शिक्षक पाठवत आहे. त्यांच्यातील काहींना तुम्ही जिवे माराल. त्यांपैकी काहींना वधस्तंभावर खिळाल. त्यांच्यातील काहींना तुमच्या सभास्थानात फटके माराल आणि एका नगरातून दुसऱ्या नगरात तुम्ही त्यांचा पाठलाग कराल.
Тим же то ось я посилаю до вас пророків, і мудрцїв, і письменників, і одних з них повбиваєте та порозпинаєте, а инших бити мете по школах ваших, та гонити мете від города в город:
35 ३५ म्हणजे नीतिमान हाबेल याच्या रक्तापासून तुम्ही ज्याला वेदी आणि पवित्रस्थान यांच्यामध्ये ठार मारले तो बरख्याचा पुत्र जखऱ्या याच्या रक्तापर्यंत, सर्व नीतिमान लोकांचे रक्त पृथ्वीवर पाडण्यात आले आहे त्यांचा दोष तुमच्यावर यावा.
щоб упала на вас уся кров праведна, пролита на землї від крові Авеля праведного до крові Захарії, сина Варахіїного, що вбили ви між церквою й жертівнею.
36 ३६ मी तुम्हास खरे सांगतो; या सर्व गोष्टीची शिक्षा तुमच्या पिढीवर येईल.”
Істино глаголю вам: Все те прийде на кодло се.
37 ३७ “हे, यरूशलेमे, यरूशलेमे, संदेष्ट्यांना ठार मारणाऱ्या, देवाने तुझ्याकडे पाठवलेल्यांना दगडमार करणाऱ्या, कोंबडी जशी आपल्या पिल्लांना पंखाखाली एकवटते तसे तुझ्या मुलांबाळांना एकवटण्याची पुष्कळ वेळा माझी इच्छा होती, पण तुमची इच्छा नव्हती.
Єрусалиме, Єрусалиме, що повбивав єси пророків, і покаменував посланих до тебе! скільки раз хотів я зібрати дітей твоїх, як курка збирав курчат своїх під крила, й не схотїли!
38 ३८ पाहा, आता तुमचे घर तुमच्यासाठी ओसाड होईल.
Оце ж оставляєть ся вам дом ваш пустий.
39 ३९ मी तुला सांगतो, प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो. असे म्हणेपर्यंत तू मला पाहणारच नाहीस.”
Глаголю бо вам: Не побачите мене від нинї, аж поки скажете: Благословенyyy в імя Господнє!