< मत्तय 23 >

1 येशू लोकांशी व त्याच्या शिष्यांशी बोलला,
អនន្តរំ យីឝុ រ្ជននិវហំ ឝិឞ្យាំឝ្ចាវទត៑,
2 तो म्हणाला, “नियमशास्त्राचे शिक्षक व परूशी हे मोशेच्या आसनावर बसले आहेत.
អធ្យាបកាះ ផិរូឝិនឝ្ច មូសាសនេ ឧបវិឝន្តិ,
3 म्हणून ते जसे सांगतात तसे तुम्ही करा आणि पाळा. पण तुम्ही त्यांच्या कृतीप्रमाणे तसे करू नका. याचे कारण ते सांगतात पण त्याप्रमाणे करत नाहीत.
អតស្តេ យុឞ្មាន៑ យទ្យត៑ មន្តុម៑ អាជ្ញាបយន្តិ, តត៑ មន្យធ្វំ បាលយធ្វញ្ច, កិន្តុ តេឞាំ កម៌្មានុរូបំ កម៌្ម ន កុរុធ្វំ; យតស្តេឞាំ វាក្យមាត្រំ សារំ កាយ៌្យេ កិមបិ នាស្តិ។
4 वाहावयास अवघड असे ओझे ते बांधतात व लोकांच्या खांद्यांवर देतात पण स्वतः ते ओझे उचलायला एक बोटदेखील लावत नाहीत.
តេ ទុវ៌្វហាន៑ គុរុតរាន៑ ភារាន៑ ពទ្វ្វា មនុឞ្យាណាំ ស្កន្ធេបរិ សមប៌យន្តិ, កិន្តុ ស្វយមង្គុល្យៃកយាបិ ន ចាលយន្តិ។
5 ते त्यांचे सर्व कामे लोकांनी पाहावे म्हणून करतात कारण ते आपली स्मरणपत्रे रूंद करतात आणि आपल्या झग्यांचे काठ मोठे करतात.
កេវលំ លោកទឝ៌នាយ សវ៌្វកម៌្មាណិ កុវ៌្វន្តិ; ផលតះ បដ្ដពន្ធាន៑ ប្រសាយ៌្យ ធារយន្តិ, ស្វវស្ត្រេឞុ ច ទីគ៌្ហគ្រន្ថីន៑ ធារយន្តិ;
6 मेजवानीच्या ठिकाणी आपल्याला विशेष मानाची जागा मिळावी असे त्यांना वाटते. तसेच यहूद्यांच्या सभास्थानात मोक्याच्या जागी बसायला त्यांना फार आवडते.
ភោជនភវន ឧច្ចស្ថានំ, ភជនភវនេ ប្រធានមាសនំ,
7 बाजारातील मुख्य रस्त्याने जाता येता लोकांनी आपल्याला मान द्यावा याची त्यांना फार आवड असते आणि लोकांनी त्यांना ‘रब्बी’ म्हणावे असे त्यांना वाटते.
ហដ្ឋេ នមស្ការំ គុរុរិតិ សម្ពោធនញ្ចៃតានិ សវ៌្វាណិ វាញ្ឆន្តិ។
8 परंतु तुम्ही स्वतःला ‘रब्बी’ म्हणवून घेऊ नका. तुम्ही सर्व एकमेकांचे भाऊ आहात, तुमचा गुरू एकच आहे.
កិន្តុ យូយំ គុរវ ឥតិ សម្ពោធនីយា មា ភវត, យតោ យុឞ្មាកម៑ ឯកះ ខ្រីឞ្ដឯវ គុរុ
9 आणि जगातील कोणालाही पिता म्हणू नका कारण तुमचा पिता एकच आहे व तो स्वर्गात आहे.
រ្យូយំ សវ៌្វេ មិថោ ភ្រាតរឝ្ច។ បុនះ ប្ឫថិវ្យាំ កមបិ បិតេតិ មា សម្ពុធ្យធ្វំ, យតោ យុឞ្មាកមេកះ ស្វគ៌ស្ថឯវ បិតា។
10 १० तुम्ही स्वतःला मालक म्हणून घेऊ नका. तुमचा मालक ख्रिस्त आहे.
យូយំ នាយកេតិ សម្ភាឞិតា មា ភវត, យតោ យុឞ្មាកមេកះ ខ្រីឞ្ដឯវ នាយកះ។
11 ११ तुमच्यातील जो सेवक बनून तुमची सेवा करतो तो तुमच्यात सर्वात मोठा होय.
អបរំ យុឞ្មាកំ មធ្យេ យះ បុមាន៑ ឝ្រេឞ្ឋះ ស យុឞ្មាន៑ សេវិឞ្យតេ។
12 १२ जो स्वतःला मोठा समजेल त्यास कमी लेखले जाईल. स्वतःला लहान समजणारा प्रत्येकजण मोठा गणला जाईल.
យតោ យះ ស្វមុន្នមតិ, ស នតះ ករិឞ្យតេ; កិន្តុ យះ កឝ្ចិត៑ ស្វមវនតំ ករោតិ, ស ឧន្នតះ ករិឞ្យតេ។
13 १३ अहो, परूश्यांनो आणि नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्हास हाय, तुम्ही ढोंगी आहात! तुम्ही स्वर्गाच्या राज्याचा रस्ता लोकांसाठी बंद करता, तुम्ही स्वतः तर आत जात नाहीच, पण जे आत जाण्याचा प्रयत्न करतात त्यांनाही आत जाऊ देत नाहीत.
ហន្ត កបដិន ឧបាធ្យាយាះ ផិរូឝិនឝ្ច, យូយំ មនុជានាំ សមក្ឞំ ស្វគ៌ទ្វារំ រុន្ធ, យូយំ ស្វយំ តេន ន ប្រវិឝថ, ប្រវិវិក្ឞូនបិ វារយថ។ វត កបដិន ឧបាធ្យាយាះ ផិរូឝិនឝ្ច យូយំ ឆលាទ៑ ទីគ៌្ហំ ប្រាត៌្ហ្យ វិធវានាំ សវ៌្វស្វំ គ្រសថ, យុឞ្មាកំ ឃោរតរទណ្ឌោ ភវិឞ្យតិ។
14 १४ अहो परूश्यांनो व नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, ढोंग्यांनो तुमची केवढी दुर्दशा होणार कारण तुम्ही विधवांची घरे खाऊन टाकता व ढोंगाने लांब लांब प्रार्थना करता; यामुळे तुम्हास अधिक शिक्षा होइल.
ហន្ត កបដិន ឧបាធ្យាយាះ ផិរូឝិនឝ្ច, យូយមេកំ ស្វធម៌្មាវលម្ពិនំ កត៌្តុំ សាគរំ ភូមណ្ឌលញ្ច ប្រទក្ឞិណីកុរុថ,
15 १५ परूश्यांनो व नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दुःखी व्हाल. तुम्ही ढोंगी आहात कारण तुम्ही एक मतानुसारी करण्यासाठी समुद्र व भूमी पालथी घालता आणि तुम्हास तो मिळाला म्हणजे तुम्ही त्यास आपल्याहून दुप्पट नरकपुत्रासारखे करून टाकता. (Geenna g1067)
កញ្ចន ប្រាប្យ ស្វតោ ទ្វិគុណនរកភាជនំ តំ កុរុថ។ (Geenna g1067)
16 १६ तुम्हास दुःख होईल. आंधळ्या वाटाड्यांनो, जे तुम्ही म्हणता, जर कोणी परमेश्वराच्या भवनाची शपथ घेतो तर काही नाही; पण जर एखादा त्या भवनातील सोन्याची शपथ घेऊन बोलतो, तर तो बांधलेला आहे.
វត អន្ធបថទឝ៌កាះ សវ៌្វេ, យូយំ វទថ, មន្ទិរស្យ ឝបថករណាត៑ កិមបិ ន ទេយំ; កិន្តុ មន្ទិរស្ថសុវណ៌ស្យ ឝបថករណាទ៑ ទេយំ។
17 १७ तुम्ही मूर्ख आंधळे आहात. सोने आणि परमेश्वराचे भवन यांपैकी कोणते अधिक महत्त्वाचे आहे? ते सोने किंवा भवन, जे त्या सोन्याला पवित्र बनवते.
ហេ មូឍា ហេ អន្ធាះ សុវណ៌ំ តត្សុវណ៌បាវកមន្ទិរម៑ ឯតយោរុភយោ រ្មធ្យេ កិំ ឝ្រេយះ?
18 १८ आणि तुम्ही असे म्हणता. जर एखादा वेदीची शपथ घेतो तर त्यामध्ये काही वावगे नाही. पण जर एखादा वेदीवरील अर्पणाची शपथ घेतो तर तो बांधलेला आहे.
អន្យច្ច វទថ, យជ្ញវេទ្យាះ ឝបថករណាត៑ កិមបិ ន ទេយំ, កិន្តុ តទុបរិស្ថិតស្យ នៃវេទ្យស្យ ឝបថករណាទ៑ ទេយំ។
19 १९ तुम्ही आंधळे आहात कारण मोठे काय आहे? ते अर्पण की अर्पणाला पवित्र करणारी वेदी?
ហេ មូឍា ហេ អន្ធាះ, នៃវេទ្យំ តន្នៃវេទ្យបាវកវេទិរេតយោរុភយោ រ្មធ្យេ កិំ ឝ្រេយះ?
20 २० म्हणून जो वेदीची शपथ घेतो तो त्या वेदीबरोबर त्यावरच्या सर्वांची शपथ घेतो.
អតះ កេនចិទ៑ យជ្ញវេទ្យាះ ឝបថេ ក្ឫតេ តទុបរិស្ថស្យ សវ៌្វស្យ ឝបថះ ក្រិយតេ។
21 २१ तसेच जो परमेश्वराच्या भवनाची शपथ घेतो तो भवन व त्यामध्ये राहणाऱ्या देवाची देखील शपथ घेतो.
កេនចិត៑ មន្ទិរស្យ ឝបថេ ក្ឫតេ មន្ទិរតន្និវាសិនោះ ឝបថះ ក្រិយតេ។
22 २२ जो स्वर्गाची शपथ घेतो तो देवाच्या आसनाची व त्यावर बसणाऱ्याचीही शपथ घेतो.
កេនចិត៑ ស្វគ៌ស្យ ឝបថេ ក្ឫតេ ឦឝ្វរីយសិំហាសនតទុបយ៌្យុបវិឞ្ដយោះ ឝបថះ ក្រិយតេ។
23 २३ परूश्यांनो, नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दुःखी व्हाल. तुम्ही ढोंगी आहात! तुमचे जे काही आहे त्याचा दशांश तुम्ही देवाला देता; पुदिना, शेप, जिरे यांचा देखील दशांश देता. पण नियमशास्त्राच्या महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे: न्याय, दया व विश्वास या गोष्टी तुम्ही सोडल्या आहेत; पण तुम्ही या करायच्या होत्या आणि त्या सोडावयाच्या नव्हत्या.
ហន្ត កបដិន ឧបាធ្យាយាះ ផិរូឝិនឝ្ច, យូយំ បោទិនាយាះ សិតច្ឆត្រាយា ជីរកស្យ ច ទឝមាំឝាន៑ ទត្ថ, កិន្តុ វ្យវស្ថាយា គុរុតរាន៑ ន្យាយទយាវិឝ្វាសាន៑ បរិត្យជថ; ឥមេ យុឞ្មាភិរាចរណីយា អមី ច ន លំឃនីយាះ។
24 २४ तुम्ही आंधळे वाटाडे आहात. तुम्ही डास गाळून काढता व उंट गिळून टाकता.
ហេ អន្ធបថទឝ៌កា យូយំ មឝកាន៑ អបសារយថ, កិន្តុ មហាង្គាន៑ គ្រសថ។
25 २५ अहो परूश्यांनो, नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दुःखी व्हाल, तुम्ही ढोंगी आहात! तुम्ही आपल्या ताट व वाट्या बाहेरून साफ करता पण ते आतून अपहार आणि असंयम यांनी त्या आतून भरल्या आहेत.
ហន្ត កបដិន ឧបាធ្យាយាះ ផិរូឝិនឝ្ច, យូយំ បានបាត្រាណាំ ភោជនបាត្រាណាញ្ច ពហិះ បរិឞ្កុរុថ; កិន្តុ តទភ្យន្តរំ ទុរាត្មតយា កលុឞេណ ច បរិបូណ៌មាស្តេ។
26 २६ अहो परूश्यांनो, तुम्ही आंधळे आहात! अगोदर तुमची वाटी आतून घासा व धुवा म्हणजे ती बाहेरून देखील खरोखर साफ होईल.
ហេ អន្ធាះ ផិរូឝិលោកា អាទៅ បានបាត្រាណាំ ភោជនបាត្រាណាញ្ចាភ្យន្តរំ បរិឞ្កុរុត, តេន តេឞាំ ពហិរបិ បរិឞ្ការិឞ្យតេ។
27 २७ अहो परूश्यांनो नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दुःखी व्हाल. तुम्ही ढोंगी आहात! रंगसफेदी केलेल्या कबरांसारखे तुम्ही आहात. त्या वरून चांगल्या दिसतात पण आतून मरण पावलेल्या मनुष्यांच्या हाडांनी भरल्या आहेत.
ហន្ត កបដិន ឧបាធ្យាយាះ ផិរូឝិនឝ្ច, យូយំ ឝុក្លីក្ឫតឝ្មឝានស្វរូបា ភវថ, យថា ឝ្មឝានភវនស្យ ពហិឝ្ចារុ, កិន្ត្វភ្យន្តរំ ម្ឫតលោកានាំ កីកឝៃះ សវ៌្វប្រការមលេន ច បរិបូណ៌ម៑;
28 २८ तुम्ही सर्व लोकांस बाहेरून नीतिमान दिसता पण तुम्ही आतून ढोंग व दुष्टपणा यांनी भरलेले आहात.
តថៃវ យូយមបិ លោកានាំ សមក្ឞំ ពហិទ៌្ហាម៌្មិកាះ កិន្ត្វន្តះករណេឞុ កេវលកាបដ្យាធម៌្មាភ្យាំ បរិបូណ៌ាះ។
29 २९ अहो परूश्यांनो, नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दुःखी व्हाल. तुम्ही ढोंगी आहात! तुम्ही संदेष्ट्यांच्या कबरा बांधता आणि जे लोक नीतिमान जीवन जगले त्यांच्या कबरा सजवता.
ហា ហា កបដិន ឧបាធ្យាយាះ ផិរូឝិនឝ្ច, យូយំ ភវិឞ្យទ្វាទិនាំ ឝ្មឝានគេហំ និម៌្មាថ, សាធូនាំ ឝ្មឝាននិកេតនំ ឝោភយថ
30 ३० आणि तुम्ही म्हणता जर आम्ही आमच्या वाडवडिलांच्या काळात जिवंत असतो तर संदेष्ट्यांच्या रक्तात त्यांचे भागीदार झालो नसतो.
វទថ ច យទិ វយំ ស្វេឞាំ បូវ៌្វបុរុឞាណាំ កាល អស្ថាស្យាម, តហ៌ិ ភវិឞ្យទ្វាទិនាំ ឝោណិតបាតនេ តេឞាំ សហភាគិនោ នាភវិឞ្យាម។
31 ३१ पण ज्यांनी ज्यांनी संदेष्ट्यांना जिवे मारले, त्यांचेच तुम्ही वंशज आहात असा स्वतःविषयी पुरावा तुम्ही देता.
អតោ យូយំ ភវិឞ្យទ្វាទិឃាតកានាំ សន្តានា ឥតិ ស្វយមេវ ស្វេឞាំ សាក្ឞ្យំ ទត្ថ។
32 ३२ पुढे व्हा आणि तुमच्या वाडवडिलांनी सुरू केलेली पापी कामे पूर्ण करा.
អតោ យូយំ និជបូវ៌្វបុរុឞាណាំ បរិមាណបាត្រំ បរិបូរយត។
33 ३३ तुम्ही साप व विषारी सापाची पिल्ले आहात. तुम्ही नरकाच्या शिक्षेपासून कसे पळाल? (Geenna g1067)
រេ ភុជគាះ ក្ឫឞ្ណភុជគវំឝាះ, យូយំ កថំ នរកទណ្ឌាទ៑ រក្ឞិឞ្យធ្វេ។ (Geenna g1067)
34 ३४ मी तुम्हास सांगतो की मी तुमच्याकडे संदेष्टे, ज्ञानी लोक आणि शिक्षक पाठवत आहे. त्यांच्यातील काहींना तुम्ही जिवे माराल. त्यांपैकी काहींना वधस्तंभावर खिळाल. त्यांच्यातील काहींना तुमच्या सभास्थानात फटके माराल आणि एका नगरातून दुसऱ्या नगरात तुम्ही त्यांचा पाठलाग कराल.
បឝ្យត, យុឞ្មាកមន្តិកម៑ អហំ ភវិឞ្យទ្វាទិនោ ពុទ្ធិមត ឧបាធ្យាយាំឝ្ច ប្រេឞយិឞ្យាមិ, កិន្តុ តេឞាំ កតិបយា យុឞ្មាភិ រ្ឃានិឞ្យន្តេ, ក្រុឝេ ច ឃានិឞ្យន្តេ, កេចិទ៑ ភជនភវនេ កឞាភិរាឃានិឞ្យន្តេ, នគរេ នគរេ តាឌិឞ្យន្តេ ច;
35 ३५ म्हणजे नीतिमान हाबेल याच्या रक्तापासून तुम्ही ज्याला वेदी आणि पवित्रस्थान यांच्यामध्ये ठार मारले तो बरख्याचा पुत्र जखऱ्या याच्या रक्तापर्यंत, सर्व नीतिमान लोकांचे रक्त पृथ्वीवर पाडण्यात आले आहे त्यांचा दोष तुमच्यावर यावा.
តេន សត្បុរុឞស្យ ហាពិលោ រក្តបាតមារភ្យ ពេរិខិយះ បុត្រំ យំ សិខរិយំ យូយំ មន្ទិរយជ្ញវេទ្យោ រ្មធ្យេ ហតវន្តះ, តទីយឝោណិតបាតំ យាវទ៑ អស្មិន៑ ទេឝេ យាវតាំ សាធុបុរុឞាណាំ ឝោណិតបាតោ ៜភវត៑ តត៑ សវ៌្វេឞាមាគសាំ ទណ្ឌា យុឞ្មាសុ វត៌្តិឞ្យន្តេ។
36 ३६ मी तुम्हास खरे सांगतो; या सर्व गोष्टीची शिक्षा तुमच्या पिढीवर येईल.”
អហំ យុឞ្មាន្ត តថ្យំ វទាមិ, វិទ្យមានេៜស្មិន៑ បុរុឞេ សវ៌្វេ វត៌្តិឞ្យន្តេ។
37 ३७ “हे, यरूशलेमे, यरूशलेमे, संदेष्ट्यांना ठार मारणाऱ्या, देवाने तुझ्याकडे पाठवलेल्यांना दगडमार करणाऱ्या, कोंबडी जशी आपल्या पिल्लांना पंखाखाली एकवटते तसे तुझ्या मुलांबाळांना एकवटण्याची पुष्कळ वेळा माझी इच्छा होती, पण तुमची इच्छा नव्हती.
ហេ យិរូឝាលម៑ ហេ យិរូឝាលម៑ នគរិ ត្វំ ភវិឞ្យទ្វាទិនោ ហតវតី, តវ សមីបំ ប្រេរិតាំឝ្ច បាឞាណៃរាហតវតី, យថា កុក្កុដី ឝាវកាន៑ បក្ឞាធះ សំគ្ឫហ្លាតិ, តថា តវ សន្តានាន៑ សំគ្រហីតុំ អហំ ពហុវារម៑ ឰច្ឆំ; កិន្តុ ត្វំ ន សមមន្យថាះ។
38 ३८ पाहा, आता तुमचे घर तुमच्यासाठी ओसाड होईल.
បឝ្យត យឞ្មាកំ វាសស្ថានម៑ ឧច្ឆិន្នំ ត្យក្ឞ្យតេ។
39 ३९ मी तुला सांगतो, प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो. असे म्हणेपर्यंत तू मला पाहणारच नाहीस.”
អហំ យុឞ្មាន៑ តថ្យំ វទាមិ, យះ បរមេឝ្វរស្យ នាម្នាគច្ឆតិ, ស ធន្យ ឥតិ វាណីំ យាវន្ន វទិឞ្យថ, តាវត៑ មាំ បុន រ្ន ទ្រក្ឞ្យថ។

< मत्तय 23 >