< मत्तय 21 >
1 १ येशू व त्याचे शिष्य यरूशलेम शहराजवळ आले असता ते जैतूनाचा डोंगराजवळ बेथफगे या जागी थांबले. नंतर येशूने त्याच्या दोन शिष्यांना पाठवले,
А коли вони набли́зились до Єрусалиму, і прийшли до Вітфагі́ї, до гори до Оли́вної, тоді Ісус вислав двох учнів,
2 २ त्यांना असे सांगितले की, “तुम्ही समोरच्या गावात जा आणि लागलीच एक गाढवी बांधलेली व तिच्याबरोबर एक शिंगरु असे तुम्हास आढळेल. त्यांना सोडून माझ्याकडे घेऊन या.
до них, кажучи: „Ідіть у село, яке перед вами, і зна́йдете зараз ослицю прив'язану та з нею осля́; відв'яжіть, і Мені приведіть їх.
3 ३ जर कोणी तुम्हास काही विचारले, तर त्यास सांगा की, प्रभूला यांची गरज आहे, तो ती लगेच माझ्याकडे पाठवील.”
А як хто вам що́ скаже, відкажіть, що їх потребує Госпо́дь, — і він зараз пошле їх“.
4 ४ हे यासाठी घडले की संदेष्ट्यांच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावेः ते असे की,
А це сталось, щоб спра́вдилось те, що сказав був пророк, промовляючи:
5 ५ “सियोनेच्या कन्येला सांगा, पाहा, तुझा राज लीन होऊन गाढवावर म्हणजे गाढवीच्या शिंगरावर बसून तुझ्याकडे येत आहे.”
„Скажіте Сіонській доньці́: Ось до тебе йде Цар твій! Він покі́рливий, і всів на осла, — на осля, під'яре́мної сина“.
6 ६ तेव्हा शिष्यांनी जाऊन येशूच्या आज्ञेप्रमाणे केले.
А учні пішли та й зробили, як звелів їм Ісус.
7 ७ शिष्यांनी गाढवी व शिंगरु आणून त्यांनी त्यावर आपले अंगरखे घातले आणि येशू त्यावर बसला.
Вони привели́ до Ісуса ослицю й осля́, і одежу поклали на них, — і Він сів на них.
8 ८ पुष्कळ लोकांनी आपले अंगरखे वाटेवर अंथरले. दुसऱ्यांनी झाडांच्या फांद्या तोडल्या आणि त्या रस्त्यावर पसरल्या.
І багато народу стелили одежу свою по дорозі, інші ж різали віття з дерев і стели́ли дорогою.
9 ९ येशूच्या पुढे चालणारा लोकसुदाय आणि मागे चालणारे. मोठ्याने जयघोष करू लागले, “दाविदाच्या पुत्राला होसान्ना. प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित आहे. परम उंचामध्ये होसान्ना!”
А наро́д, що йшов перед Ним і поза́ду, викрикував, кажучи: „Оса́нна Сину Давидовому! Благословенний, хто йде у Господнє Ім'я́! Осанна на висоті!“
10 १० जेव्हा येशूने यरूशलेम शहरामध्ये प्रवेश केला तेव्हा संपूर्ण शहर गजबजून निघाले व लोक विचारत होते, “हा कोण आहे?”
А коли увійшов Він до Єрусалиму, то здвигнулося ціле місто, питаючи: „Хто́ це такий?“
11 ११ जमावाने उत्तर दिले, “हा गालील प्रांतातील नासरेथ नगरातून आलेला, येशू संदेष्टा आहे.”
А наро́д говорив: „Це Пророк, — Ісус із Назаре́ту Галілейського!“
12 १२ मग येशूने देवाच्या भवनात प्रवेश केला. तेथे जे लोक विक्री व खरेदी करीत होते त्या सर्वांना बाहेर घालवून दिले. पैश्याचा व्यवहार करणाऱ्यांची मेजे आणि कबुतरे विकणाऱ्यांच्या बैठकी उलथून टाकल्या.
Потому Ісус увійшов у храм Божий, і вигнав усіх продавців і покупців у храмі, і попереверта́в грошомінам столи, та осло́ни — продавцям голубів.
13 १३ तो त्यांना म्हणाला, “असे लिहिले आहे, ‘माझ्या घरास प्रार्थनेचे घर म्हणतील,’ पण तुम्ही त्यास लुटारुंची गुहा केली आहे.”
І сказав їм: „Написано: „Дім Мій — буде домом молитви, “а ви робите з нього „печеру розбійників“.
14 १४ मग आंधळे आणि पांगळे लोक त्याच्याकडे परमेश्वराच्या भवनात आले आणि त्यांना त्याने बरे केले.
I приступили у храмі до Нього сліпі та криві, — і Він їх уздоро́вив.
15 १५ परंतु जेव्हा मुख्य याजकांना व नियमशास्त्राचे शिक्षक यांनी येशूने केलेल्या आश्चर्यकारक गोष्टी आणि परमेश्वराच्या भवनाच्या आवारात लहान मुलांना, “दाविदाच्या पुत्राला होसान्ना.” अशी घोषणा देताना पाहिले, तेव्हा त्यांना संताप आला.
А первосвященики й книжники, бачивши чуда, що Він учинив, і дітей, що в храмі викрикували: „Осанна Сину Давидовому“, обурилися,
16 १६ त्यांनी त्यास विचारले, “ही मुले काय म्हणत आहे हे तुम्ही ऐकता ना?” येशूने त्यांना उत्तर दिले, “होय. परंतु तू बालके व तान्हुली यांच्या मुखातून स्तुती पूर्ण करवली आहे. हे तुमच्या वाचण्यात कधी आले नाही काय?”
та й сказали Йому: „Чи ти чуєш, що кажуть вони?“А Ісус відказав їм: „Так. Чи ж ви не читали нікол́и: „Із уст немовлят, і тих, що ссуть, учинив Ти хвалу“?
17 १७ नंतर येशू त्यास सोडून शहराबाहेर बेथानीस गेला. तो रात्रभर तेथे राहिला.
І покинувши їх, Він вийшов за місто в Віфа́нію, — і там ніч перебув.
18 १८ दुसऱ्या दिवशी सकाळी तो शहराकडे पुन्हा येत असता त्यास भूक लागली.
А вранці, до міста вертаючись, Він зголоднів.
19 १९ रस्त्याच्या कडेला त्यास अंजिराचे एक झाड दिसले. ते पाहून तो जवळ गेला. पण पानाशिवाय त्यास एकही अंजीर दिसले नाही. येशू त्या झाडाला म्हणाला, “यापुढे तुला, कधीही फळ न येवो!” आणि ते झाड लगेच वाळून गेले. (aiōn )
І побачив Він при дорозі одне фі́ґове дерево, і до нього прийшов, та нічого, крім листя само́го, на нім не знайшов. І до нього Він каже: „Нехай пло́ду із тебе не буде ніко́ли повіки!“І фіґове дерево зараз усохло. (aiōn )
20 २० शिष्यांनी हे पाहिले, तेव्हा त्यांना फार आश्चर्य वाटले. त्यांनी विचारले, “हे अंजिराचे झाड इतक्या लवकर वाळून कसे गेले?”
А учні, побачивши це, дивувалися та говорили: „Як швидко всохло це фіґове дерево!“
21 २१ येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हास खरे सांगतो, जर तुम्हास विश्वास असेल आणि तुम्ही संशय धरला नाही तर मी जे अंजिराच्या झाडाबाबतीत केले तेच नव्हे, तर या डोंगराला उपटून समुद्रात पड असे म्हणालात तरी ते घडेल.
Ісус же промовив у відповідь їм: „Поправді кажу́ вам: Коли б мали ви віру, і не мали су́мніву, то вчинили б не тільки як із фіговим деревом, а якби й цій горі ви сказали: „Порушся та кинься до моря“, — то й станеться те!
22 २२ जर तुमचा विश्वास असेल तर जे काही तुम्ही प्रार्थनेत विश्वासाने मागाल ते तुम्हास मिळेल.”
І все, чого ви в молитві попросите з вірою, — то одержите“.
23 २३ येशू परमेश्वराच्या भवनात गेला, येशू तेथे शिक्षण देत असताना मुख्य याजक लोक व वडीलजन येशूकडे आले. ते येशूला म्हणाले, “तुम्ही कोणत्या अधिकाराने या गोष्टी करता? हा अधिकार तुम्हास कोणी दिला?”
А коли Він прийшов у храм і навчав, поприхо́дили первосвященики й старші наро́ду до Нього й сказали: „Якою Ти вла́дою чиниш оце? І хто Тобі вла́ду цю дав?“
24 २४ येशू म्हणाला, “मीसुद्धा तुम्हास एक प्रश्न विचारतो. जर तुम्ही मला उत्तर दिले तर मी कोणत्या अधिकाराने या गोष्टी करतो, हे मी तुम्हास सांगेन.
Ісус же промовив у відповідь їм: „Запитаю й Я вас одне слово. Як про нього дасте Мені відповідь, то й Я вам скажу́, якою вла́дою Я це чиню́.
25 २५ ‘योहानाचा बाप्तिस्मा कोठून होता? स्वर्गाकडून की मनुष्यांकडून?’” येशूच्या या प्रश्नावर ते चर्चा करू लागले. ते म्हणाले, “योहानाचा बाप्तिस्मा देवाकडून होता असे म्हणावे तर येशू म्हणेल, ‘मग तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही?’
Іванове хрищення звідки було: із неба, чи від людей?“Вони ж міркували собі й говорили: „Коли скажемо: „Із неба“, відкаже Він нам: „Чого ж ви йому не повірили?“
26 २६ पण जर तो मनुष्यांकडून होता असे आपण म्हणालो आपल्याला लोकांची भीती आहे कारण योहान हा एक संदेष्टा होता असे ते सर्वजण मानतात.”
А як скажемо: „Від людей“, — боїмося наро́ду, бо Івана вважають усі за пророка“.
27 २७ म्हणून त्यांनी येशूला उत्तर दिले, “आम्हास माहीत नाही.” तेव्हा येशू म्हणाला, “तर मग मी कोणत्या अधिकाराने या गोष्टी करतो, हे मीही तुम्हास सांगणार नाही.”
І сказали Ісусові в відповідь: „Ми не знаємо“. Відказав їм і Він: „То й Я вам не скажу́, якою владою Я це чиню́.
28 २८ याविषयी तुम्हास काय वाटते ते मला सांगा; “एका मनुष्यास दोन पुत्र होते. तो आपल्या पहिल्या मुलाकडे गेला आणि म्हणाला, ‘माझ्या मुला, आज तू द्राक्षाच्या मळ्यात जा आणि काम कर.’
А як вам здається? Один чоловік мав двох синів. Прийшовши до першого, він сказав: „Піди но, дитино, сьогодні, працюй у винограднику!“
29 २९ मुलाने उत्तर दिले, ‘मी जाणार नाही.’ परंतु नंतर त्या मुलाने मन बदलले व तो गेला.
А той відповів і сказав: „Готовий, панотче“, — і не пішов.
30 ३० नंतर वडील आपल्या दुसऱ्या मुलाकडे गेले आणि म्हटले, ‘माझ्या मुला, आज तू जाऊन माझ्या द्राक्षाच्या मळ्यात काम कर.’ त्या मुलाने उत्तर दिले, ‘होय बाबा, मी जातो.’ पण तो गेला नाही.
І, прийшовши до другого, так само сказав. А той відповів і сказав: „Я не хочу“. А потім покаявся, і пішов.
31 ३१ त्या दोघांपैकी कोणत्या मुलाने वडीलांची आज्ञा पाळली?” ते म्हणाले, “पहिल्या मुलाने.” येशू त्यांना म्हणाला, “मी खरे सांगतो, जकातदार व वेश्या तुमच्या अगोदर स्वर्गाच्या राज्यात जातील.
Котрий же з двох учинив волю батькову?“Вони кажуть: „Останній“. Ісус промовляє до них: „Поправді кажу вам, що ми́тники та блудоді́йки випере́джують вас у Боже Царство.
32 ३२ कारण योहान नीतिमत्त्वाच्या मार्गाने तुम्हाकडे आला, परंतु तुम्ही त्यावर विश्वास ठेवला नाही, पण जकातदार व वेश्या यांनी त्यावर विश्वास ठेवला आणि हे तुम्ही पाहिले पण तरी देखील तुम्ही आपले मन बदलण्यास आणि त्यावर विश्वास ठेवण्यास तयार झाला नाही.”
Бо прийшов був до вас дорогою праведности Іван, та йому не повірили ви, а ми́тники та блудоді́йки йняли йому віри. А ви бачили, та проте не покаялися й опісля́, щоб повірити йому.
33 ३३ “हा दुसरा दाखला ऐकाः एक मनुष्य होता, त्याचे शेत होते. त्याने आपल्या शेतात द्राक्षे लावली. त्याभोवती कुंपण घातले आणि द्राक्षरसाकरिता कुंड तयार केले आणि माळा बांधला, मग त्याने आपला मळा काही शेतकऱ्यांना खंडाने करायला दिला, मग तो दुसऱ्यादेशी निघून गेला.
Послухайте іншої притчі. Був госпо́дар один. Насадив виноградника він, обгородив його муром, ви́довбав у ньому чави́ло, башту поставив, — і віддав його винаря́м, та й пішов.
34 ३४ जेव्हा द्राक्षे तोडणीचा हंगाम जवळ आला, तेव्हा त्या मनुष्याने आपला वाटा आणण्याकरिता काही चाकर शेतकऱ्याकडे पाठवले.
Коли ж надійшов час плоді́в, він до винарів послав рабів своїх, щоб прийняти плоди́ свої.
35 ३५ परंतु शेतकऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. एकाला मार दिला तर दुसऱ्या चाकराला जिवे मारले. नंतर तिसऱ्याला दगडमार करून ठार केले.
Винарі ж рабів його похапали, — і одно́го побили, а другого замордували, а того вкаменува́ли.
36 ३६ मग शेतकऱ्यांकडे त्या मनुष्याने आणखी एकदा चाकर पाठवले. पहिल्यापेक्षा त्याने जास्त चाकर पाठवले पण त्या शेतकऱ्यांनी त्यांना तशीच वागणूक दिली.
Знов послав він інших рабів, більш як перше, — та й їм учинили те саме.
37 ३७ नंतर, त्याने त्याच्या स्वतःच्या मुलाला त्यांच्याकडे पाठवले, तो म्हणाला, ‘निश्चितच ते माझ्या मुलाचा मान राखतील.’
Нарешті послав до них сина свого́ і сказав: „Посоро́мляться сина мого“.
38 ३८ पण जेव्हा शेतकऱ्यांनी त्याच्या मुलाला पाहिले तेव्हा ते एकमेकास म्हणू लागले, ‘हा तर मालकाचा मुलगा आहे. तो वारस आहे. चला आपण त्यास ठार करू व त्याचे वतन घेऊ.’
Але́ винарі́, як побачили сина, міркувати собі стали: „Це спадкоє́мець; ходім, замордуймо його, — і заберемо його спа́дщину!“
39 ३९ त्यांनी त्यास धरले व द्राक्षमळ्याच्या बाहेर फेकले व त्यास ठार मारले.
І, схопи́вши його, вони вивели за виноградник його, та й убили.
40 ४० मग द्राक्षमळ्याचा मालक परत येईल तेव्हा या शेतकऱ्यांचे काय करील?”
Отож, як прибу́де той пан виноградника, що́ зробить він тим винаря́м?“
41 ४१ यहूदी मुख्य याजक लोक आणि पुढारी म्हणाले, “तो त्या लोकांस खात्रीने मरणदंड देईल कारण ते दुष्ट होते. नंतर तो आपला द्राक्षमळा दुसऱ्यास खंडाने देईल. हंगामाच्या दिवसात जे त्याच्या पिकाची वाटणी देतील, अशांना तो ते देईल.”
Вони кажуть Йому: „Злочинців погубить жорсто́ко, виноградника ж віддасть іншим винаря́м, що будуть плоди́ віддавати йому своєча́сно“.
42 ४२ येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही शास्त्रलेखात कधी वाचले नाही काय? ‘बांधणाऱ्यांनी नाकारलेला दगड कोनशिला झाला आहे. हे प्रभूने केले आणि आमच्या दृष्टीने हे अद्भूत आहे.’
Ісус промовляє до них: „Чи ви не читали ніко́ли в Писа́нні: Камінь, що його будівничі відкинули, — той наріжним став каменем; від Господа сталося це, і дивне воно в очах наших!“
43 ४३ म्हणून मी तुम्हास सांगतो की, देवाचे राज्य तुमच्याकडून काढून घेण्यात येईल आणि जे राष्ट्र त्यातली फळे देईल त्यास ते दिले जाईल.
Тому́ кажу вам, що від вас Царство Боже відійметься, і дасться наро́дові, що плоди́ його буде прино́сити.
44 ४४ जो कोणी या दगडावर पडेल, त्याचे तुकडे तुकडे होतील परंतु जर हा दगड कोणावर पडेल तर त्याचा भुगाभुगा होईल.”
І хто впаде́ на цей камінь — розі́б'ється, а на кого він сам упаде — то розча́вить його́“.
45 ४५ येशूने सांगितलेले दाखले मुख्य याजकांनी आणि परूश्यांनी ऐकले. येशू त्यांच्याविषयी बोलत आहे हे त्यांनी ओळखले.
А як первосвященики та фарисеї почули ці притчі Його, то вони зрозуміли, що про них Він гово́рить.
46 ४६ त्यांना येशूला अटक करायचे होते. पण त्यांना लोकांचे भय वाटत होते, कारण लोक येशूला संदेष्टा मानीत होते.
І намага́лись схопи́ти Його, але́ побоялись людей, бо вважали Його за Пророка.