< मत्तय 20 >
1 १ “म्हणून स्वर्गाचे राज्य हे कोणा शेतमालकासारखे आहे. जो अगदी पहाटे त्याच्या द्राक्षमळ्यासाठी मोलाने मजूर आणण्यासाठी गेला.
Förty himmelriket är likt enom husbonda, som gick ut bittida om morgonen, till att leja sig arbetare i sin vingård.
2 २ त्या मनुष्याने एक दिवसाच्या मजुरीकरिता प्रत्येकाला एक चांदीचे नाणे देण्याचे कबूल केले आणि त्याने द्राक्षाच्या मळ्यात कामास पाठवले.
Och när han hade varit öfverens med arbetarena om en viss dagspenning, sände han dem i sin vingård.
3 ३ सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास तो मनुष्य बाजारात गेला तेव्हा तेथे काही माणसे उभी असलेली त्यास दिसली. त्या लोकांस काहीच काम नव्हते.
Sedan gick han ut vid tredje stunden, och såg några andra ståndande fåfänga på torget;
4 ४ मग तो त्यांना म्हणाला, ‘तुम्हीसुद्धा माझ्या द्राक्षमळ्यात कामाला जा आणि जी योग्य मजुरी आहे ती मी तुम्हास देईन.’
Och sade till dem: Går ock I uti min vingård; och hvad skäligit är, vill jag gifva eder.
5 ५ मग ते काम करण्यास मळ्यात गेले, तो मनुष्य बारा वाजता आणि तीन वाजता बाजारात गेला आणि त्या मनुष्याने आपल्या मळ्यात काम करण्यासाठी लोकांस दोन वेळा जाऊन मजुरीवर घेतले
Och de gingo. Och åter gick han ut vid sjette och nionde stunden, och gjorde sammaledes.
6 ६ पाच वाजता तो मनुष्य परत एकदा बाजारात गेला तेव्हा आणखी काही लोक उभे असलेले त्यास आढळले. त्याने त्यांना विचारले, ‘तुम्ही काही काम न करता दिवसभर येथे का बरे उभे राहिला आहात?’
Men vid den ellofte stundena gick han ut, och fann några andra ståndande fåfänga, och sade till dem: Hvi stån I här hela dagen fåfänge?
7 ७ त्या लोकांनी उत्तर दिले, ‘आम्हास कोणी काम दिले नाही.’ तो मनुष्य त्यांना म्हणाला, ‘तर मग तुम्ही जाऊन माझ्या द्राक्षमळ्यात काम करा.’
De sade till honom: Ty ingen hafver lejt oss. Då sade han till dem: Går ock I uti min vingård; och hvad skäligit är, skolen I få.
8 ८ संध्याकाळी द्राक्षमळ्याचा मालक मुकादमाला म्हणाला, ‘मजुरांना बोलवा आणि त्यांना त्यांची मजुरी देऊन टाका, मी ज्यांना अगदी शेवटी कामावर आणले त्यांना अगोदर मजुरी द्या, नंतर बाकीच्या सर्वांना मजुरी द्या, मी कामावर रोजगारीने पहिल्याने बोलावलेल्यांना सर्वात शेवटी मजुरी द्या.’
När aftonen kom, sade vingårdsherren till sin skaffare: Kalla fram arbetarena, och gif dem deras lön, begynnandes på de sista, intill de första.
9 ९ जे मजूर संध्याकाळी साधारण पाच वाजता कामावर घेतले होते ते आपली मजुरी घेण्यासाठी आले. प्रत्येकाला एक नाणे मजुरी मिळाली.
Och när de kommo fram, som vid ellofte stundena komne voro, fick hvardera dagspenningen.
10 १० मग ज्यांना सुरूवातीला कामावर घेण्यात आले होते, ते आपली मजुरी घेण्यासाठी आले. त्यांना वाटत होते की, इतरांपेक्षा त्यांना जास्त पैसे मिळतील, पण त्या सर्वांना चांदीचे एकच नाणे मजुरी मिळाली.
Men när de förste kommo, mente de, att de skulle fått mer; och fingo ock hvardera dagspenningen.
11 ११ त्यांनी ते घेतले व मालकाकडे तक्रार करू लागले.
Och när de så fingo, knorrade de emot husbondan;
12 १२ ते म्हणाले, ‘ज्यांना शेवटी कामावर घेतले त्यांनी केवळ एक तासच काम केले. परंतु तुम्ही त्यांना आमच्या बरोबरीने मजुरी दिली. आम्ही मात्र दिवसभर उन्हात कष्ट केले.’
Och sade: Desse siste hafva arbetat en timma, och du gjorde dem lika med oss, som hafva burit dagsens tunga och hettan.
13 १३ परंतु मळ्याचा मालक त्यांच्यातील एकाला म्हणाला, ‘मित्रा मी तुझ्याबाबतीत अन्याय करीत नाही. मी तुला एक चांदीचे नाणे मजुरी देईन यावर आपण सहमत झालो नाही का?
Då svarade han enom af dem, och sade: Min vän, jag gör dig ingen orätt; vast du icke öfverens med mig om en viss dagspenning?
14 १४ जे तुझे आहे ते घे आणि चालायला लाग, तुला दिली तितकीच मजुरी मला या शेवटच्या मनुष्यास द्यायची आहे.
Tag det dig tillhörer, och gack din väg; men jag vill gifva denna sista så mycket som dig.
15 १५ मी माझ्या पैशाचा वापर मला पाहिजे तसा करू शकत नाही का? मी लोकांशी चांगला आहे म्हणून, तुला हेवा वाटतो का?’
Eller må jag icke göra uti min ting hvad jag vill? Ser du fördenskull illa ut, att jag så god är?
16 १६ म्हणून आता जे शेवटचे आहेत ते पहिले होतील आणि पहिले ते शेवटचे होतील.”
Alltså varda de ytterste de främste, och de främste de ytterste. Ty månge äro kallade; men få äro utvalde.
17 १७ येशू यरूशलेम शहराला जात असता त्याने त्याच्या शिष्यांना एकाबाजूला घेतले आणि त्यांना म्हणाला,
Och så drog Jesus upp till Jerusalem, och tog de tolf Lärjungarna till sig på vägen, och sade till dem:
18 १८ “पाहा, आपण यरूशलेम शहराकडे जात आहोत. मनुष्याच्या पुत्राला धरून मुख्य याजक लोक व नियमशास्त्राचे शिक्षक यांच्या हाती धरुन देण्यात येईल. ते त्यास मरणदंड ठरतील.
Si, vi farom upp till Jerusalem, och menniskones Son skall öfverantvardas dem öfversta Prestomen, och dem Skriftlärdom; och de skola döma honom till döden.
19 १९ आणि थट्टा करावयास, फटके मारावयास व वधस्तंभावर खिळावयास त्यास परराष्ट्रीयांच्या हाती देतील. परंतु तिसऱ्या दिवशी तो परत जीवनात येईल.”
Och de skola öfverantvarda honom Hedningomen, till att begabbas, och hudflängas, och korsfästas; och tredje dagen skall han uppstå igen.
20 २० त्यानंतर जब्दीच्या मुलांची आई, आपल्या मुलांसह त्याच्याकडे आली. ती त्याच्या पाया पडली आणि तिने त्यास एक विनंती केली.
Då steg Zebedei söners moder fram till honom med sina söner, tillbad honom, och begärade något af honom.
21 २१ त्याने तिला विचारले, “तुला काय पाहिजे?” ती म्हणाली, “माझा एक मुलगा तुमच्या राज्यात तुमच्या उजवीकडे बसेल आणि दुसरा डावीकडे बसेल असे वचन द्या.”
Då sade han till henne: Hvad vill du? Sade hon till honom: Låt dessa två mina söner sitta i ditt rike; den ena på dina högra hand, och den andra på dina venstra.
22 २२ तो तिला म्हणाला, “तू काय मागत आहेस ते तुला समजत नाही! जो प्याला मी पिणार आहे तो तुम्हास पिता येईल काय?” ते म्हणाले, होय, “पिता येईल!”
Då svarade Jesus, och sade: I veten icke hvad I bedjen; kunnen I dricka den kalken, som jag skall dricka, och döpas med det dopet, som jag döpes med? Då sade de till honom: Ja, väl.
23 २३ येशू त्याना म्हणाला, “तुम्ही खरोखर माझ्या प्याल्यातून प्याल खरे, पण माझ्या उजव्या आणि डाव्या हाताला बसण्याचा मान कोणाला देणे हे ठरविणारा मी नाही, तर माझ्या पित्याने तो मान कोणाला द्यायचा हे ठरवले आहे.”
Sade han till dem: Min kalk skolen I visst dricka, och döpas med det dop, som jag döpes med; men sitta på mina högra hand och venstra står icke mig till att gifva, utan dem som det tillredt är af minom Fader.
24 २४ जेव्हा इतर दहा शिष्यांनी हे ऐकले तेव्हा ते त्या दोघां भावांवर नाराज झाला.
När de tio det hörde, vordo de misslynte på de två bröderna.
25 २५ मग येशूने त्यांना बोलावून म्हटले, “परराष्ट्रीय लोकांच्या राजांना लोकांवर आपली सत्ता आहे हे दाखवणे आवडले आणि त्यांच्या प्रमुख नेत्यांना आपले अधिकार वाटेल तसे वापरणे आवडते.
Då kallade Jesus dem till sig, och sade: I veten, att verldslige Förstar äro rådande, och de som herrar äro, hafva magtena.
26 २६ पण तुमचे वागणे तसे नसावे. जर तुमच्यातील कोणाला मोठे व्हायचे असेल तर त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे.
Så skall det icke vara ibland eder; utan den, som vill vara mägtig ibland eder, han vare edar tjenare.
27 २७ आणि ज्याला पहिला व्हावयाचे आहे त्याने दास झाले पाहिजे.
Och hvilken ibland eder vill vara den främste, han vare edar dräng.
28 २८ म्हणजे तुम्ही मनुष्याच्या पुत्रासारखे असले पाहिजे. जसा तो इतरांकडून सेवा करून घ्यायला आला नाही तर इतरांची सेवा करायला आणि अनेकांचे तारण व्हावे यासाठी आपला जीव खंडणी म्हणून देण्यासाठी आला.”
Såsom menniskones Son är icke kommen, på det han vill låta tjena sig, utan att han vill tjena, och gifva sitt lif till återlösning för många.
29 २९ ते यरीहो शहर सोडत असताना, मोठा लोकसमुदाय त्याच्यामागे आला.
Och när de gingo utaf Jericho, följde honom mycket folk.
30 ३० रस्त्याच्या कडेला दोन आंधळे बसले होते आणि जेव्हा त्यांनी ऐकले की, येशू तेथून जात आहे, तेव्हा ते मोठ्याने ओरडले, “प्रभू येशू, दाविदाच्या पुत्रा. आमच्यावर दया करा.”
Och si, två blinde såto vid vägen; och när de hörde, att Jesus gick der fram, ropade de, och sade: Ack! Herre, Davids Son, förbarma dig öfver oss.
31 ३१ जमावाने त्यांना दटावले व त्यांना शांत राहण्यास सांगितले. पण ते अधिकच मोठ्याने ओरडू लागले, “प्रभू, दाविदाच्या पुत्रा, आमच्यावर दया करा.”
Men folket näpste dem, att de skulle tiga. Då ropade de dessmer, och sade: Ack! Herre, Davids Son, förbarma dig öfver oss.
32 ३२ मग येशू थांबला आणि त्यांच्याशी बोलला, त्याने विचारले, “मी तुमच्यासाठी काय करावे अशी तुमची इच्छा आहे?”
Då stadnade Jesus, och kallade dem, och sade: Hvad viljen I, att jag skall göra eder?
33 ३३ त्या आंधळ्या मनुष्यांनी उत्तर दिले, “प्रभूजी, आम्हास दिसावे अशी आमची इच्छा आहे.”
De sade till honom: Herre, att vår ögon måtte öppnas.
34 ३४ येशूला त्यांच्यांबद्दल कळवळा आला आणि त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला. त्याच क्षणी त्यांना दिसू लागले आणि ते त्याच्यामागे गेले.
Då varkunnade sig Jesus öfver dem, och tog på deras ögon; och straxt fingo de sina syn, och följde honom.