< मत्तय 2 >

1 हेरोद राजाच्या दिवसात यहूदीया प्रांतातील बेथलेहेम नगरात येशूचा जन्म झाल्यानंतर, पूर्वेकडील देशातून ज्ञानी लोक यरूशलेम शहरात येऊन विचारपूस करू लागले की,
Amikor pedig megszületett Jézus a júdeai Betlehemben, Heródes király idejében, íme, napkeletről bölcsek jöttek Jeruzsálembe, és ezt mondták:
2 “यहूद्यांचा राजा जन्मला आहे तो कोठे आहे? आम्ही पूर्वेला त्याचा तारा पाहीला आणि त्यास नमन करावयास आलो आहोत.”
„Hol van a zsidók királya, aki megszületett? Mert láttuk csillagát napkeleten, és azért jöttünk, hogy tisztességet tegyünk neki.“
3 जेव्हा हेरोद राजाने हे ऐकले, तेव्हा तो व त्याच्याबरोबर सर्व यरूशलेम शहर घाबरून गेले;
Amikor Heródes király ezt meghallotta, felháborodott, és vele együtt az egész Jeruzsálem.
4 हेरोद राजाने सर्व मुख्य याजकांना व नियमशास्त्राचे शिक्षक यांना एकत्र जमवून त्यांना विचारले की, ख्रिस्ताचा जन्म कोठे होणार आहे?
Egybegyűjtött minden főpapot és a nép írástudóit, és tudakozódott tőlük, hogy hol kell Krisztusnak megszületnie.
5 ते त्यास म्हणाले, “यहूदीया प्रांतातील बेथलेहेम नगरात, कारण संदेष्ट्यांच्याद्वारे असे लिहिलेले आहे की;
Azok pedig ezt mondták neki: „A júdeai Betlehemben, mert így írta meg a próféta:
6 ‘हे बेथलेहेमा, यहूदाच्या प्रांता, तू यहूदाच्या सर्व सरदारांमध्ये कनिष्ठ आहेस असे मुळीच नाही कारण तुझ्यातून असा सरदार निघेल जो मा‍झ्या इस्राएल लोकांचा सांभाळ करील.’”
»És te, Betlehem, Júdának földje, semmiképpen sem vagy legkisebb Júda fejedelmi városai között, mert belőled származik a fejedelem, aki legeltetni fogja népemet, Izraelt.«“
7 मग हेरोद राजाने ज्ञानी लोकांस गुप्तपणे बोलावून त्यांच्यापासून तारा नक्की कधी दिसला याची वेळ विचारून घेतली.
Ekkor Heródes titkon hívatta a bölcseket, szorgalmasan megtudakolta tőlük a csillag megjelenésének idejét.
8 त्याने त्यांना बेथलेहेमास पाठवताना म्हटले, “तुम्ही जाऊन त्या बालकाविषयी बारकाईने शोध करा व तुम्हास शोध लागल्यावर मला कळवा म्हणजे मी ही येऊन त्यास नमन करीन.”
Elküldte őket Betlehembe, és azt mondta nekik: „Menjetek el, szorgalmasan kérdezősködjetek a gyermek felől, mihelyt pedig megtaláljátok, adjátok tudtomra, hogy én is elmenjek, és tisztességet tegyek neki.“
9 राजाचे हे सांगणे ऐकून ते त्यांच्या वाटेने निघाले. जो तारा त्यांनी पूर्वेस पाहीला होता त्याने बेथलेहेम नगरापर्यंत त्यांचे मार्गदर्शन केले आणि ज्ञानी लोक बालकापर्यंत पोहोचेपर्यंत त्यांच्यापुढे चालला.
Ők pedig a király beszédét meghallgatták, és elindultak. És íme, a csillag, amelyet napkeleten láttak, előttük ment mindaddig, amíg odaérve megállt a hely fölött, ahol a gyermek volt.
10 १० तो तारा पाहून ज्ञानी लोकांस अतिशय आनंद झाला.
Amikor meglátták a csillagot, igen nagy örömmel örvendeztek.
11 ११ नंतर ते त्या घरात गेले आणि ते बालक आपली आई मरीया हिच्याजवळ असलेले त्यांनी पाहीले व खाली वाकून त्यांनी त्यास नमन केले. त्यांनी आपल्या द्रव्यांच्या थैल्या उघडून सोने, ऊद व गंधरस ही दाने अर्पण केली.
Bementek a házba, ott találták a gyermeket anyjával, Máriával, és leborulva tisztességet tettek neki, kincseiket kitárva ajándékot adtak neki: aranyat, tömjént és mirhát.
12 १२ देवाने त्यांना स्वप्नात हेरोदाकडे परत जाऊ नका, अशी सूचना दिल्यामुळे ते दुसर्‍या मार्गाने आपल्या देशास निघून गेले.
Mivel álmukban intést kaptak, hogy Heródeshez vissza ne menjenek, más úton tértek vissza hazájukba.
13 १३ ते गेल्यावर, प्रभूचा दूत योसेफास स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, “ऊठ, बालक व त्याची आई यांना घेऊन मिसर देशात पळून जा आणि मी तुला सांगेपर्यंत तेथेच राहा कारण बालकाचा घात करण्यासाठी हेरोद राजा त्याचा शोध करणार आहे.”
Mikor pedig elmentek, megjelent Józsefnek az Úr angyala álmában, és mondta neki: „Kelj fel, vedd a gyermeket és anyját, fuss Egyiptomba, és maradj ott, amíg én mondom neked, mert Heródes halálra fogja keresni a gyermeket.“
14 १४ त्या रात्री तो उठला आणि बालक व त्याची आई यांना घेऊन रातोरात मिसर देशात निघून गेला.
Ő pedig felkelt, vette a gyermeket és anyját még éjjel, és Egyiptomba ment.
15 १५ तो हेरोदाच्या मरणापर्यंत तेथे राहिला. “मी माझ्या पुत्राला मिसर देशातून बोलावले आहे.” असे जे प्रभूने संदेष्ट्याच्याद्वारे सांगितले ते पूर्ण झाले.
És ott volt egészen Heródes haláláig, hogy beteljesedjék, amit az Úr mondott a próféta által, aki így szólt: „Egyiptomból hívtam ki az én fiamat.“
16 १६ तेव्हा ज्ञानी लोकांनी आपणाला फसवले हे पाहून हेरोद राजा अतिशय संतापला आणि जी वेळ त्याने ज्ञानी लोकांपासून नीट विचारून घेतली होती तिच्याप्रमाणे त्याने बेथलेहेमात व आसपासच्या सर्व प्रदेशांत जे दोन वर्षांचे व त्याहून कमी वयाचे पुरूष बालके होते त्या सर्वांना त्याने माणसे पाठवून त्यांच्याकडून जिवे मारले.
Ekkor Heródes látta, hogy a bölcsek megcsúfolták őt, szerfölött felháborodott, kiküldte embereit, és megöletett Betlehemben és annak egész környékén minden kétesztendős és azon aluli gyermeket a szerint az idő szerint, ahogyan azt pontosan megtudta a bölcsektől.
17 १७ यिर्मया संदेष्ट्याच्याद्वारे जे सांगितले होते, ते त्यासमयी पूर्ण झाले. ते असेः
Ekkor teljesedett be, amit Jeremiás próféta mondott, midőn így szólt:
18 १८ “रामा येथे रडणे व मोठा आकांत ह्यांचा शब्द ऐकण्यात आला, राहेल आपल्या मुलांकरिता रडत आहे, आणि ती नाहीत म्हणून ती सांत्वन पावेना.”
„Szó hallatszott Rámában, sírás-rívás és sok keserves jajgatás. Ráhel siratta fiait, és nem akart megvigasztalódni, hogy nincsenek.“
19 १९ पुढे हेरोद राजा पावल्यावर, पाहा प्रभूचा दूत मिसर देशात योसेफास स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला,
Mikor pedig Heródes meghalt, íme, az Úr angyala megjelent álmában Józsefnek Egyiptomban,
20 २० “उठ, बालकास व त्याच्या आईस घेऊन इस्राएल देशास जा, कारण बालकाचा जीव घ्यावयास जे पाहत होते ते मरून गेले आहेत.”
és ezt mondta: „Kelj fel, vedd a gyermeket és anyját, és eredj Izrael földjére, mert meghaltak, akik a gyermeket halálra keresték.“
21 २१ तेव्हा तो उठला आणि बालकाला व त्याच्या आईला घेऊन इस्राएल देशात आला.
Ő pedig felkelt, magához vette a gyermeket és anyját, és elment Izrael földjére.
22 २२ परंतु अर्खेलाव हा आपला पिता हेरोद याच्या जागी यहूदीया प्रांतात राज्य करीत आहे असे ऐकून तो तेथे जाण्यास घाबरला, आणि स्वप्नात देवाने सूचना केल्यानंतर तो गालील प्रांतास निघून गेला,
Amikor pedig hallotta, hogy Júdeában Arkhelaosz uralkodik Heródesnek, atyjának helyén, nem mert odamenni, hanem miután álmában figyelmeztetést kapott, Galileába ment.
23 २३ व नासरेथ नावाच्या गावी जाऊन राहिला अशासाठी की, “त्याला नासोरी म्हणतील” हे जे संदेष्ट्यांच्याद्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे.
Odaérkezve a Názáret nevű városkában lakott, hogy beteljesedjék, amit a próféták mondtak, hogy názáretinek fogják nevezni.

< मत्तय 2 >