< मत्तय 17 >
1 १ मग सहा दिवसानंतर येशूने पेत्र, याकोब व त्याचा भाऊ योहान यांना आपल्याबरोबर घेतले व त्यांना एका उंच डोंगरावर एकांती नेले.
Po šesti dnech vzal s sebou Ježíš pouze Petra, Jakuba a jeho bratra Jana a vyšli na vysokou horu.
2 २ तेव्हा त्यांच्यादेखत त्याचे रूप पालटले. त्याचे तोंड सूर्यासारखे प्रकाशले आणि त्याची वस्त्रे प्रकाशासारखी पांढरी शुभ्र झाली.
Náhle učedníci zpozorovali, že Ježíšův vzhled se změnil. Tvář mu oslnivě zářila jako slunce a jeho oděv se skvěl bělostí.
3 ३ तेव्हा पाहा, मोशे व एलीया हे त्याच्याशी बोलत असताना त्यांना दिसले.
Vtom uviděli Mojžíše a Elijáše, jak s ním rozmlouvají.
4 ४ पेत्र येशूला म्हणाला, “प्रभू, येथे असणे हे आपणासाठी बरे आहे. आपली इच्छा असेल तर मी येथे तीन मंडप करतो, एक आपल्यासाठी एक मोशेसाठी व एक एलीयासाठी.”
Petr zvolal: „Pane, je nám tu tak dobře! Jestli chceš, postavíme vám tu přístřeší a zůstaňme tady!“
5 ५ तो बोलत आहे तो, पाहा, इतक्यात, एका तेजस्वी मेघाने त्यांच्यावर सावली केली आणि त्या मेघातून अशी वाणी झाली की, “हा माझा प्रिय पुत्र आहे, याजविषयी मी संतुष्ट आहे, याचे तुम्ही ऐका.”
Než to však dořekl, zahalil je oblak a slyšeli hlas: „Toto je můj milovaný Syn, moje radost, toho poslouchejte!“
6 ६ येशूबरोबर असलेल्या शिष्यांनीही वाणी ऐकली. तेव्हा ते जमिनीवर पालथे पडले कारण ते फार घाबरले होते.
Když to učedníci slyšeli, padli k zemi s uctivou bázní.
7 ७ तेव्हा येशूजवळ येऊन त्यांना स्पर्श करून म्हणाला, “उठा! घाबरू नका.”
Ježíš k nim přišel, dotkl se jich a řekl: „Vstaňte a nebojte se!“
8 ८ मग त्यांनी आपले डोळे उघडले आणि वर पाहिले तेव्हा त्यांना येशूशिवाय दुसरे कोणीही दिसले नाही.
Když se rozhlédli, viděli pouze samotného Ježíše.
9 ९ नंतर ते डोंगरावरून खाली उतरत असताना, येशूने त्यांना आज्ञा केली की, “मनुष्याचा पुत्र मरणातून पुन्हा उठेपर्यंत डोंगरावर जे पाहिले ते कोणालाही सांगू नये.”
Cestou z hory jim Ježíš přikázal: „Nikomu neříkejte, co jste viděli, dokud nevstanu z mrtvých.“
10 १० मग त्याच्या शिष्यांनी म्हटले, “नियमशास्त्राचे शिक्षक असे का म्हणतात की, एलीया अगोदर आला पाहिजे?”
Učedníci se ho ptali: „Proč učitelé zákona zdůrazňují, že před tebou měl přijít Elijáš?“
11 ११ तेव्हा त्याने उत्तर दिले, “एलीया येऊन सर्वकाही निटनेटके करील हे खरे,
Ježíš jim odpověděl: „Mají pravdu. On má přijít a připravit lidská srdce na Kristův příchod.
12 १२ पण मी तुम्हास सांगतो की, एलीया आलाच आहे आणि त्यांनी त्यास ओळखले नाही, पण त्यांना वाटले तसे त्यांनी त्यास केले. मनुष्याचा पुत्रही त्यांच्याकडून असेच सहन करणार आहे.”
Já vám však říkám, že Elijáš už přišel, ale oni ho neuznali a naložili s ním podle svého. A také pro mne chystají jen utrpení.“
13 १३ तेव्हा त्यांना समजले की त्याने बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाविषयी सांगितले आहे. हे शिष्यांच्या ध्यानात आले.
Učedníci pochopili, že mluví o Janu Křtiteli.
14 १४ नंतर येशू व शिष्य लोकसमुदायाजवळ आल्यावर एक मनुष्य त्याच्याकडे आला आणि त्याच्यापुढे गुडघे टेकून म्हणाला,
Na úpatí hory na ně čekal zástup lidí. Nějaký muž klekl před Ježíšem a řekl:
15 १५ “प्रभूजी, माझ्या मुलावर दया करा. त्यास फेफरे येतात व त्याचे फार हाल होतात कारण तो सारखा विस्तवात आणि पाण्यात पडतो.
„Pane, slituj se nad mým synem! Mnoho zkusí, má zlé záchvaty a při nich často spadne do ohně nebo do vody.
16 १६ मी त्यास आपल्या शिष्यांकडे आणले पण त्यांना त्यास बरे करता येईना.”
Prosil jsem tvé učedníky, ale nevědí si s ním rady.“
17 १७ येशूने उत्तर दिले, “अहो अविश्वासू व विपरीत पिढीच्या लोकांनो, मी तुमच्याबरोबर आणखी कोठवर राहू? मी तुमचे किती सहन करू? त्यास माझ्याकडे आणा.”
Ježíš si povzdechl: „Co to s vámi je? Nevěříte a překážíte Boží moci! Nemám to s vámi lehké. Přiveďte mi ho sem!“
18 १८ येशूने त्या भूताला धमकावले, तेव्हा ते भूत त्याच्यातून निघून गेले आणि त्याच घटकेला तो मुलगा बरा झाला.
Pak Ježíš přikázal démonu, který byl příčinou nemoci, aby chlapce opustil. A od té chvíle byl chlapec zdráv.
19 १९ नंतर शिष्य एकांती येशूजवळ येऊन म्हणाले, “आम्हास ते का काढता आले नाही?”
Když potom byli s Ježíšem sami, zeptali se učedníci: „Proč my jsme nemohli toho chlapce uzdravit?“
20 २० तेव्हा तो म्हणाला, “तुमच्या अल्पविश्वासामुळे. मी तुम्हास खरे सांगतो, तुमच्यात जर मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असेल तर तुम्ही या डोंगराला येथून निघून तेथे जा, असे तुम्ही म्हटला तर तो डोंगर जाईल. तुमच्यासाठी काहीही अशक्य असणार नाही.”
Ježíš jim odpověděl: „Protože málo věříte. Budete-li mít víru alespoň jako semínko hořčice a řeknete této hoře: ‚Posuň se, ‘poslechne vás. Nic pro vás nebude nemožné.
21 २१ तरीही प्रार्थना व उपवास यावाचून असल्या जातीचे भूत निघत नाही.
Takový případ vyžaduje opravdovou modlitbu a půst.“
22 २२ जेव्हा ते एकत्र गालील प्रांतात आले तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “मनुष्याचा पुत्र मनुष्यांच्या हाती धरून दिला जाणार आहे.
Když přišli do Galileje, Ježíš jim řekl: „Mám být vydán do rukou těch,
23 २३ ते त्यास जिवे मारतील आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठविला जाईल.” तेव्हा शिष्य फार दुःखी झाले.
kteří mne zabijí. Ale třetího dne zase vstanu k životu.“Učedníky to velmi zarmoutilo.
24 २४ येशू आणि त्याचे शिष्य कफर्णहूमास आले तेव्हा परमेश्वराच्या भवनाचा कर वसूल करणारे आले, ते पेत्राकडे येऊन म्हणाले, “तुमचे गुरू कर देत नाहीत काय?”
V Kafarnaum přišli k Petrovi výběrčí chrámové daně a zeptali se: „Váš mistr neplatí daň?“
25 २५ त्याने म्हटले, “होय देतो.” मग तो घरात आल्याबरोबर तो बोलण्या अगोदर येशू म्हणाला, “शिमोना, तुला काय वाटते? पृथ्वीवरील राजे जकात किंवा कर कोणाकडून घेतात, आपल्या मुलांकडून की परक्याकडून?”
„Platí, “odpověděl Petr. Doma ho Ježíš předešel otázkou: „Co myslíš, Petře, od koho vybírají králové a panovníci daně a poplatky? Od synů nebo od cizích?“
26 २६ जेव्हा तो म्हणाला, “परक्याकडून.” तेव्हा येशूने त्यास म्हटले, “तर मग मुले मोकळी आहेत.
„Od cizích, “odpověděl Petr.
27 २७ तरी आपण त्यांना अडखळण आणू नये, म्हणून सरोवराकडे जाऊन पाण्यात गळ टाक आणि पहिल्याने वर येईल तो मासा धरून त्याचे तोंड उघड म्हणजे तुला चांदीचे एक नाणे सापडेल. ते घेऊन माझ्याबद्दल व तुझ्याबद्दल त्यांना दे.”
„Dobře tedy, “řekl Ježíš, „synové tedy nejsou vázáni touto povinností! Ale nebudeme Jeruzalém zbytečně dráždit. Jdi k jezeru, nahoď udici a v první rybě, kterou chytneš, najdeš minci. Ta bude stačit na poplatek za nás oba.“