< मत्तय 16 >
1 १ परूशी आणि सदूकी लोकांस येशूची परीक्षा पाहायची होती म्हणून ते येशूकडे आले व आम्हास आकाशातून चिन्ह दाखवा अशी मागणी त्यांनी केली.
The Pharisees and Sadducees came, and testing him, asked him to show them a sign from heaven.
2 २ परंतु येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही संध्याकाळ झाली असता म्हणता आजचे हवामान चांगले असेल कारण आकाश तांबूस आहे,
But he answered and said to them, "When it is evening, you say, 'It will be fair weather, for the sky is red.'
3 ३ आणि तुम्ही सकाळी म्हणता, आज वादळ होईल कारण आभाळ तांबूस व गडद आहे. तुम्हास आकाशाचे स्वरूप ओळखता येते, पण काळाची लक्षणे ओळखता येत नाहीत काय?
In the morning, 'It will be foul weather today, for the sky is red and threatening.' You know how to discern the appearance of the sky, but you cannot discern the signs of the times.
4 ४ दुष्ट व देवाशी अप्रामाणिक असणारी पिढी चिन्ह शोधते, पण तिला योना संदेष्ट्याशिवाय दुसरे चिन्ह दिले जाणार नाही.” मग तो त्यांना सोडून गेला.
An evil and adulterous generation seeks after a sign, and there will be no sign given to it, except the sign of Jonah." He left them, and departed.
5 ५ येशू आणि त्याचे शिष्य सरोवराच्या पलीकडे गेले तेव्हा भाकरी घ्यायला विसरले.
The talmidim came to the other side and had forgotten to take bread.
6 ६ तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “परूशी व सदूकी यांच्या खमिराविषयी सावध असा.”
Yeshua said to them, "Watch out and guard yourselves against the hametz of the Pharisees and Sadducees."
7 ७ तेव्हा ते आपसात विचार करून म्हणाले, “आपण भाकरी घेतल्या नाहीत म्हणून ते असे म्हणत आहे.”
They reasoned among themselves, saying, "We brought no bread."
8 ८ पण येशूने हे ओळखून म्हटले, “अहो अल्पविश्वासू, आपण भाकरी घेतल्या नाहीत असा विचार तुम्ही आपसामध्ये का करता?
But Yeshua, becoming aware of this, said, "You of little faith, why are you discussing among yourselves about having no bread?
9 ९ तुम्हास अजून समजत नाही काय? पाच भाकारींनी पाच हजार लोकांस जेवू घातले ते आणि त्यानंतर तुम्ही किती टोपल्या उचलून घेतल्या ते तुम्हास आठवत नाही काय?
Do you still not understand? Do you not remember the five loaves for the five thousand, and how many baskets you took up?
10 १० तसेच चार हजारांच्या जेवणाला सात भाकरी आणि तुम्ही किती टोपल्या उचलून घेतल्या हे तुम्हास आठवत नाही काय?
Nor the seven loaves for the four thousand, and how many baskets you took up?
11 ११ मी भाकरी विषयी तुम्हास बोललो नाही, तर परूशी व सदूकी यांच्या खमिराविषयी सावध राहा, असे म्हणालो, हे तुम्हास कसे समजत नाही?”
Why is it that you do not understand that I did not speak to you concerning bread? But beware of the hametz of the Pharisees and Sadducees."
12 १२ तेव्हा त्यांना समजले की, त्याने त्यांना भाकरीच्या खमिराविषयी सावध राहण्यास सांगितले नव्हते तर परूशी आणि सदूकी यांच्या शिकवणुकीविषयी सावधान राहायला सांगितले होते.
Then they understood that he did not tell them to beware of the yeast of bread, but of the teaching of the Pharisees and Sadducees.
13 १३ येशू फिलिप्पाच्या कैसरीया या भागाकडे गेला. तो त्याच्या शिष्यांना म्हणाला, “मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात?”
Now when Yeshua came into the parts of Caesarea Philippi, he asked his talmidim, saying, "Who do people say that the Son of Man is?"
14 १४ आणि ते म्हणाले, “काही बाप्तिस्मा करणारा योहान, तर कित्येक एलीया तर दुसरे काही यिर्मया किंवा संदेष्ट्यापैकी एक असे म्हणतात.”
They said, "Some say John the Immerser, some, Elijah, and others, Jeremiah, or one of the prophets."
15 १५ मग येशू त्यांना म्हणाला, “पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता?”
He said to them, "But who do you say that I am?"
16 १६ शिमोन पेत्राने उत्तर दिले, “तू ख्रिस्त, जिवंत देवाचा पुत्र आहेस.”
Shim'on Peter answered, "You are the Messiah, the Son of the living God."
17 १७ येशू म्हणाला, “शिमोन, बार्योना, तू धन्य आहेस कारण रक्त व मांस यांनी तुला हे उघड केले नाही, तर माझा पिता जो स्वर्गात आहे त्याने तुला हे उघड केले.
And Yeshua answered him, "Blessed are you, Shim'on Bar Jonah, for flesh and blood has not revealed this to you, but my Father who is in heaven.
18 १८ आणखी मी तुला असे सांगतो की, तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन आणि तिच्यापुढे मृतलोकाच्या द्वारांचे कांहींच चालणार नाही. (Hadēs )
I also tell you that you are Peter, and on this Rock I will build my congregation, and the gates of Sheol will not prevail against it. (Hadēs )
19 १९ मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल.”
I will give to you the keys of the kingdom of heaven, and whatever you bind on earth will be bound in heaven, and whatever you loose on earth will be loosed in heaven."
20 २० तेव्हा त्याने शिष्यांना मी ख्रिस्त आहे ते तुम्ही कोणालाही सांगू नका असे निक्षून सांगितले.
Then he commanded the talmidim that they should tell no one that he is the Messiah.
21 २१ तेव्हापासून येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगू लागला की, आपण यरूशलेम शहराला जाऊन वडील, यहूदी नेते व मुख्य याजक लोक आणि नियमशास्त्राच्या शिक्षक यांच्याकडून पुष्कळ दुःखे सोसावी व जिवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी पुन्हा उठवले जावे याचे अगत्य आहे.
From that time, Yeshua began to show his talmidim that he must go to Jerusalem and suffer many things from the elders, chief cohanim, and scribes, and be killed, and the third day be raised up.
22 २२ तेव्हा पेत्राने त्यास एकाबाजूला घेऊन निषेध करून म्हटले, “प्रभू, तुझ्यापासून हे दूर असो. असे तुला कधीही होणारच नाही!”
Peter took him aside, and began to rebuke him, saying, "Far be it from you, Lord. This will never be done to you."
23 २३ परंतु तो वळून पेत्राला म्हणाला, “अरे सैताना, माझ्यापासून चालता हो, तू मला अडखळण आहेस, कारण तू देवाच्या गोष्टींकडे लक्ष लावीत नाहीस तर मनुष्यांच्या गोष्टींकडे लक्ष लावतोस.”
But he turned, and said to Peter, "Get behind me, Satan. You are a stumbling block to me, for you are not setting your mind on the things of God, but on the things of humans."
24 २४ तेव्हा येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, “जर कोणी माझ्यामागे येऊ इच्छित असेल तर त्याने स्वतःला नाकारावे आणि आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व माझ्यामागे यावे.
Then Yeshua said to his talmidim, "If anyone desires to come after me, let him deny himself, and take up his cross, and follow me.
25 २५ कारण जो कोणी आपला जीव वाचवू इच्छितो तो त्यास गमावील पण जो माझ्याकरिता आपला जीव गमावील तो त्यास मिळवील.
For whoever desires to save his life will lose it, and whoever will lose his life for my sake will find it.
26 २६ जर मनुष्याने सर्व जग मिळविले आणि आपला जीव गमावला तर त्यास काय लाभ? किंवा मनुष्य आपल्या जीवाचा काय मोबदला देईल?
For what will it profit a person, if he gains the whole world, and forfeits his life? Or what will a person give in exchange for his life?
27 २७ कारण मनुष्याचा पुत्र आपल्या पित्याच्या वैभवात आपल्या स्वर्गदूतांसहित येईल त्यावेळी तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कामाप्रमाणे मोबदला देईल.
For the Son of Man will come in the glory of his Father with his angels, and then he will render to everyone according to his deeds.
28 २८ मी तुम्हास खरे सांगतो की, येथे उभे राहणाऱ्यातले काहीजण असे आहेत की, ते मनुष्याच्या पुत्राला त्याच्या राज्यात येताना पाहतील तोपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही.”
Truly I tell you, there are some standing here who will in no way taste of death, until they see the Son of Man coming in his Kingdom."