< मत्तय 15 >
1 १ तेव्हा यरूशलेम शहराहून काही परूशी व नियमशास्त्राचे शिक्षक येशूकडे आले व म्हणाले,
Ipapo vanyori navaFarisi vakauya kuna Jesu vachibva kuJerusarema uye vakamubvunza vachiti,
2 २ “तुमचे शिष्य वाडवडिलांनी घालून दिलेले नियम का पाळत नाहीत? कारण तुमचे शिष्य जेवणापूर्वी हात धूत नाहीत.”
“Sei vadzidzi venyu vachityora tsika dzavakuru? Havashambi maoko avo vasati vadya!”
3 ३ येशूने त्यास उत्तर देऊन म्हटले, “तुम्ही तुमच्या परंपरा चालवण्यासाठी देवाची आज्ञा का मोडता?
Jesu akavapindura achiti, “Ko, imi munotyorerei murayiro waMwari nokuda kwetsika dzenyu?
4 ४ कारण देवाने सांगितले आहे की, ‘तुझ्या आई-वडीलांचा मान राख आणि जो कोणी आपल्या आई-वडीलांबद्दल वाईट बोलतो, त्यास जिवे मारावे.’
Nokuti Mwari akati, ‘Kudza baba vako namai vako’ uye, ‘Ani naani anotuka baba kana mai vake anofanira kuurayiwa.’
5 ५ पण तुम्ही म्हणता, ‘जो कोणी पित्याला किंवा आईला म्हणेल की, मला तुझ्यासाठी जे काही देणे भाग होते, ते मी देवाला अर्पण केले आहे.’
Asi imi munoti kana munhu akati kuna baba vake kana mai vake, ‘Chinhu chipi nechipi chamaiti munozogamuchira kubva kwandiri, chava chipo chakakumikidzwa kuna Mwari’,
6 ६ ते देवाचे नियमशास्त्र मोडीत आहेत की आपल्या वडिलांचा व आईचा सन्मान करू नये. याप्रकारे तुम्ही आपल्या अशा परंपरेने देवाचे वचन रद्द केले आहे.
haachafaniri ‘kukudza baba vake’ nacho? Saizvozvo munoshayisa shoko raMwari simba nokuda kwetsika dzenyu.
7 ७ अहो ढोंग्यानो, तुम्हाविषयी यशया संदेष्ट्याने योग्य सांगितले आहे. तो म्हणतो:
Imi vanyengeri! Isaya akaprofita kwazvo pamusoro penyu achiti:
8 ८ हे लोक, ओठांनी माझा सन्मान करतात. पण त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे.
“‘Vanhu ava vanondikudza nemiromo yavo, asi mwoyo yavo iri kure neni.
9 ९ आणि ते मनुष्याचे नियम आपली धर्मतत्त्वे म्हणून शिकवतात आणि व्यर्थच माझी उपासना करतात.”
Vanondinamata pasina; vachidzidzisa dzidziso nemirayiro yavanhu.’”
10 १० तेव्हा लोकांस आपल्याजवळ बोलावून त्याने म्हटले, “ऐका व समजून घ्या.
Jesu akadana vanhu vazhinji kwaari akati, “Teererai, munzwisise.
11 ११ जे तोंडाद्वारे आत जाते ते मनुष्यास अशुद्ध करीत नाही, पण जे तोंडातून बाहेर निघते तेच मनुष्यास अशुद्ध करते.”
Icho chinopinda mumuromo momunhu ‘hachimusvibisi’, asi chinobuda mumuromo make ndicho ‘chinomusvibisa’.”
12 १२ नंतर शिष्य जवळ येऊन त्यास म्हणाले, “परूश्यांनी जेव्हा हे ऐकले तेव्हा ते रागावले हे आपणाला कळले काय?”
Ipapo vadzidzi vakauya kwaari vakamubvunza vachiti, “Munoziva here kuti vaFarisi vagumburwa pavanzwa shoko iri?”
13 १३ पण त्याने उत्तर देऊन म्हटले, “प्रत्येक रोप जे माझ्या स्वर्गातील पित्याने लावले नाही ते उपटले जाईल.
Akapindura akati, “Muti mumwe nomumwe usina kusimwa naBaba vangu vokudenga uchadzurwa.
14 १४ त्यांना जाऊ द्या. ते आंधळे वाटाडे आहेत. जर एका आंधळ्याने दुसऱ्या आंधळ्याला वाट दाखवण्याचा प्रयत्न केला तर दोघेही खड्ड्यात पडतील.”
Vasiyei vakadaro, vatungamiriri vamapofu. Kana bofu rikatungamirira rimwe bofu, vose vachawira mugomba.”
15 १५ पेत्र म्हणाला, “आमच्यासाठी हा दाखला स्पष्ट करून सांगा.”
Petro akati, “Titsanangurirei mufananidzo uyu.”
16 १६ येशूने त्यांना विचारले, “तुम्ही अजूनही अज्ञानी आहात काय?
Jesu akavabvunza akati, “Nemiwo hamusati mava kunzwisisa?
17 १७ जे काही तोंडात जाते ते सर्व पोटात जाते व मग शौचकूपातून बाहेर टाकले जाते. हे तुम्हास अजून समजत नाही काय?
Hamuoniwo here kuti chose chinopinda mumuromo chinopinda mudumbu chichizobuda kunze!
18 १८ परंतु ज्या गोष्टी तोंडातून बाहेर निघतात त्या अंतःकरणातून येतात व त्याच मनुष्यास अशुद्ध करतात.
Asi zvinhu zvinobuda mumuromo zvinobva mumwoyo, izvozvi ndizvo zvinosvibisa munhu.
19 १९ कारण वाईट विचार, खून, व्यभिचार, जारकर्मे, खोट्या साक्षी, निंदा ही अंतःकरणातून बाहेर निघतात.
Nokuti mumwoyo munobuda pfungwa dzakaipa, umhondi, upombwe, unzenza, umbavha, uchapupu hwenhema nokureva nhema pamusoro pavamwe vanhu.
20 २० या गोष्टी मनुष्यास अशुद्ध करतात. परंतु न धुतलेल्या हाताने खाण्याने मनुष्य अशुद्ध होत नाही.”
Izvi ndizvo ‘zvinosvibisa’ munhu, asi kudya asina kushamba maoko ‘hazvimusvibisi’.”
21 २१ नंतर येशू तेथून निघून सोर व सिदोनाच्या भागात गेला.
Jesu akabvapo akaenda kudunhu reTire neSidhoni.
22 २२ तेव्हा एक कनानी स्त्री त्या भागातून येशूकडे आली. ती स्त्री ओरडून म्हणाली, “प्रभू, दाविदाच्या पुत्रा, माझ्यावर दया करा. माझी मुलगी भूताने फार पिडलेली आहे.”
Mumwe mukadzi muKenani womunzvimbo iyi akauya achidanidzira achiti, “Ishe, mwanakomana waDhavhidhi, ndinzwirei ngoni! Mwanasikana wangu ari kutambudzwa zvikuru nedhimoni rakamubata.”
23 २३ पण येशूने तिला एका शब्दानेही उत्तर दिले नाही, तेव्हा त्याच्या शिष्यांनी येऊन त्यास विनंती केली, “तिला पाठवून द्या, कारण ती आमच्या मागे ओरडत येत आहे.”
Jesu haana chaakapindura. Ipapo vadzidzi vake vakauya kwaari vakasvikoti, “Mudzingei nokuti ari kuramba achidanidzira kwatiri.”
24 २४ पण येशूने उत्तर दिले, “मला देवाने फक्त इस्राएलाच्या हरवलेल्या मेंढरांकडे पाठवले आहे.”
Akati kwavari, “Ndakatumwa kumakwai akarasika eIsraeri chete.”
25 २५ मग ती स्त्री पुन्हा येशूकडे आली, ती येशूच्या पाया पडली व म्हणाली, “प्रभूजी, मला मदत करा.”
Mukadzi uya akauya akasvikopfugama pamberi pake akati, “Ishe, ndibatsireiwo!”
26 २६ परंतु त्याने म्हटले, “मुलाची भाकर घेऊन कुत्र्यास टाकणे योग्य नाही.”
Akapindura akati, “Hazvina kunaka kutora chingwa chavana muchichikandira imbwa.”
27 २७ ती स्त्री म्हणाली, “होय प्रभूजी, परंतु तरीही कुत्रीही आपल्या धन्याच्या मेजावरून पडलेला चूरा खातात.”
Mukadzi uya akati, “Hongu Ishe, kunyange nembwa dzinodyawo zvimedu zvinodonha kubva patafura yatenzi wadzo.”
28 २८ तेव्हा येशूने तिला उत्तर दिले, “मुली, तुझा विश्वास मोठा आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे तुला प्राप्त होवो.” आणि त्याचवेळी तिची मुलगी बरी झाली.
Ipapo Jesu akapindura akati, “Mai, mune kutenda kukuru! Chikumbiro chenyu chanzwikwa.” Mwanasikana wake akabva aporeswa kubva panguva iyoyo.
29 २९ नंतर येशू तेथून निघून गालीलच्या सरोवराजवळ आला व येशू डोंगरावर चढून तेथे बसला.
Jesu akabvapo akatevedza gungwa reGarirea. Ipapo akakwira mugomo akagara pasi.
30 ३० मग पुष्कळ लोक त्याच्याकडे आले, त्यांनी आपल्याबरोबर लुळे, पांगळे, आंधळे, बहिरे व इतर अनेक लोकांस आणले होते आणि त्यांनी त्या आजाऱ्यांना येशूच्या पायावर ठेवले. तेव्हा त्याने त्यांना बरे केले.
Uye vanhu vazhinji vakauya kwaari navakaremara, mapofu, mhetamakumbo, mbeveve navamwe vazhinji, vakasvikovaisa patsoka dzake uye akavaporesa.
31 ३१ मुके बोलू लागले, व्यंग असलेले चांगले झाले, लंगडे चालू लागले, आंधळे पाहू लागले. हे पाहून लोक थक्क झाले आणि त्यांनी इस्राएलाच्या देवाचे गौरव केले.
Vanhu vakashamiswa kuona mbeveve dzichitaura, mhetamakumbo dzichitwasanudzwa, vakaremara vachifamba namapofu achiona. Vakarumbidza Mwari weIsraeri.
32 ३२ मग येशूने आपल्या शिष्यांना आपल्याजवळ बोलावून म्हटले, “मला लोकांचा कळवळा येतो कारण ते आज तीन दिवसांपासून माझ्याबरोबर राहिले आहेत आणि त्यांच्याकडे खायला काही नाही, त्यांना उपाशी पाठवावे अशी माझी इच्छा नाही कारण ते वाटेत कदाचित कासावीस होतील.”
Jesu akadana vadzidzi vake akati kwavari, “Ndiri kunzwa tsitsi pamusoro pavanhu ava; vanga vachingova neni kwamazuva matatu uye havachina chokudya. Handidi kuti ndivaendese vaine nzara nokuti vangaziya nenzara munzira.”
33 ३३ शिष्य त्यास म्हणाले, “एवढ्या मोठ्या लोकसमुदायाला तृप्त करावे इतक्या भाकरी या दूर रानात आमच्याजवळ कोठून असणार?”
Vadzidzi vake vakapindura vachiti, “Ndokupi kwatingawana chingwa chinokwana vanhu vose ava muno musango makadai?”
34 ३४ तेव्हा येशू म्हणाला, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?” ते म्हणाले, “आमच्याकडे सात भाकरी आहेत व काही लहान मासे आहेत.”
Jesu akabvunza akati, “Mune zvingwa zvingani?” Ivo vakati, “Tine zvinomwe notuhove tushoma shoma.”
35 ३५ मग त्याने लोकांस जमिनीवर बसविण्याची आज्ञा केली.
Akarayira kuti vanhu vose vagare pasi.
36 ३६ मग त्या सात भाकरी व मासे घेऊन त्याने देवाचे उपकार मानले व त्या भाकरी मोडल्या व शिष्यांना दिल्या व शिष्यांनी लोकांस दिल्या.
Ipapo akatora zvingwa zvinomwe zviya nehove dziya, akavonga, akazvimedura ndokuzvipa kuvadzidzi, ivowo ndokupa vanhu vose.
37 ३७ तेव्हा ते सर्व जेवून तृप्त झाले आणि त्यांनी उरलेल्या तुकड्यांनी भरलेल्या सात टोपल्या गोळा केल्या.
Vose vakadya vakaguta. Mushure, vadzidzi vakanhongera zvimedu zvakanga zvasara zvikazadza matengu manomwe.
38 ३८ आणि जेवणारे, स्त्रिया व लेकरे सोडून चार हजार पुरूष होते.
Vanhu vakadya vaiva varume zviuru zvina, vakadzi navana vasingaverengerwi.
39 ३९ मग समुदायास निरोप दिल्यावर तो तारवात बसून मगदानाच्या प्रदेशात गेला.
Mushure mokunge Jesu aendesa vanhu vazhinji ava, akapinda mugwa ndokubva aenda kudunhu reMagadhani.