< मत्तय 15 >

1 तेव्हा यरूशलेम शहराहून काही परूशी व नियमशास्त्राचे शिक्षक येशूकडे आले व म्हणाले,
အပရံ ယိရူၑာလမ္နဂရီယား ကတိပယာ အဓျာပကား ဖိရူၑိနၑ္စ ယီၑေား သမီပမာဂတျ ကထယာမာသုး,
2 “तुमचे शिष्य वाडवडिलांनी घालून दिलेले नियम का पाळत नाहीत? कारण तुमचे शिष्य जेवणापूर्वी हात धूत नाहीत.”
တဝ ၑိၐျား ကိမရ္ထမ် အပြက္ၐာလိတကရဲ ရ္ဘက္ၐိတွာ ပရမ္ပရာဂတံ ပြာစီနာနာံ ဝျဝဟာရံ လငွန္တေ?
3 येशूने त्यास उत्तर देऊन म्हटले, “तुम्ही तुमच्या परंपरा चालवण्यासाठी देवाची आज्ञा का मोडता?
တတော ယီၑုး ပြတျုဝါစ, ယူယံ ပရမ္ပရာဂတာစာရေဏ ကုတ ဤၑွရာဇ္ဉာံ လငွဓွေ၊
4 कारण देवाने सांगितले आहे की, ‘तुझ्या आई-वडीलांचा मान राख आणि जो कोणी आपल्या आई-वडीलांबद्दल वाईट बोलतो, त्यास जिवे मारावे.’
ဤၑွရ ဣတျာဇ္ဉာပယတ်, တွံ နိဇပိတရော် သံမနျေထား, ယေန စ နိဇပိတရော် နိန္ဒျေတေ, သ နိၑ္စိတံ မြိယေတ;
5 पण तुम्ही म्हणता, ‘जो कोणी पित्याला किंवा आईला म्हणेल की, मला तुझ्यासाठी जे काही देणे भाग होते, ते मी देवाला अर्पण केले आहे.’
ကိန္တု ယူယံ ဝဒထ, ယး သွဇနကံ သွဇနနီံ ဝါ ဝါကျမိဒံ ဝဒတိ, ယုဝါံ မတ္တော ယလ္လဘေထေ, တတ် နျဝိဒျတ,
6 ते देवाचे नियमशास्त्र मोडीत आहेत की आपल्या वडिलांचा व आईचा सन्मान करू नये. याप्रकारे तुम्ही आपल्या अशा परंपरेने देवाचे वचन रद्द केले आहे.
သ နိဇပိတရော် ပုန ရ္န သံမံသျတေ၊ ဣတ္ထံ ယူယံ ပရမ္ပရာဂတေန သွေၐာမာစာရေဏေၑွရီယာဇ္ဉာံ လုမ္ပထ၊
7 अहो ढोंग्यानो, तुम्हाविषयी यशया संदेष्ट्याने योग्य सांगितले आहे. तो म्हणतो:
ရေ ကပဋိနး သရွွေ ယိၑယိယော ယုၐ္မာနဓိ ဘဝိၐျဒွစနာနျေတာနိ သမျဂ် ဥက္တဝါန်၊
8 हे लोक, ओठांनी माझा सन्मान करतात. पण त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे.
ဝဒနဲ ရ္မနုဇာ ဧတေ သမာယာန္တိ မဒန္တိကံ၊ တထာဓရဲ ရ္မဒီယဉ္စ မာနံ ကုရွွန္တိ တေ နရား၊
9 आणि ते मनुष्याचे नियम आपली धर्मतत्त्वे म्हणून शिकवतात आणि व्यर्थच माझी उपासना करतात.”
ကိန္တု တေၐာံ မနော မတ္တော ဝိဒူရဧဝ တိၐ္ဌတိ၊ ၑိက္ၐယန္တော ဝိဓီန် နြာဇ္ဉာ ဘဇန္တေ မာံ မုဓဲဝ တေ၊
10 १० तेव्हा लोकांस आपल्याजवळ बोलावून त्याने म्हटले, “ऐका व समजून घ्या.
တတော ယီၑု ရ္လောကာန် အာဟူယ ပြောက္တဝါန်, ယူယံ ၑြုတွာ ဗုဓျဓ္ဗံ၊
11 ११ जे तोंडाद्वारे आत जाते ते मनुष्यास अशुद्ध करीत नाही, पण जे तोंडातून बाहेर निघते तेच मनुष्यास अशुद्ध करते.”
ယန္မုခံ ပြဝိၑတိ, တတ် မနုဇမ် အမေဓျံ န ကရောတိ, ကိန္တု ယဒါသျာတ် နိရ္ဂစ္ဆတိ, တဒေဝ မာနုၐမမေဓျီ ကရောတီ၊
12 १२ नंतर शिष्य जवळ येऊन त्यास म्हणाले, “परूश्यांनी जेव्हा हे ऐकले तेव्हा ते रागावले हे आपणाला कळले काय?”
တဒါနီံ ၑိၐျာ အာဂတျ တသ္မဲ ကထယာဉ္စကြုး, ဧတာံ ကထာံ ၑြုတွာ ဖိရူၑိနော ဝျရဇျန္တ, တတ် ကိံ ဘဝတာ ဇ္ဉာယတေ?
13 १३ पण त्याने उत्तर देऊन म्हटले, “प्रत्येक रोप जे माझ्या स्वर्गातील पित्याने लावले नाही ते उपटले जाईल.
သ ပြတျဝဒတ်, မမ သွရ္ဂသ္ထး ပိတာ ယံ ကဉ္စိဒင်္ကုရံ နာရောပယတ်, သ ဥတ္ပာဝ္ဒျတေ၊
14 १४ त्यांना जाऊ द्या. ते आंधळे वाटाडे आहेत. जर एका आंधळ्याने दुसऱ्या आंधळ्याला वाट दाखवण्याचा प्रयत्न केला तर दोघेही खड्ड्यात पडतील.”
တေ တိၐ္ဌန္တု, တေ အန္ဓမနုဇာနာမ် အန္ဓမာရ္ဂဒရ္ၑကာ ဧဝ; ယဒျန္ဓော'န္ဓံ ပန္ထာနံ ဒရ္ၑယတိ, တရှျုဘော် ဂရ္တ္တေ ပတတး၊
15 १५ पेत्र म्हणाला, “आमच्यासाठी हा दाखला स्पष्ट करून सांगा.”
တဒါ ပိတရသ္တံ ပြတျဝဒတ်, ဒၖၐ္ဋာန္တမိမမသ္မာန် ဗောဓယတု၊
16 १६ येशूने त्यांना विचारले, “तुम्ही अजूनही अज्ञानी आहात काय?
ယီၑုနာ ပြောက္တံ, ယူယမဒျ ယာဝတ် ကိမဗောဓား သ္ထ?
17 १७ जे काही तोंडात जाते ते सर्व पोटात जाते व मग शौचकूपातून बाहेर टाकले जाते. हे तुम्हास अजून समजत नाही काय?
ကထာမိမာံ ကိံ န ဗုဓျဓ္ဗေ? ယဒါသျံ ပြေဝိၑတိ, တဒ် ဥဒရေ ပတန် ဗဟိရ္နိရျာတိ,
18 १८ परंतु ज्या गोष्टी तोंडातून बाहेर निघतात त्या अंतःकरणातून येतात व त्याच मनुष्यास अशुद्ध करतात.
ကိန္တွာသျာဒ် ယန္နိရျာတိ, တဒ် အန္တးကရဏာတ် နိရျာတတွာတ် မနုဇမမေဓျံ ကရောတိ၊
19 १९ कारण वाईट विचार, खून, व्यभिचार, जारकर्मे, खोट्या साक्षी, निंदा ही अंतःकरणातून बाहेर निघतात.
ယတော'န္တးကရဏာတ် ကုစိန္တာ ဗဓး ပါရဒါရိကတာ ဝေၑျာဂမနံ စဲရျျံ မိထျာသာက္ၐျမ် ဤၑွရနိန္ဒာ စဲတာနိ သရွွာဏိ နိရျျာန္တိ၊
20 २० या गोष्टी मनुष्यास अशुद्ध करतात. परंतु न धुतलेल्या हाताने खाण्याने मनुष्य अशुद्ध होत नाही.”
ဧတာနိ မနုၐျမပဝိတြီ ကုရွွန္တိ ကိန္တွပြက္ၐာလိတကရေဏ ဘောဇနံ မနုဇမမေဓျံ န ကရောတိ၊
21 २१ नंतर येशू तेथून निघून सोर व सिदोनाच्या भागात गेला.
အနန္တရံ ယီၑုသ္တသ္မာတ် သ္ထာနာတ် ပြသ္ထာယ သောရသီဒေါန္နဂရယေား သီမာမုပတသျော်၊
22 २२ तेव्हा एक कनानी स्त्री त्या भागातून येशूकडे आली. ती स्त्री ओरडून म्हणाली, “प्रभू, दाविदाच्या पुत्रा, माझ्यावर दया करा. माझी मुलगी भूताने फार पिडलेली आहे.”
တဒါ တတ္သီမာတး ကာစိတ် ကိနာနီယာ ယောၐိဒ် အာဂတျ တမုစ္စဲရုဝါစ, ဟေ ပြဘော ဒါယူဒး သန္တာန, မမဲကာ ဒုဟိတာသ္တေ သာ ဘူတဂြသ္တာ သတီ မဟာက္လေၑံ ပြာပ္နောတိ မမ ဒယသွ၊
23 २३ पण येशूने तिला एका शब्दानेही उत्तर दिले नाही, तेव्हा त्याच्या शिष्यांनी येऊन त्यास विनंती केली, “तिला पाठवून द्या, कारण ती आमच्या मागे ओरडत येत आहे.”
ကိန္တု ယီၑုသ္တာံ ကိမပိ နောက္တဝါန်, တတး ၑိၐျာ အာဂတျ တံ နိဝေဒယာမာသုး, ဧၐာ ယောၐိဒ် အသ္မာကံ ပၑ္စာဒ် ဥစ္စဲရာဟူယာဂစ္ဆတိ, ဧနာံ ဝိသၖဇတု၊
24 २४ पण येशूने उत्तर दिले, “मला देवाने फक्त इस्राएलाच्या हरवलेल्या मेंढरांकडे पाठवले आहे.”
တဒါ သ ပြတျဝဒတ်, ဣသြာယေလ္ဂောတြသျ ဟာရိတမေၐာန် ဝိနာ ကသျာပျနျသျ သမီပံ နာဟံ ပြေၐိတောသ္မိ၊
25 २५ मग ती स्त्री पुन्हा येशूकडे आली, ती येशूच्या पाया पडली व म्हणाली, “प्रभूजी, मला मदत करा.”
တတး သာ နာရီသမာဂတျ တံ ပြဏမျ ဇဂါဒ, ဟေ ပြဘော မာမုပကုရု၊
26 २६ परंतु त्याने म्हटले, “मुलाची भाकर घेऊन कुत्र्यास टाकणे योग्य नाही.”
သ ဥက္တဝါန်, ဗာလကာနာံ ဘက္ၐျမာဒါယ သာရမေယေဘျော ဒါနံ နောစိတံ၊
27 २७ ती स्त्री म्हणाली, “होय प्रभूजी, परंतु तरीही कुत्रीही आपल्या धन्याच्या मेजावरून पडलेला चूरा खातात.”
တဒါ သာ ဗဘာၐေ, ဟေ ပြဘော, တတ် သတျံ, တထာပိ ပြဘော ရ္ဘဉ္စာဒ် ယဒုစ္ဆိၐ္ဋံ ပတတိ, တတ် သာရမေယား ခါဒန္တိ၊
28 २८ तेव्हा येशूने तिला उत्तर दिले, “मुली, तुझा विश्वास मोठा आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे तुला प्राप्त होवो.” आणि त्याचवेळी तिची मुलगी बरी झाली.
တတော ယီၑုး ပြတျဝဒတ်, ဟေ ယောၐိတ်, တဝ ဝိၑွာသော မဟာန် တသ္မာတ် တဝ မနောဘိလၐိတံ သိဒျျတု, တေန တသျား ကနျာ တသ္မိန္နေဝ ဒဏ္ဍေ နိရာမယာဘဝတ်၊
29 २९ नंतर येशू तेथून निघून गालीलच्या सरोवराजवळ आला व येशू डोंगरावर चढून तेथे बसला.
အနန္တရံ ယီၑသ္တသ္မာတ် သ္ထာနာတ် ပြသ္ထာယ ဂါလီလ္သာဂရသျ သန္နိဓိမာဂတျ ဓရာဓရမာရုဟျ တတြောပဝိဝေၑ၊
30 ३० मग पुष्कळ लोक त्याच्याकडे आले, त्यांनी आपल्याबरोबर लुळे, पांगळे, आंधळे, बहिरे व इतर अनेक लोकांस आणले होते आणि त्यांनी त्या आजाऱ्यांना येशूच्या पायावर ठेवले. तेव्हा त्याने त्यांना बरे केले.
ပၑ္စာတ် ဇနနိဝဟော ဗဟူန် ခဉ္စာန္ဓမူကၑုၐ္ကကရမာနုၐာန် အာဒါယ ယီၑေား သမီပမာဂတျ တစ္စရဏာန္တိကေ သ္ထာပယာမာသုး, တတး သာ တာန် နိရာမယာန် အကရောတ်၊
31 ३१ मुके बोलू लागले, व्यंग असलेले चांगले झाले, लंगडे चालू लागले, आंधळे पाहू लागले. हे पाहून लोक थक्क झाले आणि त्यांनी इस्राएलाच्या देवाचे गौरव केले.
ဣတ္ထံ မူကာ ဝါကျံ ဝဒန္တိ, ၑုၐ္ကကရား သွာသ္ထျမာယာန္တိ, ပင်္ဂဝေါ ဂစ္ဆန္တိ, အန္ဓာ ဝီက္ၐန္တေ, ဣတိ ဝိလောကျ လောကာ ဝိသ္မယံ မနျမာနာ ဣသြာယေလ ဤၑွရံ ဓနျံ ဗဘာၐိရေ၊
32 ३२ मग येशूने आपल्या शिष्यांना आपल्याजवळ बोलावून म्हटले, “मला लोकांचा कळवळा येतो कारण ते आज तीन दिवसांपासून माझ्याबरोबर राहिले आहेत आणि त्यांच्याकडे खायला काही नाही, त्यांना उपाशी पाठवावे अशी माझी इच्छा नाही कारण ते वाटेत कदाचित कासावीस होतील.”
တဒါနီံ ယီၑုး သွၑိၐျာန် အာဟူယ ဂဒိတဝါန်, ဧတဇ္ဇနနိဝဟေၐု မမ ဒယာ ဇာယတေ, ဧတေ ဒိနတြယံ မယာ သာကံ သန္တိ, ဧၐာံ ဘက္ၐျဝသ္တု စ ကဉ္စိဒပိ နာသ္တိ, တသ္မာဒဟမေတာနကၖတာဟာရာန် န ဝိသြက္ၐျာမိ, တထာတွေ ဝရ္တ္မမဓျေ က္လာမျေၐုး၊
33 ३३ शिष्य त्यास म्हणाले, “एवढ्या मोठ्या लोकसमुदायाला तृप्त करावे इतक्या भाकरी या दूर रानात आमच्याजवळ कोठून असणार?”
တဒါ ၑိၐျာ ဦစုး, ဧတသ္မိန် ပြာန္တရမဓျ ဧတာဝတော မရ္တျာန် တရ္ပယိတုံ ဝယံ ကုတြ ပူပါန် ပြာပ္သျာမး?
34 ३४ तेव्हा येशू म्हणाला, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?” ते म्हणाले, “आमच्याकडे सात भाकरी आहेत व काही लहान मासे आहेत.”
ယီၑုရပၖစ္ဆတ်, ယုၐ္မာကံ နိကဋေ ကတိ ပူပါ အာသတေ? တ ဦစုး, သပ္တပူပါ အလ္ပား က္ၐုဒြမီနာၑ္စ သန္တိ၊
35 ३५ मग त्याने लोकांस जमिनीवर बसविण्याची आज्ञा केली.
တဒါနီံ သ လောကနိဝဟံ ဘူမာဝုပဝေၐ္ဋုမ် အာဒိၑျ
36 ३६ मग त्या सात भाकरी व मासे घेऊन त्याने देवाचे उपकार मानले व त्या भाकरी मोडल्या व शिष्यांना दिल्या व शिष्यांनी लोकांस दिल्या.
တာန် သပ္တပူပါန် မီနာံၑ္စ ဂၖဟ္လန် ဤၑွရီယဂုဏာန် အနူဒျ ဘံက္တွာ ၑိၐျေဘျော ဒဒေါ်, ၑိၐျာ လောကေဘျော ဒဒုး၊
37 ३७ तेव्हा ते सर्व जेवून तृप्त झाले आणि त्यांनी उरलेल्या तुकड्यांनी भरलेल्या सात टोपल्या गोळा केल्या.
တတး သရွွေ ဘုက္တွာ တၖပ္တဝန္တး; တဒဝၑိၐ္ဋဘက္ၐျေဏ သပ္တဍလကာန် ပရိပူရျျ သံဇဂၖဟုး၊
38 ३८ आणि जेवणारे, स्त्रिया व लेकरे सोडून चार हजार पुरूष होते.
တေ ဘောက္တာရော ယောၐိတော ဗာလကာံၑ္စ ဝိဟာယ ပြာယေဏ စတုးသဟသြာဏိ ပုရုၐာ အာသန်၊
39 ३९ मग समुदायास निरोप दिल्यावर तो तारवात बसून मगदानाच्या प्रदेशात गेला.
တတး ပရံ သ ဇနနိဝဟံ ဝိသၖဇျ တရိမာရုဟျ မဂ္ဒလာပြဒေၑံ ဂတဝါန်၊

< मत्तय 15 >