< मत्तय 14 >
1 १ त्यावेळी चौथाई देशांचा राजा हेरोदाने येशूची किर्ती ऐकली.
En ce temps-là, Hérode le Tétrarque entendit le bruit qui se faisait autour de Jésus, et il dit à ses serviteurs:
2 २ तेव्हा त्याने आपल्या चाकरांना म्हटले, “येशू हा बाप्तिस्मा करणारा योहान आहे. त्यास मरण पावलेल्यातून उठविण्यात आले आहे म्हणून याच्याठायी सामर्थ्य कार्य करीत आहे.”
«C'est Jean-Baptiste; il est ressuscité des morts, et c'est pour cela que la puissance miraculeuse se déploie en lui.»
3 ३ हेरोदाने आपला भाऊ फिलिप्प याची पत्नी हेरोदिया हिच्यामुळे योहानाला अटक करून तुरूंगात टाकले होते.
Hérode, en effet, avait fait arrêter Jean, l'avait chargé de chaînes et mis en prison à cause d'Hérodiade, femme de son frère,
4 ४ कारण योहान त्यास सांगत होता, “तू तिला पत्नी बनवावे हे देवाच्या नियमशास्त्राच्या योग्य नाही.”
parce que Jean lui disait: «Il ne t'est pas permis d'en faire ta femme.»
5 ५ हेरोद त्यास मारावयास पाहत होता, पण तो लोकांस भीत होता कारण लोकांचा असा विश्वास होता की, योहान संदेष्टा आहे.
Il voulait le faire mourir, mais il craignait le peuple, parce qu'on tenait Jean pour un prophète.
6 ६ हेरोदाच्या वाढदिवशी हेरोदियाच्या मुलीने दरबारात नाच करून हेरोदाला खूश केले.
Or, à l'anniversaire de la naissance d'Hérode, la fille d'Hérodiade dansa devant les convives et charma Hérode,
7 ७ त्यामुळे त्याने शपथ वाहून ती जे काही मागेल ते देण्याचे अभिवचन तिला दिले.
si bien qu'il lui promit avec serment de lui donner ce qu'elle demanderait.
8 ८ तिच्या आईच्या सांगण्यावरून ती म्हणाली, “बाप्तिस्मा करणारा योहानाचे शीर तबकात घालून मला इथे आणून द्या.”
Poussée par sa mère, elle lui dit: «Donne-moi, ici, dans un bassin, la tête de Jean-Baptiste.»
9 ९ हेरोद राजाला फार वाईट वाटले. तरी त्याने आपल्या शपथपूर्वक दिलेल्या वचनामुळे व आमंत्रित लोकांमुळे ते द्यावयाची आज्ञा केली.
Le Roi en fut fâché; mais à cause de ses serments et de ceux qui étaient à table avec lui, il commanda qu'on la lui donnât,
10 १० आणि त्याने तुरुंगात माणसे पाठवून योहानाचे शीर उडवले.
et il envoya décapiter Jean dans la prison.
11 ११ मग त्यांनी त्याचे शीर तबकात घालून त्या मुलीला आणून दिले. तिने ते आपल्या आईकडे आणले.
On apporta la tête dans un bassin, et on la donna à la jeune fille, qui la porta à sa mère.
12 १२ मग त्याच्या शिष्यांनी येऊन त्याचे प्रेत उचलून नेले व त्यास पुरले आणि त्यांनी जाऊन जे घडले ते येशूला सांगितले.
Les disciples de Jean vinrent prendre le corps, et l'ensevelirent, puis ils allèrent informer Jésus de ce qui s'était passé.
13 १३ मग ते ऐकून येशू तेथून होडीत बसून निवांत जागी निघून गेला. हे ऐकून लोकसमुदाय नगरांतून त्याच्यामागे पायीपायी गेले.
Jésus ayant appris ce que disait Hérode, entra dans une barque, et se retira à l'écart, en un lieu solitaire; la foule, l'ayant su, l'y suivit à pied, des différentes villes.
14 १४ मग जेव्हा त्याने मोठा लोकसमुदाय पाहिला. तेव्हा त्यास त्यांच्याविषयी कळवळा आला व जे आजारी होते त्यांना त्याने बरे केले.
Lorsqu'il sortit de la barque, il vit une grande foule; et il en eut pitié, et il guérit leurs malades.
15 १५ मग संध्याकाळ झाल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे आले आणि म्हणाले, “ही अरण्यातील जागा आहे आणि भोजनाची वेळ होऊन गेली आहे. लोकांनी गावामध्ये जाऊन स्वतःकरता अन्न विकत घ्यावे म्हणून त्यांना पाठवून द्या.”
Quand le soir fut venu, les disciples s'approchèrent de Jésus, et lui dirent: «Ce lieu est désert, et l'heure est déjà avancée; renvoie cette foule de gens, afin qu'ils aillent dans les villages s'acheter des vivres.»
16 १६ परंतु येशू त्यांना म्हणाला, “त्यांना जाण्याची गरज नाही. तुम्हीच त्यांना काही खायला द्या.”
Mais Jésus leur dit: «Il n'est pas nécessaire qu'ils y aillent; donnez-leur vous-mêmes à manger.»
17 १७ ते त्यास म्हणाले, आमच्याजवळ केवळ “पाच भाकरी व दोन मासे आहेत.”
Ils lui répondirent: «Nous n'avons ici que cinq pains et deux poissons.»
18 १८ तो म्हणाला, “ते माझ्याकडे आणा.”
— «Apportez-les-moi ici, » leur dit Jésus.
19 १९ मग लोकांस गवतावर बसण्याची आज्ञा केली. त्याने त्या पाच भाकरी व दोन मासे घेऊन वर आकाशाकडे पाहून त्यावर आशीर्वाद मागितला. नंतर त्याने भाकरी मोडून शिष्यांना दिल्या व शिष्यांनी लोकांस दिल्या.
Après avoir fait asseoir cette multitude sur l'herbe, il prit les cinq pains et les deux poissons, et, levant les yeux au ciel, il prononça la bénédiction; puis, ayant rompu les pains, il les donna à ses disciples, et les disciples les donnèrent à la foule.
20 २० ते सर्व जेवून तृप्त झाले. मग त्या उरलेल्या तुकड्यांच्या त्यांनी बारा टोपल्या भरून घेतल्या.
Tous mangèrent et furent rassasiés; et l'on emporta douze corbeilles pleines des morceaux qui restaient.
21 २१ जेवणारे सुमारे पाच हजार पुरूष होते. शिवाय स्त्रिया व मुले होतीच.
Le nombre de ceux qui mangèrent se montait à cinq mille hommes environ, sans compter les femmes et les enfants.
22 २२ मी लोकसमुदायास निरोप देत आहे तो तुम्ही तारवात बसून माझ्यापुढे पलीकडे जा असे म्हणून त्याने लगेच शिष्यांना पाठवून दिले.
Aussitôt après, Jésus pressa ses disciples d'entrer dans la barque et de. le précéder vers l'autre rive, pendant qu'il renverrait la foule.
23 २३ लोकांस पाठवून दिल्यावर तो प्रार्थना करण्यास एकांत ठिकाणी डोंगरावर गेला, रात्र झाली तेव्हा तो तेथे एकटाच होता.
Quand il l'eut renvoyée, il monta sur la montagne, pour prier à l'écart; et, la nuit venue, il était là seul.
24 २४ पण तारू सरोवरामध्ये होते. इकडे वारा विरूद्ध दिशेने वाहत असल्यामुळे तारू लाटांनी हेलकावत होते व त्यामुळे ते त्याच्यावर ताबा ठेवू शकत नव्हते.
Cependant la barque, qui se trouvait déjà au milieu de la mer, était tourmentée par les vagues, car le vent était contraire.
25 २५ तेव्हा रात्रीच्या चौथ्या प्रहरी येशू त्याच्याकडे आला. तो पाण्यावरून चालत होता.
A la quatrième veille de la nuit, Jésus alla vers ses disciples, en marchant sur la mer.
26 २६ शिष्य त्यास पाण्यावरून चालताना पाहून घाबरून गेले व म्हणाले, हे “भूत आहे.” आणि ते भिऊन ओरडले
Eux, le voyant marcher sur la mer, furent bouleversés, et dirent: «C'est un fantôme; » et ils poussèrent un cri de frayeur.
27 २७ पण येशू लगेच त्यांना म्हणाला, “धीर धरा, मी आहे; भिऊ नका.”
Mais aussitôt Jésus leur parla, et leur dit: «Rassurez-vous, c'est moi; n'ayez point de peur.»
28 २८ पेत्र म्हणाला, प्रभूजी जर आपण असाल तर मला पाण्यावरून आपणाकडे येण्यास सांगा.
Pierre, ayant pris la parole, lui dit: «Seigneur, si c'est toi, ordonne que j'aille vers toi en marchant sur les eaux.»
29 २९ येशू म्हणाला, “ये.” मग पेत्र तारवातून उतरून व पाण्यावर चालत येशूकडे जाऊ लागला.
Jésus lui dit: «Viens.» Et Pierre, étant sorti de la barque, marcha sur les eaux et s'avança vers Jésus.
30 ३० पण तो पाण्यावर चालत असताना जोराचा वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असता ओरडून म्हणाला “प्रभूजी, मला वाचवा.”
Mais, voyant que le vent était fort, il eut peur, et, comme il commençait à enfoncer, il s'écria: «Seigneur, sauve-moi!»
31 ३१ आणि लगेच येशूने आपला हात पुढे करून त्यास धरले व म्हटले, “अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरलास?”
Aussitôt Jésus étendit la main, le saisit, et lui dit: «Homme de peu de foi, pourquoi as-tu douté?»
32 ३२ मग येशू व पेत्र होडीत गेल्यावर वारा थांबला.
Ils entrèrent ensuite dans la barque, et le vent cessa.
33 ३३ तेव्हा जे शिष्य होडीत होते ते त्यास नमन करून म्हणाले, “तुम्ही खरोखर देवाचे पुत्र आहात.”
Ceux qui étaient dans la barque vinrent se prosterner devant Jésus, disant: «Tu es vraiment le Fils de Dieu.»
34 ३४ नंतर ते पलीकडे गनेसरेताच्या भागात गेले.
Lorsqu'ils eurent achevé leur traversée, ils arrivèrent au pays de Génésareth.
35 ३५ तेथील लोकांनी येशूला ओळखून व सभोवतालच्या सर्व प्रदेशात निरोप पाठवला व त्यांनी सर्व प्रकारच्या आजाऱ्यांस त्याच्याकडे आणले.
Les gens de l'endroit, ayant reconnu Jésus, envoyèrent annoncer sa présence dans tous les environs, de sorte qu'on lui amena tous les malades.
36 ३६ आणि आम्हास आपल्या वस्त्राच्या काठाला स्पर्श करू द्यावा, अशी विनंती केली, तेव्हा जितक्यांनी स्पर्श केला तितके बरे झाले.
On le pria de leur laisser seulement toucher la houppe de son manteau; et tous ceux qui la touchèrent furent guéris.