< मत्तय 13 >

1 त्यादिवशी येशू घरातून निघून सरोवराच्या किनार्‍याशी जाऊन बसला
अपरञ्च तस्मिन् दिने यीशुः सद्मनो गत्वा सरित्पते रोधसि समुपविवेश।
2 तेव्हा लोकांचे समुदाय त्याच्याजवळ जमले; म्हणून तो मचव्यात जाऊन बसला व सर्व लोक किनार्‍यावर उभे राहिले.
तत्र तत्सन्निधौ बहुजनानां निवहोपस्थितेः स तरणिमारुह्य समुपाविशत्, तेन मानवा रोधसि स्थितवन्तः।
3 मग त्याने त्यांना दाखल्यांनी पुष्कळ गोष्टी सांगितल्या तो म्हणाला “पाहा, पेरणारा पेरणी करावयास निघाला;
तदानीं स दृष्टान्तैस्तान् इत्थं बहुश उपदिष्टवान्। पश्यत, कश्चित् कृषीवलो बीजानि वप्तुं बहिर्जगाम,
4 आणि तो पेरणी करीत असता काही बी वाटेवर पडले व पाखरांनी येऊन ते खाऊन टाकले.
तस्य वपनकाले कतिपयबीजेषु मार्गपार्श्वे पतितेषु विहगास्तानि भक्षितवन्तः।
5 काही खडकाळ जमिनीवर पडले, तेथे फारशी माती नव्हती आणि माती खोल नसल्यामुळे ते लवकर उगवले;
अपरं कतिपयबीजेषु स्तोकमृद्युक्तपाषाणे पतितेषु मृदल्पत्वात् तत्क्षणात् तान्यङ्कुरितानि,
6 आणि सूर्य वर आला तेव्हा ते करपले व त्यास मूळ नव्हते म्हणून ते वाळून गेले.
किन्तु रवावुदिते दग्धानि तेषां मूलाप्रविष्टत्वात् शुष्कतां गतानि च।
7 काही काटेरी झाडांमध्ये पडले; मग काटेरी झाडानी वाढून त्याची वाढ खुंटवली.
अपरं कतिपयबीजेषु कण्टकानां मध्ये पतितेषु कण्टकान्येधित्वा तानि जग्रसुः।
8 काही चांगल्या जमिनीत पडले; मग त्याचे कोठे शंभरपट, कोठे साठपट तर कोठे तीसपट, असे पीक आले.
अपरञ्च कतिपयबीजानि उर्व्वरायां पतितानि; तेषां मध्ये कानिचित् शतगुणानि कानिचित् षष्टिगुणानि कानिचित् त्रिंशगुंणानि फलानि फलितवन्ति।
9 ज्याला कान आहेत तो ऐको.”
श्रोतुं यस्य श्रुती आसाते स शृणुयात्।
10 १० मग शिष्य जवळ येऊन त्यास म्हणाले, आपण त्याच्याबरोबर दाखल्यानी का बोलता?
अनन्तरं शिष्यैरागत्य सोऽपृच्छ्यत, भवता तेभ्यः कुतो दृष्टान्तकथा कथ्यते?
11 ११ त्याने त्यास उत्तर दिले, “स्वर्गाच्या राज्याची गुपीते जाणण्याचे दान तुम्हास दिले आहे, परंतु त्यांना दिलेले नाही.
ततः स प्रत्यवदत्, स्वर्गराज्यस्य निगूढां कथां वेदितुं युष्मभ्यं सामर्थ्यमदायि, किन्तु तेभ्यो नादायि।
12 १२ कारण ज्या कोणाजवळ आहे त्यास दिले जाईल व त्यास भरपूर होईल; ज्या कोणाजवळ नाही त्याचे जे असेल ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल.
यस्माद् यस्यान्तिके वर्द्धते, तस्मायेव दायिष्यते, तस्मात् तस्य बाहुल्यं भविष्यति, किन्तु यस्यान्तिके न वर्द्धते, तस्य यत् किञ्चनास्ते, तदपि तस्माद् आदायिष्यते।
13 १३ यास्तव मी त्याच्याबरोबर दाखल्यांनी बोलतो; कारण ते पाहत असता पाहत नाहीत आणि ऐकत असता ऐकत नाहीत व त्यांना समजतही नाही.
ते पश्यन्तोपि न पश्यन्ति, शृण्वन्तोपि न शृण्वन्ति, बुध्यमाना अपि न बुध्यन्ते च, तस्मात् तेभ्यो दृष्टान्तकथा कथ्यते।
14 १४ यशयाचा संदेश त्याच्याविषयी पूर्ण होत आहे, तो असा की, तुम्ही ऐकाल तर खरे, परंतु तुम्हास समजणारच नाही, व पाहाल तर खरे, परंतु तुम्हास दिसणारच नाही;
यथा कर्णैः श्रोष्यथ यूयं वै किन्तु यूयं न भोत्स्यथ। नेत्रैर्द्रक्ष्यथ यूयञ्च परिज्ञातुं न शक्ष्यथ। ते मानुषा यथा नैव परिपश्यन्ति लोचनैः। कर्णै र्यथा न शृण्वन्ति न बुध्यन्ते च मानसैः। व्यावर्त्तितेषु चित्तेषु काले कुत्रापि तैर्जनैः। मत्तस्ते मनुजाः स्वस्था यथा नैव भवन्ति च। तथा तेषां मनुष्याणां क्रियन्ते स्थूलबुद्धयः। बधिरीभूतकर्णाश्च जाताश्च मुद्रिता दृशः।
15 १५ कारण या लोकांचे अंतःकरण जड झाले आहे, ते कानानी मंद ऐकतात आणि त्यांनी डोळे मिटून घेतले आहेत; यासाठी की, त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, कानांनी ऐकू नये, अंतःकरणाने समजून नये आणि वळू नये आणि मी त्यांना बरे करू नये.
यदेतानि वचनानि यिशयियभविष्यद्वादिना प्रोक्तानि तेषु तानि फलन्ति।
16 १६ पण तुमचे डोळे धन्य आहेत, कारण ते पाहत आहे; आणि तुमचे कान, कारण ते ऐकत आहेत.
किन्तु युष्माकं नयनानि धन्यानि, यस्मात् तानि वीक्षन्ते; धन्याश्च युष्माकं शब्दग्रहाः, यस्मात् तैराकर्ण्यते।
17 १७ मी तुम्हास खरे सांगतो की, तुम्ही जे पाहत आहात ते पाहावयास पुष्कळ संदेष्टे व नीतिमान जन उत्कंठित होते, तरी त्यांना पाहण्यास मिळाले नाही; आणि तुम्ही जे ऐकता ते ऐकावयास ते उत्कंठित होते, तरी त्यांना ऐकण्यास मिळाले नाही.”
मया यूयं तथ्यं वचामि युष्माभि र्यद्यद् वीक्ष्यते, तद् बहवो भविष्यद्वादिनो धार्म्मिकाश्च मानवा दिदृक्षन्तोपि द्रष्टुं नालभन्त, पुनश्च यूयं यद्यत् शृणुथ, तत् ते शुश्रूषमाणा अपि श्रोतुं नालभन्त।
18 १८ आता तुम्ही पेरणाऱ्याचा दाखला ऐकून घ्या.
कृषीवलीयदृष्टान्तस्यार्थं शृणुत।
19 १९ वाटेवर पेरलेला तो हा आहे की, कोणी राज्याचे वचन ऐकतो पण ते त्यास समजत नाही, तेव्हा तो दुष्ट येऊन त्याच्या अंतःकरणात पेरलेले ते हिरावून घेतो;
मार्गपार्श्वे बीजान्युप्तानि तस्यार्थ एषः, यदा कश्चित् राज्यस्य कथां निशम्य न बुध्यते, तदा पापात्मागत्य तदीयमनस उप्तां कथां हरन् नयति।
20 २० खडकावरील पेरलेला तो हा आहे की, तो वचन ऐकतो व ते लगेच आनंदाने स्वीकारतो;
अपरं पाषाणस्थले बीजान्युप्तानि तस्यार्थ एषः; कश्चित् कथां श्रुत्वैव हर्षचित्तेन गृह्लाति,
21 २१ परंतु त्यास मूळ नसल्याकारणाने तो थोडाच वेळ टिकतो आणि वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे तो लागलाच अडखळतो.
किन्तु तस्य मनसि मूलाप्रविष्टत्वात् स किञ्चित्कालमात्रं स्थिरस्तिष्ठति; पश्चात तत्कथाकारणात् कोपि क्लेस्ताडना वा चेत् जायते, तर्हि स तत्क्षणाद् विघ्नमेति।
22 २२ काटेरी झाडामध्ये पेरलेला तो हा आहे की, तो वचन ऐकतो, परंतु संसाराची चिंता व द्रव्याचा मोह ही वचनाची वाढ खुंटवतात आणि तो निष्फळ होतो. (aiōn g165)
अपरं कण्टकानां मध्ये बीजान्युप्तानि तदर्थ एषः; केनचित् कथायां श्रुतायां सांसारिकचिन्ताभि र्भ्रान्तिभिश्च सा ग्रस्यते, तेन सा मा विफला भवति। (aiōn g165)
23 २३ चांगल्या जमिनीत पेरलेला तो हा आहे की, तो वचन ऐकून ते समजतो; तो फळ देतोच देतो; कोणी शंभरपट, कोणी साठपट, तर कोणी तीसपट असे देतो.
अपरम् उर्व्वरायां बीजान्युप्तानि तदर्थ एषः; ये तां कथां श्रुत्वा वुध्यन्ते, ते फलिताः सन्तः केचित् शतगुणानि केचित षष्टिगुणानि केचिच्च त्रिंशद्गुणानि फलानि जनयन्ति।
24 २४ येशूने त्यांच्यापुढे दुसरा एक दाखला मांडला. “कोणी एका मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले त्याच्यासारखे स्वर्गाचे राज्य आहे.
अनन्तरं सोपरामेकां दृष्टान्तकथामुपस्थाप्य तेभ्यः कथयामास; स्वर्गीयराज्यं तादृशेन केनचिद् गृहस्थेनोपमीयते, येन स्वीयक्षेत्रे प्रशस्तबीजान्यौप्यन्त।
25 २५ लोक झोपेत असताना त्याचा शत्रू येऊन गव्हामध्ये निदण पेरून निघून गेला;
किन्तु क्षणदायां सकललोकेषु सुप्तेषु तस्य रिपुरागत्य तेषां गोधूमबीजानां मध्ये वन्ययवमबीजान्युप्त्वा वव्राज।
26 २६ पण जेव्हा पाला फुटला व दाणे आले तेव्हा निदण ही दिसले.
ततो यदा बीजेभ्योऽङ्करा जायमानाः कणिशानि घृतवन्तः; तदा वन्ययवसान्यपि दृश्यमानान्यभवन्।
27 २७ तेव्हा घरधन्याच्या दासांनी येऊन त्यास म्हटले, महाराज, आपण आपल्या शेतामध्ये चांगले बी पेरले ना? तर मग त्यामध्ये निदण कोठून आले?
ततो गृहस्थस्य दासेया आगम्य तस्मै कथयाञ्चक्रुः, हे महेच्छ, भवता किं क्षेत्रे भद्रबीजानि नौप्यन्त? तथात्वे वन्ययवसानि कृत आयन्?
28 २८ तो त्यांना म्हणाला हे काम कोणा शत्रूचे आहे. दासांनी त्यास म्हटले, तर आम्ही जाऊन ते काढून टाकावे अशी आपली इच्छा आहे काय?
तदानीं तेन ते प्रतिगदिताः, केनचित् रिपुणा कर्म्मदमकारि। दासेयाः कथयामासुः, वयं गत्वा तान्युत्पाय्य क्षिपामो भवतः कीदृशीच्छा जायते?
29 २९ तो म्हणाला, नाही. तुम्ही निदण गोळा करताना त्याच्याबरोबर कदाचित गहू ही उपटाल.
तेनावादि, नहि, शङ्केऽहं वन्ययवसोत्पाटनकाले युष्माभिस्तैः साकं गोधूमा अप्युत्पाटिष्यन्ते।
30 ३० कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या; मग कापणीच्या वेळेस मी कापणाऱ्यास सांगेन की, पहिल्याने निदण गोळा करा आणि जाळण्यासाठी त्याच्या पेढ्या बांधा; परंतु गहू मा‍झ्या कोठारात साठवा.”
अतः श्स्यकर्त्तनकालं यावद् उभयान्यपि सह वर्द्धन्तां, पश्चात् कर्त्तनकाले कर्त्तकान् वक्ष्यामि, यूयमादौ वन्ययवसानि संगृह्य दाहयितुं वीटिका बद्व्वा स्थापयत; किन्तु सर्व्वे गोधूमा युष्माभि र्भाण्डागारं नीत्वा स्थाप्यन्ताम्।
31 ३१ त्याने त्याच्यापुढे आणखी एक दाखला मांडला की, “स्वर्गाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे; तो कोणाएका मनुष्याने घेऊन आपल्या शेतात लावला;
अनन्तरं सोपरामेकां दृष्टान्तकथामुत्थाप्य तेभ्यः कथितवान् कश्चिन्मनुजः सर्षपबीजमेकं नीत्वा स्वक्षेत्र उवाप।
32 ३२ तो तर सर्व दाण्यामध्ये लहान आहे; तरी वाढल्यावर भाजीपाल्यापेक्षा मोठा होऊन त्याचे असे झाड होते की, आकाशातील पाखर त्याच्या फांद्यात वस्ती करतात.”
सर्षपबीजं सर्व्वस्माद् बीजात् क्षुद्रमपि सदङ्कुरितं सर्व्वस्मात् शाकात् बृहद् भवति; स तादृशस्तरु र्भवति, यस्य शाखासु नभसः खगा आगत्य निवसन्ति; स्वर्गीयराज्यं तादृशस्य सर्षपैकस्य समम्।
33 ३३ त्याने त्यांना आणखी एक दाखला सांगितला की, “स्वर्गाचे राज्य खमिरासारखे आहे; ते एका स्त्रीने घेऊन तीन मापे पीठामध्ये लपवून ठेवले, तेणेकरून शेवटी ते सर्व पीठ फुगून गेले.”
पुनरपि स उपमाकथामेकां तेभ्यः कथयाञ्चकार; काचन योषित् यत् किण्वमादाय द्रोणत्रयमितगोधूमचूर्णानां मध्ये सर्व्वेषां मिश्रीभवनपर्य्यन्तं समाच्छाद्य निधत्तवती, तत्किण्वमिव स्वर्गराज्यं।
34 ३४ या सर्व गोष्टी येशूने दाखल्यानी लोकसमुदायाला सांगितल्या आणि दाखल्यावाचून तो त्याच्याबरोबर काही बोलला नाही;
इत्थं यीशु र्मनुजनिवहानां सन्निधावुपमाकथाभिरेतान्याख्यानानि कथितवान् उपमां विना तेभ्यः किमपि कथां नाकथयत्।
35 ३५ यासाठी की, संदेष्ट्याच्याद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे; ते असे की, दाखले सांगायला मी आपले तोंड उघडीन; जगाच्या स्थापनेपासून गुप्त राहिलेल्या गोष्टी मी बोलून दाखवीन.
एतेन दृष्टान्तीयेन वाक्येन व्यादाय वदनं निजं। अहं प्रकाशयिष्यामि गुप्तवाक्यं पुराभवं। यदेतद्वचनं भविष्यद्वादिना प्रोक्तमासीत्, तत् सिद्धमभवत्।
36 ३६ नंतर तो लोकसमुदायास निरोप देऊन घरात गेला; तेव्हा त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, शेतातल्या निदणाच्या दाखल्याची आम्हास फोड करून सांगा.
सर्व्वान् मनुजान् विसृज्य यीशौ गृहं प्रविष्टे तच्छिष्या आगत्य यीशवे कथितवन्तः, क्षेत्रस्य वन्ययवसीयदृष्टान्तकथाम् भवान अस्मान् स्पष्टीकृत्य वदतु।
37 ३७ त्याने उत्तर दिले की, चांगले बी पेरणारा हा मनुष्याचा पुत्र आहे.
ततः स प्रत्युवाच, येन भद्रबीजान्युप्यन्ते स मनुजपुत्रः,
38 ३८ शेत हे जग आहे; चांगले बी हे राज्याचे पुत्र आहेत; निदण हे त्या दुष्टाचे पुत्र आहेत;
क्षेत्रं जगत्, भद्रबीजानी राज्यस्य सन्तानाः,
39 ३९ ते पेरणारा शत्रू हा सैतान आहे; कापणीही युगाची समाप्ती आहे; आणि कापणारे हे देवदूत आहेत; (aiōn g165)
वन्ययवसानि पापात्मनः सन्तानाः। येन रिपुणा तान्युप्तानि स शयतानः, कर्त्तनसमयश्च जगतः शेषः, कर्त्तकाः स्वर्गीयदूताः। (aiōn g165)
40 ४० तेव्हा जसे निदण गोळा करून अग्नीत जाळतात तसे युगाच्या समाप्तीस होईल. (aiōn g165)
यथा वन्ययवसानि संगृह्य दाह्यन्ते, तथा जगतः शेषे भविष्यति; (aiōn g165)
41 ४१ मनुष्याचा पुत्र आपल्या देवदूतांना पाठवील आणि त्याच्या राज्यातून अडखळण करणाऱ्या सर्व वस्तू व अन्याय करणार्‍यांना जमा करील,
अर्थात् मनुजसुतः स्वांयदूतान् प्रेषयिष्यति, तेन ते च तस्य राज्यात् सर्व्वान् विघ्नकारिणोऽधार्म्मिकलोकांश्च संगृह्य
42 ४२ आणि त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील; तेथे रडणे व दात खाणे चालेल.
यत्र रोदनं दन्तघर्षणञ्च भवति, तत्राग्निकुण्डे निक्षेप्स्यन्ति।
43 ४३ तेव्हा नीतिमान आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील. ज्याला कान आहेत तो ऐको.
तदानीं धार्म्मिकलोकाः स्वेषां पितू राज्ये भास्करइव तेजस्विनो भविष्यन्ति। श्रोतुं यस्य श्रुती आसाते, म शृणुयात्।
44 ४४ स्वर्गाचे राज्य शेतात लपवलेल्या धनासारखे आहे, ती कोणाएका मनुष्यास सापडली आणि त्याने ती लपवून ठेवली. मग आनंदाच्या भरात त्याने जाऊन, आपले सर्वस्व विकले आणि ते शेत विकत घेतले.
अपरञ्च क्षेत्रमध्ये निधिं पश्यन् यो गोपयति, ततः परं सानन्दो गत्वा स्वीयसर्व्वस्वं विक्रीय त्तक्षेत्रं क्रीणाति, स इव स्वर्गराज्यं।
45 ४५ आणखी, स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्याचा शोध करणाऱ्या कोणाएका व्यापारासारखे आहे;
अन्यञ्च यो वणिक् उत्तमां मुक्तां गवेषयन्
46 ४६ त्यास एक अति मोलवान् मोती आढळला; मग त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले आणि तो विकत घेतला.
महार्घां मुक्तां विलोक्य निजसर्व्वस्वं विक्रीय तां क्रीणाति, स इव स्वर्गराज्यं।
47 ४७ आणखी, स्वर्गाचे राज्य समुद्रात टाकलेल्या एखाद्या जाळ्यात सर्वप्रकारचे जीव एकत्र सापडतात त्यासारखे आहे;
पुनश्च समुद्रो निक्षिप्तः सर्व्वप्रकारमीनसंग्राह्यानायइव स्वर्गराज्यं।
48 ४८ ते भरलेल्या मनुष्यांनी ते किनार्‍याकडे ओढले आणि बसून जे चांगले ते भांड्यात जमा केले, वाईट ते फेकून दिले.
तस्मिन् आनाये पूर्णे जना यथा रोधस्युत्तोल्य समुपविश्य प्रशस्तमीनान् संग्रह्य भाजनेषु निदधते, कुत्सितान् निक्षिपन्ति;
49 ४९ तसे युगाच्या समाप्तीस होईल; देवदूत येऊन नीतिमानातून दुष्टांना वेगळे करतील. (aiōn g165)
तथैव जगतः शेषे भविष्यति, फलतः स्वर्गीयदूता आगत्य पुण्यवज्जनानां मध्यात् पापिनः पृथक् कृत्वा वह्निकुण्डे निक्षेप्स्यन्ति, (aiōn g165)
50 ५० आणि त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील; तेथे रडणे व दात खाणे चालेल.
तत्र रोदनं दन्तै र्दन्तघर्षणञ्च भविष्यतः।
51 ५१ तुम्हास या सर्व गोष्टी समजल्या काय? ते त्यास म्हणाले, हो.
यीशुना ते पृष्टा युष्माभिः किमेतान्याख्यानान्यबुध्यन्त? तदा ते प्रत्यवदन्, सत्यं प्रभो।
52 ५२ तेव्हा तो त्यांना म्हणाला, “प्रत्येक नियमशास्त्राचा शिक्षक जो स्वर्गाच्या राज्याचा शिष्य झाला आहे तो आपल्या भांडारातून नव्या जुन्या गोष्टी काढणार्‍या मनुष्यासारखा आहे.”
तदानीं स कथितवान्, निजभाण्डागारात् नवीनपुरातनानि वस्तूनि निर्गमयति यो गृहस्थः स इव स्वर्गराज्यमधि शिक्षिताः स्वर्व उपदेष्टारः।
53 ५३ नंतर असे झाले की, हे दाखले सांगण्याचे समाप्त केल्यावर येशू तेथून निघाला.
अनन्तरं यीशुरेताः सर्व्वा दृष्टान्तकथाः समाप्य तस्मात् स्थानात् प्रतस्थे। अपरं स्वदेशमागत्य जनान् भजनभवन उपदिष्टवान्;
54 ५४ आणि स्वतःच्या गावी आल्यावर त्याने त्याच्या सभास्थानात त्यांना अशी शिकवण दिली की ते आश्चर्यचकित होऊन म्हणाले, हे ज्ञान व अद्भूत कृत्ये करण्याचे हे सामर्थ्य या मनुष्यास कोठून मिळते?
ते विस्मयं गत्वा कथितवन्त एतस्यैतादृशं ज्ञानम् आश्चर्य्यं कर्म्म च कस्माद् अजायत?
55 ५५ हा सुताराचा पुत्र ना? याच्या आईला मरीया म्हणतात ना? याकोब, योसे, शिमोन व यहूदा, हे याचे भाऊ ना?
किमयं सूत्रधारस्य पुत्रो नहि? एतस्य मातु र्नाम च किं मरियम् नहि? याकुब्-यूषफ्-शिमोन्-यिहूदाश्च किमेतस्य भ्रातरो नहि?
56 ५६ याच्या बहि‍णी, त्या सर्व आपणाबरोबर नाहीत काय? मग ते सर्व याला कोठून?
एतस्य भगिन्यश्च किमस्माकं मध्ये न सन्ति? तर्हि कस्मादयमेतानि लब्धवान्? इत्थं स तेषां विघ्नरूपो बभूव;
57 ५७ असे ते त्याच्याविषयी अडखळले. येशूने त्यास म्हटले, “संदेष्ट्याला आपला देश व आपले घर यामध्ये मात्र सन्मान मिळत नाही.”
ततो यीशुना निगदितं स्वदेशीयजनानां मध्यं विना भविष्यद्वादी कुत्राप्यन्यत्र नासम्मान्यो भवती।
58 ५८ तेथे त्यांच्या अविश्वासामुळे त्याने फारशी अद्भूत कृत्ये केली नाहीत.
तेषामविश्वासहेतोः स तत्र स्थाने बह्वाश्चर्य्यकर्म्माणि न कृतवान्।

< मत्तय 13 >