< मत्तय 12 >

1 त्यावेळी एका शब्बाथ दिवशी येशू धान्याच्या शेतामधून चालला होता. शिष्याना भूक लागली होती, म्हणून ते कणसे मोडून खाऊ लागले.
En ce temps-là, Jésus passait par les blés, le jour du sabbat, et ses disciples, qui avaient faim, se mirent à arracher des épis et à les manger.
2 जेव्हा परूश्यांनी हे पाहिले, तेव्हा ते येशूला म्हणाले, “पाहा, तुमचे शिष्य शब्बाथ दिवशी जे करू नये ते करीत आहेत.”
Les pharisiens, voyant cela, lui dirent: «Tes disciples font une chose qu'il n'est pas permis de faire un jour de sabbat.»
3 तेव्हा येशूने त्यांना म्हटले, दाविदाला व त्याच्याबरोबरच्या मनुष्यांना भूक लागली तेव्हा त्याने काय केले, हे तुम्ही कधी वाचले नाही काय?
Mais Jésus leur dit: «n’avez-vous pas lu ce que fit David, lorsque lui et ceux qui étaient avec lui eurent faim:
4 तो देवाच्या भवनात कसा गेला आणि ज्या समर्पित भाकरी त्याने व त्याच्याबरोबरच्या लोकांनी खाऊ नयेत, असे करणे नियमशास्त्राच्या विरूद्ध होते. फक्त याजकांनाच ती भाकर खाण्याची परवानगी होती. त्या त्यांनी कशा खाल्ल्या?
comment il entra dans la maison de Dieu, et mangea les pains de proposition, ce qu'il ne lui était pas permis de manger, non plus qu'à ceux qui l'accompagnaient, mais aux sacrificateurs seuls.
5 आणि प्रत्येक शब्बाथाच्या दिवशी परमेश्वराच्या भवनातील याजक भवनात शब्बाथ पवित्र पाळण्याविषयीचा नियम मोडीत असत हे तुम्ही नियमशास्त्रात वाचले नाही काय? परंतु तरी ते निर्दोष असत.
Ou bien n’avez-vous pas lu dans la Loi que, le jour du sabbat, les sacrificateurs profanent le sabbat dans le temple, sans être coupables pour cela.
6 मी तुम्हास सांगतो की, परमेश्वराच्या भवनापेक्षा महान असा कोणीतरी येथे आहे.
Or, je vous dis qu'il y a ici plus que le temple.
7 पवित्र शास्त्र म्हणते, मला दया हवी आहे आणि यज्ञ पशू नको. याचा खरा अर्थ तुम्हास समजला असता तर तुम्ही या निर्दोष लोकांस दोष लावला नसता.
Si vous saviez ce que signifie cette parole: «Je veux la miséricorde et non le sacrifice, »; vous n'auriez pas condamné des innocents;
8 कारण मनुष्याचा पुत्र शब्बाथाचा धनी आहे.
car le Fils de l'homme est maître du sabbat.»
9 नंतर येशूने ते ठिकाण सोडले व यहूद्यांच्या सभास्थानात तो गेला.
Jésus, ayant quitté ce lieu, entra dans la synagogue.
10 १० सभास्थानात हात वाळलेला एक मनुष्य होता. काही यहूद्यांनी येशूवर काही दोषारोप करता यावा या हेतूने त्यास विचारला, “शब्बाथ दिवशी रोग बरे करणे योग्य आहे काय?”
Il s'y trouvait un homme qui avait la main sèche, et l’on demanda à Jésus s'il était permis de guérir, le jour du sabbat: c'était afin de l'accuser.
11 ११ येशूने त्यांना उत्तर दिले, “जर तुमच्यापैकी एखाद्याकडे मेंढरू असले व शब्बाथ दिवशी ते खड्ड्यात पडले, तर तो त्यास वर काढणार नाही काय?
Jésus leur dit: «Quel est celui d'entre vous, qui, n'ayant qu'une brebis, si elle vient à tomber, un jour de sabbat, dans une fosse, ne la prend et ne l'en retire?
12 १२ तर मग मनुष्य मेंढरापेक्षा कितीतरी अधिक मौल्यवान आहे. म्हणून नियमशास्त्र लोकांस शब्बाथ दिवशी चांगले करण्याची मोकळीक देते.”
Combien un homme ne vaut-il pas mieux qu'une brebis! Ainsi, il est permis de bien faire le jour du sabbat.»
13 १३ मग येशू त्या वाळलेल्या हाताच्या मनुष्यास म्हणाला, “तुझा हात पुढे सरळ कर.” त्या मनुष्याने हात लांब केला व तो हात बरा झाला आणि दुसऱ्या हातासारखाच चांगला झाला.
Alors il dit à l'homme: «Etends la main.» Il retendit, et elle redevint saine comme l'autre.
14 १४ नंतर परूश्यांनी बाहेर जाऊन त्यास कसे मारावे याविषयी मसलत केली.
Les pharisiens sortirent et tinrent conseil contre lui, sur les moyens de le faire périr;
15 १५ परूशी काय करीत आहेत ते येशूला माहीत होते. म्हणून येशू तेथून गेला. पुष्कळ लोक येशूच्या मागे निघाले व त्याने जे कोणी रोगी होते, त्या सर्वांना बरे केले.
mais Jésus, en ayant eu connaissance, s'éloigna de ces lieux. Une grande foule le suivit, et il guérit tous leurs malades;
16 १६ आणि त्याने त्यांना निक्षून सांगितले की, तो कोण आहे, हे इतरांना सांगू नका.
et il leur commanda sévèrement de ne pas le faire connaître,
17 १७ यशया संदेष्ट्याच्याद्वारे जे सांगितले गेले होते ते पूर्ण होण्यासाठी त्याने असे म्हटले.
afin que s'accomplît ce qui a été dit par Ésaïe, le prophète:
18 १८ “हा माझा सेवक, याला मी निवडले आहे. मी त्याजवर प्रीती करतो आणि त्याच्याविषयी माझा जीव संतुष्ट वाटतो. मी आपला आत्मा त्याच्यावर ठेवीन, आणि तो परराष्ट्रीय लोकांस योग्य न्यायाची घोषणा करील.
«Voici le serviteur que je me suis choisi, le bien-aimé, en qui j'ai mis toute mon affection. Je lui donnerai mon Esprit, et il annoncera la justice aux nations.
19 १९ तो वाद घालणार नाही किंवा ओरडणार नाही, रस्त्यावर लोक त्याचा आवाज ऐकणार नाहीत.
Il ne contestera point, il ne criera point, on n'entendra pas sa voix dans les places publiques;
20 २० वाकलेला बोरू तो मोडणार नाही आणि मंदावलेली वात तो विझवणार नाही. न्याय विजयास होईपर्यंत तो असे करील.
il n'achèvera point de briser le roseau froissé, et il n'éteindra point le lumignon qui fume encore, jusqu’à ce qu'il ait fait triompher la justice.
21 २१ परराष्ट्रीय लोक त्याच्यावर आशा ठेवतील. येशूचे सामर्थ्य देवाकडून आहे.”
Et les nations mettront leur espérance en son nom.»
22 २२ मग काही मनुष्यांनी एकाला येशूकडे आणले. तो मनुष्य आंधळा व मुका होता व त्याच्यामध्ये भूत होते. येशूने त्या मनुष्यास बरे केले व तो बोलू लागला व पाहू लागला.
Alors on lui amena un démoniaque aveugle et sourd-muet, et il le guérit; de sorte que le muet parlait et voyait.
23 २३ सर्व लोक चकित झाले, ते म्हणाले, “हा दाविदाचा पुत्र असेल काय?”
Toute la foule était ravie en admiration, et disait: «N'est-ce point là le Fils de David?»
24 २४ परूश्यांनी लोकांस हे बोलताना ऐकले. परूशी म्हणाले, “भूते काढण्यासाठी येशू बालजबूलचे सामर्थ्य वापरतो आणि बालजबूल हा तर भूतांचा अधिपती आहे.”
Les pharisiens entendant cette parole, dirent: «Il ne chasse les démons que par Belzébuth, prince des démons.»
25 २५ परूशी कसला विचार करीत आहेत ते येशूला जाणवत होते. म्हणून येशू त्यांना म्हणाला, “आपसात लढणारी राज्ये नाश पावतात व फूट पडलेले शहर किंवा घर टिकत नाही.
Jésus connaissant, leurs pensées, leur dit: «Tout royaume en proie aux divisions se détruit, et toute ville ou maison en proie aux divisions ne subsistera point.
26 २६ आणि जर सैतानच सैतानला काढतो तर त्यांच्यात मतभेद आहे, त्यांच्यात फूट आहे मग त्याचे राज्य कसे टिकेल?
Si Satan chasse Satan, il est divisé; comment donc son royaume subsistera-il?
27 २७ आणि मी जर बालजबूलाच्या सहाय्याने भूते काढतो तर तुमचे लोक कोणाच्या सामर्थ्याने भूते काढतात. म्हणून तुमचे स्वतःचे लोक तुमचा न्याय करतील.
Et si moi, je chasse les démons par Belzébuth, par qui vos fils les chassent-ils? C'est pourquoi ils seront eux-mêmes vos juges.
28 २८ परंतु मी जर देवाच्या आत्म्याच्या साहाय्याने भूते काढतो तर देवाचे राज्य तुमच्यावर आले आहे.
Mais, si je chasse les démons par l’Esprit de Dieu, le royaume de Dieu est donc venu vers vous.
29 २९ किंवा एखाद्या बलवान मनुष्याच्या घरात शिरून, त्याच्या घरातील सर्व वस्तूची चोरी जर कोणाला करायची असेल तर प्रथम त्या बलवान मनुष्यास तो बांधून टाकील व मग तो चोरी करील.
Et comment peut-on entrer dans la maison de l'homme fort et piller ses biens, si l’on n'a auparavant lié cet homme fort, après quoi on pillera sa maison.
30 ३० जो मनुष्य माझ्याबरोबर काम करीत नाही तो माझ्याविरुद्ध आहे आणि जो माझ्याबरोबर गोळा करत नाही तो उधळून टाकतो.
Qui n'est pas avec moi, est contre moi; et qui n'assemble pas avec moi, disperse.
31 ३१ म्हणून मी तुम्हास सांगतो, मनुष्यांना ते करीत असलेल्या सर्व पापांची व वाईट बोलतील त्याबद्दलही क्षमा करण्यात येईल पण जर कोणी पवित्र आत्म्याविरूद्ध बोलेल, तर त्यास क्षमा करण्यात येणार नाही.
C'est pourquoi je vous dis que tout péché et tout blasphème seront pardonnés aux hommes; mais le blasphème contre l'Esprit ne leur sera point pardonné.
32 ३२ एखादा मनुष्य जर मनुष्याच्या पुत्राविरुद्ध काही बोलेल तर त्यास क्षमा करण्यात येईल पण जो कोणी पवित्र आत्म्याविरूद्ध बोलेल त्यास क्षमा होणार नाही. त्यास या युगातही क्षमा होणार नाही व येणाऱ्या युगातही होणार नाही. (aiōn g165)
A celui qui aura parlé contre le Fils de l'homme, on le lui pardonnera; mais à celui qui aura parlé contre le Saint-Esprit, on ne le lui pardonnera ni dans ce temps-ci, ni dans le siècle à venir. (aiōn g165)
33 ३३ झाड चांगले आणि त्याचे फळ चांगले असे म्हणा, अथवा झाड वाईट आणि त्याचे फळ वाईट असे म्हणा; कारण झाड त्याच्या फळावरून ओळखले जाते.
Ou dites que l'arbre est bon et que son fruit est bon, ou dites que l'arbre est mauvais et que son fruit est mauvais; car c'est au fruit qu'on connaît l'arbre.
34 ३४ अहो सापाच्या पिल्लांनो, तुम्ही वाईट असता तुम्हास चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील? जे अंतःकरणात आहे तेच तोंडावाटे बाहेर पडते.
Race de vipères, comment pouvez-vous dire de bonnes choses, méchants comme vous l'êtes? car de l'abondance du coeur la bouche parle.
35 ३५ चांगला मनुष्य आपल्या चांगल्या भांडारातून चांगल्या गोष्टी काढतो आणि वाईट मनुष्य आपल्या वाईट भांडारातून वाईट गोष्टी काढतो.
L'homme de bien tire de bonnes choses de son bon trésor, et le méchant tire de mauvaises choses de son mauvais trésor.
36 ३६ आणखी मी तुम्हास सांगतो की. जो प्रत्येक व्यर्थ शब्द लोक बोलतील त्याचा हिशोब ते न्यायाच्या दिवशी देतील.
Je vous déclare qu'au jour du jugement les hommes rendront compte de toute parole mauvaise qu'ils auront dite;
37 ३७ कारण तू आपल्या बोलण्यावरून न्यायी ठरशील आणि आपल्या बोलण्यावरूनच दोषी ठरशील.”
car par vos paroles vous serez justifiés, et par vos paroles vous serez condamnés.»
38 ३८ काही नियमशास्त्राचे शिक्षक व परूशी यांच्यापैकी काहीजणांनी येशूला म्हटले, “गुरुजी, तुमच्या हातून एखादे चिन्ह पहावे अशी आमची इच्छा आहे.”
Alors des scribes et des pharisiens prirent la parole, et lui dirent: «Maître, nous voudrions te voir faire un miracle?»
39 ३९ येशूने उत्तर दिले, “जे लोक देवाशी अप्रामाणिक आहेत, पापी आहेत असे लोक पुराव्यासाठी चमत्कार पाहू इच्छितात. पण योना संदेष्ट्याशिवाय दुसरे चिन्ह तुम्हास मिळणार नाही.
Mais Jésus leur répondit: «Cette génération méchante et adultère, réclame un miracle; eh bien! il ne lui en sera point accordé d'autre que celui de Jonas, le prophète:
40 ४० कारण योना जसा तीन दिवस व तीन रात्री मोठ्या माशाच्या पोटात होता तसा मनुष्याचा पुत्र तीन दिवस व तीन रात्री पृथ्वीच्या पोटात राहील.
de même que Jonas passa trois jours et trois nuits dans le ventre d'un grand poisson, ainsi le Fils de l'homme passera trois jours et trois nuits dans le sein de la terre.
41 ४१ जेव्हा तुमच्या पिढीचा न्याय होईल, तेव्हा निनवे शहराचे लोक उभे राहतील, तुमच्याविरुध्द साक्ष देतील आणि तुम्हास दोष देतील कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चात्ताप केला आणि आता तर तुमच्यामध्ये योनापेक्षा महान असा कोणीएक येथे आहे.
Les Ninivites se lèveront au jour du jugement avec cette génération, et la condamneront; car ils se repentirent à la prédication de Jonas, et il y a ici plus que Jonas.
42 ४२ न्यायाच्या दिवशी दक्षिणेकडील देशाची राणी या पिढीबरोबर उभी राहून हिला दोषी ठरवील कारण शलमोनाचे ज्ञान ऐकायला ती पृथ्वीच्या शेवटापासून आली आणि शलमोनापेक्षा महान असा कोणी येथे आहे.”
La reine du Midi se lèvera au jour du jugement avec cette génération, et la condamnera; car elle vint du bout du monde pour entendre la sagesse de Salomon: et il y a ici plus que Salomon.»
43 ४३ “जेव्हा अशुद्ध आत्मा मनुष्यास सोडून बाहेर निघून जातो तेव्हा तो पाणी नसलेल्या ठिकाणाहून विसावा शोधीत फिरतो पण तो त्यास मिळत नाही.
«Quand l'esprit impur est sorti d'un homme, il va par les lieux arides, cherchant du repos, et il n'en trouve point.
44 ४४ तेव्हा तो म्हणतो, जेथून मी आलो त्या माझ्या घरात मी परत जाईन आणि जेव्हा तो परत येतो तेव्हा ते घर रिकामे असलेले तसेच स्वच्छ व नीटनेटके असे त्यास दिसते.
Alors il se dit: «Je vais retourner dans la maison d'où je suis sorti; il revient et la trouve vacante, balayée et mise en ordre.
45 ४५ नंतर तो जाऊन आपल्यापेक्षा दुष्ट असे दुसरे सात आणखी आत्मे आपल्याबरोबर घेतो व ते आत शिरून त्यास झपाटतात व त्याच्यात राहतात. मग त्या मनुष्याची शेवटची स्थिति पहिल्यापेक्षा वाईट होते. तसेच आजच्या या पापी पिढीचे होईल.”
Alors il va prendre avec lui sept autres esprits plus méchants que lui, puis ils y entrent et s'y établissent; et la dernière condition de cet homme est pire que la première. Il en sera de même de cette méchante génération.
46 ४६ मग तो लोकसमुदायाबरोबर बोलत असता, त्याची आई व त्याचे भाऊ त्याच्याशी बोलण्यासाठी बाहेर वाट पाहत उभे होते.
Pendant qu'il parlait encore à la foule, sa mère et ses frères étaient dehors, qui cherchaient à lui parler.
47 ४७ तेव्हा कोणीतरी त्यास म्हणाले, “तुमची आई व भाऊ बाहेर उभे आहेत. ते तुमच्याशी बोलण्याची वाट पाहत आहेत.”
On lui dit: «Ta mère et tes frères sont là dehors, et ils cherchent à te parler.»
48 ४८ त्याच्याशी बोलणाऱ्याला त्याने उत्तर दिले, “कोण माझी आई? कोण माझा भाऊ?”
Mais Jésus répondit à celui qui le lui disait: «Qui est ma mère, et qui sont mes frères?
49 ४९ मग तो आपल्या शिष्यांकडे हात करून म्हणाला, “पाहा, माझी आई व माझे भाऊ हे आहेत.
Puis, étendant la main sur ses disciples, il dit: «Voici ma mère et mes frères,
50 ५० कारण माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेनुसार जे वागतात, तेच माझे भाऊ, बहीण आणि आई.”
car celui qui fait la volonté de mon Père qui est dans les deux, celui-là est mon frère, et ma soeur, et ma mère.»

< मत्तय 12 >