< मत्तय 11 >

1 येशूने त्याच्या बारा शिष्यांना आज्ञा सांगण्याचे संपविल्यावर तो तेथून निघाला आणि गालील प्रांतातील गावामध्ये फिरून शिकवू आणि उपदेश करू लागला.
I, nako hayisika mu kumana Jesu a va layi Valutwana vakwe vene nkumi ni vovele, cha yenda kuzwaho ni kutanga kuluta ni ku kutaza mu mileneñi yabo.
2 बाप्तिस्मा करणारा योहान तुरूंगात होता. त्याने ख्रिस्त करीत असलेल्या कामाविषयी ऐकले. तेव्हा त्याने आपल्या काही शिष्यांच्या हाती निरोप पाठवला.
Linu Joani na nga zuwa mwi ntolongo inkenzo za Kereste, cha tumina iñusa ni valutwana vakwe
3 आणि त्यास विचारले, “जो येणार होता, तो तूच आहेस? किंवा आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी?”
mi chi va wamba kwali, “Kana njiwe yo Keza, kapa kwina zumwi muntu utu swanela kulola?”
4 येशूने उत्तर दिले, “जे तुम्ही ऐकता व पाहता ते योहानाला जाऊन सांगा.
Jesu ave tabi mi cha wamba kuvali, “Mu yende mi mukavihe kwa Joani zi mwa vona ni kuzuwa.
5 आंधळे पाहतात. पांगळे चालतात. कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मरण पावलेले उठवले जातात व गरिबांना सुवार्ता सांगण्यात येते.
Zivofu va tambula kuvona, zihole zi yenda, ve mbingwa ba jolola, va sa zuwi va zuwe, va fwile va vukile vuhalo, mi vantu va saka ku zuwa linzwi va kutazwe.
6 जो कोणी माझ्यामुळे अडखळत नाही तो धन्य आहे.”
Imbuyoti yi ve kwa vo, vasa nya nsilizi linzwi.”
7 मग ते जात असता येशू योहानाविषयी लोकांशी बोलू लागला, तुम्ही वैराण प्रदेशात काय पाहायला गेला होता? वाऱ्याने हलविलेला बोरू काय?
A va vakwame ha va yenda nzila yabo, Kereste cha tanga ku wambila chi chaba ka za Joani, “Zile muyendele nzi mwi Halaupa ku kalwela mpe zi hungiswa luhuho?
8 तुम्ही काय पाहायला गेला होता? तलम वस्त्रे घातलेल्या मनुष्यास पाहायला गेला होता काय? तलम वस्त्रे घालणारे राजाच्या घरात असतात.
Linu zile muyendelezi ku kavona - muntu yo zavele zizwato zi huva? Initi, avo vazwata zizwato zi huvilila vahale muzubo ya simwine.
9 तर मग तुम्ही बाहेर कशाला गेला होतात? संदेष्ट्याला पाहायला काय? होय. मी तुम्हास सांगतो आणि संदेष्ट्यांपेक्षाही अधिक मोठा असा त्याला.
Chi nzi chi muyendela kuka bona, mupolofita? Ee, ni wamba kwenu, mi hahulu kuhita mupolofita.
10 १० त्याच्याविषयी असे लिहिण्यात आले आहे की, पाहा, मी माझ्या दूताला तुझ्यापुढे पाठवतो तो तुझ्यासाठी मार्ग तयार करील.
Nji yena za kwe, zi ñoleletwe, 'Mu vone, ni tumina muhikana wangu havusu vwenu, ye se a lukise inzila yenu, havusu bwenu.'
11 ११ मी तुम्हास खरे सांगतो की, स्त्रीयांपासून जन्मलेल्यांमध्ये बाप्तिस्मा करणारा योहान याच्यापेक्षा मोठा असा कोणी झाला नाही, तरीही स्वर्गाच्या राज्यात जो अगदी लहान आहे तो त्याच्यापेक्षा मोठा आहे.
Ni wamba kwenu, che niti, kwa vo, vava pepwa ku vanakazi, kakwina mukando kwa Joani Mukolobezi. Linu munini mu mubuso we Reeza, kwiwulu njo mukando.
12 १२ बाप्तिस्मा करणारा योहान याच्या दिवसापासून आतापर्यंत लोक स्वर्गाच्या राज्यावर जोराने हल्ला करीत आहे आणि हल्ला करणारे ते हिरावून घेतात.
Ku zwa muma zuva a Joani Mukolobezi ku sika sunu, mubuso we Reeza uhindwa chamata mi vakwame vakali va u hinda cha kunyanga.
13 १३ कारण योहानापर्यंत सर्व संदेष्टे व नियमशास्त्र यांनी भविष्य सांगितले.
Vapolofita vonse ni mulao, vava polofiti konji kusika kwa Joani Mukolobazi.
14 १४ आणि जर तुम्ही ते स्वीकारण्यास तयार असाल तर येणारा एलीया तो हाच आहे.
Heba no tavela kutambula, uzu Elia, iye yo swanela kukeza.
15 १५ ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐको.
Uzo, wina matwi akuzuwa, mu musiye atekeleze.
16 १६ या पिढीला मी कोणती उपमा देऊ? जी बाजारात बसून आपल्या सोबत्यांना हाक मारतात त्यांच्यासारखी ही पिढी आहे. ती म्हणतात.
Kani, vamba nye, ni chinzi kolu lusika? Kuswana sina vahwile, va kwete kuzanina ama wuzikizo a musika, vekele ni vali sumpa,
17 १७ आम्ही तुमच्यासाठी संगीत वाजवले तरी तुम्ही नाचला नाहीत. आम्ही विलाप केला तरी तुम्ही ऊर बडवून घेतले नाही.
ni bati, 'twa miliizikize mpeeta kono kana mwa zana. Twa silisa, kono kana mwa donsa zinsozi.'
18 १८ योहान काही न खाता व पिता आला, पण ते म्हणतात त्यास भूत लागले आहे.
Kana Joani kana vezi kuku lya chinkwa, kapa kuñywa i waine, mi ni vata kuti wina, 'Madimona.'
19 १९ मनुष्याचा पुत्र खातपीत आला. ते म्हणतात, पाहा, हा खादाडा व दारूबाज, जकातदार व पापी लोकांचा मित्र, परंतु ज्ञानाची योग्यता त्याच्याद्वारे घडणाऱ्या योग्य गोष्टीमुळे ठरते.
Mwana'Muntu, abezi ku lya, ni kuñywa, ni vata kuti, 'Mu vwene, mukwame mulyabi, ni vudakwa, mulikana va telisi va mutelo, ni batenda zibi!' Kono vutali vu vwene kete chi vu tendwa.”
20 २० तेव्हा ज्या नगरांमध्ये त्याने सर्वात जास्त चमत्कार केले होते त्या नगरातील लोकांनी पश्चात्ताप केला नाही, म्हणून येशूने त्यांना दोष दिला.
Kuzwa aho, Jesu cha tanga ku kalimela minzi yonse ya vatendi I makazo mwa teni, kakuti kena vava vaki,
21 २१ “हे खोराजिना नगरा, तुझा धिक्कार असो, हे बेथसैदा नगरा तुझा धिक्कार असो, कारण तुमच्यामध्ये जी पराक्रमाची कृत्ये करण्यात आली ती जर सोर व सिदोन यांच्यामध्ये केली असती तर त्यांनी त्वरेने पूर्वीच गोणपाट नेसून व अंगाला राख फासून पश्चात्ताप केला असता.
“Wina bumayi iwe Koranizini! Wina bumayi iwe Betsaida! Heva zikando ziva tendwa mu minzi ya Tire ni Sidoni ziba tendwa inwe ni ziva voleli kale za kuzwata masaka ni kulivumbeka mufuse.
22 २२ पण मी तुम्हास सांगतो की, न्यायाच्या दिवशी सोर व सिदोन या शहरांना तुमच्यापेक्षा अधिक सोपे जाईल.
Kono kakuve kuhuva kwi koto ye katulo ya Tire ni Sidoni kuhita yenu.
23 २३ आणि तू कफर्णहूम शहरा, तू आकाशापर्यंत उंच होशील काय? तू नरकापर्यंत खाली जाशील, कारण जे चमत्कार तुझ्यामध्ये करण्यात आले ते जर सदोमात करण्यात आले असते तर ते नगर आतापर्यंत टिकले असते. (Hadēs g86)
I we, Kapenauma, uzeza kuti mo yende kwiwulu? Nanta, mo bozwe mwi Hele. Sina mwa Sodoma muva tendelwe zikando ni kwenu, ni ziba shali bulyo kusikila lya sunu. (Hadēs g86)
24 २४ पण मी तुम्हास सांगतो की, न्यायाच्या दिवशी तुमच्यापेक्षा सदोम नगराला सोपे जाईल.”
Kono, niti kwenu, ka ku huvahale munkanda ya Sodoma che nako ye nkatulo, kuhita kwenu.”
25 २५ मग येशू म्हणाला, “हे पित्या, आकाशाच्या व पृथ्वीच्या प्रभू मी तुझे उपकार मानतो कारण तू या गोष्टी ज्ञानी व बुद्धीमान लोकांपासून गुप्त ठेवून बालकासारखे अशिक्षित आहेत त्यांना तू प्रकट केल्या.
Che nako iyo Jesu avati, “Ni lumbeka Tayo Ireeza, Simwine wewulu ne nkanda, kakuti aba humbili vatali, ku zuwisisa ni kwi zivahaza kwavo, va sali tutite, sina vahwile,
26 २६ होय पित्या, तू हे केलेस, कारण खरोखर तुला हेच योग्य वाटले होते.
Ee, che niti, Tayo, kutendwe intanto yako.
27 २७ माझ्या पित्याने मला सर्वकाही दिले आहे आणि पित्यावाचून कोणी पुत्राला ओळखीत नाही आणि पुत्रावाचून ज्याला प्रकट करायची पुत्राची इच्छा आहे त्याच्याशिवाय कोणीही पित्याला ओळखीत नाही.
Zintu zonse zi va tendwa cha Ngu kuzwila kwa Tayo, Mi kakwina nanga umwina wizi mwana konji Tayo, mi kakwina umwina wizi Tayo konji Mwana, mi kuzumwi sina Mwana' yo lakeze kulitondeza kwali.
28 २८ अहो जे थकलेले व ओझ्याने लादलेले असे सर्व तुम्ही मजकडे या आणि मी तुम्हास विसावा देईन.
Mwize kwa ngu, mwense mu lemenwe ni ku suntika, mi kani mihe mpumulo.
29 २९ मी अंतःकरणाने लीन व नम्र आहे, म्हणून माझे जू आपणावर घ्या, माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवास विसावा मिळेल.
Muhinde i jokwe lya ngu mulikulike mi mulitute kwangu, kakuti nina chisemo ni nkulo indotu, mi ka muwanine inhuho zenu impumulo.
30 ३० कारण माझे जू सोपे आहे आणि माझे ओझे हलके आहे.”
Kakuti i jokwe lyangu ihuva mi muziyo wangu muhuva.”

< मत्तय 11 >