< मत्तय 10 >

1 येशूने आपल्या बारा शिष्यांना आपल्याजवळ एकत्र बोलावले आणि त्याने त्यांना अशुद्ध आत्म्यांवर प्रभुत्त्व दिले व तसेच त्या अशुद्ध आत्म्यांना घालवण्यासाठी, प्रत्येक प्रकारचे आजार व प्रत्येक प्रकारचे व्याधी बरे करण्यासाठी अधिकार दिला.
And having called to him his twelve disciples, he gave them power to expel unclean spirits, and to cure diseases and maladies of every kind.
2 तर त्या बारा प्रेषितांची नावे ही होती: पेत्र (ज्याला शिमोन म्हणत) आणि त्याचा भाऊ अंद्रिया, जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान
Now these are the names of the twelve apostles: The first, Simon, called Peter, and Andrew his brother; James, son of Zebedee, and John his brother;
3 फिलिप्प व बर्थलमय, थोमा आणि मत्तय जकातदार, अल्फीचा मुलगा याकोब व तद्दय
Philip and Bartholomew; Thomas, and Matthew the publican; James, son of Alpheus, and Lebbeus, surnamed Thaddeus;
4 शिमोन कनानी व पुढे ज्याने त्याचा विश्वासघात केला तो यहूदा इस्कार्योत.
and Simon the Canaanite, and Judas Iscariot, he who betrayed him.
5 येशूने या बाराजणांना अशी आज्ञा देऊन पाठवले की: परराष्ट्रीय लोकांमध्ये जाऊ नका व शोमरोनी लोकांच्या कोणत्याही नगरात प्रवेश करू नका.
These twelve Jesus commissioned, instructing them, and saying: Go not away to the Gentiles, nor enter a Samaritan city;
6 तर त्याऐवजी इस्राएलाच्या हरवलेल्या मेंढराकडे जा.
but go directly to the lost sheep of the stock of Israel.
7 तुम्ही जाल तेव्हा संदेश द्या व असे म्हणा, “स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.”
And as you go, proclaim, saying, The Reign of Heaven approaches.
8 रोग्यांना बरे करा, मरण पावलेल्यांना जिवंत करा, कुष्ठरोग्यांना शुद्ध करा आणि भूते काढा. तुम्हास फुकट मिळाले आहे म्हणून फुकट द्या.
Heal the sick, raise the dead; cleanse lepers, expel demons; freely they have received, freely give.
9 तुमच्या कमरेला सोने, चांदी किंवा तांबे घेऊ नका.
Put not gold or silver, or brass in your girdles;
10 १० सोबत पिशवी घेऊ नका, तुमच्या प्रवासासाठी फक्त तुमचे अंगावरचे कपडे व पायातील वहाणा असू द्या. अधिकचे वस्त्र किंवा वहाणा घेऊ नका. काठी घेऊ नका, कारण कामकऱ्याला आपले अन्न मिळणे आवश्यक आहे.
carry no traveling bag, no spare coat, shoes, or staff; for the workman is worthy of his maintenance.
11 ११ ज्या कोणत्याही नगरात किंवा गावात तुम्ही जाल तेथे कोण योग्य व्यक्ती आहे याचा शोध करा आणि तेथून निघेपर्यंत त्या व्यक्तीच्या घरी राहा.
And whatever city or village you enter, inquire what person of worth dwells there; and abide with him until you leave the place.
12 १२ त्या घरात प्रवेश करतेवेळी येथे शांती असो, असे म्हणा.
When you enter the home, salute the family.
13 १३ जर ते घर खरोखर योग्य असेल तर तुमची शांती तेथे राहील पण जर ते घर योग्य नसेल तर तुमची शांती तुमच्याकडे परत येईल.
If the family be worthy, the peace you wish them shall come upon them: if they be not worthy, it shall rebound upon yourselves.
14 १४ आणि जो कोणी तुम्हास स्वीकारणार नाही किंवा तुमचे शब्द ऐकणार नाही तेव्हा त्याच्या घरातून किंवा नगरातून बाहेर पडताना तुम्ही आपल्या पायाची धूळ झटकून टाका.
Wheresoever they will not receive you, nor regard your words, in departing that house or city, shake the dust off your feet.
15 १५ मी तुम्हास खरे सांगतो. न्यायाच्या दिवशी त्या नगरापेक्षा सदोम आणि गमोराला अधिक सोपे जाईल.
Indeed, I say to you, the condition of Sodom and Gomorrah shall be more tolerable on the day of judgment, than the condition of that city.
16 १६ लांडग्यांमध्ये जसे मेंढरास पाठवावे तसे मी तुम्हास पाठवत आहे, म्हणून तुम्ही सापांसारखे चतुर आणि कबुतरांसारखे निरुपद्रवी व्हा.
Behold! I send you forth as sheep amidst wolves. Be therefore prudent as the serpents, and harmless as the doves.
17 १७ मनुष्यांविषयी सावध असा कारण ते तुम्हास न्यायसभेच्या स्वाधीन करतील आणि त्यांच्या सभास्थानामध्ये ते तुम्हास फटके मारतील.
But be upon your guard against these men; for they will deliver you to councils, and scourge you in their synagogues;
18 १८ माझ्यामुळे ते तुम्हास राज्यपाल व राजे यांच्यासमोर आणतील. तुम्ही त्यांच्यापुढे व परराष्ट्रीय लोकांपुढे माझ्याविषयी सांगाल.
and you shall be brought before governors and kings, on my account, to bear testimony to them, and to the Gentiles.
19 १९ जेव्हा तुम्हास अटक करतील तेव्हा काय बोलावे किंवा कसे बोलावे याविषयी काळजी करू नका. तेव्हा तुम्ही काय बोलायचे ते तुम्हाला सांगितले जाईल.
But when they deliver you up, be not anxious how, or what you shall speak; for what you shall speak shall be suggested to you in that moment.
20 २० कारण बोलणारे तुम्ही नसून तुमच्या देवाचा आत्मा तुमच्याद्वारे बोलेल.
For it shall not be you that shall speak; but the Spirit of my Father, who will speak by you.
21 २१ भाऊ आपल्या भावाविरूद्ध व पिता आपल्या मुलाविरूद्ध उठेल आणि त्यास विश्वासघाताने मारण्यास सोपवून देईल. मुले आईवडिलांवर उठून त्यांना जिवे मारण्यास देतील.
Then the brother will deliver up the brother to death; and the father the child; and children will arise against their parents, and procure their death.
22 २२ माझ्या नावामुळे सर्व तुमचा द्वेष करतील. पण शेवटपर्यंत जो टिकेल तोच तरेल.
And for my name you shall be hated universally. But the man who perseveres to the end, shall be saved.
23 २३ एका ठिकाणी जर तुम्हास त्रास दिला जाईल, तर दुसरीकडे जा. मी तुम्हास खरे सांगतो, मनुष्याचा पुत्र येईपर्यंत इस्राएलच्या सर्व गावामध्ये तुमचे असे फिरणे संपणार नाही.
Therefore, when they persecute you in one city, flee to another; for indeed, I say to you, you shall not have gone through the cities of Israel, till the Son of Man be come.
24 २४ शिष्य त्याच्या गुरूपेक्षा वरचढ नाही किंवा चाकर मालकाच्या वरचढ नाही.
A disciple is not above his teacher, nor a servant above his master.
25 २५ शिष्य आपल्या शिक्षकासारखा व चाकर आपल्या मालकासारखा होणे इतके पुरे. जर घराच्या धन्याला त्यांनी बालजबूलम्हणले तर घरातील इतर मनुष्यांना ते किती वाईट नावे ठेवतील! लोकांचे नको तर देवाचे भय बाळगा.
It is enough for the disciple to be as his teacher, and for the servant to be as his master. If they have called the master of the house Beelzebub, how much more his domestics?
26 २६ म्हणून त्यांना भिऊ नका, कारण उघडे होणार नाही असे काही झाकलेले नाही आणि कळणार नाही असे काही गुप्त नाही.
Therefore, fear them not; for there is nothing hid that shall not be detected; nothing secret that shall not be known.
27 २७ जे मी तुम्हास अंधारात सांगतो ते तुम्ही प्रकाशात बोला आणि कानात सांगितलेले जे तुम्ही ऐकता ते तुम्ही छतावरून गाजवा.
What I tell you in the dark, publish in the light; and what is whispered in your ear, proclaim from the house tops.
28 २८ जे शरीराला वधतात पण आत्म्याचा वध करू शकत नाहीत त्यांना भिऊ नका, तर त्यापेक्षा आत्म्याला व शरीराला जो मारू शकतो व नरकात टाकू शकतो त्यास भ्या. (Geenna g1067)
And fear not them you kill the body, but can not kill the soul; rather fear him who can destroy both soul and body in hell. (Geenna g1067)
29 २९ दोन चिमण्या एका नाण्याला विकत नाहीत काय? तरीही तुमच्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेशिवाय त्यातील एकही जमिनीवर पडणार नाही.
Are not two sparrows sold for a penny? Yet neither of them falls to the ground without your Father.
30 ३० आणि तुमच्या डोक्यावरचे केससुद्धा त्याने मोजलेले आहेत.
Nay, the very hairs of your head are all numbered.
31 ३१ म्हणून घाबरु नका. पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुम्ही अधिक मौल्यवान आहात.
Fear not, then; you are much more valuable than sparrows.
32 ३२ जो कोणी मनुष्यांसमोर मला स्वीकारील त्यास मीसुद्धा माझ्या स्वर्गातील पित्यासमोर स्वीकारीन.
Whoever, therefore, shall acknowledge me before men, him will I also acknowledge before my Father, who is in heaven.
33 ३३ पण जो कोणी मनुष्यांसमोर मला नाकारील त्यास मीसुद्धा माझ्या स्वर्गातील पित्यासमोर नाकारीन.
But whoever shall disown me before men, him will I also disown before my Father, who is in heaven.
34 ३४ असे समजू नका की मी पृथ्वीवर शांतता प्रस्थापित करायला आलो आहे. मी शांतता स्थापित करायला आलो नाही तर तलवार चालवायला आलो आहे.
Think not that I am come to bring peace to the earth. I came not to bring peace, but a sword.
35 ३५ मी फूट पाडायला आलो आहे, म्हणजे मुलाला त्याच्या पित्याविरुद्ध आणि मुलीला तिच्या आईविरुद्ध, सुनेला तिच्या सासूविरुद्ध उभे करायला आलो आहे.
For I am come to cause dissension between father and son, between mother and daughter, between mother-in-law and daughter-in-law;
36 ३६ सारांश, मनुष्याच्या घरचीच माणसे त्याचे शत्रू होतील.
so that a man's enemies will be found in his own family.
37 ३७ जो माझ्यापेक्षा स्वतःच्या पित्यावर किंवा आईवर अधिक प्रीती करतो, तो मला योग्य नाही. जो माझ्यापेक्षा आपल्या मुलावर, मुलीवर अधिक प्रीती करतो, तो मला योग्य नाही.
He who loves father or mother more than me, is not worthy of me. He who loves son or daughter more than me, is not worthy of me.
38 ३८ जो आपला वधस्तंभ घेऊन माझ्यामागे येण्याचे नाकारतो, तो मला योग्य नाही.
He who will not take his cross and follow me, is not worthy of me.
39 ३९ जो आपला जीव मिळवतो तो त्यास गमवील पण जो माझ्याकरिता आपला जीव गमावतो तो त्यास मिळवील.
He who preserves his life, shall lose it: but he who loses his life, on my account, shall preserve it.
40 ४० जी व्यक्ती तुम्हास स्वीकारते ती व्यक्ती मला स्वीकारते आणि ज्या पित्याने मला पाठवले त्यालाही स्वीकारते.
He that receives you, receives me; and he that receives me, receives him who sent me, receives him who sent me.
41 ४१ जो कोणी संदेष्ट्यांचा स्वीकार त्याच्या संदेशाच्या सेवेमुळे करतो, त्यास संदेष्ट्याचे प्रतिफळ मिळेल आणि नीतिमानाला नीतिमान म्हणून जो स्वीकारतो त्यास नीतिमानाचे प्रतिफळ मिळेल.
He that receives a prophet, because he is a prophet, shall obtain a prophet's reward; and he that receives a righteous man, because he is a righteous man, shall receive a righteous man's reward:
42 ४२ मी तुम्हास खरे सांगतो की, या लहानातील एकाला शिष्य म्हणून जो कोणी प्यालाभर थंड पाणी प्यायला देईल तोही आपल्या प्रतिफळाला मुळीच मुकणार नाही.
and whosoever shall give one of these little ones, because he is my disciple, a single cup of cold water to drink; indeed, I say to you, he shall not lose his reward.

< मत्तय 10 >