< मार्क 7 >
1 १ काही परूशी आणि नियमशास्त्राचे शिक्षक जे यरूशलेम शहराहून आले होते, ते येशूभोवती जमले.
And the Pharisees and certain ones of the scribes, having come from Jerusalem, gather to Him.
2 २ आणि त्यांनी त्याच्या काही शिष्यांना अशुद्ध, म्हणजे विधीग्रंथ हात न धुता जेवताना पाहिले.
And seeing certain ones of His disciples eating bread with defiled, that is, unwashed hands.
3 ३ कारण परूशी व इतर सर्व यहूदी वाडवडिलांचे नियम पाळून विशिष्ट रीतीने नीट हात धुतल्याशिवाय जेवत नाहीत.
For the Pharisees and all the Jews, unless they diligently wash their hands, do not eat, holding the tradition of the elders.
4 ४ बाजारातून आणलेली कुठलीही वस्तू धुतल्याशिवाय ते खात नाहीत. त्यांच्या पूर्वजांच्या इतर अनेक चालारीती ते पाळतात आणि प्याले, घागरी, तांब्याची भांडी धुणे अशा दुसरे इतर नियमही पाळतात.
And from the forum, unless they may baptize themselves, they do not eat: and many other things which they have received to hold, the baptism of cups, and pots, and brazen vessels, and couches.
5 ५ मग परूशी व नियमशास्त्राचे शिक्षक यांनी येशूला विचारले, “तुझे शिष्य वाडवडिलांच्या नियम प्रमाणे का जगत नाहीत? हात न धुता का जेवतात?”
Then the Pharisees and scribes asked Him, Wherefore do not thy disciples walk according to the tradition of the elders: but they eat bread with unwashed hands?
6 ६ येशू त्यांना म्हणाला, “यशयाने जेव्हा तुम्हा ढोंगी लोकांविषयी भविष्य केले तेव्हा त्याचे बरोबरच होते. यशया लिहितो, ‘हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात परंतु त्याची अंतःकरणे माझ्यापासून दूर आहेत.
And responding He said to them, Beautifully did Isaiah prophesy concerning you hypocrites, as has been written, This people honor me with lips, but their heart is far from me.
7 ७ ते व्यर्थ माझी उपासना करतात कारण ते लोकांस शास्त्र म्हणून जे शिकवतात ते मनुष्यांनी केलेले नियम असतात.’
In vain do they worship me, teaching for doctrines the commandments of men.
8 ८ तुम्ही देवाच्या आज्ञांचा त्याग केला असून, आता तुम्ही मनुष्याची परंपरा पाळत आहात.”
For having left the commandment of God, you are holding the tradition of men.
9 ९ आणखी तो त्यांना म्हणाला, “तुम्ही आपल्या परंपरा पाळण्याकरता देवाची आज्ञा मोडण्यासाठी सोयीस्कर पद्धत शोधून काढली आहे.
And He said to them, Truly, you make void the commandment of God, that you may hold your own tradition.
10 १० मोशेने सांगितले आहे की, ‘तू आपल्या आई-वडीलांचा सन्मान कर आणि जो मनुष्य आपल्या वडिलांबद्दल किंवा आईबद्दल वाईट बोलतो, त्यास ठार मारलेच पाहिजे.’
For Moses said, Honor thy father and thy mother; and let the one speaking evil of father and mother die the death.
11 ११ परंतु तुम्ही शिकविता, एखादा मनुष्य आपल्या वडिलांना व आईला असे म्हणू शकतो की, ‘तुम्हास मदत करण्यासाठी माझ्याकडे थोडे फार आहे, परंतु तुम्हास मदत करण्यासाठी मी ते वापरणार नाही, मी ते देवाला अर्पण करण्याचे ठरवले आहे.’
But you say, If a man may say to father or mother, Corban, that is a gift, whatsoever you may be profited by me;
12 १२ तर तुम्ही त्यास त्याच्या वडिलांसाठी किंवा आईसाठी पुढे काहीच करू देत नाही.
and you no longer permit him to do anything for his father or mother;
13 १३ अशाप्रकारे तुम्ही आपला संप्रदाय चालू ठेवून देवाचे वचन रद्द करता आणि यासारख्या पुष्कळ गोष्टी करता.”
making void the word of God by your tradition, which you have given: and you do many such similar things.
14 १४ तेव्हा येशूने लोकसमुदायाला पुन्हा बोलावून म्हटले, “प्रत्येकाने माझे ऐका व हे समजून घ्या.
And calling the crowd to Him again, He said to them, Hear all ye, and understand.
15 १५ बाहेरून मनुष्याच्या आत जाऊन त्यास अपवित्र करील असे काही नाही, तर मनुष्याच्या आतून जे निघते तेच त्यास अपवित्र करते. ज्या कोणाला ऐकण्यास कान आहेत तो ऐको.”
There is nothing without a man coming into him, which is competent to defile him: but those things coming out from him, these are the things which defile the man.
If any one has ears to hear, let him hear.
17 १७ लोकसमुदायाला सोडून येशू घरात गेला तेव्हा शिष्यांनी त्यास या दाखल्याविषयी विचारले,
And when He came from the multitude into the house, His disciples asked Him the parable.
18 १८ तो त्यांना म्हणाला, “तुम्हास देखील हे समजत नाही काय? जे बाहेरून मनुष्याच्या आत जाते ते त्यास अपवित्र करीत नाही हे तुम्हास समजत नाही का?
And He says to them, Are you still without understanding? Do you not know that everything external entering into a man is not able to defile him?
19 १९ कारण ते त्याच्या अंतःकरणात जात नाही तर त्याच्या पोटात जाते नंतर ते विष्ठेद्वारे शरीराबाहेर पडते.” असे सांगून सर्वप्रकारचे अन्न त्याने शुद्ध घोषित केले.
Because it does not go into his heart, but into his stomach, and is cast out into the excrement, purifying all edibles.
20 २० आणखी तो म्हणाला, “जे मनुष्याच्या अंतःकरणातून बाहेर पडते ते मनुष्यास अपवित्र करते.
And He said, Everything proceeding out from the man, that defiles the man.
21 २१ कारण आतून म्हणजे अंतःकरणातून वाईट विचार बाहेर पडतात. जारकर्म, चोरी, खून,
For within, out of the heart of men, proceed evil reasonings, adulteries, fornications, murders,
22 २२ व्यभिचार, लोभ, वाईटपणा, कपट, असभ्यता, मत्सर, शिव्यागाळी, अहंकार आणि मूर्खपणा,
thefts, covetousness, wickedness, deceit, impurity, an evil eye, blasphemy, pride, folly.
23 २३ या सर्व वाईट गोष्टी आतून बाहेर पडतात आणि मनुष्यास अपवित्र करतात.”
All these evils proceed out from within, and defile the man.
24 २४ येशू त्या ठिकाणाहून निघून सोर आणि सिदोन प्रांतात गेला. तेथे तो एका घरात गेला व हे कोणाला कळू नये अशी त्याची इच्छा होती. तरी त्यास गुप्त राहणे शक्य नव्हते.
And rising up, He departed thence into the regions of Tyre and Sidon. And having entered into a house, and He wished no one to know it: and He was not able to be hidden.
25 २५ पण जिच्या लहान मुलीला अशुद्ध आत्मा लागला होता अशा एका स्त्रीने त्याच्याविषयी लगेच ऐकले व ती येऊन त्याच्या पाया पडली.
For a woman hearing concerning Him, whose daughter had an unclean spirit, having come worshiped at His feet.
26 २६ ती स्त्री ग्रीक होती व सिरीयातील फिनीशिया येथे जन्मली होती. तिने येशूला आपल्या मुलीतून भूत काढण्याची विनंती केली.
For the woman was a Greek, a Syrophenician by race; and asked Him that He may cast the demon out of her daughter.
27 २७ तो तिला म्हणाला, “प्रथम मुलांना तृप्त होऊ दे कारण मुलांची भाकरी घेऊन कुत्र्याला टाकणे योग्य नव्हे.”
And He said to her, Permit the children first to be fed: for It is not good to take the children's bread and cast it to little dogs.
28 २८ परंतु ती त्यास म्हणाली, “प्रभू, कुत्रीसुद्धा मुलांच्या हातून मेजाखाली पडलेला चुरा खातात.”
And she responded and says to Him, Yea, Lord: for even the little dogs eat the crumbs of the children under the table.
29 २९ तो त्या स्त्रीला म्हणाला, “तुझ्या या बोलण्यामुळे जा, तुझ्या मुलीतून भूत निघून गेले आहे.”
And He said to her, On account of this word go; the demon has already gone out from thy daughter.
30 ३० मग ती घरी आली तेव्हा तिची मुलगी अंथरूणावर पडली आहे व तिच्यातून भूत निघून गेले आहे. असे तिने पाहिले.
And having come into her house, she found the demon gone out, and the daughter lying on the bed.
31 ३१ येशू सोर भोवतालच्या प्रदेशातून परतला आणि सिदोनाहून दकापलीसच्या वाटेने गालीलच्या सरोवराकडे आला.
And having again come out from Tyre and Sidon, He came to the Sea of Galilee, amid the coasts of Decapolis.
32 ३२ तेथे काही लोकांनी एका बहिऱ्या-तोतऱ्या मनुष्यास येशूकडे आणले व आपण त्याच्यावर हात ठेवावा अशी विनंती केली.
And they bring Him a deaf man, speaking with difficulty; and intreat Him that He may lay His hand on him.
33 ३३ येशूने त्यास लोकांपासून एका बाजूस घेऊन त्याच्या कानात आपली बोटे घातली व थुंकून त्याच्या जीभेला स्पर्श केला.
And taking him from the crowd privately, He put His fingers in his ears, and having spat, He touched his tongue;
34 ३४ त्याने स्वर्गाकडे पाहून उसासा टाकला व तो म्हणाला, “इफ्फाथा.” म्हणजे, “मोकळा हो.”
and looking up to heaven, he groaned, and says to him, Ephphatha, which is, Be thou opened.
35 ३५ आणि त्याच क्षणी त्याचे कान मोकळे झाले आणि जीभेचा बंद सुटला व त्यास बोलता येऊ लागले.
And immediately his ears were opened, and the bond of his tongue loosed, and he continued to speak distinctly.
36 ३६ तेव्हा हे कोणाला सांगू नका असे त्याने त्यांना निक्षून सांगितले. परंतु तो त्यांना जसजसे सांगत गेला, तसतसे ते अधिकच जाहीर करत गेले.
And He charged them that they should tell no one: and the more He charged them, the more abundantly they proclaimed it.
37 ३७ ते लोक फारच आश्चर्यचकित झाले व म्हणाले, “त्याने सर्वकाही चांगले केले आहे. तो बहिऱ्यांना ऐकण्यास आणि मुक्यांना बोलावयास लावतो.”
And were astonished exceedingly, saying, He has done all things well: He makes the deaf to hear, and the dumb to speak.