< मार्क 3 >

1 मग येशू पुन्हा एका सभास्थानात गेला, तेथे वाळलेल्या हाताचा एक मनुष्य होता.
И вниде паки в сонмище: и бе тамо человек, суху имый руку.
2 येशूवर आरोप करण्यासाठी कारण मिळावे म्हणून तो शब्बाथ दिवशी त्या मनुष्यास बरे करतो की काय हे पाहण्यासाठी ते त्याच्यावर बारकाईने नजर ठेवून होते.
И назираху Его, аще в субботы изцелит его, да Нань возглаголют.
3 येशू वाळलेल्या हाताच्या मनुष्यास म्हणाला, “ऊठ आणि लोकांच्या समोर उभा राहा.”
И глагола человеку суху имущему руку: стани посреде.
4 नंतर तो त्यांना म्हणाला, “शब्बाथ दिवशी चांगले करणे किंवा वाईट करणे, जीव वाचवणे किंवा जीवे मारणे यांतील कोणते योग्य आहे?” पण ते गप्प राहीले.
И глагола им: достоит ли в субботы добро творити, или зло творити? Душу спасти, или погубити? Они же молчаху.
5 मग त्याने त्यांच्या मनाच्या कठीणपणामुळे खिन्न होऊन त्या सर्वांकडे रागाने पहिले व त्या मनुष्यास म्हणाला, “तुझा हात लांब कर,” त्याने हात लांब केला आणि तो बरा झाला.
И воззрев на них со гневом, скорбя о окаменении сердец их, глагола человеку: простри руку твою. И простре: и утвердися рука его цела яко другая.
6 नंतर परूशी निघून गेले आणि लगेच त्यास जीवे मारणे कसे शक्य होईल याविषयी हेरोदीयांबरोबर येशूविरूद्ध कट करीत बसले.
И изшедше фарисее, абие со иродианы совет творяху Нань, како Его погубят.
7 मग येशू आपल्या शिष्यांसह सरोवराकडे निघून गेला आणि गालील व यहूदीया प्रांतातून मोठा लोकसमुदाय त्याच्या मागोमाग निघाला.
Иисус же отиде со ученики Своими к морю: и мног народ от Галилеи по Нем иде, и от Иудеи,
8 यरूशलेम शहर, इदोम प्रांत, यार्देने नदीच्या पलीकडच्या प्रदेशातून, सोर व सिदोन शहराच्या आसपासच्या प्रदेशातून मोठा समुदाय, जी मोठमोठी कामे तो करत होता त्याविषयी ऐकून त्याच्याकडे आला.
и от Иерусалима, и от Идумеи, и со онаго полу Иордана. И от Тира и Сидона множество многое, слышавше, елика творяше, (и) приидоша к Нему.
9 मग गर्दीमुळे चेंगरून जाऊ नये म्हणून त्याने आपल्या शिष्यांना एक होडी तयार ठेवण्यास सांगितले.
И рече учеником Своим, да корабль будет у Него народа ради, да не стужают Ему.
10 १० कारण त्याने अनेक लोकांस बरे केले होते म्हणून ज्यांना रोग होते ते त्यास स्पर्श करण्यासाठी त्याच्या अंगावर पडत होते.
Многи бо изцели, якоже нападати на Него, да Ему прикоснутся, елицы имеяху раны.
11 ११ जेव्हा अशुद्ध आत्मे येशूला पाहत तेव्हा ते त्याच्यासमोर खाली पडून मोठ्याने ओरडत की, “तू देवाचा पुत्र आहेस!”
И дуси нечистии, егда видяху Его, припадаху к Нему и зваху, глаголюще, яко Ты еси Сын Божий.
12 १२ पण तो त्यांना सक्त ताकीद देत होता, की मला प्रकट करू नका.
И много прещаше им, да не явлена Его сотворят.
13 १३ मग येशू डोंगरावर चढून गेला व त्यास जे शिष्य हवे होते? त्यांना त्याने स्वतःकडे बोलावले आणि ते त्याच्याकडे आले.
И взыде на гору и призва, ихже хотяше Сам: и приидоша к Нему.
14 १४ तेव्हा त्याने बारा जणांची नेमणूक केली त्यांना त्याने प्रेषित हे नाव दिले. त्याने त्यांची यासाठी निवड केली की, त्यांनी त्याच्यासोबत असावे व त्यांना दुसऱ्या ठिकाणी उपदेश करण्यासाठी त्यास पाठवता यावे.
И сотвори дванадесяте, да будут с Ним, и да посылает их проповедати,
15 १५ व त्यांना भूते काढण्याचा अधिकार असावा.
и имети власть целити недуги и изгонити бесы:
16 १६ मग येशूने या बारा जणांची निवड केली व जो शिमोन त्यास पेत्र हे नाव दिले.
и нарече Симону имя Петр:
17 १७ जब्दीचा मुलगा याकोब व याकोबाचा भाऊ योहान त्यांना त्याने बोआनेर्गेश, ज्याचा अर्थ गर्जनेचे पुत्र असा होतो हे नाव दिले.
и Иакова Зеведеова и Иоанна брата Иаковля: и нарече има имена Воанергес, еже есть сына громова:
18 १८ अंद्रिया, फिलिप्प, बर्थलमय, मत्तय, थोमा, अल्फीचा मुलगा याकोब, तद्दय, शिमोन कनानी
и Андреа, и Филиппа, и Варфоломеа, и Матфеа, и Фому, и Иакова Алфеова, и Фаддеа, и Симона Кананита,
19 १९ आणि यहूदा इस्कर्योत ज्याने नंतर येशूचा विश्वासघात केला.
и Иуду Искариотскаго, иже и предаде Его.
20 २० मग येशू घरी आला आणि पुन्हा इतके लोक जमले की त्यांना जेवता सुद्धा येईना.
И приидоша в дом: и собрася паки народ, яко не мощи им ни хлеба ясти.
21 २१ त्याच्या कुटुंबातील लोकांनी याविषयी ऐकले तेव्हा ते त्यास धरावयास निघाले कारण त्यास वेड लागले असे त्यांचे म्हणणे होते.
И слышавше иже бяху у Него, изыдоша, да имут Его: глаголаху бо, яко неистов есть.
22 २२ तसेच यरूशलेम शहराहून आलेले नियमशास्त्राचे शिक्षक म्हणत होते की, याच्यामध्ये बालजबूल आहे आणि त्या भुतांच्या अधिपतीच्या साहाय्याने हा भूते काढतो.
И книжницы, иже от Иерусалима низшедшии, глаголаху, яко веельзевула имать и яко о князи бесовстем изгонит бесы.
23 २३ मग येशूने त्यांना आपणाजवळ बोलावून दाखल्याच्या साहाय्याने त्यांना सांगू लागला, “सैतान सैतानाला कसा काढील?
И призвав их, в притчах глаголаше им: како может сатана сатану изгонити?
24 २४ आपापसात फूट पडलेले राज्य टिकू शकत नाही.
И аще царство на ся разделится, не может стати царство то:
25 २५ आपापसात फूट पडलेले घरही टिकू शकत नाही.
и аще дом на ся разделится, не может стати дом той:
26 २६ जर सैतान स्वतःलाच विरोध करू लागला आणि त्याच्यातच फूट पडली तर तो टिकू शकणार नाही, तर त्याचा शेवट होईल.
и аще сатана воста на ся сам и разделися, не может стати, но конец имать.
27 २७ खरोखर कोणालाही बलवान मनुष्याच्या घरात शिरून त्याची मालमत्ता लुटता येणार नाही. प्रथम त्या बलवान मनुष्यास बांधले पाहिजे, मगच त्याचे घर लुटता येईल.”
Никтоже может сосуды крепкаго, вшед в дом его, расхитити, аще не первее крепкаго свяжет: и тогда дом его расхитит.
28 २८ मी तुम्हास खरे सांगतो की, “लोकांच्या पापांची व त्यांनी केलेल्या देवाच्या निंदेची त्यांना क्षमा होईल.
Аминь глаголю вам, яко вся отпустятся согрешения сыном человеческим, и хуления, елика аще восхулят:
29 २९ पण जो कोणी पवित्र आत्म्याची निंदा करील, त्याची कधीच क्षमा होणार नाही आणि तो मनुष्य सार्वकालिक पापाचा दोषी आहे.” (aiōn g165, aiōnios g166)
а иже восхулит на Духа Святаго, не имать отпущения во веки, но повинен есть вечному суду. (aiōn g165, aiōnios g166)
30 ३० येशू असे म्हणाला कारण त्याच्यामध्ये अशुद्ध आत्मा आहे असे ते त्याच्याविषयी म्हणत होते.
Зане глаголаху: духа нечистаго имать.
31 ३१ तेव्हा येशूची आई व भाऊ आले आणि बाहेर उभे राहून त्यांनी निरोप पाठवून त्यास बोलावले.
Приидоша убо Мати и братия Его, и вне стояще послаша к Нему, зовуще Его.
32 ३२ लोकसमुदाय येशूभोवती बसला होता, ते त्यास म्हणाले, “तुझी आई व तुझे भाऊ बाहेर तुझी वाट पाहत आहेत.”
И седяше народ окрест Его. Реша же Ему: се, Мати Твоя и братия Твоя (и сестры Твоя) вне ищут Тебе.
33 ३३ त्याने त्यांना उत्तर दिले, “माझी आई व माझे भाऊ कोण आहेत?”
И отвеща им, глаголя: кто есть мати Моя, или братия Моя?
34 ३४ मग तो आपल्या सभोवताली बसलेल्यांकडे सभोवती पाहून म्हणाला, “पाहा माझी आई आणि माझे भाऊ.
И соглядав окрест Себе седящыя, глагола: се, мати Моя и братия Моя:
35 ३५ जे कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वागतात तेच माझे भाऊ, माझी बहीण व माझी आई.”
иже бо аще сотворит волю Божию, сей брат Мой и сестра Моя и мати (Ми) есть.

< मार्क 3 >