< मार्क 3 >
1 १ मग येशू पुन्हा एका सभास्थानात गेला, तेथे वाळलेल्या हाताचा एक मनुष्य होता.
He came again into the synagogue, a man was there having a withered hand.
2 २ येशूवर आरोप करण्यासाठी कारण मिळावे म्हणून तो शब्बाथ दिवशी त्या मनुष्यास बरे करतो की काय हे पाहण्यासाठी ते त्याच्यावर बारकाईने नजर ठेवून होते.
And they were watching Him, if He will heal him on the Sabbath, that they might accuse Him.
3 ३ येशू वाळलेल्या हाताच्या मनुष्यास म्हणाला, “ऊठ आणि लोकांच्या समोर उभा राहा.”
And He says to the man having a withered hand; Rise up in the midst.
4 ४ नंतर तो त्यांना म्हणाला, “शब्बाथ दिवशी चांगले करणे किंवा वाईट करणे, जीव वाचवणे किंवा जीवे मारणे यांतील कोणते योग्य आहे?” पण ते गप्प राहीले.
And He says to them; Is it lawful to do good or to do evil on the Sabbath; to save life, or to kill? And they were silent.
5 ५ मग त्याने त्यांच्या मनाच्या कठीणपणामुळे खिन्न होऊन त्या सर्वांकडे रागाने पहिले व त्या मनुष्यास म्हणाला, “तुझा हात लांब कर,” त्याने हात लांब केला आणि तो बरा झाला.
And looking round on them with indignation, being grieved over the hardness of their hearts, He says to the man; Reach forth thy hand. And he reached it forth and it was restored.
6 ६ नंतर परूशी निघून गेले आणि लगेच त्यास जीवे मारणे कसे शक्य होईल याविषयी हेरोदीयांबरोबर येशूविरूद्ध कट करीत बसले.
And the Pharisees, having gone out immediately along with the Herodians, took counsel against Him in order that they might kill Him.
7 ७ मग येशू आपल्या शिष्यांसह सरोवराकडे निघून गेला आणि गालील व यहूदीया प्रांतातून मोठा लोकसमुदाय त्याच्या मागोमाग निघाला.
And Jesus departed with His disciples to the sea: and a great multitude followed Him from Galilee, and from Judea,
8 ८ यरूशलेम शहर, इदोम प्रांत, यार्देने नदीच्या पलीकडच्या प्रदेशातून, सोर व सिदोन शहराच्या आसपासच्या प्रदेशातून मोठा समुदाय, जी मोठमोठी कामे तो करत होता त्याविषयी ऐकून त्याच्याकडे आला.
and from Jerusalem, and from Idumea, and from beyond the Jordan, and those about Tyre and Sidon, a great multitude, hearing so many things that He was doing, came to Him.
9 ९ मग गर्दीमुळे चेंगरून जाऊ नये म्हणून त्याने आपल्या शिष्यांना एक होडी तयार ठेवण्यास सांगितले.
And He said to His disciples, that a little boat should wait on Him in order that they may not tread on Him.
10 १० कारण त्याने अनेक लोकांस बरे केले होते म्हणून ज्यांना रोग होते ते त्यास स्पर्श करण्यासाठी त्याच्या अंगावर पडत होते.
For He healed many; so that they were falling before Him so that they might touch Him, so many as had diseases.
11 ११ जेव्हा अशुद्ध आत्मे येशूला पाहत तेव्हा ते त्याच्यासमोर खाली पडून मोठ्याने ओरडत की, “तू देवाचा पुत्र आहेस!”
And unclean spirits, when they saw Him, fell down before Him, and were crying out, saying, Thou art the Son of God.
12 १२ पण तो त्यांना सक्त ताकीद देत होता, की मला प्रकट करू नका.
And He charged them much that they should not make Him known.
13 १३ मग येशू डोंगरावर चढून गेला व त्यास जे शिष्य हवे होते? त्यांना त्याने स्वतःकडे बोलावले आणि ते त्याच्याकडे आले.
And He goes up into the mountain, and calls whom He wished: and they went away to Him.
14 १४ तेव्हा त्याने बारा जणांची नेमणूक केली त्यांना त्याने प्रेषित हे नाव दिले. त्याने त्यांची यासाठी निवड केली की, त्यांनी त्याच्यासोबत असावे व त्यांना दुसऱ्या ठिकाणी उपदेश करण्यासाठी त्यास पाठवता यावे.
And He made twelve (apostles) that they may be with Him and that He may send them out to preach,
15 १५ व त्यांना भूते काढण्याचा अधिकार असावा.
and to have power to heal diseases, and to cast out the demons.
16 १६ मग येशूने या बारा जणांची निवड केली व जो शिमोन त्यास पेत्र हे नाव दिले.
And He placed the name Peter on Simon;
17 १७ जब्दीचा मुलगा याकोब व याकोबाचा भाऊ योहान त्यांना त्याने बोआनेर्गेश, ज्याचा अर्थ गर्जनेचे पुत्र असा होतो हे नाव दिले.
and James the son of Zebedee, and John the brother of James; and on them He placed the names Boanerges, which is, Sons of thunder:
18 १८ अंद्रिया, फिलिप्प, बर्थलमय, मत्तय, थोमा, अल्फीचा मुलगा याकोब, तद्दय, शिमोन कनानी
and Andrew and Philip, and Bartholomew, and Matthew, and Thomas, and James the son of Alpheus, and Thaddeus, and Simon the Zealot, and Judas Iscariot,
19 १९ आणि यहूदा इस्कर्योत ज्याने नंतर येशूचा विश्वासघात केला.
who also betrayed Him.
20 २० मग येशू घरी आला आणि पुन्हा इतके लोक जमले की त्यांना जेवता सुद्धा येईना.
And He comes into a house; and the multitude come together again so they are not able to eat bread.
21 २१ त्याच्या कुटुंबातील लोकांनी याविषयी ऐकले तेव्हा ते त्यास धरावयास निघाले कारण त्यास वेड लागले असे त्यांचे म्हणणे होते.
And those along with Him hearing came out to arrest Him: for they continued to say, He is beside Himself.
22 २२ तसेच यरूशलेम शहराहून आलेले नियमशास्त्राचे शिक्षक म्हणत होते की, याच्यामध्ये बालजबूल आहे आणि त्या भुतांच्या अधिपतीच्या साहाय्याने हा भूते काढतो.
And the scribes having come down from Jerusalem were saving, He has Beelzebul and He is casting out the demons through the prince of the demons.
23 २३ मग येशूने त्यांना आपणाजवळ बोलावून दाखल्याच्या साहाय्याने त्यांना सांगू लागला, “सैतान सैतानाला कसा काढील?
And calling them to Him, He continued to speak to them in parables, How is Satan able to cast out Satan?
24 २४ आपापसात फूट पडलेले राज्य टिकू शकत नाही.
And if a kingdom may be divided against itself, that kingdom is not able to stand,
25 २५ आपापसात फूट पडलेले घरही टिकू शकत नाही.
and if a house may be divided against itself, that house will not be able to stand;
26 २६ जर सैतान स्वतःलाच विरोध करू लागला आणि त्याच्यातच फूट पडली तर तो टिकू शकणार नाही, तर त्याचा शेवट होईल.
and if Satan stand up against himself, and is divided, he is not able to stand, but has an end.
27 २७ खरोखर कोणालाही बलवान मनुष्याच्या घरात शिरून त्याची मालमत्ता लुटता येणार नाही. प्रथम त्या बलवान मनुष्यास बांधले पाहिजे, मगच त्याचे घर लुटता येईल.”
No one is able, having entered into the house of a strong man, to spoil his goods, unless he may first bind the strong man, and then he will spoil his house.
28 २८ मी तुम्हास खरे सांगतो की, “लोकांच्या पापांची व त्यांनी केलेल्या देवाच्या निंदेची त्यांना क्षमा होईल.
Truly I say unto you, that all sins shall be forgiven unto the sons of men, and blasphemies whatsoever they may blaspheme:
29 २९ पण जो कोणी पवित्र आत्म्याची निंदा करील, त्याची कधीच क्षमा होणार नाही आणि तो मनुष्य सार्वकालिक पापाचा दोषी आहे.” (aiōn , aiōnios )
but whosoever may blaspheme against the Holy Ghost hath never forgiveness, but is subject of eternal condemnation. (aiōn , aiōnios )
30 ३० येशू असे म्हणाला कारण त्याच्यामध्ये अशुद्ध आत्मा आहे असे ते त्याच्याविषयी म्हणत होते.
Because they were saying, He has an unclean spirit.
31 ३१ तेव्हा येशूची आई व भाऊ आले आणि बाहेर उभे राहून त्यांनी निरोप पाठवून त्यास बोलावले.
And His mother and His brothers come; and standing without, sent to Him, calling Him.
32 ३२ लोकसमुदाय येशूभोवती बसला होता, ते त्यास म्हणाले, “तुझी आई व तुझे भाऊ बाहेर तुझी वाट पाहत आहेत.”
And the crowd was sitting round Him; and they say to Him, Behold thy mother and thy brothers without are seeking thee.
33 ३३ त्याने त्यांना उत्तर दिले, “माझी आई व माझे भाऊ कोण आहेत?”
And He responding to them, says, Who is my mother and my brothers?
34 ३४ मग तो आपल्या सभोवताली बसलेल्यांकडे सभोवती पाहून म्हणाला, “पाहा माझी आई आणि माझे भाऊ.
And looking round on His disciples sitting about Him in a circle, He says, Behold my mother and my brothers!
35 ३५ जे कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वागतात तेच माझे भाऊ, माझी बहीण व माझी आई.”
For whosoever may do the will of God, the same is my brother, and my sister, and my mother.