< मार्क 2 >
1 १ काही दिवसानी येशू कफर्णहूम नगरास परत आला तेव्हा तो घरी आहे असे लोकांच्या कानी पडले.
And again he entered into Capharnaum after some days.
2 २ तेव्हा इतके लोक जमले की घरात त्यांना जागा उरली नाही, एवढेच नव्हे तर दरवाजाबाहेरदेखील जागा नव्हती. तेव्हा तो त्यांना वचन सांगत होता.
And it was heard that he was in the house, and many came together, so that there was no room; no, not even at the door; and he spoke to them the word.
3 ३ मग काही लोक त्याच्याकडे पक्षघाती मनुष्यास घेऊन आले. त्यास चौघांनी उचलून आणले होते.
And they came to him, bringing one sick of the palsy, who was carried by four.
4 ४ परंतु गर्दीमुळे त्यांना त्या मनुष्यास येशूजवळ नेता येईना, मग तो जेथे उभा होता त्याच्यावरचे छप्पर त्यांनी काढले व ज्या खाटेवर तो मनुष्य होता, ती खाट त्यांनी छप्परातून खाली त्याच्यापुढे सोडली.
And when they could not offer him unto him for the multitude, they uncovered the roof where he was; and opening it, they let down the bed wherein the man sick of the palsy lay.
5 ५ त्यांचा विश्वास पाहून येशू पक्षघाती मनुष्यास म्हणाला, “मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.”
And when Jesus had seen their faith, he saith to the sick of the palsy: Son, thy sins are forgiven thee.
6 ६ तेथे काही नियमशास्त्राचे शिक्षक बसले होते. ते आपल्या मनात विचार करू लागले की,
And there were some of the scribes sitting there, and thinking in their hearts:
7 ७ “हा मनुष्य असे का बोलत आहे? हा दुर्भाषण करीत आहे! देवाशिवाय कोण पापांची क्षमा करू शकतो?”
Why doth this man speak thus? he blasphemeth. Who can forgive sins, but God only?
8 ८ आणि तेव्हा ते आपल्या अंतःकरणात असे विचार करीत आहेत, हे येशूने त्याच क्षणी आपल्या आत्म्यात ओळखून त्यांना म्हटले, “तुम्ही आपल्या मनात असले विचार का करता?
Which Jesus presently knowing in his spirit, that they so thought within themselves, saith to them: Why think you these things in your hearts?
9 ९ तुझ्या पापांची क्षमा झाली आहे, असे या पक्षघाती मनुष्यास म्हणणे किंवा ऊठ आपला बाज उचलून घेऊन चाल असे म्हणणे; यातील कोणते सोपे आहे?”
Which is easier, to say to the sick of the palsy: Thy sins are forgiven thee; or to say: Arise, take up thy bed, and walk?
10 १० परंतु मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे त्यांना समजावे म्हणून, तो पक्षघाती मनुष्यास म्हणाला,
But that you may know that the Son of man hath power on earth to forgive sins, (he saith to the sick of the palsy, )
11 ११ “मी तुला सांगतो, ऊठ, तुझी खाट उचलून घेऊन आपल्या घरी जा.”
I say to thee: Arise, take up thy bed, and go into thy house.
12 १२ मग तो लगेच उठला. त्याने आपली खाट उचलून घेऊन सर्वाच्या देखत तो घराच्या बाहेर निघाला; यामुळे ते सर्व आश्चर्यचकित झाले व देवाचे गौरव करत म्हणाले, “आम्ही असे कधीच पाहिले नव्हते.”
And immediately he arose; and taking up his bed, went his way in the sight of all; so that all wondered and glorified God, saying: We never saw the like.
13 १३ येशू पुन्हा सरोवराकडे गेला व पुष्कळ लोक त्याच्याजवळ आले आणि त्याने त्यांना शिक्षण दिले.
And he went forth again to the sea side; and all the multitude came to him, and he taught them.
14 १४ नंतर तो जात असता त्याने अल्फीचा मुलगा लेवी यास जकात नाक्यावर बसलेले पाहिले. मग येशू लेवीला म्हणाला, “माझ्यामागे ये.” तेव्हा लेवी उठला आणि येशूच्या मागे गेला.
And when he was passing by, he saw Levi the son of Alpheus sitting at the receipt of custom; and he saith to him: Follow me. And rising up, he followed him.
15 १५ नंतर असे झाले की येशू लेवीच्या घरी जेवायला बसला; तेथे बरेच जकातदार व पापी लोकही येशू व त्याच्या शिष्यांबरोबर जेवत होते कारण ते पुष्कळ असून त्याच्यामागे आले होते.
And it came to pass, that as he sat at meat in his house, many publicans and sinners sat down together with Jesus and his disciples. For they were many, who also followed him.
16 १६ तेव्हा काही नियमशास्त्राचे शिक्षक जे परूशी होते त्यांनी येशूला पापी व जकातदारांबरोबर जेवताना पाहिले. ते त्याच्या शिष्यांना म्हणाले, “हा पापी व जकातदार यांच्याबरोबर का जेवतो?”
And the scribes and the Pharisees, seeing that he ate with publicans and sinners, said to his disiples: Why doth your master eat and drink with publicans and sinners?
17 १७ हे ऐकून येशू त्यांना म्हणाला, “निरोग्यांना वैद्याची गरज नसते, तर रोग्यांना असते. मी नीतिमान लोकांस नाही, तर पाप्यांना बोलावण्यास आलो आहे.”
Jesus hearing this, saith to them: They that are well have no need of a physician, but they that are sick. For I came not to call the just, but sinners.
18 १८ जेव्हा योहानाचे शिष्य व परूशी उपवास करीत होते तेव्हा काहीजण येशूकडे आले आणि त्यास म्हणाले, “योहानाचे शिष्य व परूशी लोक उपवास करतात परंतु तुझे शिष्य उपवास का करीत नाहीत?”
And the disiples of John and the Pharisees used to fast; and they come and say to him: Why do the disciples of John and of the Pharisees fast; but thy disciples do not fast?
19 १९ येशू त्यांना म्हणाला, “वऱ्हाड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत त्यांनी उपवास करणे त्यांना शक्य आहे काय? वर बरोबर आहे तोपर्यंत त्यांना उपवास करणे शक्य नाही.
And Jesus saith to them: Can the children of the marriage fast, as long as the bridegroom is with them? As long as they have the bridegroom with them, they cannot fast.
20 २० परंतु असे दिवस येतील की, वर त्यांच्यापासून घेतला जाईल आणि नंतर ते त्या दिवसांत उपवास करतील.
But the days will come when the bridegroom shall be taken away from them; and then they shall fast in those days.
21 २१ कोणी नव्या कापडाचा तुकडा जुन्या कापडाला जोडीत नाही, जर तो असे करतो तर नवे कापड जुन्या कापडाला फाडील व छिद्र मोठे होईल.
No man seweth a piece of raw cloth to an old garment: otherwise the new piecing taketh away from the old, and there is made a greater rent.
22 २२ तसेच नवा द्राक्षरस कोणीही द्राक्षरसाच्या जुन्या कातडी पिशवीत घालीत नाही. जर तो असे करतो तर द्राक्षरस कातडी पिशवीला फोडील आणि द्राक्षरस नासेल व द्राक्षरसाची कातडी पिशवी यांचा नाश होईल. म्हणून नवा द्राक्षरस नव्या कातडी पिशवीतच घालतात.”
And no man putteth new wine into old bottles: otherwise the wine will burst the bottles, and both the wine will be spilled, and the bottles will be lost. But new wine must be put into new bottles.
23 २३ नंतर असे झाले की, येशू शब्बाथ दिवशी शेतातून जात असता, त्याचे शिष्य कणसे मोडू लागले.
And it came to pass again, as the Lord walked through the corn fields on the sabbath, that his disciples began to go forward, and to pluck the ears of corn.
24 २४ तेव्हा परूशी येशूला म्हणाले, “पाहा, शब्बाथ दिवशी जे करू नये ते हे का करतात?”
And the Pharisees said to him: Behold, why do they on the sabbath day that which is not lawful?
25 २५ येशू त्यांना म्हणाला, “जेव्हा दावीद व त्याच्याबरोबर असलेल्या लोकांस भूक लागली व त्यांना खावयाला हवे होते. तेव्हा त्यांनी काय केले याविषयी तुम्ही वाचले नाही काय?
And he said to them: Have you never read what David did when he had need, and was hungry himself, and they that were with him?
26 २६ अब्याथार महायाजक असताना, तो देवाच्या भवनात कसा गेला आणि देवाला समर्पित केलेल्या भाकरी, ज्या नियमशास्त्राप्रमाणे याजकाशिवाय कोणीही खाऊ नयेत त्या कशा खाल्ल्या व जे त्याच्याबरोबर होते त्यांनाही कशा दिल्या, याविषयी तुम्ही वाचले नाही काय?”
How he went into the house of God, under Abiathar the high priest, and did eat the loaves of proposition, which was not lawful to eat but for the priests, and gave to them who were with him?
27 २७ तो त्यास सांगत होता, “शब्बाथ मनुष्यांसाठी करण्यात आला. मनुष्य शब्बाथासाठी करण्यात आला नाही.
And he said to them: The sabbath was made for man, and not man for the sabbath.
28 २८ म्हणून मनुष्याचा पुत्र शब्बाथाचा देखील प्रभू आहे.”
Therefore the Son of man is Lord of the sabbath also.