< मार्क 2 >

1 काही दिवसानी येशू कफर्णहूम नगरास परत आला तेव्हा तो घरी आहे असे लोकांच्या कानी पडले.
थोडा दिन नंतर येशु कफर्णहुम गावमा परत वना, अनी तो घर शे, हाई लोकसनी ऐकं.
2 तेव्हा इतके लोक जमले की घरात त्यांना जागा उरली नाही, एवढेच नव्हे तर दरवाजाबाहेरदेखील जागा नव्हती. तेव्हा तो त्यांना वचन सांगत होता.
तवय त्याना घरमा ईतला लोकसनी गर्दी करी की, दारमाईन घुसाले सुध्दा जागा नव्हती, तठे जमेल लोकसले त्यानी संदेश दिधा.
3 मग काही लोक त्याच्याकडे पक्षघाती मनुष्यास घेऊन आले. त्यास चौघांनी उचलून आणले होते.
तवय लखवा व्हयेल माणुसले चारजण त्यानाकडे उचलीसन लई वनात.
4 परंतु गर्दीमुळे त्यांना त्या मनुष्यास येशूजवळ नेता येईना, मग तो जेथे उभा होता त्याच्यावरचे छप्पर त्यांनी काढले व ज्या खाटेवर तो मनुष्य होता, ती खाट त्यांनी छप्परातून खाली त्याच्यापुढे सोडली.
गर्दी इतली व्हयेल व्हती की, त्यानाजोडे जावाले जागाच नव्हती, म्हणीन त्या घरवर चढनात. येशु जठे उभा व्हता तठला कौले त्यासनी काढी लिधात अनी जी खाटवर तो लखवा व्हयेल माणुस झोपेल व्हता त्यासनी ती खाट तठे खाल उतारी दिधी.
5 त्यांचा विश्वास पाहून येशू पक्षघाती मनुष्यास म्हणाला, “मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.”
मी त्याले बरं करसु हाऊ त्यासना ईश्वास दखीसन येशुनी लखवा व्हयेल माणुसले सांगं, “हे पोऱ्या, तुना पापसनी क्षमा व्हयेल शे.”
6 तेथे काही नियमशास्त्राचे शिक्षक बसले होते. ते आपल्या मनात विचार करू लागले की,
काही शास्त्री लोके तठे बशेल व्हतात. त्या आपला-आपला मनमा ईचार कराले लागनात की,
7 “हा मनुष्य असे का बोलत आहे? हा दुर्भाषण करीत आहे! देवाशिवाय कोण पापांची क्षमा करू शकतो?”
“हाऊ असा कसा काय बोलस? हाऊ तर देवनी निंदा करी राहीना! कोणीच देवना शिवाय पापनी क्षमा करू शकस नही!”
8 आणि तेव्हा ते आपल्या अंतःकरणात असे विचार करीत आहेत, हे येशूने त्याच क्षणी आपल्या आत्म्यात ओळखून त्यांना म्हटले, “तुम्ही आपल्या मनात असले विचार का करता?
येशुले त्याना आत्मिक दृष्टीघाई लगेच दखायनं की, शास्त्रीसना मनमा काय ईचार चाली राहिनात. तो त्यासले बोलना, “तुम्हीन आपला मनमा हाऊ ईचार कसाले करी राहिनात?
9 तुझ्या पापांची क्षमा झाली आहे, असे या पक्षघाती मनुष्यास म्हणणे किंवा ऊठ आपला बाज उचलून घेऊन चाल असे म्हणणे; यातील कोणते सोपे आहे?”
‘तुना पापनी क्षमा व्हई गई,’ अस लखवा व्हयेल माणुसले बोलानं की, ‘ऊठ, तुनी खाट उचलीन, चालाले लाग’ हाई बोलनं, कोणतं सोपं शे?
10 १० परंतु मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे त्यांना समजावे म्हणून, तो पक्षघाती मनुष्यास म्हणाला,
मनुष्यना पोऱ्याले जगना पापनी क्षमा कराना अधिकार शे,” हाई तुमले समजाले पाहिजे अस बोलीन येशुनी लखवा व्हयेल माणुसले सांगं,
11 ११ “मी तुला सांगतो, ऊठ, तुझी खाट उचलून घेऊन आपल्या घरी जा.”
“मी तुले सांगस की, ऊठ, तुनी खाट उचलीन घर जाय!”
12 १२ मग तो लगेच उठला. त्याने आपली खाट उचलून घेऊन सर्वाच्या देखत तो घराच्या बाहेर निघाला; यामुळे ते सर्व आश्चर्यचकित झाले व देवाचे गौरव करत म्हणाले, “आम्ही असे कधीच पाहिले नव्हते.”
मंग तो ऊठना अनी लगेच त्यानी खाट उचलीन सर्व लोकस समोरतीन गया, हाई दखीन सर्व लोके चमकाई गयात, त्या देवना गौरव करीसन बोलनात, “आम्हीन अस कधीच दखेल नव्हतं!”
13 १३ येशू पुन्हा सरोवराकडे गेला व पुष्कळ लोक त्याच्याजवळ आले आणि त्याने त्यांना शिक्षण दिले.
मंग येशु परत गालील समुद्रना काठवर गया अनी सर्व लोकसनी गर्दी त्यानाजोडे वनी. तवय तो त्यासले शिकाडू लागना.
14 १४ नंतर तो जात असता त्याने अल्फीचा मुलगा लेवी यास जकात नाक्यावर बसलेले पाहिले. मग येशू लेवीला म्हणाला, “माझ्यामागे ये.” तेव्हा लेवी उठला आणि येशूच्या मागे गेला.
मंग समुद्रना काठवरतीन तो जाई राहिंता, तवय त्यानी अल्फिना पोऱ्या लेवीले जकात नाकावर बशेल दखं, अनी त्याले सांगं, “चल मनामांगे ये,” तवय लेवी ऊठीसन त्यानामांगे गया.
15 १५ नंतर असे झाले की येशू लेवीच्या घरी जेवायला बसला; तेथे बरेच जकातदार व पापी लोकही येशू व त्याच्या शिष्यांबरोबर जेवत होते कारण ते पुष्कळ असून त्याच्यामागे आले होते.
मंग येशु लेवीना घर जेवाले गया. तठे येशु अनी त्याना शिष्य यासना पंगतमा बराच जकातदार अनी पापी लोके जेवाले बशेल व्हतात. कारण असा बराच लोके त्याना मांगे येल व्हतात.
16 १६ तेव्हा काही नियमशास्त्राचे शिक्षक जे परूशी होते त्यांनी येशूला पापी व जकातदारांबरोबर जेवताना पाहिले. ते त्याच्या शिष्यांना म्हणाले, “हा पापी व जकातदार यांच्याबरोबर का जेवतो?”
तवय परूशी पंथमधला शास्त्री लोकसनी दखं की, येशु जकातदार अनं पापी लोकससंगे जेवण करी राहीना, त्या त्याना शिष्यले बोलनात, “हाऊ असा लोकससंगे का बर जेवण करस?”
17 १७ हे ऐकून येशू त्यांना म्हणाला, “निरोग्यांना वैद्याची गरज नसते, तर रोग्यांना असते. मी नीतिमान लोकांस नाही, तर पाप्यांना बोलावण्यास आलो आहे.”
हाई ऐकीसन येशु त्यासले बोलना, “निरोगी माणुसले वैद्यनी गरज ऱ्हास नही, तर आजारी माणुसले ऱ्हास, मी धार्मीक माणससले नही, तर पापी माणससले बोलावाले येल शे.”
18 १८ जेव्हा योहानाचे शिष्य व परूशी उपवास करीत होते तेव्हा काहीजण येशूकडे आले आणि त्यास म्हणाले, “योहानाचे शिष्य व परूशी लोक उपवास करतात परंतु तुझे शिष्य उपवास का करीत नाहीत?”
बाप्तिस्मा देणारा योहानना शिष्य अनी परूशी ह्या उपास करतस, म्हणीन काही लोके ईसन येशुले ईचारु लागनात, “योहानना शिष्य अनी परुशीसना शिष्य उपास करतस मंग तुमना शिष्य उपास का बर करतस नही?”
19 १९ येशू त्यांना म्हणाला, “वऱ्हाड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत त्यांनी उपवास करणे त्यांना शक्य आहे काय? वर बरोबर आहे तोपर्यंत त्यांना उपवास करणे शक्य नाही.
येशुनी त्यासले सांगं, “जोपावत वऱ्हाडीसनासंगे नवरदेव शे, तोपावत त्या उपाशी राहतीन काय? जोपावत नवरदेव त्यासनासंगे शे तोपावत त्या उपाशी राहूच शकत नही.”
20 २० परंतु असे दिवस येतील की, वर त्यांच्यापासून घेतला जाईल आणि नंतर ते त्या दिवसांत उपवास करतील.
पण असा दिन येवाव शे की, नवरदेव त्यासनापाईन येगळा व्हई, तवय त्या उपास करतीन.
21 २१ कोणी नव्या कापडाचा तुकडा जुन्या कापडाला जोडीत नाही, जर तो असे करतो तर नवे कापड जुन्या कापडाला फाडील व छिद्र मोठे होईल.
कोणी नवा कपडाना तुकडा ठिगळं पडेल जुना कपडाले लावस नही, लाव तर ठिगळाकरता लायल कपडा जुना कपडाले अजुन फाडी टाकी अनी ठिगळं अजुन मोठं व्हई जाई.
22 २२ तसेच नवा द्राक्षरस कोणीही द्राक्षरसाच्या जुन्या कातडी पिशवीत घालीत नाही. जर तो असे करतो तर द्राक्षरस कातडी पिशवीला फोडील आणि द्राक्षरस नासेल व द्राक्षरसाची कातडी पिशवी यांचा नाश होईल. म्हणून नवा द्राक्षरस नव्या कातडी पिशवीतच घालतात.”
कोणी नवा द्राक्षरस कातडापाईन बनाडेल जुनी थैलीमा भरीन ठेवस नही. जर तसं करं तर थैली फाटी जाई, अनी सर्व द्राक्षरस सांडाई जाई. म्हणीसन नवा द्राक्षरस नवा थैलीमा भरीन ठेवतस.
23 २३ नंतर असे झाले की, येशू शब्बाथ दिवशी शेतातून जात असता, त्याचे शिष्य कणसे मोडू लागले.
एकदाव अस व्हयनं की, शब्बाथ दिनले येशु त्याना शिष्यससंगे वावरमाईन जाई राहींता. जाता जाता शिष्य ओंब्या तोडीन खाई राहींतात.
24 २४ तेव्हा परूशी येशूला म्हणाले, “पाहा, शब्बाथ दिवशी जे करू नये ते हे का करतात?”
हाई दखीसन परूशी येशुले बोलनात, “दख, तुना शिष्य अस कामकरी राहीनात जे शब्बाथ दिनले नियमप्रमाणे करतस नही!”
25 २५ येशू त्यांना म्हणाला, “जेव्हा दावीद व त्याच्याबरोबर असलेल्या लोकांस भूक लागली व त्यांना खावयाला हवे होते. तेव्हा त्यांनी काय केले याविषयी तुम्ही वाचले नाही काय?
येशुनी त्यासले उत्तर दिधं, “तुम्हीन कधी हाई वाचं नही का? की, जवय दावीद राजा अनी त्यानासंगे ज्या व्हतात, त्यासले भूक लागनी अनं त्यासनाजोडे खावाले काहीच नव्हतं तवय दावीद राजाने काय करं,
26 २६ अब्याथार महायाजक असताना, तो देवाच्या भवनात कसा गेला आणि देवाला समर्पित केलेल्या भाकरी, ज्या नियमशास्त्राप्रमाणे याजकाशिवाय कोणीही खाऊ नयेत त्या कशा खाल्ल्या व जे त्याच्याबरोबर होते त्यांनाही कशा दिल्या, याविषयी तुम्ही वाचले नाही काय?”
कशा तो देवना मंदिरमा गया अनी देवले अर्पण करेल भाकरी ज्या याजकशिवाय कोणीच खातस नही. त्या त्यानीपण खाद्यात अनी त्यानासंगे ज्या व्हतात, त्यासले पण खावाड्यात, हाई अब्याथार हाऊ जवय महायाजक व्हता, तवय हाई घडनं की नही?”
27 २७ तो त्यास सांगत होता, “शब्बाथ मनुष्यांसाठी करण्यात आला. मनुष्य शब्बाथासाठी करण्यात आला नाही.
आखो तो त्यासले बोलना, “शब्बाथ दिन हाऊ माणसंसना चांगला करता बनाडेल शे; माणुस शब्बाथ दिनकरता नही.”
28 २८ म्हणून मनुष्याचा पुत्र शब्बाथाचा देखील प्रभू आहे.”
यामुये मनुष्यना पोऱ्या शब्बाथ दिनना धनी शे.

< मार्क 2 >