< मार्क 16 >
1 १ शब्बाथाचा दिवस संपला तेव्हा मग्दालीया नगराची मरीया, याकोबाची आई मरीया आणि सलोमी यांनी त्यास लावण्याकरिता सुगंधी तेल विकत आणले.
І, як минула субота, Мария Магдалина, та Мария Яковова, та Саломия купили пахощів, щоб, прийшовши, намастити Його.
2 २ आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी, अगदी पहाटे सूर्योदयाच्या वेळी त्या कबरेकडे गेल्या.
І вельми рано первого дня тижня приходять до гробу, як сходило сонце.
3 ३ त्या एकमेकीस म्हणत होत्या की, कबरेच्या तोंडावरून आपणासाठी धोंड कोण बाजूला लोटील?
І казали між собою: Хто відкотить нам каменя від дверей гробу?
4 ४ नंतर त्यांनी वर पाहिले आणि त्यांना धोंड दूर लोटलेली आढळली. ती फारच मोठी होती.
І поглянувши, побачили, що відкочено каменя; був бо великий дуже.
5 ५ त्या कबरेत आत गेल्या तेव्हा त्या चकित झाल्या. त्यांना एक तरुण पुरूष उजव्या बाजूस बसलेला आढळला. त्याने पांढरा शुभ्र झगा घातला होता.
І ввійшовши в гріб, побачили молодця, сидячого з правого боку, одягненого в шату білу, та й вжахнулись.
6 ६ तो त्यांना म्हणाला, भयभीत होऊ नका, तुम्ही नासरेथकर येशू जो वधस्तंभावर खिळला होता त्याचा शोध करीत आहात. पण तो उठला आहे. येथे नाही. त्यांनी त्यास ठेवले होते ती जागा पाहा.
Він же рече їм: Не жахайтесь. Ісуса шукаєте Назарянина, розпятого. Устав; нема Його тут. Ось місце, де положено Його.
7 ७ जा आणि त्याच्या शिष्यांना व पेत्रालाही सांगा की, तो तुमच्या अगोदर गालील प्रांतात जात आहे, त्याने तुम्हास सांगितल्याप्रमाणे तेथे तो तुम्हास दृष्टीस पडेल.
Тільки ж ійдїть скажіть ученикам Його та Петрові, що попередить вас у Галилею. Там Його побачите, як сказав вам.
8 ८ मग त्या बाहेर गेल्या आणि भीतीमुळे कबरेपासून पळाल्या. त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी कोणाला काहीही सांगितले नाही कारण त्या भयभीत झाल्या होत्या.
І вийшовши вони хутко, побігли відгребу; бо обняв їх трепет і страх, та й нікому нічого не сказали: боялись бо.
9 ९ (note: The most reliable and earliest manuscripts do not include Mark 16:9-20.) आठवड्याच्या पहिल्या दिवशी येशू उठल्यावर त्याने प्रथम मग्दालीया नगराची मरीयाला, जिच्यातून त्याने सात भूते काढली होती, तिला दर्शन दिले.
(note: The most reliable and earliest manuscripts do not include Mark 16:9-20.) Воскреснувши ж уранці первого дня тижня, явивсь найперше Мариї Магдалинї, що з неї вигнав сім бісів.
10 १० ती गेली आणि रडून शोक करणाऱ्या त्याच्या अनुयायांना तिने हे वृत्त सांगितले.
Вона пійшовши, сповістила тих, що були з Ним, як сумували та плакали.
11 ११ त्यांनी ऐकले की तो जिवंत आहे व तिने त्यास पाहिले आहे. तेव्हा त्यांनी तिच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला नाही.
А ті, почувши, що живий, і вона Його бачила, не поняли віри.
12 १२ यानंतर त्यांच्यापैकी दोघे उघड्या माळरानावर चालले होते. गावाकडे जात असता येशू त्यांना दुसऱ्या रुपाने प्रकट झाला.
Після ж того двоїм із них в дорозї явив ся в иншому видї, як ійшли на село.
13 १३ ते परत आले व इतरांना त्याविषयी सांगितले परंतु त्यांनी त्यांच्यावरही विश्वास ठेवला नाही.
І вони, пійшовши, сповістили других, та й тим не поняли віри.
14 १४ नंतर अकरा शिष्य जेवत बसले असता येशू त्यांना प्रकट झाला. त्याने शिष्यांच्या अविश्वासाबद्दल आणि त्यांच्या अंतःकरणाच्या कठोरतेबद्दल त्यांना समज दिली कारण ज्यांनी त्यास उठल्यावर पाहिले होते त्यांच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही.
Опісля явивсь одинайцятьом їм сидячим за столом, і дорікав їм недовірством їх і жорстркостю серця, що тим, котрі бачили Його воскресшого, не поняли віри.
15 १५ तो त्यांना म्हणाला, “सर्व जगात जा आणि सर्व सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा.
І рече їм: Ійдїть по всьому сьвіту й проповідуйте євангелию усякому твориву.
16 १६ जो कोणी विश्वास ठेवतो आणि बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल, परंतु जो विश्वास ठेवत नाही तो शिक्षेस पात्र होईल.
Хто вірувати ме та охрестить ся, спасеть ся; а хто не вірувати ме, осудить ся.
17 १७ परंतु जे विश्वास ठेवतील त्यांच्याबरोबर ही चिन्हे असतील, ते माझ्या नावाने भूते काढतील, ते नव्या नव्या भाषा बोलतील.
Ознаки ж віруючим такі будуть: імям моїм бісів виганятимуть; мовами заговорять новими;
18 १८ ते आपल्या हातांनी साप उचलतील आणि ते कोणतेही प्राणघातक पदार्थ प्याले तरी ते त्यांना कदापि बाधणार नाही. ते आजाऱ्यांवर हात ठेवतील आणि ते बरे होतील.”
гадюк брати муть, і, коли смертнього чого випють, не шкодити ме їм; на недужих руки класти муть, і одужувати муть.
19 १९ मग प्रभू येशू त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर तो स्वर्गात घेतला गेला आणि देवाच्या उजव्या बाजूस जाऊन बसला.
Господь же, після того, як промовив до них, вознїс ся на небо, й сїв по правиці в Бога.
20 २० शिष्य बाहेर गेले आणि त्यांनी प्रत्येक ठिकाणी सुवार्तेची घोषणा केली. प्रभूने त्यांच्याबरोबर कार्य केले व त्याने वचनाबरोबर असणाऱ्या चिन्हांनी त्याची खात्री केली.
Вони ж вийшовши, проповідували всюди, а Господь допомагав, і слово стверджував услїд ознаками. Амінь.