< मार्क 13 >
1 १ मग येशू परमेश्वराच्या भवनातून निघून जात असता त्याच्या शिष्यांपैकी एकजण त्यास म्हणाला, “गुरूजी, पाहा, कसे हे अद्भूत धोंडे व बांधलेली इमारत आहे.”
NI a kotieila sang ni im en kaudok, amen sapwilim a tounpadak kan potoan ong i: Saunpadak, kom kotin masani takai o im pukat!
2 २ येशू त्यास म्हणाला “तू या मोठ्या इमारती पाहतोस ना? येथील एकही दगड दुसऱ्या दगडावर राहणार नाही. त्यातील प्रत्येक खाली पाडला जाईल.”
A Iesus kotin sapeng, masani ong i: Koe kilekilang im kalaimun pukat? Sota takai eu pan mi pon eu, me so pan lokidoki sang.
3 ३ येशू परमेश्वराच्या भवनासमोरच्या जैतुनाच्या डोंगरावर बसला होता. पेत्र, याकोब, योहान आणि अंद्रिया यांनी त्यास एकांतात विचारले,
Ari, ni a kotikot pon dol Oliwe sal dong im en kaudok, Petrus, o Iakopus, o Ioanes, o Andreas, re ap kelep potoan ong i:
4 ४ “या गोष्टी केव्हा घडतील हे आम्हास सांगा आणि या गोष्टी पूर्ण होण्याची वेळ येईल तेव्हा कोणते चिन्ह घडेल?”
Re kotin masani ong kit, iad mepukat pan wiaui o da pan kadapakilene en mepukat karos a pan pwaida?
5 ५ नंतर येशू त्यांना सांगू लागला, “तुम्हास कोणी फसवू नये म्हणून सावध राहा.
Iesus ap kotin sapeng irail masani: Kalaka, pwe meamen de kotaue komail!
6 ६ पुष्कळ लोक माझ्या नावाने येतील व म्हणतील की, ‘मी तोच आहे’ आणि ते पुष्काळांना फसवतील.
Pwe me toto pan kodo ni ad ai, inda: Ngai i. Re ap pan kotaueda me toto.
7 ७ जेव्हा तुम्ही लढायाविषयी आणि लढायांच्या अफवाविषयी ऐकाल तेव्हा घाबरू नका. हे निश्चितपणे घडणारच आहे. पण एवढ्याने शेवट होणार नाही.
O ni omail pan rong mauin o rong en mauin, komail depa masak! Pwe mepukat udan wiaui; a saikenta imwi.
8 ८ एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर उठेल, एक राज्य दुसऱ्या राज्यावर उठेल, निरनिराळ्या ठिकाणी भूकंप होतील आणि दुष्काळ पडतील. पण या गोष्टी म्हणजे केवळ नाशाची सुरूवात आहे.
Pwe wei eu pan u ong eu wei o pil wei en nanmarki ko, o sap rerer pan wiaui sili, o lek, o insensued, mepukat kamoe en patau.
9 ९ तुम्ही सावध असा. ते तुम्हास न्यायसभांच्या स्वाधीन करतील आणि सभास्थानात तुम्हास मार देतील. त्यांना साक्ष व्हावी म्हणून तुम्हास राज्यकर्ते व राजे यांच्यासमोर उभे रहावे लागेल.
A komail kalaka pein komail! Pwe re pan pang komail la ong kapung o sinakoke kan; o komail pan kamekame o wisike dong mon monsap o nanmarki kan pweki ngai, pwen kadede ong irail.
10 १० या गोष्टी घडण्यापूर्वी सर्व राष्ट्रांमध्ये सुवार्तेची घोषणा झालीच पाहिजे.
O rongamau en kaloki ong mas nan sap karos.
11 ११ ते तुम्हास अटक करून चौकशीसाठी आणतील तेव्हा अगोदरच तुम्ही काय बोलावे याची काळजी करू नका, तर त्या घटकेला जे काही सुचवले जाईल ते बोला, कारण बोलणारे तुम्ही नाही तर पवित्र आत्मा तुम्हासाठी बोलेल.
A ni arail wa komail la o pangla komail, der lamelame mas, me komail pan inda, pil der madamadaua mas. A iei me o, me pan ko ong komail ni klok ota, i me komail en inda! Pwe kaidin komail me lokaia a Ngen saraui.
12 १२ भाऊ भावाला व वडील आपल्या मुलाला ठार मारण्यासाठी विश्वासघात करून धरून देतील, मुले आपल्या आईवडीलांवर उठतील आणि ते त्यांना ठार करतील.
Pwe ol pan pangala ri a ol, pwen kamela; o sam na seri, o seri ko pan u ong sam, in, o pan kare ong ir, en kamela.
13 १३ आणि माझ्या नावामुळे सर्वजण तुमचा द्वेष करतील, पण जो शेवटपर्यंत टिकेल तोच तारला जाईल.
Komail ap pan kalingaringarla pan aramas karos pweki ad ai. A me dadaurata lao imwi lel, a pan dorela.
14 १४ जेव्हा तुम्ही नाशाला कारण अशी भयंकर गोष्ट, दानीएल संदेष्ट्याने सांगितलेला ‘ओसाडीचा अमंगळ पदार्थ’ जो जिथे नको तेथे पाहाल. (वाचकाने याचा अर्थ काय तो समजावून घ्यावा) तेव्हा जे यहूदीया प्रांतात आहेत त्यांनी डोंगरांकडे पळून जावे.
Ni omail kilang wiawi sued en kao lapalap, me a pan wiaui wasa, me a so kon ong meamen wudok a en dedeki me mimi Iudäa, re en sopo wong nan nana ko.
15 १५ जो मनुष्य आपल्या घराच्या छतावर असेल त्याने घरातून काही आणण्यासाठी खाली उतरू नये.
O me mi pon im, depa kodido nan im; a depa pil pedelong ong lole, pwen ki sang meakot.
16 १६ आणि जर एखादा मनुष्य शेतात असेल तर त्याने आपला झगा आणण्यासाठी माघारी जाऊ नये.
O me mi nan sap, depa sapaledo ale a likau.
17 १७ त्या दिवसात ज्या स्त्रियांची मुले तान्ही असतील व अंगावर पाजत असतील त्यांच्यासाठी हे अती भयंकर होईल.
A pan non suede ong me lisean o ong ir, me kadidi ni ran oko.
18 १८ हे हिवाळ्यात होऊ नये म्हणून प्रार्थना करा.
Komail kapakapeki, pwe omail sapola de wiaui ni ansau en pou.
19 १९ कारण त्या दिवासात जो त्रास होईल तो देवाने जग निर्माण केले त्या आरंभापासून तो आजपर्यंत कधीही झाला नसेल व पुन्हा त्यासारखा कधीही होणार नाही, असा असेल.
Pwe ni ran oko kainsensued pan wiaui, me sota due sang ni tapin sappa, ni en Kot a kotin wiada kokodo kokolata.
20 २० परमेश्वराने जर ते दिवस कमी केले नसते तर कोणीही वाचला नसता. परंतु ज्यांना त्याने निवडले आहे अशा निवडलेल्या मनुष्यांसाठी ते दिवस त्याने कमी केले आहेत.
Ma Kaun o sota kotin kamotola ran oko, sota uduk, me pan dorela. A pweki me pilipildar akan, me a kotin piladar, iei me a kotin kamoto kila ran oko.
21 २१ आणि जर कोणी तुम्हास म्हणेल की ‘पाहा, ख्रिस्त येथे आहे किंवा तेथे आहे,’ तर त्यावर विश्वास ठेवू नका.
Ma meamen indai ong komail ni ansau o: Kilang, iet et Kristus! De ionen! Der kamelele.
22 २२ कारण काही लोक आपण खोटे ख्रिस्त किंवा खोटे संदेष्टे असल्याचा दावा करतील आणि शक्य झाले तर ते निवडलेल्या लोकांस फसवण्यासाठी चिन्हे व आश्चर्यकर्म करतील.
Pwe Kristus likam o saukop likam akai pan koda o re pan kasaleda kilel o manaman, pwen pil kotaue ir, me pilipildar akan ma re kak ong.
23 २३ पहा, तेव्हा तुम्ही सावध राहा. मी काळापूर्वीच तुम्हास सर्वकाही सांगून ठेवले आहे.
Komail ari kalaka! Pwe I kop ong komail er meakaros!
24 २४ परंतु त्या दिवसात ही संकटे येऊन गेल्यावर, ‘सूर्य अंधकारमय होईल, चंद्र प्रकाश देणार नाही.’
Ari, ni ran oko murin kainsensued katipin pan rotala, o maram pan solar lingan.
25 २५ ‘आकाशातून तारे पडतील आणि आकाशातील बळे डळमळतील.’
O usu en lang pan pupedi o kelail en lang akan pan mokimokid.
26 २६ आणि लोक मनुष्याचा पुत्राला मेघांरूढ होऊन मोठ्या सामर्थ्यानिशी आणि वैभवाने येताना पाहतील.
Ari, re ap pan kilang Nain aramas pan kotikot kodo nan dapok ni a roson melel o ni a lingan.
27 २७ नंतर तो आपल्या देवदूतास पाठवील व चार दिशातून, पृथ्वीच्या सीमेपासून ते आकाशाच्या सीमेपर्यंत त्याच्या निवडलेल्या लोकांस एकत्र करील.
A ap pan kadar pasang na tounlang kan, kapokon pena sang pali en lang paieu sapwilim a pilipildar akan, sang imwin sappa lel imwin lang.
28 २८ अंजिराच्या झाडापासून शिका. जेव्हा त्याच्या डहाळ्या कोमल होतात आणि त्यावर पाने फुटतात तेव्हा तुम्हास उन्हाळा जवळ आला हे समजते.
Komail en asa karaseras en tuka pik. Ni ra kan ar pons o pepe pwarado, komail kin asa, me rak korenier.
29 २९ त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा या गोष्टी घडताना पाहाल तेव्हा तुम्हास समजेल की, तो काळ अगदीच दाराशी येऊन ठेपला आहे.
O pil komail; ni omail kilang wiawia pukat a pan pwaida, komail en asa, me a korendor, a mier pan wanim.
30 ३० मी तुम्हास खरे सांगतो की, या सर्व गोष्टी घडण्यापूर्वी ही पिढी खात्रीने नाहीशी होणार नाही.
Melel, I indai ong komail: Di wet sota pan imwisokela, lao wiawia pukat pwaida.
31 ३१ स्वर्ग आणि पृथ्वी नाहीशी होतील पण माझी वचने नाहीशी होणारच नाहीत.
Lang o sappa pan soredi, a ai masan sota pan soredi.
32 ३२ त्या दिवसाविषयी किंवा त्या घटकेविषयी कोणालाही ठाऊक नाही. स्वर्गातील देवदूतांनाही नाही व पुत्रासही नाही. फक्त पित्याला ठाऊक आहे.
A duen ran o klok sota amen me asa. Tounlang kan, me mi lang, pil sota asa; Na pil so, Sam eta.
33 ३३ सावध असा, प्रार्थनेत जागृत असा कारण ती वेळ केव्हा येईल हे तुम्हास ठाऊक नाही.
Komail kalaka! Masamasan o kapakap! Pwe komail sasa ansau o!
34 ३४ ती वेळ अशी आहे की, एक मनुष्य प्रवासास निघते वेळी घर सोडतो आणि त्याच्या प्रत्येक नोकराला काम नेमून देतो. तो पहारेकऱ्यास जागरूक राहण्याची आज्ञा करतो. तसे हे आहे.
Due aramas amen, me wia sailok doo, me kidi im a, ap ki ong manaman ren a ladu kan, pil ki ong karos ar dodok, ap pil masani ong silepan wanim o, en masamasan.
35 ३५ म्हणून तुम्ही जागे असा, कारण घरधनी केव्हा येईल हे तुम्हास ठाऊक नाही. तो संध्याकाळी, मध्यरात्री, पहाटे कोंबडा आरवण्यापूर्वी किंवा सकाळी केव्हा येईल हे तुम्हास माहीत नाही.
Iei me komail en masamasaneki, pwe komail sasa ansau, saumas en im o a purodo, ma sautik, de ailep en pong, de ni malek kakorot, de ni mansang.
36 ३६ जर तो अचानक आला तर तुम्हास झोपेत असताना पाहील.
Pwe a depa madangedo, diarada omail mamair.
37 ३७ मी तुम्हास सांगतो, ते सर्वांना सांगतो, जागृत राहा.”
O me I indai ong komail, I pil indai ong karos, masamasan!