< मार्क 11 >
1 १ जेव्हा ते यरूशलेम शहराजवळ जैतुनांच्या डोंगराजवळ बेथफगे व बेथानी गावाजवळ आले तेव्हा येशूने आपल्या दोन शिष्यास असे सांगून पाठवले की,
As they approached Jerusalem, being come as far as Bethphage, and Bethany, near the Mount of Olives; he sent two of his disciples,
2 २ “समोरच्या गावात जा, गावात जाताच ज्याच्यावर कोणी बसले नाही असे शिंगरु बांधलेले आढळेल. ते सोडा व येथे आणा.
and said to them, Go into the village opposite you, and just as you enter it, you will find a colt tied, on which no man ever rode; loose him, and bring him.
3 ३ आणि जर कोणी तुम्हास विचारले, ‘तुम्ही हे का घेऊन जात आहात?’ तर तुम्ही असे म्हणा, ‘प्रभूला याची गरज आहे.’ व तो ते लगेच परत तेथे पाठवील.”
And if any person ask you, Wherefore do you this? say, The Master needs him, and he will instantly send him hither.
4 ४ मग ते निघाले आणि त्यांना रस्त्यावर, दाराशी एक शिंगरु बांधलेले आढळले मग त्यांनी ते सोडले.
Accordingly they went, and finding a colt tied before a door, where two ways met, they loosed him.
5 ५ तेथे उभे असलेल्या लोकांपैकी काहीजण त्यांना म्हणाले, “हे शिंगरु सोडून तुम्ही काय करीत आहात?”
Some of the people present said to them, Wherefore do you loose the colt?
6 ६ त्यांनी येशू त्यांना काय म्हणाला ते त्यांना सांगितले. तेव्हा त्या लोकांनी त्यास ते शिंगरु नेऊ दिले.
They having answered as Jesus had commanded them, were allowed to take him.
7 ७ त्यांनी ते शिंगरु येशूकडे आणले. त्यांनी आपली वस्त्रे त्याच्यावर पांघरली व येशू त्यावर बसला.
Accordingly they brought the colt to Jesus, on which having laid their mantles, he sat on him.
8 ८ पुष्कळ लोकांनी आपले झगे रस्त्यावर पसरले आणि इतरांनी शेतातून तोडलेल्या डहाळ्या पसरल्या.
And many spread their mantles in the way; others cut down sprays from the trees, and strowed them in the way.
9 ९ पुढे चालणारे व मागून येणारे घोषणा देऊ लागले, “होसान्ना, प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो.
And they who went before, and they who followed shouted, saying, Hosanna! blessed be He that comes in the name of the Lord!
10 १० आमचा पूर्वज दावीद याचे येणारे राज्य धन्यवादित असो. स्वर्गात होसान्ना.”
Happy be the approaching Reign of our Father David!
11 ११ नंतर येशूने यरूशलेम शहरात प्रवेश केल्यावर तो परमेश्वराच्या भवनात गेला व सभोवतालचे सर्व पाहिले. त्या सुमारास संध्याकाळ झाली होती म्हणून तो आपल्या बारा शिष्यांसह बेथानीस निघून गेला.
In this manner Jesus entered Jerusalem and the temple; where, after surveying everything around, it being late, he departed with the twelve to Bethany.
12 १२ दुसऱ्या दिवशी, ते बेथानीहून निघाल्यानंतर येशूला भूक लागली.
The next day, when he left Bethany, he was hungry;
13 १३ त्यास पानांनी भरलेले अंजिराचे एक झाड दुरून दिसले. त्यावर काही मिळेल या आशेने तो पाहावयास गेला पण तेथे त्यास पानांशिवाय काही आढळले नाही कारण तो अंजिराचा हंगाम नव्हता.
and observing a fig tree at a distance, full of leaves, went to look for fruit on it, for the fig harvest was not yet. And being come, he found nothing but leaves.
14 १४ नंतर तो त्यास म्हणाला, “यापुढे सर्वकाळ तुझे फळ कोणीही खाणार नाही.” त्याच्या शिष्यांनी हे ऐकले. (aiōn )
Then he said to it, Henceforth let no man ever eat fruit off you. And his disciples heard him. (aiōn )
15 १५ नंतर ते यरूशलेम शहरात गेले आणि येशू परमेश्वराच्या भवनात गेला तेव्हा भवनात जे खरेदी विक्रीचा व्यवहार करीत होते त्यांना येशू बाहेर घालवू लागला. त्याने सराफांचे चौरंग व जे कबुतरे विकत होते त्यांची बैठक उलथून टाकली.
Being returned to Jerusalem, he went into the temple, and drove out them who sold, and them who bought in the temple, and overturned the tables of the money changers, and the stalls of them who sold doves;
16 १६ त्याने कोणालाही कसल्याच वस्तूंची परमेश्वराच्या भवनामधून नेआण करू दिली नाही.
and would suffer no person to carry vessels through the temple.
17 १७ मग येशू शिकवू लागला. तो त्यांना म्हणाला, “माझ्या घराला सर्व राष्ट्रांचे प्रार्थनाभवन म्हणतील, असे पवित्र शास्त्रात लिहिले नाही काय? परंतु तुम्ही त्यास लुटारूंची गुहा बनवली आहे.”
He also taught them, saying, Is it not written, "My house shall be called a house of prayer for all nations?" but you have made it a den of robbers.
18 १८ मुख्य याजकांनी आणि नियमशास्त्राच्या शिक्षकांनी हे ऐकले आणि ते त्यास ठार मारण्याचा मार्ग शोधू लागले कारण सर्व लोक त्याच्या शिक्षणाने थक्क झाल्याने ते त्यास भीत होते.
And the scribes and the chief priests hearing this, sought means to destroy him; for they dreaded him, because all the multitude admired his doctrine.
19 १९ त्या रात्री येशू व त्याचे शिष्य शहराबाहेर गेले.
And in the evening he went out of the city.
20 २० सकाळी येशू आणि त्याचे शिष्य जात असता त्यांनी ते अंजिराचे झाड मुळापासून वाळून गेलेले पाहिले.
Next morning as they returned, they saw that the fig tree was dried up from the root.
21 २१ पेत्राला आठवण झाली. तो येशूला म्हणाला, “रब्बी, पाहा! ज्या अंजिराच्या झाडाला आपण शाप दिला ते वाळून गेले आहे.”
Peter recollecting, said to him, Rabbi, behold the fig tree, which you devoted, already withered.
22 २२ येशूने उत्तर दिले, “देवावर विश्वास ठेवा.
Jesus answered, Have faith in God.
23 २३ मी तुम्हास खरे सांगतो की, जो कोणी या डोंगराला ‘उपटून समुद्रात टाकाला जा’ असे म्हणेल व तो आपल्या मनात संशय धरणार नाही आपण जे म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरील तर त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल.
For indeed, I say to you, Whoever shall say to this mountain, Be lifted, and thrown into the sea, and shall not in the least doubt, but shall believe that what he says shall happen; whatever he shall command, shall be done for him;
24 २४ म्हणून मी तुम्हास सांगतो जे काही तुम्ही प्रार्थनेत मागाल ते मिळालेच आहे असा विश्वास धरा आणि ते तुम्हास मिळेल.
for which reason I assure you, that what things soever you pray for, if you believe that you shall obtain them, they shall be yours.
25 २५ जेव्हा तुम्ही प्रार्थना करीत उभे राहता तेव्हा तुमच्या मनात जर कोणाच्या विरुद्ध काही असेल तर त्याची क्षमा करा. यासाठी की, तुमच्या स्वर्गातील पित्याने तुमच्या पापांची क्षमा करावी.
And when you pray, forgive, if you have matter of complaint against any; that your Father, who is in heaven, may also forgive you your trespasses.
26 २६ परंतु तुम्ही जर क्षमा करणार नाही तर तुमचा स्वर्गातील पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही.”
But if you do not forgive, neither will your Father, who is in heaven, forgive your trespasses.
27 २७ ते परत यरूशलेम शहरास आले आणि येशू परमेश्वराच्या भवनात फिरत असता मुख्य याजक लोक, नियमशास्त्राचे शिक्षक आणि वडील त्याच्याकडे आले.
Again, they arrived at Jerusalem; and as he was walking in the temple, the chief priests, scribes, and the elders, came,
28 २८ आणि त्यास म्हणाले, “आपण कोणात्या अधिकाराने या गोष्टी करता? त्या करण्याचा अधिकार आपणास कोणी दिला?”
and said to him, By what authority do you these things? and who empowered you to do them?
29 २९ येशू त्यांना म्हणाला, “मीही तुम्हास एक प्रश्न विचारतो आणि जर तुम्ही मला त्याचे उत्तर दिले तर मी या गोष्टी कोणत्या अधिकाराने करतो हे तुम्हास सांगेन.
Jesus answering, said to them, I also have a question to ask; answer me, and I will tell you by what authority I do these things.
30 ३० योहानाचा बाप्तिस्मा स्वर्गातून होता की मनुष्यांपासून होता? याचे उत्तर द्या.”
Was the title which John had to immerse, from heaven, or from men? Answer me.
31 ३१ त्याविषयी त्यांनी आपसात चर्चा केली आणि म्हणू लागले जर आपण तो स्वर्गापासून म्हणावे तर तो म्हणेल, “मग त्यावर तुम्ही विश्वास का ठेवला नाही?
Then they argued thus among themselves; If we say, From heaven; he will reply, Why, then, did you not believe him?
32 ३२ परंतु जर आपण तो मनुष्यांपासून आहे असे म्हणावे तर लोक आपणावर रागवतील.” त्या लोकांची भीती वाटत होती कारण सर्व लोकांचा विश्वास होता की योहान खरोखर संदेष्टा होता.
But if we say, From men; we are in danger from the people, who are all convinced that John was a prophet.
33 ३३ मग त्यांनी येशूला उत्तर दिले, “आम्हास माहीत नाही.” तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “मग मीही या गोष्टी कोणात्या अधिकाराने करीत आहे हे तुम्हास सांगत नाही.”
They therefore answering, said to Jesus, We can not tell. Jesus replied, Neither do I tell you by what authority I do these things.