< मार्क 11 >

1 जेव्हा ते यरूशलेम शहराजवळ जैतुनांच्या डोंगराजवळ बेथफगे व बेथानी गावाजवळ आले तेव्हा येशूने आपल्या दोन शिष्यास असे सांगून पाठवले की,
Když se blížili k Jeruzalému a stoupali na Olivovou horu, uviděli Betfage a Betanii. Ježíš poslal dva ze svých učedníků napřed
2 “समोरच्या गावात जा, गावात जाताच ज्याच्यावर कोणी बसले नाही असे शिंगरु बांधलेले आढळेल. ते सोडा व येथे आणा.
a řekl jim: „Jděte do vesnice tamhle před námi. Na kraji vesnice uvidíte u plotu uvázané oslátko, na kterém ještě nikdo nejel. To mi přiveďte.
3 आणि जर कोणी तुम्हास विचारले, ‘तुम्ही हे का घेऊन जात आहात?’ तर तुम्ही असे म्हणा, ‘प्रभूला याची गरज आहे.’ व तो ते लगेच परत तेथे पाठवील.”
A kdyby se vás někdo ptal, co to děláte, odpovězte krátce: Pán ho potřebuje a brzy ho vrátí.“
4 मग ते निघाले आणि त्यांना रस्त्यावर, दाराशी एक शिंगरु बांधलेले आढळले मग त्यांनी ते सोडले.
Učedníci šli a skutečně našli u jednoho domu přivázané oslátko.
5 तेथे उभे असलेल्या लोकांपैकी काहीजण त्यांना म्हणाले, “हे शिंगरु सोडून तुम्ही काय करीत आहात?”
Když ho odvazovali, někteří z kolemjdoucích se ptali, proč to dělají.
6 त्यांनी येशू त्यांना काय म्हणाला ते त्यांना सांगितले. तेव्हा त्या लोकांनी त्यास ते शिंगरु नेऊ दिले.
Odpověděli tak, jak jim poradil Ježíš, a lidé je nechali zvíře odvést.
7 त्यांनी ते शिंगरु येशूकडे आणले. त्यांनी आपली वस्त्रे त्याच्यावर पांघरली व येशू त्यावर बसला.
Přivedli oslátko k Ježíšovi, přehodili přes ně své pláště, Ježíš se na ně posadil a vydali se na cestu.
8 पुष्कळ लोकांनी आपले झगे रस्त्यावर पसरले आणि इतरांनी शेतातून तोडलेल्या डहाळ्या पसरल्या.
Lidé ze zástupu, který ho provázel, se začali předhánět v pozornostech; prostírali před ním své pláště, jiní lámali větve a zdobili jimi cestu.
9 पुढे चालणारे व मागून येणारे घोषणा देऊ लागले, “होसान्ना, प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो.
Za ním i před ním se utvořil průvod a všichni volali: „Ať žije král! Sláva!
10 १० आमचा पूर्वज दावीद याचे येणारे राज्य धन्यवादित असो. स्वर्गात होसान्ना.”
Jde v Božím jménu! Ať žije Davidovo království! Nebe jásá s námi!“
11 ११ नंतर येशूने यरूशलेम शहरात प्रवेश केल्यावर तो परमेश्वराच्या भवनात गेला व सभोवतालचे सर्व पाहिले. त्या सुमारास संध्याकाळ झाली होती म्हणून तो आपल्या बारा शिष्यांसह बेथानीस निघून गेला.
Tak vstoupil Ježíš do Jeruzaléma a vešel do chrámu. Všechno si tam pozorně prohlédl, a protože byl již večer, odešel se svými dvanácti na noc do Betanie.
12 १२ दुसऱ्या दिवशी, ते बेथानीहून निघाल्यानंतर येशूला भूक लागली.
Druhý den cestou z Betanie dostal Ježíš hlad.
13 १३ त्यास पानांनी भरलेले अंजिराचे एक झाड दुरून दिसले. त्यावर काही मिळेल या आशेने तो पाहावयास गेला पण तेथे त्यास पानांशिवाय काही आढळले नाही कारण तो अंजिराचा हंगाम नव्हता.
Z dálky uviděl fíkovník obalený listím a šel se podívat, zda nemá nějaké ovoce. Když pak přišel až ke stromu, zjistil, že kromě listí na něm nic neroste; první úroda byla pryč a na novou strom ještě nenasadil.
14 १४ नंतर तो त्यास म्हणाला, “यापुढे सर्वकाळ तुझे फळ कोणीही खाणार नाही.” त्याच्या शिष्यांनी हे ऐकले. (aiōn g165)
Učedníci slyšeli, jak říká stromu: „Nikdo už z tebe nebude jíst ovoce!“ (aiōn g165)
15 १५ नंतर ते यरूशलेम शहरात गेले आणि येशू परमेश्वराच्या भवनात गेला तेव्हा भवनात जे खरेदी विक्रीचा व्यवहार करीत होते त्यांना येशू बाहेर घालवू लागला. त्याने सराफांचे चौरंग व जे कबुतरे विकत होते त्यांची बैठक उलथून टाकली.
Vrátili se do Jeruzaléma a Ježíš šel do chrámu. Když na nádvoří chrámu uviděl stánky s obětními zvířaty a pulty směnárníků, zpřevracel je a obchodníky vyhnal.
16 १६ त्याने कोणालाही कसल्याच वस्तूंची परमेश्वराच्या भवनामधून नेआण करू दिली नाही.
Nedovolil ani, aby si někdo tamtudy krátil cestu s vodou od studny.
17 १७ मग येशू शिकवू लागला. तो त्यांना म्हणाला, “माझ्या घराला सर्व राष्ट्रांचे प्रार्थनाभवन म्हणतील, असे पवित्र शास्त्रात लिहिले नाही काय? परंतु तुम्ही त्यास लुटारूंची गुहा बनवली आहे.”
„Cožpak nevíte, “horlil, „že je napsáno v Písmu: ‚Můj chrám je určen k tomu, aby se v něm všechny národy modlily?‘Vy jste však z něho udělali lupičské doupě.“
18 १८ मुख्य याजकांनी आणि नियमशास्त्राच्या शिक्षकांनी हे ऐकले आणि ते त्यास ठार मारण्याचा मार्ग शोधू लागले कारण सर्व लोक त्याच्या शिक्षणाने थक्क झाल्याने ते त्यास भीत होते.
Slyšeli to i velekněží a učitelé zákona a přemýšleli, jak by se Ježíše zbavili. Měli z něho strach, protože lid byl jeho učením nadšen.
19 १९ त्या रात्री येशू व त्याचे शिष्य शहराबाहेर गेले.
Večer Ježíš s učedníky opustil město.
20 २० सकाळी येशू आणि त्याचे शिष्य जात असता त्यांनी ते अंजिराचे झाड मुळापासून वाळून गेलेले पाहिले.
Když šli ráno zase kolem toho fíkovníku, viděli, že je úplně suchý.
21 २१ पेत्राला आठवण झाली. तो येशूला म्हणाला, “रब्बी, पाहा! ज्या अंजिराच्या झाडाला आपण शाप दिला ते वाळून गेले आहे.”
Petr si vzpomněl na včerejší příhodu. „Mistře, ten fíkovník, který jsi odsoudil, uschl!“
22 २२ येशूने उत्तर दिले, “देवावर विश्वास ठेवा.
„To vás překvapuje?“usmál se Ježíš. „Boží moc je daleko větší.
23 २३ मी तुम्हास खरे सांगतो की, जो कोणी या डोंगराला ‘उपटून समुद्रात टाकाला जा’ असे म्हणेल व तो आपल्या मनात संशय धरणार नाही आपण जे म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरील तर त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल.
Když budete věřit Bohu – a myslím to smrtelně vážně – a řekli byste této hoře: ‚Zvedni se a padni do moře, ‘ta hora to udělá. Musíte jen věřit bez nejmenší pochybnosti.
24 २४ म्हणून मी तुम्हास सांगतो जे काही तुम्ही प्रार्थनेत मागाल ते मिळालेच आहे असा विश्वास धरा आणि ते तुम्हास मिळेल.
Pamatujte si: budete-li za něco prosit ve svých modlitbách s pevnou vírou, že vaše prosba bude naplněna, pak se tak určitě stane.
25 २५ जेव्हा तुम्ही प्रार्थना करीत उभे राहता तेव्हा तुमच्या मनात जर कोणाच्या विरुद्ध काही असेल तर त्याची क्षमा करा. यासाठी की, तुमच्या स्वर्गातील पित्याने तुमच्या पापांची क्षमा करावी.
Ale když se modlíte, odpusťte nejdříve tomu, proti komu něco máte, aby i váš nebeský Otec mohl odpustit vám.
26 २६ परंतु तुम्ही जर क्षमा करणार नाही तर तुमचा स्वर्गातील पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही.”
Jestliže ve vás zůstane hněv, ani Bůh vám nepromine vaše provinění.“
27 २७ ते परत यरूशलेम शहरास आले आणि येशू परमेश्वराच्या भवनात फिरत असता मुख्य याजक लोक, नियमशास्त्राचे शिक्षक आणि वडील त्याच्याकडे आले.
Přišli zase do Jeruzaléma. Když Ježíš procházel chrámem, zastavili ho zástupci představenstva chrámu
28 २८ आणि त्यास म्हणाले, “आपण कोणात्या अधिकाराने या गोष्टी करता? त्या करण्याचा अधिकार आपणास कोणी दिला?”
„Od koho máš pověření k takovým činům? Kdo tě k tomu zmocnil?“
29 २९ येशू त्यांना म्हणाला, “मीही तुम्हास एक प्रश्न विचारतो आणि जर तुम्ही मला त्याचे उत्तर दिले तर मी या गोष्टी कोणत्या अधिकाराने करतो हे तुम्हास सांगेन.
„Já se vás také zeptám na jednu věc, “opáčil Ježíš. „Když mi odpovíte, řeknu i já, od koho mám tu moc.
30 ३० योहानाचा बाप्तिस्मा स्वर्गातून होता की मनुष्यांपासून होता? याचे उत्तर द्या.”
Povězte mi: Byl Jan Křtitel skutečně poslán od Boha, nebo si to vymyslel?“
31 ३१ त्याविषयी त्यांनी आपसात चर्चा केली आणि म्हणू लागले जर आपण तो स्वर्गापासून म्हणावे तर तो म्हणेल, “मग त्यावर तुम्ही विश्वास का ठेवला नाही?
Dali hlavy dohromady: „Odpovíme-li, že od Boha, pak nám řekne, proč jsme mu tedy neuvěřili.
32 ३२ परंतु जर आपण तो मनुष्यांपासून आहे असे म्हणावे तर लोक आपणावर रागवतील.” त्या लोकांची भीती वाटत होती कारण सर्व लोकांचा विश्वास होता की योहान खरोखर संदेष्टा होता.
A před lidmi zase nemůžeme Jana prohlásit za obyčejného fanatika. Vždyť jsou všichni přesvědčeni, že to byl Boží prorok.“
33 ३३ मग त्यांनी येशूला उत्तर दिले, “आम्हास माहीत नाही.” तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “मग मीही या गोष्टी कोणात्या अधिकाराने करीत आहे हे तुम्हास सांगत नाही.”
A tak odpověděli Ježíšovi: „Nevíme!“„Ani já vám tedy nepovím, od koho mám pověření, “odtušil Ježíš.

< मार्क 11 >