< मार्क 1 >

1 देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या शुभवर्तमानाची ही सुरूवात आहे.
Ten jest początek Ewangielii Jezusa Chrystusa, Syna Bożego.
2 यशया संदेष्ट्याच्या ग्रंथात लिहिल्याप्रमाणे, “पाहा, मी माझ्या दूताला तुझ्यापुढे पाठवतो, तो तुझ्यासाठी मार्ग तयार करील;
Jako napisano w prorokach: Oto Ja posyłam Anioła mego przed obliczem twojem, który zgotuje drogę twoję przed tobą.
3 अरण्यांत घोषणा करणाऱ्याची वाणी झाली, ‘परमेश्वराचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा सरळ करा.’”
Głos wołającego na puszczy: Gotujcie drogę Pańską, proste czyńcie ścieżki jego.
4 त्याप्रमाणेच योहान आला, तो अरण्यांत बाप्तिस्मा देत होता आणि पापांच्या क्षमेसाठी पश्चात्तापाच्या बाप्तिस्म्याची घोषणा करीत होता.
Jan chrzcił na puszczy, i kazał chrzest pokuty na odpuszczenie grzechów.
5 यहूदीया प्रांत व यरूशलेम शहरातील सर्व लोक योहानाकडे आले. त्यांनी आपली पापे कबूल करून त्याच्यापासून यार्देन नदीत बाप्तिस्मा घेतला.
I wychodziła do niego wszystka kraina Judzka, i Jeruzalemczycy, a wszyscy byli od niego chrzczeni w rzece Jordanie, wyznawając grzechy swoje.
6 योहान उंटाच्या केसांपासून बनवलेली वस्त्रे घालीत असे. त्याच्या कंबरेला कातड्याचा पट्टा होता व तो टोळ व रानमध खात असे.
Ale Jan przyodziany był sierścią wielbłądową, a pas skórzany był około biódr jego, a jadał szarańczę i miód leśny.
7 तो घोषणा करून म्हणत असे, “माझ्यापेक्षाही महान असा कोणीएक माझ्यामागून येत आहे आणि मी त्याच्या वहाणांचा बंद खाली वाकून लवून सोडण्याच्या देखील पात्रतेचा नाही.
I kazał, mówiąc: Idzie za mną możniejszy niżeli ja, któremum nie jest godzien, schyliwszy się, rozwiązać rzemyka u obuwia jego.
8 मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो पण तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करील.”
Jamci was chrzcił wodą; ale on was będzie chrzcił Duchem Świętym.
9 त्या दिवसात असे झाले की, येशू गालील प्रांतातील नासरेथ नगराहून आला आणि योहानाच्या हातून यार्देन नदीत येशूने बाप्तिस्मा घेतला.
I stało się w one dni, że przyszedł Jezus z Nazaretu Galilejskiego, a ochrzczony jest od Jana w Jordanie.
10 १० येशू पाण्यातून वर येताना, आकाश उघडलेले आणि पवित्र आत्मा त्याच्यावर कबुतरासारखा उतरत आहे, असे त्यास दिसले.
A zarazem wystąpiwszy z wody, ujrzał rozstępujące się niebiosa, i Ducha jako gołębicę na niego zstępującego.
11 ११ तेव्हा आकाशातून वाणी झाली की, “तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे.”
I stał się głos z nieba: Tyś jest on Syn mój miły, w którym mi się upodobało.
12 १२ मग आत्म्याने लगेचच त्यास अरण्यांत घालवले.
A zaraz Duch wypędził go na puszczą.
13 १३ सैतान त्याची परीक्षा पाहत असता तो अरण्यांत चाळीस दिवस राहीला. तो वनपशूंमध्ये होता. आणि देवदूत येऊन त्याची सेवा करीत होते.
I był tam na puszczy przez czterdzieści dni, będąc kuszony od szatana, a był z zwierzęty, a Aniołowie służyli mu.
14 १४ योहानाला अटक झाल्यानंतर, येशू गालील प्रांतास आला व देवाकडून आलेली सुवार्ता त्याने गाजवली.
Lecz potem, gdy Jan był podany do więzienia, przyszedł Jezus do Galilei, każąc Ewangieliję królestwa Bożego,
15 १५ तो म्हणाला, “आता योग्य वेळ आली आहे, देवाचे राज्य जवळ आले आहे, पश्चात्ताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा.”
A mówiąc: Wypełnił się czas i przybliżyło się królestwo Boże: Pokutujcie, a wierzcie Ewangielii.
16 १६ येशू गालीलच्या सरोवराजवळून जात असता त्यास शिमोन व शिमोनाचा भाऊ अंद्रिया हे सरोवरात जाळे टाकताना दिसले, कारण ते मासे धरणारे होते.
A przechodząc się nad morzem Galilejskiem, ujrzał Szymona i Andrzeja, brata jego, zapuszczających sieć w morze; bo byli rybitwi.
17 १७ येशू त्यांना म्हणाला, “माझ्यामागे या म्हणजे मी तुम्हास माणसे धरणारे करीन.”
I rzekł im Jezus: Pójdźcie za mną, a uczynię was rybitwami ludzi.
18 १८ मग ते लगेचच जाळी सोडून त्याच्यामागे चालू लागले.
A oni zarazem opuściwszy sieci swoje, poszli za nim.
19 १९ तेथून काहीसे पुढे गेल्यावर येशूला जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान हे तारवात जाळे नीट करताना दिसले.
A stamtąd troszeczkę odszedłszy, ujrzał Jakóba, syna Zebedeuszowego, i Jana, brata jego, a oni w łodzi poprawiali sieci.
20 २० त्याने लगेच त्यांना हाक मारून बोलावले; मग ते त्यांचा पिता जब्दी व नोकरचाकर यांना तारवात सोडून त्याच्यामागे गेले.
I zaraz ich powołał; a oni zostawiwszy ojca swego Zebedeusza w łodzi z czeladzią, poszli za nim.
21 २१ नंतर येशू आणि त्याचे शिष्य कफर्णहूम नगरास गेले, आणि लगेचच येशूने शब्बाथ दिवशी सभास्थानात जाऊन शिक्षण दिले.
Potem weszli do Kapernaum; a zaraz w sabat wszedłszy Jezus do bóżnicy, nauczał.
22 २२ त्याच्या शिकवणुकीने ते चकित झाले, कारण येशू नियमशास्त्राच्या शिक्षकांप्रमाणे शिकवीत नव्हता, तर त्यास अधिकार असल्यासारखा शिकवीत होता.
I zdumiewali się nad nauką jego; albowiem on ich uczył jako mający moc, a nie jako nauczeni w Piśmie.
23 २३ त्याचवेळी त्यांच्या सभास्थानात अशुद्ध आत्मा लागलेला एक मनुष्य होता, तो एकदम मोठ्याने ओरडला,
A był w bóżnicy ich człowiek mający ducha nieczystego, który zawołał,
24 २४ आणि म्हणाला, “नासरेथच्या येशू, तू आमच्यामध्ये का पडतोस? तू आमचा नाश करावयास आला आहेस काय? तू कोण आहेस हे मला माहीत आहे, जो देवाचा पवित्र तो तूच.”
Mówiąc: Ach! cóż my z tobą mamy, Jezusie Nazareński? Przyszedłeś, abyś nas wytracił. Znam cię, ktoś jest, żeś on święty Boży.
25 २५ परंतु येशूने त्यास धमकावून म्हटले, “शांत राहा व याच्यातून नीघ.”
I zgromił go Jezus, mówiąc: Umilknij, a wynijdź z niego.
26 २६ “नंतर अशुद्ध आत्म्याने त्यास पिळले व तो मोठ्याने ओरडून त्याच्यातून बाहेर निघून गेला.”
Tedy rozdarłszy go duch nieczysty i zawoławszy głosem wielkim, wyszedł z niego.
27 २७ लोक आश्चर्यचकित झाले व एकमेकांस विचारू लागले, “येथे काय चालले आहे? हा मनुष्य काहीतरी नवीन आणि अधिकाराने शिकवीत आहे. तो अशुद्ध आत्म्यांनाही आज्ञा करतो आणि ते त्याचे ऐकतात!”
I wylękli się wszyscy, tak iż się pytali między sobą, mówiąc: Cóż to jest? cóż to za nowa nauka, iż mocą i duchom nieczystym rozkazuje, i są mu posłuszni?
28 २८ येशूविषयीची ही बातमी ताबडतोब गालील प्रांतात सर्वत्र पसरली.
I rozeszła się powieść o nim prędko po wszystkiej krainie, leżącej około Galilei.
29 २९ येशू व त्याच्या शिष्यांनी सभास्थान सोडले आणि लगेच तो योहान व याकोब यांच्याबरोबर शिमोन व अंद्रिया यांच्या घरी गेला.
A wyszedłszy zaraz z bóżnicy, przyszli do domu Szymonowego i Andrzejowego z Jakóbem i z Janem.
30 ३० शिमोनाची सासू तापाने बिछान्यावर पडली होती. तेव्हा त्यांनी ताबडतोब येशूला तिच्याविषयी सांगितले.
A świekra Szymonowa leżała, mając gorączkę, o której mu wnet powiedzieli.
31 ३१ तेव्हा त्याने जवळ जाऊन तिच्या हाताला धरून तिला उठवले आणि तिचा ताप निघून गेला व ती त्यांची सेवा करू लागली.
Tedy przystąpiwszy podniósł ją, ująwszy ją za rękę jej; a zaraz ją gorączka opuściła, i posługowała im.
32 ३२ संध्याकाळी म्हणजे सूर्यास्त झाल्यावर लोकांनी सर्व आजारी आणि भूतांनी पछाडलेल्यास त्याच्याकडे आणले.
A gdy był wieczór i słońce zachodziło, przynosili do niego wszystkie, którzy się źle mieli, i opętane;
33 ३३ सर्व नगर दरवाजापुढे जमा झाले.
A wszystko miasto zgromadziło się do drzwi.
34 ३४ त्याने निरनिराळ्या रोगांनी आजारी असलेल्यांना बरे केले व अनेक लोकांतून भूते काढली. पण त्याने भूतांना बोलू दिले नाही कारण ती त्यास ओळखत होती.
I uzdrowił wiele tych, co się źle mieli na rozliczne choroby, i wygnał wiele dyjabłów, a nie dopuścił mówić dyjabłom; bo go znali.
35 ३५ मग त्याने अगदी पहाटेस अंधार असतानाच घर सोडले आणि एकांत स्थळी जाऊन तेथे त्याने प्रार्थना केली.
A bardzo rano przede dniem wstawszy, wyszedł i odszedł na puste miejsce, a tam się modlił.
36 ३६ शिमोन व त्याच्यासोबत असलेले येशूचा शोध करीत होते,
I poszli za nim Szymon i ci, którzy z nim byli;
37 ३७ व तो सापडल्यावर ते त्यास म्हणाले, गुरूजी “आम्ही सर्वजण तुमचा शोध करीत आहोत.”
A znalazłszy go, rzekli mu: Wszyscy cię szukają.
38 ३८ तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “आपण जवळपासच्या गावात जाऊ या, म्हणजे मला तेथे देखील उपदेश करता यावा म्हणून आपण दुसरीकडे जाऊ कारण त्यासाठीच मी निघून आलो आहे.”
Tedy im on rzekł: Idźmy do przyległych miasteczek, abym i tam kazał; bom na to przyszedł.
39 ३९ मग तो सर्व गालील प्रांतातून, त्यांच्या सभास्थानातून उपदेश करीत आणि भूते काढीत फिरला.
I kazał w bóżnicach ich po wszystkiej Galilei, i wyganiał dyjabły.
40 ४० एक कुष्ठरोगी येशूकडे आला व त्याच्यापुढे गुडघे टेकून त्याने स्वतःला बरे करण्याची त्यास विनंती केली. तो येशूला म्हणाला, “आपली इच्छा असली तर मला शुद्ध करण्यास आपण समर्थ आहात.”
Tedy przyszedł do niego trędowaty, prosząc go i upadając przed nim na kolana, i mówiąc mu: Jeźli chcesz, możesz mię oczyścić.
41 ४१ येशूला त्याचा कळवळा आला, त्याने हात पुढे करून त्यास स्पर्श केला व म्हटले, “माझी इच्छा आहे, शुद्ध हो.”
A tak Jezus użaliwszy się, wyciągnął rękę, a dotknął się go i rzekł mu: Chcę, bądź oczyszczony!
42 ४२ आणि लगेच त्याचे कुष्ठ गेले व तो शुद्ध झाला.
A gdy to Pan rzekł, zarazem odszedł trąd od niego, i był oczyszczony.
43 ४३ येशूने त्यास सक्त ताकीद दिली व लगेच लावून दिले.
A srodze mu przygroziwszy Jezus, zaraz go odprawił;
44 ४४ आणि म्हटले, “पाहा, याविषयी कोणाला काहीही सांगू नकोस, तर जाऊन स्वतःला याजकाला दाखव आणि त्यांना साक्ष व्हावी म्हणून तू आपल्या शुद्धीकरता मोशेने नेमलेले अर्पण कर.”
I rzekł mu: Patrz, abyś nikomu nic nie powiadał, ale idź, a ukaż się kapłanowi, i ofiaruj za oczyszczenie twoje to, co rozkazał Mojżesz, na świadectwo przeciwko nim.
45 ४५ परंतु तो तेथून गेला व घोषणा करून ही बातमी इतकी पसरवली की येशूला उघडपणे शहरात जाता येईना, म्हणून तो बाहेर अरण्यातच राहिला आणि तरी चोहोबाजूंनी लोक त्याच्याकडे येत राहण्याचे थांबले नाही.
Ale on odszedłszy, począł wiele opowiadać i rozsławiać tę rzecz, tak iż już nie mógł Jezus jawnie wnijść do miasta, ale był na ustroniu na miejscach pustych. I schodzili się do niego zewsząd.

< मार्क 1 >