< मार्क 1 >
1 १ देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या शुभवर्तमानाची ही सुरूवात आहे.
Jézus Krisztus, az Isten Fia evangéliumának kezdete,
2 २ यशया संदेष्ट्याच्या ग्रंथात लिहिल्याप्रमाणे, “पाहा, मी माझ्या दूताला तुझ्यापुढे पाठवतो, तो तुझ्यासाठी मार्ग तयार करील;
amint meg van írva a prófétáknál: „Íme, elküldöm az én követemet a te orcád előtt, aki elkészíti az utadat előtted;
3 ३ अरण्यांत घोषणा करणाऱ्याची वाणी झाली, ‘परमेश्वराचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा सरळ करा.’”
kiáltó szava szól a pusztában: Készítsétek az Úrnak útját, egyengessétek ösvényeit!“
4 ४ त्याप्रमाणेच योहान आला, तो अरण्यांत बाप्तिस्मा देत होता आणि पापांच्या क्षमेसाठी पश्चात्तापाच्या बाप्तिस्म्याची घोषणा करीत होता.
János pedig előállt, és keresztelt a pusztában, prédikálva a megtérés keresztségét a bűnöknek bocsánatára.
5 ५ यहूदीया प्रांत व यरूशलेम शहरातील सर्व लोक योहानाकडे आले. त्यांनी आपली पापे कबूल करून त्याच्यापासून यार्देन नदीत बाप्तिस्मा घेतला.
És kiment hozzá Júdea egész tartománya és a jeruzsálembeliek is, és bűneikről vallást téve megkeresztelkedtek mindnyájan a Jordán vizében.
6 ६ योहान उंटाच्या केसांपासून बनवलेली वस्त्रे घालीत असे. त्याच्या कंबरेला कातड्याचा पट्टा होता व तो टोळ व रानमध खात असे.
János pedig teveszőr ruhát és dereka körül bőrövet viselt, és sáskát és erdei mézet evett,
7 ७ तो घोषणा करून म्हणत असे, “माझ्यापेक्षाही महान असा कोणीएक माझ्यामागून येत आहे आणि मी त्याच्या वहाणांचा बंद खाली वाकून लवून सोडण्याच्या देखील पात्रतेचा नाही.
és ezt prédikálta: „Utánam jön, aki erősebb nálam, akinek nem vagyok méltó, hogy lehajolva sarujának szíját megoldjam.
8 ८ मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो पण तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करील.”
Én vízzel kereszteltelek meg titeket, de ő Szentlélekkel keresztel meg titeket.“
9 ९ त्या दिवसात असे झाले की, येशू गालील प्रांतातील नासरेथ नगराहून आला आणि योहानाच्या हातून यार्देन नदीत येशूने बाप्तिस्मा घेतला.
Történt pedig azokban a napokban, hogy eljött Jézus a galileai Názáretből, és megkeresztelte őt János a Jordánban.
10 १० येशू पाण्यातून वर येताना, आकाश उघडलेले आणि पवित्र आत्मा त्याच्यावर कबुतरासारखा उतरत आहे, असे त्यास दिसले.
És amikor feljött a vízből, látta az eget megnyílni, és a Lelket, mint egy galambot őreá leszállani;
11 ११ तेव्हा आकाशातून वाणी झाली की, “तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे.”
és szózat szólt az égből: „Te vagy az én szeretett Fiam, akiben én gyönyörködöm.“
12 १२ मग आत्म्याने लगेचच त्यास अरण्यांत घालवले.
A Lélek pedig azonnal elragadta őt a pusztába.
13 १३ सैतान त्याची परीक्षा पाहत असता तो अरण्यांत चाळीस दिवस राहीला. तो वनपशूंमध्ये होता. आणि देवदूत येऊन त्याची सेवा करीत होते.
És negyven napig volt a pusztában, miközben kísértette a Sátán. Vadállatokkal volt együtt; és az angyalok szolgáltak neki.
14 १४ योहानाला अटक झाल्यानंतर, येशू गालील प्रांतास आला व देवाकडून आलेली सुवार्ता त्याने गाजवली.
Miután pedig Jánost tömlöcbe vetették, elment Jézus Galileába, és prédikálta az Isten országának evangéliumát, ezt mondván:
15 १५ तो म्हणाला, “आता योग्य वेळ आली आहे, देवाचे राज्य जवळ आले आहे, पश्चात्ताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा.”
„Betelt az idő, és elközelített az Istennek országa: térjetek meg, és higgyetek az evangéliumban.“
16 १६ येशू गालीलच्या सरोवराजवळून जात असता त्यास शिमोन व शिमोनाचा भाऊ अंद्रिया हे सरोवरात जाळे टाकताना दिसले, कारण ते मासे धरणारे होते.
Amikor pedig a Galileai-tenger mellett járt, látta Simont és az ő testvérét Andrást, amint a tengerbe hálót vetettek, mert halászok voltak;
17 १७ येशू त्यांना म्हणाला, “माझ्यामागे या म्हणजे मी तुम्हास माणसे धरणारे करीन.”
és ezt mondta nekik Jézus: „Kövessetek engem, és én azt teszem, hogy embereket halásszatok.“
18 १८ मग ते लगेचच जाळी सोडून त्याच्यामागे चालू लागले.
Erre azonnal elhagyva a hálóikat, követték őt.
19 १९ तेथून काहीसे पुढे गेल्यावर येशूला जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान हे तारवात जाळे नीट करताना दिसले.
És onnan egy kevéssé előbbre menve, látta Jakabot, a Zebedeus fiát és annak testvérét, Jánost, amint a hajóban azok is a hálókat kötözgették;
20 २० त्याने लगेच त्यांना हाक मारून बोलावले; मग ते त्यांचा पिता जब्दी व नोकरचाकर यांना तारवात सोडून त्याच्यामागे गेले.
és azonnal elhívta őket. Ők pedig atyjukat, Zebedeust a napszámosokkal a hajóban hagyva, elmentek őutána.
21 २१ नंतर येशू आणि त्याचे शिष्य कफर्णहूम नगरास गेले, आणि लगेचच येशूने शब्बाथ दिवशी सभास्थानात जाऊन शिक्षण दिले.
Ezután bementek Kapernaumba. És mindjárt szombaton bement a zsinagógába, és tanított.
22 २२ त्याच्या शिकवणुकीने ते चकित झाले, कारण येशू नियमशास्त्राच्या शिक्षकांप्रमाणे शिकवीत नव्हता, तर त्यास अधिकार असल्यासारखा शिकवीत होता.
Elálmélkodtak a tanításán, mert úgy tanította őket, mint akinek hatalma van, és nem úgy, mint az írástudók.
23 २३ त्याचवेळी त्यांच्या सभास्थानात अशुद्ध आत्मा लागलेला एक मनुष्य होता, तो एकदम मोठ्याने ओरडला,
Azok zsinagógájában pedig volt egy ember, akiben tisztátalan lélek volt, és így kiáltott fel:
24 २४ आणि म्हणाला, “नासरेथच्या येशू, तू आमच्यामध्ये का पडतोस? तू आमचा नाश करावयास आला आहेस काय? तू कोण आहेस हे मला माहीत आहे, जो देवाचा पवित्र तो तूच.”
„Ah! Mi dolgunk van nekünk veled, Názáreti Jézus? Azért jöttél-e, hogy elveszíts minket? Tudom, hogy ki vagy te: az Istennek Szentje.“
25 २५ परंतु येशूने त्यास धमकावून म्हटले, “शांत राहा व याच्यातून नीघ.”
Jézus megdorgálta őt, és ezt mondta neki: „Némulj meg, és menj ki belőle!“
26 २६ “नंतर अशुद्ध आत्म्याने त्यास पिळले व तो मोठ्याने ओरडून त्याच्यातून बाहेर निघून गेला.”
A tisztátalan lélek megszaggatta őt, és hangosan kiáltott, és kiment belőle.
27 २७ लोक आश्चर्यचकित झाले व एकमेकांस विचारू लागले, “येथे काय चालले आहे? हा मनुष्य काहीतरी नवीन आणि अधिकाराने शिकवीत आहे. तो अशुद्ध आत्म्यांनाही आज्ञा करतो आणि ते त्याचे ऐकतात!”
Mindnyájan annyira elálmélkodtak, hogy egymás között ezt kérdezgették: „Mi ez? Micsoda új tudomány ez, hogy hatalommal parancsol a tisztátalan lelkeknek is, és azok engedelmeskednek neki?“
28 २८ येशूविषयीची ही बातमी ताबडतोब गालील प्रांतात सर्वत्र पसरली.
És azonnal az ő híre elterjedt Galilea egész környékén.
29 २९ येशू व त्याच्या शिष्यांनी सभास्थान सोडले आणि लगेच तो योहान व याकोब यांच्याबरोबर शिमोन व अंद्रिया यांच्या घरी गेला.
Ezután azonnal kimentek a zsinagógából, és Simon és András házához mentek Jakabbal és Jánossal együtt.
30 ३० शिमोनाची सासू तापाने बिछान्यावर पडली होती. तेव्हा त्यांनी ताबडतोब येशूला तिच्याविषयी सांगितले.
Simon anyósa pedig lázasan feküdt, és azonnal szóltak Jézusnak felőle.
31 ३१ तेव्हा त्याने जवळ जाऊन तिच्या हाताला धरून तिला उठवले आणि तिचा ताप निघून गेला व ती त्यांची सेवा करू लागली.
És ő odamenve, megfogta a kezét, és fölemelte, úgyhogy a láz azonnal elhagyta őt, és szolgált nekik.
32 ३२ संध्याकाळी म्हणजे सूर्यास्त झाल्यावर लोकांनी सर्व आजारी आणि भूतांनी पछाडलेल्यास त्याच्याकडे आणले.
Estefelé pedig, amikor leszállt a nap, mind őhozzá vitték a betegeket és az ördöngösöket;
33 ३३ सर्व नगर दरवाजापुढे जमा झाले.
és az egész város összegyűlt az ajtó előtt.
34 ३४ त्याने निरनिराळ्या रोगांनी आजारी असलेल्यांना बरे केले व अनेक लोकांतून भूते काढली. पण त्याने भूतांना बोलू दिले नाही कारण ती त्यास ओळखत होती.
És meggyógyított sokakat, akik különféle betegségekben sínylődtek; sok ördögöt kiűzött, és nem hagyta szólni az ördögöket, mivelhogy őt ismerték.
35 ३५ मग त्याने अगदी पहाटेस अंधार असतानाच घर सोडले आणि एकांत स्थळी जाऊन तेथे त्याने प्रार्थना केली.
Kora reggel pedig, még szürkületkor, fölkelt, kiment, és elment egy puszta helyre, és ott imádkozott.
36 ३६ शिमोन व त्याच्यासोबत असलेले येशूचा शोध करीत होते,
Simon pedig és a vele lévők utána siettek;
37 ३७ व तो सापडल्यावर ते त्यास म्हणाले, गुरूजी “आम्ही सर्वजण तुमचा शोध करीत आहोत.”
és amikor megtalálták őt, ezt mondták neki: „Mindenki téged keres.“
38 ३८ तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “आपण जवळपासच्या गावात जाऊ या, म्हणजे मला तेथे देखील उपदेश करता यावा म्हणून आपण दुसरीकडे जाऊ कारण त्यासाठीच मी निघून आलो आहे.”
Ő pedig ezt mondta nekik: „Menjünk a közeli városokba, hogy ott is prédikáljak, mert azért jöttem.“
39 ३९ मग तो सर्व गालील प्रांतातून, त्यांच्या सभास्थानातून उपदेश करीत आणि भूते काढीत फिरला.
És prédikált a zsinagógákban, egész Galileában, és ördögöket űzött ki.
40 ४० एक कुष्ठरोगी येशूकडे आला व त्याच्यापुढे गुडघे टेकून त्याने स्वतःला बरे करण्याची त्यास विनंती केली. तो येशूला म्हणाला, “आपली इच्छा असली तर मला शुद्ध करण्यास आपण समर्थ आहात.”
És jött hozzá egy bélpoklos, kérve és leborulva előtte, ezt mondta neki: „Ha akarod, megtisztíthatsz engem.“
41 ४१ येशूला त्याचा कळवळा आला, त्याने हात पुढे करून त्यास स्पर्श केला व म्हटले, “माझी इच्छा आहे, शुद्ध हो.”
Jézus pedig könyörületességre indulva, kezét kinyújtva megérintette őt, és mondta néki: „Akarom, tisztulj meg.“
42 ४२ आणि लगेच त्याचे कुष्ठ गेले व तो शुद्ध झाला.
És amint ezt mondta, azonnal eltávozott tőle a poklosság, és megtisztult.
43 ४३ येशूने त्यास सक्त ताकीद दिली व लगेच लावून दिले.
És erősen megfenyegetve, azonnal elküldte őt,
44 ४४ आणि म्हटले, “पाहा, याविषयी कोणाला काहीही सांगू नकोस, तर जाऊन स्वतःला याजकाला दाखव आणि त्यांना साक्ष व्हावी म्हणून तू आपल्या शुद्धीकरता मोशेने नेमलेले अर्पण कर.”
és mondta néki: „Vigyázz, hogy senkinek semmit ne szólj, hanem eredj el, mutasd meg magadat a papnak, és vidd fel a te tisztulásodért, amit Mózes parancsolt, bizonyságul nékik!“
45 ४५ परंतु तो तेथून गेला व घोषणा करून ही बातमी इतकी पसरवली की येशूला उघडपणे शहरात जाता येईना, म्हणून तो बाहेर अरण्यातच राहिला आणि तरी चोहोबाजूंनी लोक त्याच्याकडे येत राहण्याचे थांबले नाही.
Az pedig kiment, és elkezdte mindenfelé beszélni, és terjeszteni az esetet, annyira, hogy nyilvánosan immár be sem mehetett Jézus a városba, hanem kinn a puszta helyeken volt, és oda mentek hozzá mindenfelől.