< मलाखी 4 >

1 “कारण पाहा, तो दिवस येत आहे, तो भट्टीसारखा जळतो, आणि सर्व गर्विष्ठ आणि प्रत्येक दुष्ट धसकट बनतील. येणारा दिवस त्यांना जाळून टाकील, म्हणजे एकही फांदी किंवा मूळ शिल्लक ठेवले जाणार नाही.” सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो.
Car voici, le jour vient; ardent comme un four; tous les orgueilleux, et tous les méchants seront [comme] du chaume, et ce jour qui vient, a dit l'Eternel des armées, les embrasera, et ne leur laissera ni racine, ni rameau.
2 “परंतु जे तुम्ही माझ्या नावाचे भय धरता त्या तुम्हासाठी न्यायीपणाचा सूर्य उगवेल. आणि त्याच्या पंखात निरोगी करण्याचा उपाय आहे. मग तुम्ही गोठ्यातून सुटलेल्या वासरांप्रमाणे, मुक्त व आनंदी व्हाल.
Mais pour vous qui craignez mon Nom, se lèvera le Soleil de justice, et la santé sera dans ses rayons; vous sortirez, et vous acquerrez de l'embonpoint comme de jeunes bœufs que l'on engraisse.
3 तुम्ही दुष्टांना तुडवाल, कारण मी हे करीन त्या दिवशी ते तुमच्या तळपायाखाली राख होतील.” सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो.
Et vous foulerez les méchants; car ils seront [comme] de la cendre sous les plantes de vos pieds, au jour que je ferai mon œuvre, a dit l'Eternel des armées.
4 “मोशे जो माझा सेवक होता त्यास होरेबात सर्व इस्राएलासाठी जे नियमशास्त्र मी आज्ञापिले ते, म्हणजे नियम व न्यायही तुम्ही आठवा.”
Souvenez-vous de la Loi de Moïse mon serviteur, à qui je donnai en Horeb pour tout Israël des statuts et des jugements.
5 “पाहा, परमेश्वराचा मोठा व भयंकर दिवस येईल त्यापूर्वी मी एलीया संदेष्ट्याला तुमच्याकडे पाठवीन. देवाच्या न्यायदानाच्या भयंकर मोठ्या वेळेपूर्वी तो येईल.
Voici, je m'en vais vous envoyer Elie le Prophète, avant que le jour grand et terrible de l'Eternel vienne.
6 आणि तो बापाचे हृदय मुलांकडे, आणि मुलांचे हृदय त्यांच्या बापाकडे फिरवील, नाहीतर मी कदाचित येईन आणि तुमच्या भूमीला शापाने मारीन.”
Il convertira le cœur des pères envers les enfants, et le cœur des enfants, envers leurs pères, de peur que je ne vienne, et que je ne frappe la terre à la façon de l'interdit.

< मलाखी 4 >