< मलाखी 4 >
1 १ “कारण पाहा, तो दिवस येत आहे, तो भट्टीसारखा जळतो, आणि सर्व गर्विष्ठ आणि प्रत्येक दुष्ट धसकट बनतील. येणारा दिवस त्यांना जाळून टाकील, म्हणजे एकही फांदी किंवा मूळ शिल्लक ठेवले जाणार नाही.” सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो.
看,那日子來臨,勢必如冒火燄的火爐,所有的驕傲人和惡的人都要成為禾楷;那一天來到,必要將他們燒盡──萬軍的上主說──不給他們留下根和枝條。
2 २ “परंतु जे तुम्ही माझ्या नावाचे भय धरता त्या तुम्हासाठी न्यायीपणाचा सूर्य उगवेल. आणि त्याच्या पंखात निरोगी करण्याचा उपाय आहे. मग तुम्ही गोठ्यातून सुटलेल्या वासरांप्रमाणे, मुक्त व आनंदी व्हाल.
但為你們這些敬畏我名號的人,正義的太陽將要升起,以自己好似箭羽的光芒普施救恩;你們必將出來,蹦蹦跳跳有如出欄的牛犢。
3 ३ तुम्ही दुष्टांना तुडवाल, कारण मी हे करीन त्या दिवशी ते तुमच्या तळपायाखाली राख होतील.” सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो.
你們要踐踏惡人,因為在我行事之日,他們必要如同在你們腳下的塵土──萬軍的上說。
4 ४ “मोशे जो माझा सेवक होता त्यास होरेबात सर्व इस्राएलासाठी जे नियमशास्त्र मी आज्ञापिले ते, म्हणजे नियम व न्यायही तुम्ही आठवा.”
你們應記得我僕人梅瑟的法律,即我在曷黎布山,命他傳於全以色列的誡命和制度。
5 ५ “पाहा, परमेश्वराचा मोठा व भयंकर दिवस येईल त्यापूर्वी मी एलीया संदेष्ट्याला तुमच्याकडे पाठवीन. देवाच्या न्यायदानाच्या भयंकर मोठ्या वेळेपूर्वी तो येईल.
看,在上主偉大及可怕的日子來臨以前,我必派遺先知厄里亞到你們這裏來;
6 ६ आणि तो बापाचे हृदय मुलांकडे, आणि मुलांचे हृदय त्यांच्या बापाकडे फिरवील, नाहीतर मी कदाचित येईन आणि तुमच्या भूमीला शापाने मारीन.”
衪將使父親的心轉向兒子,使兒子的心轉向父親,免得我來臨時,以毀滅律打擊這地。