< लूक 1 >

1 ज्या गोष्टींची आम्हास पक्की खातरी आहे त्या गोष्टी जे प्रारंभापासून प्रत्यक्ष पाहाणारे व शब्दाचे सेवक होते,
Plusieurs ayant entrepris d'écrire l'histoire des choses dont la vérité a été pleinement établie parmi nous;
2 त्यांनी त्या जशा आम्हास सोपवून दिल्या त्या तशाच सांगाव्या म्हणून त्यांविषयीचा वृत्तांत अनुक्रमाने लिहून काढण्याचे काम पुष्कळांनी हाती घेतले आहे.
Selon que nous les ont transmises ceux qui dès le commencement les ont vues eux-mêmes, et qui ont été les ministres de la Parole;
3 म्हणून हे थियफिला महाराज, मी सर्व गोष्टींचा मुळापासून चांगला शोध केल्यामुळे मलाही हे बरे वाटले की, या सर्व घटनांविषयीची माहिती आपणाला व्यवस्थित पणे माहिती लिहावी.
J'ai cru aussi, très excellent Théophile, que je devais te les écrire par ordre, moi qui les ai toutes examinées avec soin;
4 यासाठी की ज्या गोष्टींचे शिक्षण आपल्याला मिळाले आहे त्यांचा निश्चितपणा आपण पूर्णपणे जाणावा.
Afin que tu reconnaisses la certitude des choses dont tu as été instruit.
5 यहूदीया प्रांताचा राजा हेरोद याच्या दिवसात, जखऱ्या नावाचा कोणी याजक होता. तो अबीयाच्या याजक घराण्यातील असून त्याची पत्नी अहरोनाच्या वंशातील होती व तिचे नाव अलीशिबा होते.
Au temps d'Hérode, roi de Judée, il y avait un sacrificateur nommé Zacharie, du rang d'Abia; sa femme était de la race d'Aaron, et elle s'appelait Élisabeth.
6 ते दोघेही देवापुढे नीतिमान होते आणि प्रभूच्या सर्व आज्ञा व विधीत निर्दोषपणे चालत असत.
Ils étaient tous deux justes devant Dieu, et ils suivaient tous les commandements et toutes les ordonnances du Seigneur, d'une manière irréprochable.
7 परंतु त्यांना मूल नव्हते कारण अलीशिबा वांझ होती, शिवाय ते दोघेही फार म्हातारे झाले होते.
Ils n'avaient point d'enfants, parce qu'Élisabeth était stérile, et qu'ils étaient tous deux avancés en âge.
8 मग असे झाले की, तो आपल्या वर्गाच्या अनुक्रमाने देवापुढे त्याचे याजकाचे काम करत असता,
Or, il arriva comme Zacharie faisait les fonctions de sacrificateur devant Dieu, selon l'ordre de son rang,
9 याजकांच्या रीतीप्रमाणे परमेश्वराच्या भवनात धूप जाळण्यासाठी चिठ्ठ्या टाकून त्याची निवड करण्यात आली.
Qu'il lui échut par le sort, selon la coutume de la sacrificature, d'entrer dans le temple du Seigneur, pour y offrir les parfums.
10 १० आणि लोकांचा सगळा जमाव धूप जाळण्याच्या वेळेस बाहेर प्रार्थना करीत उभा होता.
Et toute la multitude du peuple était dehors en prières, à l'heure des parfums.
11 ११ तेव्हा परमेश्वराचा दूत, धूपवेदीच्या उजव्या बाजूला उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला.
Alors un ange du Seigneur lui apparut, se tenant debout au côté droit de l'autel des parfums.
12 १२ त्यास पाहून जखऱ्या भयभीत झाला.
Et Zacharie le voyant, fut troublé, et la frayeur le saisit.
13 १३ परंतु देवदूत त्यास म्हणाला, जखऱ्या भिऊ नको, कारण तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे आणि तुझी पत्नी अलीशिबा हिच्याकडून तुला पुत्र होईल, तू त्याचे नाव योहान ठेव.
Mais l'ange lui dit: Zacharie, ne crains point; car ta prière est exaucée, et Élisabeth ta femme t'enfantera un fils, et tu lui donneras le nom de Jean.
14 १४ तेव्हा तुला आनंद व उल्लास होईल आणि त्याच्या जन्माने पुष्कळ लोक हर्षित होतील.
Il sera pour toi un sujet de joie et de ravissement, et plusieurs se réjouiront de sa naissance.
15 १५ कारण तो परमेश्वराच्या दृष्टीने महान होईल आणि तो द्राक्षरस किंवा मद्य कधीच पिणार नाही व तो आईच्या गर्भात असतांनाच पवित्र आत्म्याने भरलेला असेल.
Car il sera grand devant le Seigneur; il ne boira ni vin, ni boisson forte, et il sera rempli du Saint-Esprit dès le sein de sa mère;
16 १६ तो इस्राएलाच्या संतानांतील अनेकांना, प्रभू त्यांचा देव याच्याकडे वळविण्यास कारणीभूत ठरेल.
Il convertira plusieurs des enfants d'Israël au Seigneur leur Dieu,
17 १७ आणि देवासाठी सिद्ध झालेले असे लोक तयार करायला, वडिलांची अंतःकरणे मुलांकडे आणि आज्ञा न मानणार्‍यांना नीतिमानांच्या ज्ञानाकडे वळवून प्रभूसाठी तयार केलेली प्रजा उभी करावयाला तो एलीयाच्या आत्म्याने आणि सामर्थ्याने त्यांच्यापुढे चालेल.
Et il marchera devant lui dans l'esprit et avec la vertu d'Élie, pour tourner les cœurs des pères vers les enfants, et les rebelles à la sagesse des justes, afin de préparer au Seigneur un peuple bien disposé.
18 १८ मग जखऱ्या देवदूताला म्हणाला, “हे घडणारच असे मी कशावरुन समजू? कारण मी वृद्ध मनुष्य आहे आणि माझी पत्नीसुद्धा उतारवयात आहे.”
Et Zacharie dit à l'ange: A quoi connaîtrai-je cela? Car je suis vieux, et ma femme est avancée en âge?
19 १९ देवदूताने त्यास उत्तर दिले, “मी देवाच्या पुढे उभा राहणारा गब्रीएल आहे आणि तुझ्याशी बोलायला व तुलाही सुवार्ता सांगायला मला पाठविण्यात आले आहे.
Et l'ange lui répondit: Je suis Gabriel, qui assiste devant Dieu; et j'ai été envoyé pour te parler et t'annoncer ces bonnes nouvelles.
20 २० पाहा, हे घडेपर्यंत तुला बोलता येणार नाही व तू मुका राहशील कारण माझे शब्द जे योग्यवेळी पूर्णपणे खरे ठरणार आहेत त्या माझ्या शब्दांवर तू विश्वास ठेवला नाहीस.”
Et voici, tu vas devenir muet, et tu ne pourras parler jusqu'au jour où ces choses arriveront, parce que tu n'as pas cru à mes paroles, qui s'accompliront en leur temps.
21 २१ तेव्हा जखऱ्याची वाट पाहणाऱ्या लोकांस तो परमेश्वराच्या भवनात इतका वेळ का राहिला याचे आश्चर्य वाटले.
Cependant, le peuple attendait Zacharie, et s'étonnait de ce qu'il tardait si longtemps dans le temple.
22 २२ तो बाहेर आल्यावर त्यास त्यांच्याबरोबर बोलता येईना. तेव्हा त्यांना जाणिव झाली की, परमेश्वराच्या भवनात त्याने दृष्टांत पाहिला आहे. तो त्यांना खुणा करत होता परंतु तो तसाच मुका राहीला.
Et quand il fut sorti, il ne pouvait leur parler, et ils connurent qu'il avait eu une vision dans le temple, parce qu'il le leur faisait entendre par des signes; et il demeura muet.
23 २३ मग असे झाले की त्याच्या सेवेचा कालावधी पूर्ण झाल्यावर तो घरी परत गेला.
Et lorsque les jours de son ministère furent achevés, il s'en alla en sa maison.
24 २४ त्या दिवसानंतर त्याची पत्नी अलीशिबा गरोदर राहिली व पाच महिने लपून राहिली, ती म्हणाली,
Quelque temps après, Élisabeth sa femme conçut; elle se cacha durant cinq mois, et disait:
25 २५ लोकांमध्ये माझा होणारा अनादर दूर करण्यासाठी प्रभूने माझ्याकडे पाहिले तेव्हा त्याने माझ्यासाठी असे केले.
C'est là ce que le Seigneur a fait en ma faveur, au jour où il a jeté les yeux sur moi, pour ôter mon opprobre du milieu des hommes.
26 २६ अलीशिबेच्या गरोदरपणाच्या सहाव्या महिन्यात देवाने गब्रीएल दूताला गालील प्रांतातील नासरेथ नावाच्या गावी,
Or, au sixième mois, Dieu envoya l'ange Gabriel dans une ville de Galilée,
27 २७ एका कुमारीकडे पाठवले. तिची दाविदाच्या घराण्यातील योसेफ नावाच्या मनुष्याशी मागणी झाली होती आणि त्या कुमारीचे नाव मरीया होते.
appelée Nazareth, à une vierge fiancée à un homme nommé Joseph, de la maison de David; et cette vierge s'appelait Marie.
28 २८ देवदूत तिच्याकडे येऊन म्हणाला, अभिवादन! तुझ्यावर कृपा झालेली आहे. प्रभू तुझ्याबरोबर आहे.
Et l'ange étant entré auprès d'elle, lui dit: Je te salue, toi qui as été reçue en grâce; le Seigneur est avec toi; tu es bénie entre les femmes.
29 २९ परंतु ती त्याच्या शब्दाने अस्वस्थ झाली आणि या अभिवादनाचा अर्थ काय असावा याचे ती नवल करू लागली.
Et ayant vu l'ange, elle fut troublée de son discours, et elle pensait en elle-même ce que pouvait être cette salutation.
30 ३० देवदूत तिला म्हणाला, “मरीये, भिऊ नकोस, देवाने तुझ्यावर कृपा केली आहे.
Alors l'ange lui dit: Marie, ne crains point, car tu as trouvé grâce devant Dieu.
31 ३१ पाहा! तू गरोदर राहशील आणि तुला मुलगा होईल त्याचे नाव तू येशू ठेव.
Et tu concevras et tu enfanteras un fils, et tu appelleras son nom JÉSUS.
32 ३२ तो महान होईल व त्यास थोर देवाचा पुत्र म्हणतील आणि प्रभू देव त्यास त्याचा पिता दावीद याचे राजासन देईल.
Il sera grand, et sera appelé Fils du Très-Haut, et le Seigneur Dieu lui donnera le trône de David son père.
33 ३३ तो याकोबाच्या घराण्यावर सर्वकाळासाठी राज्य चालवील आणि त्याच्या राज्याचा अंत होणार नाही.” (aiōn g165)
Il régnera éternellement sur la maison de Jacob, et il n'y aura point de fin à son règne. (aiōn g165)
34 ३४ तेव्हा मरीया दूताला म्हणाली, हे कसे होईल? कारण मला पुरूष ठाऊक नाही.
Alors Marie dit à l'ange: Comment cela se fera-t-il, puisque je ne connais point d'homme?
35 ३५ देवदूत तिला म्हणाला, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि थोर देवाचे सामर्थ्य तुझ्यावर सावली करील आणि म्हणून जे पवित्र बाळ जन्मास येईल, त्यास देवाचा पुत्र म्हणतील.
Et l'ange lui répondit: Le Saint-Esprit viendra sur toi, et la puissance du Très-Haut te couvrira de son ombre; c'est pourquoi aussi le saint enfant qui naîtra de toi sera appelé le Fils de Dieu.
36 ३६ बघ, तुझी नातेवाईक अलीशिबा ही सुद्धा म्हातारपणात गरोदर असून तिला पुत्रगर्भ राहीला आहे आणि जिला वांझ म्हणले जाई तिला आता सहावा महिना आहे.
Et voilà, Élisabeth ta parente a aussi conçu un fils en sa vieillesse; et c'est ici le sixième mois de celle qui était appelée stérile.
37 ३७ कारण देवाला कोणतीही गोष्ट अशक्य नाही.
Car rien n'est impossible à Dieu.
38 ३८ मरीया म्हणाली, खरोखर “मी प्रभूची दासी आहे, आपल्या म्हणण्याप्रमाणे मला होवो.” मग देवदूत तिच्यापासून निघून गेला.
Et Marie dit: Voici la servante du Seigneur; qu'il me soit fait selon ta parole. Et l'ange se retira d'auprès d'elle.
39 ३९ त्या दिवसात मरीया उठली आणि घाईने यहूदीया प्रांताच्या डोंगराळ भागातील एका नगरात गेली.
Alors Marie se leva, et s'en alla en hâte au pays des montagnes, dans une ville de Juda.
40 ४० तिने जखऱ्याच्या घरात प्रवेश केला आणि अलीशिबेला अभिवादन केले.
Et étant entrée dans la maison de Zacharie, elle salua Élisabeth.
41 ४१ जसे मरीयेचे अभिवादन अलीशिबेने ऐकले तिच्या उदरातील बाळाने उडी मारली आणि अलीशिबा पवित्र आत्म्याने भरली.
Et aussitôt qu'Élisabeth eut entendu la salutation de Marie, le petit enfant tressaillit dans son sein, et Élisabeth fut remplie du Saint-Esprit.
42 ४२ ती उंच स्वर काढून मोठ्याने म्हणाली, “स्त्रियांमध्ये तू धन्यवादित आहेस आणि तुझ्या पोटचे फळ धन्य आहे.
Et élevant la voix, elle s'écria: Tu es bénie entre les femmes, et le fruit de ton sein est béni.
43 ४३ माझ्या प्रभूच्या मातेने मजकडे यावे हा मान मला कोठून?”
Et d'où me vient ceci, que la mère de mon Seigneur vienne me visiter?
44 ४४ जेव्हा तुझ्या अभिवादनाची वाणी माझ्या कानी पडली, तेव्हा माझ्या उदरातील बाळाने आनंदाने उडी मारली
Car la voix de ta salutation n'a pas plutôt frappé mes oreilles, que le petit enfant a tressailli de joie dans mon sein.
45 ४५ जिने विश्वास ठेवला ती धन्य आहे, कारण ज्या गोष्टी प्रभूने तिला सांगितल्या त्याची पूर्णता होईल?
Et heureuse est celle qui a cru; car les choses qui lui ont été dites de la part du Seigneur auront leur accomplissement.
46 ४६ मरीया म्हणाली, “माझा जीव प्रभूला थोर मानतो,
Alors Marie dit: Mon âme magnifie le Seigneur,
47 ४७ आणि देव जो माझा तारणारा याच्या ठायी माझा आत्मा आनंदीत झाला आहे.
Et mon esprit se réjouit en Dieu mon Sauveur;
48 ४८ कारण त्याने आपल्या दासीची दैन्य अवस्था पाहीली. आतापासून मला सर्व पिढ्या धन्य म्हणतील.
Parce qu'il a regardé la bassesse de sa servante. Et voici désormais tous les âges me diront bienheureuse.
49 ४९ कारण जो सर्वसमर्थ आहे त्याने माझ्यासाठी मोठी कामे केली आहेत; आणि त्याचे नाव पवित्र आहे.
Car le Tout-Puissant m'a fait de grandes choses; son nom est saint;
50 ५० जे त्याचे भय धरतात त्यांच्यावर त्याची दया पिढ्यानपिढ्या आहे
Et sa miséricorde s'étend d'âge en âge sur ceux qui le craignent.
51 ५१ त्याने त्याच्या हाताने सामर्थ्याची कार्ये केली आहेत; जे गर्विष्ठ अंतःकरणाचे आहेत त्यांची त्याने पांगापांग केली आहे.
Il a déployé la force de son bras; il a dissipé les desseins que les orgueilleux formaient dans leur cœur;
52 ५२ त्याने राज्य करणाऱ्यांना त्यांच्या राजासनांवरून ओढून काढले आहे आणि गरीबास उंचावले आहे.
Il a détrôné les puissants, et il a élevé les petits;
53 ५३ त्याने भूकेल्यास चांगल्या पदार्थांने तृप्त केले आहे. आणि धनवानास रिकाम्या हाताने परत पाठवले आहे.
Il a rempli de biens ceux qui avaient faim, et il a renvoyé les riches à vide.
54 ५४ दयेपोटी त्याने आपला सेवक इस्राएल याला साहाय्य केले आहे.
Il a pris en sa protection Israël son serviteur;
55 ५५ आपल्या पूर्वजास त्याने सांगितल्याप्रमाणे अब्राहाम व त्याचे संतान यांच्यावरील दया सर्वकाळ स्मरण करावी. त्याने आपला सेवक इस्राएल याला साहाय्य केले आहे.” (aiōn g165)
Et comme il en avait parlé à nos pères, il s'est souvenu de sa miséricorde envers Abraham et sa postérité pour toujours. (aiōn g165)
56 ५६ अलीशिबेबरोबर तीन महीने राहिल्यानंतर मरीया आपल्या घरी परत गेली.
Et Marie demeura avec elle environ trois mois; puis elle s'en retourna en sa maison.
57 ५७ अलीशिबेची प्रसूतीची वेळ आल्यावर, तिने एका मुलास जन्म दिला.
Or, le terme d'Élisabeth étant venu, elle enfanta un fils.
58 ५८ प्रभूने तिच्यावर मोठी दया केली आहे, हे तिच्या शेजाऱ्यांनी व नातेवाईकांनी ऐकले आणि ते तिच्या आनंदात सहभागी झाले.
Et ses voisins et ses parents, ayant appris que le Seigneur avait fait éclater sa miséricorde en sa faveur, s'en réjouissaient avec elle.
59 ५९ मग असे झाले की, आठव्या दिवशी मुलाची सुंता करण्यासाठी ते आले असता, त्याच्या पित्याच्या नावाप्रमाणे ते बाळाचे नाव देखील जखऱ्या ठेवणार होते.
Et étant venus le huitième jour pour circoncire le petit enfant, ils l'appelaient Zacharie, du nom de son père.
60 ६० परंतु त्याच्या आईने उत्तर दिले, नाही त्याऐवजी त्याचे नाव योहान ठेवायचे आहे.
Mais sa mère prit la parole et dit: Non, mais il sera nommé Jean.
61 ६१ ते तिला म्हणाले, तुझ्या नातलगात या नावाचा कोणीच नाही.
Ils lui dirent: Il n'y a personne dans ta parenté qui soit appelé de ce nom.
62 ६२ नंतर त्यांनी त्याच्या वडिलांना हातवारे करून विचारले, याचे नाव काय ठेवावे, अशी तुझी इच्छा आहे
Alors ils demandèrent par signe à son père comment il voulait qu'il fût nommé.
63 ६३ तेव्हा त्याने लिहिण्यासाठी पाटी मागितली आणि, त्याचे नाव योहान आहे, असे लिहीले यावरुन त्या सर्वांना खूपच आश्चर्य वाटले.
Et Zacharie ayant demandé des tablettes, écrivit ces mots: Jean est son nom; et ils en furent tous surpris.
64 ६४ त्याच क्षणी त्याचे तोंड उघडले व त्याची जीभ मोकळी झाली आणि तो बोलू लागला व देवाला धन्यवाद देऊ लागला.
A l'instant sa bouche s'ouvrit, sa langue fut déliée, et il parlait en bénissant Dieu.
65 ६५ तेव्हा सर्व शेजारी भयभीत झाले आणि यहूदीया प्रांताच्या सर्व डोंगराळ प्रदेशात लोक या सर्व गोष्टींबद्दल बोलू लागले.
Et tous leurs voisins furent remplis de crainte, et toutes ces choses se divulguèrent par tout le pays des montagnes de Judée.
66 ६६ जे कोणी हे ऐकले ते प्रत्येकजण मनात विचार करत होते, ते म्हणाले, हे मूल पुढे कोण होणार आहे? प्रभू त्याच्याबरोबर आहे असे त्यांच्या लक्षात आले.
Et tous ceux qui les entendirent, les conservèrent dans leur cœur, et disaient: Que sera donc ce petit enfant? Et la main du Seigneur était avec lui.
67 ६७ त्याचा पिता जखऱ्या पवित्र आत्म्याने भरला आणि त्यानेही भविष्यवाणी केली; तो म्हणाला,
Alors Zacharie son père fut rempli du Saint-Esprit, et il prophétisa, en disant:
68 ६८ “इस्राएलाचा देव प्रभू, ह्याची स्तुती असो, कारण त्याने आपल्या लोकांची भेट घेतली आणि लोकांची खंडणी भरून सुटका केली.
Béni soit le Seigneur, le Dieu d'Israël, de ce qu'il a visité et racheté son peuple,
69 ६९ त्याने आपला सेवक दावीद याच्या घराण्यातून आमच्यासाठी सामर्थ्यशाली तारणारा दिला आहे.
Et de ce qu'il nous a suscité un puissant Sauveur, dans la maison de David son serviteur;
70 ७० हे देवाने त्याच्या पवित्र संदेष्ट्यांद्वारे युगाच्या प्रारंभापासून सांगितले होते. (aiōn g165)
Comme il en avait parlé par la bouche de ses saints prophètes, depuis longtemps; (aiōn g165)
71 ७१ जे आमचे शत्रू आहेत व जे आमचा द्वेष करतात त्यांच्यापासून सुटका करण्याचे अभिवचन त्याने आम्हास दिले.
De ce qu'il nous a sauvés de nos ennemis, et de la main de tous ceux qui nous haïssent,
72 ७२ आमच्या पूर्वजांवर दया दाखविण्यासाठी तो हे करणार आहे व आपल्या पवित्र कराराची आठवण ठेवणार आहे,
Pour exercer sa miséricorde envers nos pères, et se souvenir de sa sainte alliance,
73 ७३ हा करार एक शपथ होती जी त्याने आमचा पूर्वज अब्राहामाला वाहिली.
Savoir du serment qu'il avait fait à Abraham notre père,
74 ७४ ती अशी की, तुम्ही आपल्या शत्रूच्या हातातून सोडवले जाऊन,
De nous accorder que, étant délivrés de la main de nos ennemis, nous le servirions sans crainte,
75 ७५ माझ्यासमोर पवित्रतेने व नीतिमत्त्वाने आयुष्यभर माझी सेवा निर्भयपणे कराल, असे मी करीन.
Dans la sainteté et dans la justice, en sa présence, tous les jours de notre vie.
76 ७६ हे बालका, तुला परात्पराचा संदेष्टा म्हणतील कारण प्रभूचे मार्ग सिद्ध करण्याकरीता तू त्यांच्यापुढे चालशील.
Et toi, petit enfant, tu seras appelé le prophète du Très-Haut; car tu marcheras devant la face du Seigneur, pour préparer ses voies,
77 ७७ यासाठी की, त्याच्या लोकांस त्यांच्या पापांच्या क्षमेने तारणाचा अनुभव द्यावा.
Afin de donner la connaissance du salut à son peuple, dans la rémission de leurs péchés,
78 ७८ देवाच्या दयेमुळे स्वर्गीय दिवसाची पहाट उजाडेल व मरणाच्या दाट छायेत जे जगत आहेत त्यांच्यावर प्रकाशेल.
Par les entrailles de la miséricorde de notre Dieu, par lesquelles le soleil levant nous a visités d'en haut;
79 ७९ तिच्याकडून जे अंधारात आहेत व मृत्युच्या छायेत बसले आहेत त्यांना प्रकाश देण्यासाठी आणि आमचे पाय शांतीच्या मार्गास लावण्यासाठी दिवसाचा उदय करून आमची भेट घेईल.”
Pour éclairer ceux qui sont assis dans les ténèbres et dans l'ombre de la mort, et pour conduire nos pas dans le chemin de la paix.
80 ८० मग तो मुलगा वाढत गेला आणि आत्म्यात सामर्थ्यशाली झाला. इस्राएल लोकांस प्रकट होण्याच्या दिवसापर्यंत तो अरण्यात राहिला.
Et le petit enfant croissait et se fortifiait en esprit; et il demeura dans les déserts jusqu'au jour où il devait être manifesté à Israël.

< लूक 1 >