< लूक 8 >
1 १ त्यानंतर लवकरच असे झाले की, तो उपदेश करीत व देवाच्या राज्याची सुवार्ता सांगत नगरोनगरी व गांवोगांवी फिरत होता, तेव्हा ते बारा शिष्य त्याच्याबरोबर होते.
És lőn ezután, hogy ő jár vala városonként és falunként, prédikálván és hirdetvén az Isten országát, és vele a tizenkettő,
2 २ दुष्ट आत्मे व दुखणी यांपासून मुक्त केलेल्या अशा कित्येक स्त्रिया त्याच्याबरोबर होत्या, म्हणजे मग्दालीया नगराची मरीयेतून सात भूते निघाली होती, ती,
És némely asszonyok, a kiket tisztátalan lelkektől és betegségekből gyógyított meg, Mária, a ki Magdalénának neveztetik, kiből hét ördög ment ki,
3 ३ हेरोदाचा कारभारी खुजा याची पत्नी योहान्ना तसेच सूसान्ना व इतर पुष्कळ स्त्रिया, या आपल्या द्रव्याने त्यांची सेवा करीत असत.
És Johanna, Khúzának, a Heródes gondviselőjének felesége, és Zsuzsánna, és sok más asszony, kik az ő vagyonukból szolgálának néki.
4 ४ आणि मोठा समुदाय एकत्र जमला असता व गावोगावचे लोक त्याच्याजवळ येत असता तो दाखला देऊन म्हणाला,
Mikor pedig nagy sokaság gyűlt egybe, és minden városból mentek vala ő hozzá, monda példázat által:
5 ५ “पेरणारा आपले बी पेरायला निघाला; आणि तो पेरीत असता काही बी पाय वाटेवर पडले आणि ते तुडवले गेले व आकाशातील पाखरांनी ते खाऊन टाकले.
Kiméne a magvető, hogy elvesse az ő magvát: és magvetés közben némely esék az útfélre; és eltapostaték, és az égi madarak megevék azt.
6 ६ आणि काही खडकाळीवर पडले आणि ते उगवल्यावर वाळून गेले, कारण त्यास ओलावा नव्हता.
És némely esék a kősziklára; és mikor kikelt, elszárada, mert nem vala nedvessége.
7 ७ आणि काही काटेरी झाडाझुडपांमध्ये पडले आणि झाडाझुडपांबरोबर वाढून त्याची वाढ खुंटवली.
Némely esék a tövis közé; és a tövisek vele együtt növekedvén, megfojták azt.
8 ८ आणि काही चांगल्या जमिनीवर पडले आणि ते उगवून त्यास शंभरपट पीक आले.” असे म्हटल्यावर तो मोठ्याने म्हणाला, “ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐको.”
Némely pedig esék a jó földbe; és mikor kikelt, százannyi hasznot hoza. Ezeket mondván, kiált vala: A kinek van füle a hallásra, hallja.
9 ९ तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्यास विचारले, या दाखल्याचा अर्थ काय आहे?
És megkérdék őt az ő tanítványai, mondván: Mi lehet e példázat?
10 १० मग तो म्हणाला, “देवाच्या राज्याची गुजे जाणण्याची देणगी तुम्हास दिली आहे, परंतु बाकीच्या लोकांस ती दाखल्यांनी सांगितली आहेत, यासाठी की त्यांनी दिसत असता पाहू नये व त्यांनी ऐकत असता समजू नये.
Ő pedig monda nékik: Néktek adatott, hogy az Isten országának titkait értsétek; egyebeknek példázatokban, hogy látván ne lássanak, és hallván ne értsenek.
11 ११ तर दाखला हा आहे बी हे देवाचे वचन आहे.
A példázat pedig ez: A mag az Isten beszéde.
12 १२ आणि जे वाटेवरचे ते ऐकणारे आहेत, पण त्यानंतर सैतान येतो आणि त्यांनी विश्वास धरून तारण पावू नये म्हणून त्यांच्या अंतःकरणातून वचन काढून घेतो.
Az útfélen valók pedig azok, a kik hallják; aztán eljő az ördög, és kikapja az ígét az ő szívökből, hogy ne higyjenek és ne idvezüljenek.
13 १३ आणि जे खडकाळीवरचे हे आहेत की, ते ऐकतात तेव्हा वचन आनंदाने घेतात, पण त्यांना मूळ नसते; ते काही वेळेपर्यंत विश्वास धरतात व परीक्षेच्या वेळी गळून पडतात.
És a kősziklán valók azok, a kik, mikor hallják, örömmel veszik az ígét; de ezeknek nincs gyökerük, a kik egy ideig hisznek, a kísértés idején pedig elszakadnak.
14 १४ आणि काटेरी झाडांमध्ये पडणारे बी हे ऐकणारे आहेत, पण पुढे जाता जाता चिंता व धन व या जीवनातली सुखे यांनी गुदमरून जातात व भरदार फळ देत नाहीत.
És a melyik a tövis közé esett, ezek azok, a kik hallották, de elmenvén, az élet gondjaitól, és gazdagságától és gyönyörűségeitől megfojtatnak, és gyümölcsöt nem teremnek.
15 १५ पण चांगल्या जमिनीत पडणारे बी हे असे आहेत, की ते वचन ऐकून ते भल्या व चांगल्या अंतःकरणात घट्ट धरून ठेवतात आणि धीराने पीक देत जातात.
A melyik pedig a jó földbe esett, ezek azok, a kik a hallott ígét tiszta és jó szívvel megtartják, és gyümölcsöt teremnek béketűréssel.
16 १६ आणि कोणी दिवा लावल्यावर तो भांड्याने झाकत नाही किंवा पलंगाखाली ठेवत नाही तर आत येणाऱ्यांना उजेड दिसावा म्हणून तो दिवठणीवर ठेवतो.
Senki pedig, ha gyertyát gyújt, be nem fedi azt valami edénynyel, sem az ágy alá nem rejti; hanem a gyertyatartóba teszi, hogy a kik bemennek, lássák a világot.
17 १७ कारण प्रकट होणार नाही असे काही झाकलेले नाही किंवा कळणार नाही व उघडकीस येणार नाही असे काही गुप्त नाही.
Mert nincs oly titok, mely nyilvánvalóvá ne lenne; és nincs oly elrejtett dolog, mely ki ne tudódnék, és világosságra ne jőne.
18 १८ म्हणून तुम्ही कसे ऐकता यांविषयी जपा, कारण ज्याच्याजवळ आहे त्यास दिले जाईल आणि ज्याच्याजवळ नाही त्याच्याजवळ जे आहे म्हणून त्यास वाटते ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल.”
Meglássátok azért, mimódon hallgatjátok: mert a kinek van, annak adatik; és a kinek nincs, még a mijét gondolja is hogy van, elvétetik tőle.
19 १९ तेव्हा त्याची आई व भाऊ त्याच्याकडे आली आणि दाटीमुळे त्यांना त्याच्याजवळ जाता येईना.
Jövének pedig hozzá az ő anyja és atyjafiai, de nem tudtak hozzá jutni a sokaság miatt.
20 २० तेव्हा कोणी त्यास सांगितले, तुझी आई व तुझे भाऊ तुला भेटायला पाहत असून बाहेर उभे राहिले आहेत.
És tudtára adák néki, mondván: A te anyád és atyádfiai künn állnak, téged akarván látni.
21 २१ आणि त्याने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “देवाचे वचन ऐकणारे व पाळणारे हेच माझे आई व भाऊ.”
Ő pedig felelvén, monda nékik: Az én anyám és az én atyámfiai ezek, a kik az Isten beszédét hallgatják, és megcselekszik azt.
22 २२ आणि त्या दिवसात असे झाले की, तो आपल्या शिष्यांबरोबर होडीत बसला आणि “आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ” असे तो त्यांना म्हणाला आणि त्यांनी होडी हाकारली.
Lőn pedig egy napon, hogy beméne a hajóba ő és az ő tanítványai; és monda nékik: Menjünk a tónak túlsó partjára. És elindulának.
23 २३ नंतर ते जहाज हाकारत असता येशू झोपी गेला. मग सरोवरात वाऱ्याचे वादळ सुटले आणि होडी पाण्याने भरू लागले व ते संकटात पडले.
De hajózásuk közben elszenderedék; és szélvész csapott le a tóra, és megmerülének, és veszedelemben valának.
24 २४ तेव्हा ते त्याच्याजवळ येऊन त्यास जागे करून म्हणाले, गुरुजी, आम्ही बुडत आहोत. तेव्हा त्याने झोपेतून उठून वाऱ्याला व खवळलेल्या पाण्याला धमकावले; मग ते बंद होऊन अगदी निवांत झाले.
És hozzá menvén, felkölték őt mondván: Mester, Mester, elveszünk! Ő pedig felserkenvén, megdorgálá a szelet és a víznek habjait; és megszűnének, és lőn csendesség.
25 २५ तेव्हा तो त्यांना म्हणाला, “तुमचा विश्वास कोठे आहे?” आणि ते भयभीत होऊन थक्क झाले व एकमेकांना म्हणाले, हा आहे तरी कोण? की, वारा व पाणी यांना देखील हा आज्ञा करतो व ती यांचे ऐकतात.
És monda nékik: Hol van a ti hitetek? És félelemmel csodálkoznak vala, mondván egymásnak: Ugyan ki ez, hogy a szeleknek is, a víznek is parancsol, és engednek néki?
26 २६ मग ते गालील सरोवराच्या समोरील गरसेकरांच्या प्रदेशास पोहोचले.
És evezének a Gaderénusok tartományaiba, mely Galileával átellenben van.
27 २७ आणि तो जमिनीवर उतरला, तेव्हा नगरातील कोणीएक मनुष्य त्यास भेटला; त्यास पुष्कळ भूते लागली होती व त्याने बऱ्याच काळापासून कपडे घातली नव्हती व घरात न राहता तो थडग्यांमध्ये राहत होता.
És mikor ő kiment a földre, jöve elébe a városból egy ember, kiben ördögök voltak sok időtől fogva, sem ruhába nem öltözött, sem házban nem lakott, hanem a sírboltokban.
28 २८ तेव्हा तो येशूला पाहून फार ओरडला व त्याच्यापुढे पडून मोठ्याने म्हणाला, हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, माझा तुझा काय संबध? मी तुला विनंती करतो, मला पिडू नकोस.
És mikor meglátta Jézust, felkiálta és lábai elé esék néki, és fenszóval monda: Mi közöm van nékem te veled, Jézus, felséges Istennek Fia? kérlek téged, ne gyötörj engem.
29 २९ कारण तो त्या अशुद्ध आत्म्याला त्या मनुष्यांतून निघून जाण्याची आज्ञा करीत होता; कारण त्याने त्यास पुष्कळ वेळा धरले होते; आणि लोक त्यास पहाऱ्यात ठेवून साखळ्यांनी व बेड्यांनी बांधीत असत पण तो ती बंधने तोडून भूताकडून रानांमध्ये हाकून लावला जात असे.
Mert azt parancsolá annak a tisztátalan léleknek, hogy menjen ki az emberből. Mert gyakran elragadá őt: annakokáért lánczokkal és békókkal megkötözve őrizteték; de a kötelékeket elszaggatván, az ördögtől a pusztákba hajtaték.
30 ३० आणि येशूने त्यास विचारले, “तुझे नाव काय?” तेव्हा त्याने म्हटले, सैन्य, कारण त्याच्यामध्ये पुष्कळ भूते शिरली होती.
Megkérdé pedig őt Jézus, mondván: Mi a neved? És ő monda: Légió; mert sok ördög ment vala bele.
31 ३१ आणि तू आम्हास अगाधकूपात जाण्याची आज्ञा करू नको, अशी ती भूते त्यास विनंती करीत होती. (Abyssos )
És kérék őt, hogy ne parancsolja nékik, hogy a mélységbe menjenek. (Abyssos )
32 ३२ तेव्हा तेथे पुष्कळ डुकरांचा कळप डोंगरावर चरत होता; आणि त्यांमध्ये शिरायला तू आम्हास परवानगी द्यावी, अशी त्यांनी विनंती केली. मग त्याने त्यांना परवानगी दिली.
Vala pedig ott egy nagy disznónyáj, legelészve a hegyen; és kérék őt, hogy engedje meg nékik, hogy azokba menjenek. És megengedé nékik.
33 ३३ तेव्हा ती भूते त्या मनुष्यांतून निघून त्या डुकरांमध्ये शिरली आणि तो कळप कड्यावरून धडक धावंत जाऊन खाली सरोवरात पडला व गुदमरून मरण पावला.
És minekutána kimentek az ördögök az emberből, bemenének a disznókba; és a disznónyáj a meredekről a tóba rohana, és megfullada.
34 ३४ मग कळप चारणारे जे घडले ते पाहून पळाले व त्यांनी ते नगरांमध्ये व शेतांमध्ये जाऊन सांगितले.
A pásztorok pedig látván mi történt, elfutának, és elmenvén, hírré adák a városban és a falukban.
35 ३५ तेव्हा जे झाले ते पाहायला ते लोक बाहेर निघाले आणि येशूकडे आले आणि ज्या मनुष्यांतून भूते निघाली होती तो वस्त्र पांघरलेला व शुद्धीवर आलेला असा येशूच्या पायांजवळ बसलेला त्यांना आढळला; आणि ते भ्याले.
Kimenének azért megnézni mi történt; és menének Jézushoz, és ülve találák az embert, kiből az ördögök kimentek, felöltözve és eszénél, a Jézus lábainál; és megfélemlének.
36 ३६ मग ज्यांनी ते पाहिले होते त्यांनी तो भूतग्रस्त कसा बरा झाला हे त्यांना सांगितले.
Elbeszélék pedig nékik azok is, a kik látták, mimódon szabadult meg az ördöngős.
37 ३७ तेव्हा गरसेकरांच्या चहूकडल्या भागांतील सर्व लोकांनी त्यास विनंती केली की तू आमच्यापासून जावे कारण ते मोठ्या भयाने व्याप्त झाले होते. मग तो मचव्यात बसून माघारी आला.
És kéré őt a Gadarénusok körül való tartományok egész sokasága, hogy ő közülök menjen el, mert felette igen félnek vala: ő pedig beülvén a hajóba, visszatére.
38 ३८ आणि ज्या मनुष्यांतून भूते निघाली होती, तो, मला तुमच्याबरोबर राहू दयावे, अशी येशूजवळ विनंती करीत होता, परंतु तो त्यास निरोप देऊन म्हणाला,
Kéré pedig őt az az ember, a kiből az ördögök kimentek, hogy ő vele lehessen; de Jézus elbocsátá őt, mondván:
39 ३९ “तू आपल्या घरी परत जा व देवाने तूझ्यासाठी केवढी मोठी कामे केली ते साग.” मग तो निघून येशूने त्याच्यासाठी केवढी मोठी कामे केली होती ते त्या सबंध नगरांतून घोषित करत गेला.
Térj vissza házadhoz, és beszéld el, mely nagy dolgokat tett az Isten veled. Elméne azért, hirdetvén az egész városban, mely nagy dolgokat cselekedett Jézus ő vele.
40 ४० नंतर येशू परत आल्यावर समुदायाने त्यास आनंदाने अंगीकारले, कारण ते सर्व त्याची वाट पाहत होते.
És lőn, hogy mikor Jézus visszatért, a nép örömmel fogadá őt; mert mindnyájan várják vala őt.
41 ४१ तेव्हा पाहा, याईर नावाचा कोणी मनुष्य आला; तो तर सभास्थानाचा अधिकारी होता; आणि त्याने येशूच्या पाया पडून, तू माझ्या घरी यावे, अशी त्यास विनंती केली.
És ímé eljöve egy ember, kinek Jairus vala neve, ki a zsinagógának feje volt; és Jézus lábai előtt leesvén, kéré őt, hogy menjen be az ő házába;
42 ४२ कारण त्यास सुमारे बारा वर्षाची एकुलती एक मुलगी होती व ती मरणास टेकली होती. मग तो जात असता लोकसमुदाय त्याच्याजवळ दाटी करीत होते.
Mert vala néki egy egyetlen leánya, mintegy tizenkét esztendős, és az halálán volt. Mikor pedig ő méne, a sokaság szorongatá őt.
43 ४३ आणि बारा वर्षे रक्तस्राव होत असलेली कोणीएक स्त्री, जी (आपली सर्व उपजीविका वैद्यांवर खर्ची घालून) कोणाकडूनही निरोगी होईना,
És egy asszony, ki vérfolyásban volt tizenkét esztendőtől fogva, és bár minden vagyonát az orvosokra költötte, senki meg nem tudta gyógyítani,
44 ४४ तिने त्याच्या पाठीमागे येऊन त्याच्या वस्त्राच्या काठाला स्पर्श केला आणि लागलीच तिचा रक्तस्राव बंद झाला.
Hátulról hozzá járulván, illeté az ő ruhájának peremét; és azonnal elálla vérének folyása.
45 ४५ मग येशू म्हणाला, “मला कोणी स्पर्श केला?” तेव्हा सर्वजण नाकारीत असता पेत्र व जे त्याच्याबरोबर होते ते त्यास म्हणाले, हे गुरूजी, समुदाय दाटी करून तुम्हास चेंगरीत आहेत.
És monda Jézus: Ki az, a ki engem illete? És mikor mindnyájan tagadták, monda Péter és a kik ő vele valának: Mester, a sokaság nyom és szorongat téged, és azt mondod: Ki az, a ki engem illete?
46 ४६ तेव्हा येशू म्हणाला, “कोणीतरी मला स्पर्श केला, कारण माझ्यातून सामर्थ्य निघाले हे मला समजले.”
Jézus pedig monda: Illete engem valaki; mert én észrevettem, hogy erő származék ki tőlem.
47 ४७ मग ती स्त्री, आपण गुप्त राहिलो नाही असे पाहून, थरथर कांपत आली आणि त्याच्यापुढे उपडी पडून आपण कोणत्या कारणासाठी स्पर्श केला व लागलीच आपण कसे बरे झालो, हे तिने सर्व लोकांच्या देखत सांगितले.
Mikor pedig látta az asszony; hogy nem maradt titokban, reszketve előjöve és előtte leesvén, megjelenté néki az egész sokaság előtt, miért illette őt, és hogy azonnal meggyógyult.
48 ४८ तेव्हा त्याने तिला म्हटले, “मुली, तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे. शांतीने जा.”
És ő monda néki: Bízzál leányom, a te hited megtartott téged; eredj el békességgel!
49 ४९ तो अजून बोलत आहे इतक्यात सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या येथून कोणी आला व म्हणाला, तुझी मुलगी मरण पावली आहे; गुरूजीला आणखी श्रम देऊ नका.
Mikor még a szó szájában vala, eljöve egy ember a zsinagóga fejének házától, mondván néki: Meghalt a leányod; ne fáraszd a Mestert!
50 ५० पण येशूने ते ऐकून त्यास उत्तर दिले, “भिऊ नको, विश्वास मात्र धर, म्हणजे ती बरी केली जाईल.”
Jézus pedig mikor ezt hallotta, felele néki, mondván: Ne félj; csak higyj, és megtartatik.
51 ५१ मग घरात आल्यावर पेत्र व योहान व याकोब आणि मुलीचा पिता व तिची आई यांच्यावाचून कोणालाही आपणाबरोबर आत येऊ दिले नाही.
Bemenvén pedig a házba, senkit nem bocsáta be, csak Pétert, Jakabot, Jánost és a leányzó atyját és anyját.
52 ५२ आणि सर्व तिच्यासाठी रडत व शोक करीत होते, पण तो म्हणाला, “रडू नका, कारण ती मरण पावली नाही, तर झोपेत आहे.”
Sírának pedig mindnyájan, és gyászolák azt; ő pedig monda: Ne sírjatok; nem halt meg, hanem aluszik.
53 ५३ तरी ती मरण पावली आहे हे जाणून ते त्यास हसू लागले.
És kineveték őt, tudván, hogy meghalt.
54 ५४ पण त्याने तिचा हात आपल्या हातात घेऊन तिला हाक मारून म्हटले, “मुली, ऊठ.”
Ő pedig mindenkit kiküldvén, és a leányzó kezét megfogván, kiálta, mondván: Leányzó, kelj fel!
55 ५५ तेव्हा तिचा आत्मा परत आला व ती लागलीच उठली; मग तिला खायला द्यावे अशी त्याने आज्ञा केली.
És visszatére annak lelke, és azonnal fölkele; és ő parancsolá, hogy adjanak néki enni.
56 ५६ आणि तिचे आई-वडील थक्क झाले; परंतु जे झाले ते कोणाला सांगू नका असे त्याना निक्षून सांगितले.
És elálmélkodának annak szülei; ő pedig megparancsolá, hogy senkinek ne mondják, a mi történt.