< लूक 7 >
1 १ ऐकणाऱ्या लोकांस त्याने आपली सर्व वचने सांगणे संपवल्यानंतर त्याने कफर्णहूमात प्रवेश केला.
İsa, kendisini dinleyen halka bütün bu sözleri söyledikten sonra Kefarnahum'a gitti.
2 २ तेव्हा कोणाएका शताधीपतीचा आवडता दास आजारी होऊन मरणास टेकला होता.
Orada bir yüzbaşının çok değer verdiği kölesi ölüm döşeğinde hasta yatıyordu.
3 ३ मग त्याने येशूविषयी ऐकून यहूद्यांच्या वडिलांना त्याच्याकडे पाठवून, तू येऊन माझ्या दासास वाचवावे, अशी त्यास विनंती केली.
İsa'yla ilgili haberleri duyan yüzbaşı, gelip kölesini iyileştirmesini rica etmek üzere O'na Yahudiler'in bazı ileri gelenlerini gönderdi.
4 ४ जेव्हा ते येशूजवळ आले तेव्हा त्यांनी त्यास आग्रहाने विनंती केली, ज्याच्यासाठी तू हे करावे, तो योग्य आहे.
Bunlar İsa'nın yanına gelince içten bir yalvarışla O'na şöyle dediler: “Bu adam senin yardımına layıktır.
5 ५ कारण तो आमच्या राष्ट्रावर प्रीती करतो आणि त्याने आमच्यासाठी आमचे सभास्थान बांधून दिले.
Çünkü ulusumuzu seviyor. Havramızı yaptıran da kendisidir.”
6 ६ त्यामूळे येशू त्यांच्याबरोबर मार्गात चालत गेला आणि तो घरापासून फार दूर नव्हता, तोच त्या शताधीपतीने मित्रांना त्यांच्याकडे पाठवून म्हटले, प्रभू, आपण त्रास करून घेऊ नका, कारण तुम्ही माझ्या घरी यावे असा मी योग्य नाही.
İsa onlarla birlikte yola çıktı. Eve yaklaştığı sırada, yüzbaşı bazı dostlarını yollayıp O'na şu haberi gönderdi: “Ya Rab, zahmet etme; evime girmene layık değilim.
7 ७ त्यामुळे तुमच्याकडे येण्यासही मी स्वतःला योग्य मानले नाही, परंतु तुम्ही फक्त शब्द बोला, म्हणजे माझा सेवक बरा होईल.
Bu yüzden yanına gelmeye de kendimi layık görmedim. Sen yeter ki bir söz söyle, uşağım iyileşir.
8 ८ कारण मीही दुसऱ्याच्या अधिकाराखाली असलेला मनुष्य असून माझ्या हाताखाली शिपाई आहेत; आणि याला मी म्हणतो, जा, म्हणजे हा जातो व दुसऱ्याला ये म्हणतो, म्हणजे तो येतो आणि माझ्या दासास म्हणतो, हे कर, म्हणजे तो ते करतो.
Ben de buyruk altında bir görevliyim, benim de buyruğumda askerlerim var. Birine, ‘Git’ derim, gider; ötekine, ‘Gel’ derim, gelir; köleme, ‘Şunu yap’ derim, yapar.”
9 ९ जेव्हा येशूने हे ऐकले तेव्हा त्यास त्याच्याविषयी आश्चर्य वाटले, तो त्याच्यामागे येणाऱ्या जमावाकडे वळून म्हणाला, “मी तुम्हास सांगतो, एवढा मोठा विश्वास मला इस्राएलात देखील आढळला नाही.”
Bu sözleri duyan İsa yüzbaşıya hayran kaldı. Ardından gelen kalabalığa dönerek, “Size şunu söyleyeyim” dedi, “İsrail'de bile böyle iman görmedim.”
10 १० आणि जे पाठवलेले होते, ते घरी परतले, तेव्हा त्यांना आढळून आले की, तो सेवक बरा झाला आहे.
Gönderilenler eve döndüklerinde köleyi iyileşmiş buldular.
11 ११ आणि दुसऱ्या दिवशी असे झाले की, तो नाईन नावाच्या नगराकडे जात होता आणि त्याचे पुष्कळ शिष्य व मोठा समुदाय हे त्याच्याबरोबर जात होते.
Bundan kısa bir süre sonra İsa, Nain denilen bir kente gitti. Öğrencileriyle büyük bir kalabalık O'na eşlik ediyordu.
12 १२ जसा तो गावाच्या वेशीजवळ आला तेव्हा पाहा कोणाएका मरण पावलेल्या मनुष्यास बाहेर घेऊन जात होते. तो आपल्या आईचा एकुलता एक मुलगा होता व ती विधवा होती; आणि गावातील बरेच लोक तिच्याबरोबर होते.
İsa kentin kapısına tam yaklaştığı sırada, dul annesinin tek oğlu olan bir adamın cenazesi kaldırılıyordu. Kent halkından büyük bir kalabalık da kadınla birlikteydi.
13 १३ तेव्हा तिला पाहून प्रभूला तिचा कळवळा आला व तो तिला म्हणाला “रडू नकोस”
Rab kadını görünce ona acıdı. Kadına, “Ağlama” dedi.
14 १४ मग जवळ जाऊन त्याने तिरडीस स्पर्श केला; तेव्हा खांदेकरी स्थिर उभे राहीले आणि तो म्हणाला, “मुला, मी तुला सांगतो, उठ!”
Yaklaşıp cenaze sedyesine dokununca sedyeyi taşıyanlar durdu. İsa, “Delikanlı” dedi, “Sana söylüyorum, kalk!”
15 १५ आणि तो मरण पावलेला उठून बसला व बोलू लागला; मग येशूने त्यास त्याच्या आईजवळ दिले.
Ölü doğrulup oturdu ve konuşmaya başladı. İsa onu annesine geri verdi.
16 १६ तेव्हा सर्वांना भय वाटले आणि ते देवाला गौरव करीत म्हणाले, “आमच्यामध्ये मोठा संदेष्टा उदयास आला आहे आणि देवाने आपल्या लोकांची भेट घेतली आहे”
Herkesi bir korku almıştı. “Aramızda büyük bir peygamber ortaya çıktı!” ve “Tanrı, halkının yardımına geldi!” diyerek Tanrı'yı yüceltmeye başladılar.
17 १७ येशूविषयीची ही बातमी सर्व यहूदीया प्रांतात आणि सभोवतालच्या परिसरात पसरली.
İsa'yla ilgili bu haber bütün Yahudiye'ye ve çevre bölgelere yayıldı.
18 १८ योहानाच्या शिष्यांनी योहानाला जाऊन हे सर्वकाही सांगितले,
Yahya'nın öğrencileri bütün bu olup bitenleri kendisine bildirdiler. Öğrencilerinden ikisini yanına çağıran Yahya, “Gelecek Olan sen misin, yoksa başkasını mı bekleyelim?” diye sormaları için onları Rab'be gönderdi.
19 १९ नंतर योहानाने आपल्या दोन शिष्यांना बोलावले आणि त्याने त्यांना प्रभूकडे हे विचारण्यासाठी पाठवले की, जो येणारा तो तूच आहेस की आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी?
20 २० जेव्हा ते लोक त्याच्याकडे आले, ते म्हणाले, “बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने आम्हास तुमच्याकडे हे विचारण्यास पाठवले आहे की, जो येणारा तो तूच आहेस की आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी?”
Adamlar İsa'nın yanına gelince şöyle dediler: “Bizi sana Vaftizci Yahya gönderdi. ‘Gelecek Olan sen misin, yoksa başkasını mı bekleyelim?’ diye soruyor.”
21 २१ त्याच घटकेस येशूने अनेक लोकांचे रोग, आजार बरे केले, पुष्कळांमधील दुष्ट आत्मे काढली, आंधळ्यांना दृष्टी दिली.
Tam o sırada İsa, çeşitli hastalıklara, illetlere ve kötü ruhlara tutulmuş birçok kişiyi iyileştirdi, birçok körün gözünü açtı.
22 २२ येशूने त्यांना उत्तर दिले, “जा आणि तुम्ही जे ऐकले व पाहिले आहे ते योहानाला सांगा, आंधळे पाहतात, लंगडे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मरण पावलेले जिवंत केले जातात आणि गरीब लोक सुवार्ता ऐकतात.
Sonra Yahya'nın öğrencilerine şöyle karşılık verdi: “Gidin, görüp işittiklerinizi Yahya'ya bildirin. Körlerin gözleri açılıyor, kötürümler yürüyor, cüzamlılar temiz kılınıyor, sağırlar işitiyor, ölüler diriliyor ve Müjde yoksullara duyuruluyor.
23 २३ आणि जो कोणी माझ्याविषयी अडखळत नाही तो धन्य आहे.”
Benden ötürü sendeleyip düşmeyene ne mutlu!”
24 २४ मग योहानाचे निरोपे गेल्यावर तो योहानाविषयी समुदायांशी बोलू लागला, “तुम्ही काय पाहायला बाहेर रानात गेला? वाऱ्याने हलवलेला बोरू काय?
Yahya'nın gönderdiği haberciler gittikten sonra İsa, halka Yahya'dan söz etmeye başladı. “Çöle ne görmeye gittiniz?” dedi. “Rüzgarda sallanan bir kamış mı?
25 २५ तर तुम्ही काय पाहायला बाहेर गेला? मऊ वस्त्रे घातलेल्या मनुष्यास काय? पाहा, भडक पोषाख घातलेले व चैनीत असणारे लोक राजवाड्यांत असतात.
Söyleyin, ne görmeye gittiniz? Pahalı giysiler giymiş bir adam mı? Oysa şahane giysiler giyip bolluk içinde yaşayanlar kral saraylarında bulunur.
26 २६ तर तुम्ही काय पाहायाला बाहेर गेला? संदेष्ट्याला काय? होय, मी तुम्हास सांगतो, संदेष्ट्याहूनही जो अधिक मोठा आहे त्याला.
Öyleyse ne görmeye gittiniz? Bir peygamber mi? Evet! Size şunu söyleyeyim, gördüğünüz kişi peygamberden de üstündür.
27 २७ पाहा, ‘मी आपल्या दूताला तुझ्या मुखापुढे पाठवतो; तो तुझ्यापुढे तुझी वाट तयार करील,’ असे ज्याच्याविषयी लिहिले आहे तो हाच आहे.
‘İşte, habercimi senin önünden gönderiyorum; O önden gidip senin yolunu hazırlayacak’ diye yazılmış olan sözler onunla ilgilidir.
28 २८ मी तुम्हास सांगतो की स्त्रियांपासून जे जन्मले त्यांच्यांमध्ये योहानापेक्षा मोठा असा कोणी नाही, तरी देवाच्या राज्यांत जो अगदी लहान आहे, तो त्याच्यापेक्षा मोठा आहे.”
Size şunu söyleyeyim, kadından doğanlar arasında Yahya'dan daha üstün olanı yoktur. Bununla birlikte, Tanrı'nın Egemenliği'nde en küçük olan ondan üstündür.”
29 २९ आणि जकातदारांसह सर्व लोकांनी ऐकून ‘देव न्यायी आहे’ असे ठरवले कारण त्यांनी योहानाचा बाप्तिस्मा घेतला होता.
Yahya tarafından vaftiz edilen halk, hatta vergi görevlileri bile bunu duyunca Tanrı'nın adil olduğunu doğruladılar.
30 ३० परंतु परूशी व नियमशास्त्राचे शिक्षक यांनी त्याच्यापासून बाप्तिस्मा न घेऊन आपल्या संबंधीची देवाची योजना धिक्कारली.
Oysa Yahya tarafından vaftiz edilmeye yanaşmayan Ferisiler'le Kutsal Yasa uzmanları, Tanrı'nın kendileriyle ilgili tasarısını reddettiler.
31 ३१ प्रभूने म्हटले, “तर मग मी या पिढीच्या मनुष्यांना कोणती उपमा देऊ? आणि ती कशासारखी आहेत?
İsa, “Bu kuşağın insanlarını neye benzeteyim? Bunlar neye benziyorlar?” dedi.
32 ३२ जी मुले बाजारामध्ये बसून एकमेकांना हाक मारतात त्यांच्यासारखी ती आहेत, ती म्हणतात, आम्ही तुमच्यासाठी पावा वाजवला तरी तुम्ही नाचला नाही, आम्ही विलाप केला तरी तुम्ही रडला नाही.
“Çarşı meydanında oturup birbirlerine, ‘Size kaval çaldık, oynamadınız; Ağıt yaktık, ağlamadınız’ diye seslenen çocuklara benziyorlar.
33 ३३ कारण बाप्तिस्मा करणारा योहान भाकर न खाता आणि द्राक्षरस न पिता आला आहे आणि तुम्ही म्हणता, त्यास भूत लागले आहे.
Vaftizci Yahya geldiği zaman oruç tutup şaraptan kaçındı, ona ‘cinli’ diyorsunuz.
34 ३४ मनुष्याचा पुत्र खातपीत आला आहे आणि तुम्ही म्हणता, पाहा, हा खादाडा मनुष्य व दारूबाज, जकातदारांचा व पाप्यांचा मित्र!
İnsanoğlu geldiği zaman yiyip içti. Bu kez de diyorsunuz ki, ‘Şu obur ve ayyaş adama bakın! Vergi görevlileri ve günahkârlarla dost oldu!’
35 ३५ परंतु ज्ञान आपल्या सर्व लेकरांकडून न्यायी ठरलेले आहे.”
Ne var ki bilgelik, onu benimseyen herkes tarafından doğrulanır.”
36 ३६ तेव्हा परूश्यांपैकी कोणा एकाने, “तू माझ्याबरोबर जेवावे.” अशी येशूला विनंती केली. मग तो परूश्याच्या घरात जाऊन जेवायला बसला.
Ferisiler'den biri İsa'yı yemeğe çağırdı. O da Ferisi'nin evine gidip sofraya oturdu.
37 ३७ आणि पाहा, कोणीएक पापी स्त्री त्या नगरांत होती; येशू परूश्यांच्या घरात जेवायला बसला आहे हे ऐकू ती सुगंधी तेलाची अलाबास्त्र कुपी घेऊन आली.
O sırada, kentte günahkâr olarak tanınan bir kadın, İsa'nın, Ferisi'nin evinde yemek yediğini öğrenince kaymaktaşından bir kap içinde güzel kokulu yağ getirdi. İsa'nın arkasında, ayaklarının dibinde durup ağlayarak, gözyaşlarıyla O'nun ayaklarını ıslatmaya başladı. Saçlarıyla ayaklarını sildi, öptü ve yağı üzerlerine sürdü.
38 ३८ आणि ती मागे त्याच्या पायांजवळ रडत उभी राहून आसवांनी त्याचे पाय भिजवू लागली व तिने ते आपल्या डोक्याच्या केसांनी पुसून, त्याच्या पायांचे पुष्कळ मुके घेतले व त्यांना सुगंधी तेल लावले.
39 ३९ तेव्हा ज्या परूश्याने येशूला बोलावले होते, त्याने हे पाहून आपल्या मनांत म्हटले, “हा संदेष्टा असता तर जी स्त्री त्यास स्पर्श करीत आहे ती कोण व कोणत्या प्रकारची आहे, म्हणजे ती पापी आहे, हे त्यास कळले असते.”
İsa'yı evine çağırmış olan Ferisi bunu görünce kendi kendine, “Bu adam peygamber olsaydı, kendisine dokunan bu kadının kim ve ne tür bir kadın olduğunu, günahkâr biri olduğunu anlardı” dedi.
40 ४० तेव्हा येशूने त्यास उत्तर देऊन म्हटले, “शिमोना, तुझ्याशी मला काही बोलायचे आहे.” तेव्हा तो म्हणाला, “गुरूजी बोला.”
Bunun üzerine İsa Ferisi'ye, “Simun” dedi, “Sana bir söyleyeceğim var.” O da, “Buyur, öğretmenim” dedi.
41 ४१ येशूने म्हटले, “एका सावकाराचे दोन कर्जदार होते; एकाला चांदीचे पाचशे नाणे व दुसऱ्याला पन्नास असे देणे होते.
“Tefeciye borçlu iki kişi vardı. Biri beş yüz, öbürü de elli dinar borçluydu.
42 ४२ परंतु कर्ज फेडायला त्यांच्याजवळ काही नव्हते म्हणून त्याने दोघांना क्षमा केली. तर त्यांच्यापैकी कोणता त्याच्यावर अधिक प्रीती करील?”
Borçlarını ödeyecek güçte olmadıklarından, tefeci her ikisinin de borcunu bağışladı. Buna göre, hangisi onu çok sever?”
43 ४३ तेव्हा शिमोनाने उत्तर देऊन म्हटले, “ज्याला अधिक माफ केले तो, असे मला वाटते.” मग येशू त्यास म्हणाला, “ठीक ठरवलेस.”
Simun, “Sanırım, kendisine daha çok bağışlanan” diye yanıtladı. İsa ona, “Doğru söyledin” dedi.
44 ४४ तेव्हा त्याने त्या स्त्रीकडे वळून शिमोनाला म्हटले, “ही स्त्री तुला दिसते ना? मी तुझ्या घरात आलो, तू माझ्या पायांसाठी पाणी दिले नाही; परंतु हिने आसवांनी माझे पाय भिजवले आणि आपल्या केसांनी ते पुसले.
Sonra kadına bakarak Simun'a şunları söyledi: “Bu kadını görüyor musun? Ben senin evine geldim, ayaklarım için bana su vermedin. Bu kadın ise ayaklarımı gözyaşlarıyla ıslatıp saçlarıyla sildi.
45 ४५ तू माझा मुका घेतला नाही, परंतु मी आत आल्यापासून हिने माझ्या पायांचे मुके घेण्याचे थांबवले नाही,
Sen beni öpmedin, ama bu kadın eve girdiğimden beri ayaklarımı öpüp duruyor.
46 ४६ तू माझ्या डोक्याला तेल लावले नाही, परंतु हिने माझ्या पायांना सुगंधी तेल लावले आहे.
Sen başıma zeytinyağı sürmedin, ama bu kadın ayaklarıma güzel kokulu yağ sürdü.
47 ४७ या कारणासाठी मी तुला सांगतो, हिची जी पुष्कळ पापे त्यांची क्षमा झाली आहे; कारण हिने पुष्कळ प्रीती केली; परंतु ज्याला थोडक्याची क्षमा होते तो थोडकी प्रीती करतो.”
Bu nedenle sana şunu söyleyeyim, kendisinin çok olan günahları bağışlanmıştır. Çok sevgi göstermesinin nedeni budur. Oysa kendisine az bağışlanan, az sever.”
48 ४८ तेव्हा येशूने तिला म्हटले, “तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.”
Sonra kadına, “Günahların bağışlandı” dedi.
49 ४९ मग त्याच्याबरोबर जेवायला बसले होते ते आपसांत म्हणू लागले, “पापांची देखील क्षमा करणारा हा कोण आहे?”
İsa'yla birlikte sofrada oturanlar kendi aralarında, “Kim bu adam? Günahları bile bağışlıyor!” şeklinde konuşmaya başladılar.
50 ५० मग त्याने त्या स्त्रीला म्हटले, “तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे, शांतीने जा.”
İsa ise kadına, “İmanın seni kurtardı, esenlikle git” dedi.