< लूक 6 >
1 १ नंतर असे झाले की, एका शब्बाथ दिवशी येशू शेतामधून जात होता आणि त्याचे शिष्य कणसे मोडून हातावर चोळून खात होते.
І сталось другої суботи після першої, ійшов Він через засїви, й рвали ученики Його колоссє, та й їли, потерши в руках.
2 २ मग परूश्यांपैकी काही म्हणाले, “शब्बाथ दिवशी जे करण्यास योग्य नाही, ते तुम्ही का करता?”
Деякі ж з Фарисеїв казали їм: На що робите, чого не годить ся робити в суботу?
3 ३ येशूने त्यांना म्हटले, “जेव्हा दावीद व त्याच्याबरोबरच्या मनुष्यांना भूक लागली तेव्हा त्यांनी काय केले हे तुम्ही कधी वाचले नाही काय?
І, озвавшись до них, рече Ісус: Хиба й того не читали, що зробив Давид, як зголоднів він і тї, що були з ним:
4 ४ तो देवाच्या घरात गेला आणि ज्या समर्पित भाकरी याजकांशिवाय कोणीच खाणे योग्य नाही त्या त्याने कशा घेऊन खाल्ल्या व आपल्याबरोबर जे होते त्यांनाही दिल्या.”
як, увійшовши вій у дом Божий, хлїби показні взяв і їв, і дав також тим, що були з ним, котрих не годилось їсти, хиба одним священикам?
5 ५ आणखी येशू त्यांना म्हणाला, “मनुष्याचा पुत्र शब्बाथाचा प्रभू आहे.”
І рече їм: Син чоловічий - Вів Господь і суботи.
6 ६ असे झाले की, दुसऱ्या एका शब्बाथ दिवशी येशू सभास्थानात गेला आणि शिकवू लागला. ज्याचा उजवा हात वाळलेला होता असा एक मनुष्य तेथे होता.
І сталось також другої суботи: ввійшов Він у школу та й навчав; а був там чоловік, що рука в него права була суха.
7 ७ येशू शब्बाथ दिवशी कोणाला बरे करतो की काय हे पाहण्यासाठी नियमशास्त्राचे शिक्षक व परूशी त्याच्यावर लक्ष ठेवून होते. यासाठी की त्यांना आरोप ठेवण्यासाठी काहीतरी कारण मिळावे.
Назирали ж Його письменники та Фарисеї, чи в суботу сцїляти ме, щоб знайти вину на Него.
8 ८ परंतु तो त्यांचे विचार जाणून वाळलेल्या हाताच्या मनुष्यास म्हणाला, “ऊठ आणि सर्वांसमोर उभा राहा,” आणि तो मनुष्य उठून तेथे उभा राहिला.
Він же знав думки їх, і рече чоловіку сухорукому: Устань і стань на середину. Він же, вставши, стояв.
9 ९ येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हास विचारतो, शब्बाथ दिवशी कोणत्या गोष्टी करायला परवानगी आहे? चांगले करणे की वाईट करणे? कोणते कायदेशीर आहे, एखाद्याचा जीव वाचवणे का त्याचा नाश करणे?”
Рече ж Ісус до них: Спитаю вас: Що годить ся по суботам: добре робити, чи лихе робити? душу спасати, чи погубляти?
10 १० मग त्याने सभोवती त्या सर्वांकडे पाहीले आणि म्हणाला, “तू आपला हात लांब कर.” तेव्हा त्याने तसे केले आणि त्याचा हात बरा झाला.
І, споглянувши кругом по всіх їх, рече чоловікові: Простягни руку твою. Він же зробив так, і стала рука його здорова, як і друга.
11 ११ पण परूशी व नियमशास्त्राचे शिक्षक खूप रागावले व येशूविषयी काय करता येईल याविषयी आपसात चर्चा करू लागले.
Вони ж сповнились лютостю і говорили один до одного, що б зробити Ісусові.
12 १२ त्या दिवसात असे झाले की, येशू प्रार्थना करण्यासाठी डोंगरावर गेला. त्याने ती रात्र देवाची प्रार्थना करण्यात घालवली.
Стало ж ся тими днями, вийшов Він на гору молитись, і був усю ніч на молитві Богу.
13 १३ जेव्हा दिवस उगवला, तेव्हा त्याने शिष्यांना आपणाकडे बोलावले. त्याने त्यांच्यातील बाराजणांना निवडले व त्यांना ‘प्रेषित’ असे नाव दिले.
А, як настав день, покликав учеників своїх; і, вибравши з них дванайцятьох, котрих і апостолами назвав:
14 १४ शिमोन ज्याला पेत्र हे सुद्धा नाव दिले तो अंद्रिया (पेत्राचा भाऊ), याकोब आणि योहान, फिलिप्प, बर्थलमय,
Симона, що назвав Петром, та Андрея брата його. Якова та Йоана, Филипа та Вартоломея,
15 १५ मत्तय, थोमा, अल्फीचा पुत्र याकोब, शिमोन ज्याला जिलोत म्हणत,
Маттея та Тому, Якова Алфєєвого та Симона, на прізвище Зилота,
16 १६ याकोबचा पुत्र यहूदा व यहूदा इस्कर्योत, जो पुढे विश्वासघात करणारा निघाला.
Юду Якового та Юду Іскариоцького, що й став ся зрадником;
17 १७ तो त्यांच्याबरोबर डोंगरावरून खाली उतरला व सपाट जागेवर उभा राहिला आणि त्याच्या अनुयायांचा मोठा समुदाय तेथे आला व यहूदीया प्रांत, यरूशलेम शहर, सोर आणि सिदोनच्या समुद्रकिनाऱ्याकडचे असे पुष्कळसे लोक तेथे आले होते.
і зійшовши з ними, став на місці рівному, й товариство учеників Його, і множество велике людей з усієї Юдеї і Єрусалиму, й з побережжя Тирського та Сидонського, що поприходили слухати Його і сцїлятися від недуг своїх,
18 १८ ते तेथे त्याचे ऐकण्यास व आपल्या रोगांपासून बरे होण्यास आले व ज्यांना अशुद्ध आत्म्यांची बाधा होती त्यांनाही त्यांच्या व्याधीपासून मुक्त करण्यात आले.
і мучені від духів нечистих; і спїляли ся.
19 १९ सगळा लोकसमुदाय त्यास स्पर्श करू पाहत होता, कारण त्याच्यामधून सामर्थ्य येत होते आणि सर्वांना ते बरे करत होते.
І ввесь народ шукав приторкнутись до Него: бо сила від Него виходила, й сцїляла всіх.
20 २० मग येशूने आपल्या शिष्यांकडे पाहिले व म्हणाला, “अहो दिनांनो, तुम्ही धन्य आहात कारण देवाचे राज्य तुमचे आहे.
І знявши Він очі свої на ученики свої, рече: Блаженні вбогі, бо ваше царство Боже.
21 २१ अहो जे तुम्ही आता भूकेले आहात, ते तुम्ही धन्य आहात, कारण तुम्ही तृप्त व्हाल. अहो जे तुम्ही आता रडता, ते तुम्ही आशीर्वादित आहात कारण तुम्ही हसाल.
Блаженні голодні тепер, бо насититесь. Блаженні плачущі тепер, бо сьміяти метесь.
22 २२ जेव्हा मनुष्याच्या पुत्रामुळे लोक तुमचा द्वेष करतील आणि जेव्हा ते आपल्या समाजातून तुम्हास दूर करतील व तुमची निंदा करतील व तुमचे नाव ते वाईट म्हणून टाकून देतील आणि मनुष्याच्या पुत्रामुळे तुम्हास नाकारतील, तेव्हा तुम्ही धन्य आहात.
Блаженні, коли ненавидіти муть вас люде, й коли проженуть вас, і осоромлять, і викинуть імя ваше, яв зло, задля Сина чоловічого.
23 २३ त्यादिवशी आनंद करून उड्या मारा, कारण खरोखर स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे! कारण त्यांच्या पूर्वजांनी संदेष्ट्यांना सुद्धा तसेच केले.
Радуйтесь того дня і веселїтесь, ось бо нагорода ваша велика на небі; так бо чинили пророкам батьки їх.
24 २४ पण श्रीमंतानो, तुम्हास दुःख होवो कारण तुम्हास अगोदरच सर्व सुख मिळाले आहे.
Горе ж вам, багатим І бо прийняли ви утіху вашу.
25 २५ जे तुम्ही तृप्त आहात त्या तुम्हास दुःख होवो, कारण तुम्ही भूकेले व्हाल. जे आता हसतात त्यांना दुःख होवो कारण तुम्ही शोक कराल आणि रडाल.
Горе вам, ситим! бо голодувати мете. Горе вам, що сьмієтесь тепер; бо сумувати мете да плакати мете.
26 २६ जेव्हा सर्व तुमच्याविषयी चांगले बोलतील तेव्हा तुम्हास दुःख होवो कारण त्यांच्या वाडवडिलांनी खोट्या संदेष्ट्यांना असेच केले.”
Горе вам, коли добре говорити муть про вас усї люде; так бо робили лжепророкам батьки їх.
27 २७ “परंतु तुम्हा ऐकणाऱ्यांस मी सांगतो, तुमच्या शत्रूंवर प्रीती करा. जे तुमचा द्वेष करतात, त्यांचे चांगले करा.
Тільки ж глаголю вам, слухаючим: Любіть ворогів ваших, добре робіть ненавидникам вашим,
28 २८ जे तुम्हास शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या. जे तुमचा अपमान करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा.
благословляйте кленучих вас, і моліть ся за обидників ваших.
29 २९ जर कोणी तुमच्या एका गालावर मारतो तर त्याच्यासमोर दुसराही गाल करा. जर कोणी तुमचा अंगरखा घेतो तर त्यास तुमची बंडी ही घेऊन जाण्यास मना करू नका.
Хто бв тебе у щоку, підстав і другу; а хто бере твою свиту, й жупанка не борони.
30 ३० जे तुम्हास मागतात त्या प्रत्येकाला द्या आणि जो तुमची वस्तू हिरावून घेतो त्याच्यापाशी ते परत मागू नको.
Всякому, хто просить у тебе, дай, і хто бере що твоє, не допевняй ся.
31 ३१ आणि जसे मनुष्यांनी तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा असेल तसेच तुम्हीही त्यांच्याशी वागा.
І, як хочете, щоб чинили вам люде, так і ви чинїть їм.
32 ३२ तुमच्यावर जे प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती करा, तर त्यामध्ये तुमचा उपकार तो काय? कारण पापी लोकही आपणावर प्रीती करणाऱ्यांवर प्रीती करतात.
І коли любите тих, хто любить. вас, яка вам дяка? бо й грішники тих, хто їх любить, люблять.
33 ३३ तुमचे जे चांगले करतात, त्यांचे जर तुम्ही चांगले करता तर तुम्हास काय लाभ? पापीसुद्धा असेच करतात.
І коли добро робите тим, хто добро робить вам, яка вам дяка? бо й грішники те саме чинять.
34 ३४ ज्यांच्याकडून तुम्हास परत मिळेल अशी आशा असते, त्यांना जर उसने देता तर तुम्हास काय लाभ? पापीसुद्धा परत मिळावे या उद्देशाने दुसऱ्या पाप्याला उसने देतात.
І коли позичаєте тим, від кого маєте надію одержати, яка вам дяка? бо й грішники грішникам позичають, щоб одержати стільки ж.
35 ३५ परंतु तुम्ही आपल्या शत्रूंवर प्रीती करा व त्यांचे बरे करा आणि निराश न होता उसने द्या म्हणजे तुमचे प्रतिफळ मोठे होईल व तुम्ही परात्पराचे पुत्र व्हाल कारण तो अनुपकारी व वाईट यांच्यावर तो दया करणारा आहे.
Нї, любіть ворогів ваших, і добро робіть, і позичайте, нічого від них не сподіваючись; а буде нагорода ваша велика, й будете синами Вишнього; бо Він благий до невдячних і лихих.
36 ३६ जसा तुमचा स्वर्गीय पिता दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू व्हा.”
Будьте ж оце милосердні, як і Отець ваш милосерден.
37 ३७ “दुसऱ्यांचा न्याय करू नका, म्हणजे तुमचाही न्याय होणार नाही. दुसऱ्यांना दोषी ठरवू नका म्हणजे तुम्हास दोषी ठरवले जाणार नाही. दुसऱ्यांची क्षमा करा म्हणजे तुमचीही क्षमा केली जाईल.
І не судіть, то й не будете суджені; не осуджуйте, то й не будете осуджені; прощайте, то й буде вам прощено.
38 ३८ द्या म्हणजे तुम्हास दिले जाईल. चांगले माप दाबून, हालवून व शीग भरून तुमच्या पदरी घालतील कारण ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हास परत मापून देण्यात येईल.”
Давайте, то й вам буде дано; міру добру, наталовану, й струснуту, й надто пересипану давати муть вам на лоно ваше. Такою бо мірою, якою міряєте, відміряєть ся вам.
39 ३९ त्याने त्यांना एक दाखला सांगितला, “एक आंधळा दुसऱ्या आंधळ्याला मार्ग दाखवू शकेल काय? ते दोघेही खड्डयात पडणार नाहीत काय?
Сказав же приповість їм: Чи може слїпий сліпого водити? хиба обидва в яму не впадуть?
40 ४० कोणताही शिष्य त्याच्या गुरुपेक्षा थोर नाही. पण प्रत्येक शिष्य जेव्हा पूर्ण शिकतो तेव्हा तो गुरुसारखाच होतो.
Нема ученика над учителя свого; звершений же - буде кожен, як учитель його.
41 ४१ स्वतःच्या डोळ्यातील मुसळ ध्यानात न आणता तू आपल्या भावाच्या डोळ्यातील कुसळ का पाहतोस?
Чого ж дивиш ся на порошину в оці брата твого, полїна ж у своєму оці не чуєш?
42 ४२ अथवा तू आपल्या डोळ्यातले मुसळ न पाहता आपल्या भावाला कसे म्हणशील की, भाऊ, तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे? अरे ढोंग्या, प्रथम तुझ्या डोळ्यातील मुसळ काढ मगच तुला तुझ्या भावाच्या डोळ्यातील कुसळ काढताना चांगले दिसेल.”
І як можеш казати братові твоєму: Брате, дай вийму порошину, що в оцї твоїм, сам в оці своїм полїна не бачивши? Лицеміре, викинь перше ломаку з ока твого, а тодї бачити меш вийняти порошину з ока брата твого.
43 ४३ कोणतेही चांगले झाड नाही की जे वाईट फळ देते किंवा कोणतेही वाईट झाड नाही की जे चांगले फळ देते.
Нема бо дерева доброго, що родить овощ пустий; анї дерева пустого, що родить овощ добрий.
44 ४४ कारण प्रत्येक झाड हे त्याच्या फळावरुन ओळखले जाते. लोक काटेरी झुडुपातून अंजीरे गोळा करीत नाहीत तसेच काटेरी झुडुपातून ते द्राक्षे गोळा करीत नाहीत.
Кожне бо дерево по свому овощу пізнаєть ся; не збирають бо з тернини смокви, анї збирають з ожини винограду.
45 ४५ चांगला मनुष्य त्याच्या अंतःकरणात ज्या चांगल्या गोष्टी साठवलेल्या असतात त्याच काढतो आणि दुष्ट मनुष्य त्याच्या अंतःकरणात जे वाईट आहे तेच बाहेर काढतो कारण अंतःकरणात जे भरले आहे तेच मुखावाटे निघणार.
Добрий чоловік з доброго скарбу серця свого виносить добре; а лихий чоловік з лихого скарбу серця свого виносить лихе: бо з переповнї серця промовляють уста його.
46 ४६ “तुम्ही मला ‘प्रभू, प्रभू,’ म्हणता, पण जे मी सांगतो ते तुम्ही का करीत नाही?
На що ж мене звете Господи, Господи, й не робите, що я глаголю?
47 ४७ प्रत्येकजण जो माझ्याकडे येतो व माझी वचने ऐकून त्या आज्ञा पाळतो तो कसा आहे हे मी तुम्हास दाखवितो.
Всякий, хто приходить до мене, й слухає слова мої, та й чинить їх, покажу вам, кому він подобен:
48 ४८ तो एका घर बांधणाऱ्या मनुष्यासारखा आहे. त्याने खोल खोदले आणि खडकावर पाया बांधला. मग पूर आला आणि पाण्याचा लोंढा घरावर आदळला, पण पाण्याने ते हलले नाही, कारण ते चांगले बांधले होते.
подобен він чоловікові, будуючому будинок, що викопав глибоко, й положив підвалину на каменї; як же повідь настала, наперла бистрінь на будинок той, та не змогла схитнути його: збудовано бо його на каменї.
49 ४९ पण जो कोणी माझी वचने ऐकतो पण ती पाळीत नाही तो ज्याने आपले घर पाया न घालता जमिनीवर बांधले त्या मनुष्यासारखा आहे, त्या घरावर पाण्याचा लोंढा आदळला आणि ते लागलेच पडले व त्या घराचा मोठा नाश झाला.”
Хто ж слухає, та не чинить, подобен чоловікові, будуючому будинок на землї, без підвалини, на котрий наперла бистрінь, і зараз упав, і була руїна будинка того велика.