< लूक 6 >

1 नंतर असे झाले की, एका शब्बाथ दिवशी येशू शेतामधून जात होता आणि त्याचे शिष्य कणसे मोडून हातावर चोळून खात होते.
在一个安息日,耶稣和门徒经过一片麦田,他的门徒摘下麦穗,用手搓着吃下。
2 मग परूश्यांपैकी काही म्हणाले, “शब्बाथ दिवशी जे करण्यास योग्य नाही, ते तुम्ही का करता?”
有几个法利赛人质问耶稣:“你们怎么能这样呢?安息日不允许这样做。”
3 येशूने त्यांना म्हटले, “जेव्हा दावीद व त्याच्याबरोबरच्या मनुष्यांना भूक लागली तेव्हा त्यांनी काय केले हे तुम्ही कधी वाचले नाही काय?
耶稣答道:“大卫和随从在饥饿时所做的事情,你没有读过吗?
4 तो देवाच्या घरात गेला आणि ज्या समर्पित भाकरी याजकांशिवाय कोणीच खाणे योग्य नाही त्या त्याने कशा घेऊन खाल्ल्या व आपल्याबरोबर जे होते त्यांनाही दिल्या.”
他难道不是走进上帝的神庙,吃了圣饼,还把它分给他的随从?这饼只有祭司才能吃。”
5 आणखी येशू त्यांना म्हणाला, “मनुष्याचा पुत्र शब्बाथाचा प्रभू आहे.”
他又对他们说:“人子是安息日的主。”
6 असे झाले की, दुसऱ्या एका शब्बाथ दिवशी येशू सभास्थानात गेला आणि शिकवू लागला. ज्याचा उजवा हात वाळलेला होता असा एक मनुष्य तेथे होता.
在另外一个安息日,耶稣走进会堂布道,那里有个人右手有残疾。
7 येशू शब्बाथ दिवशी कोणाला बरे करतो की काय हे पाहण्यासाठी नियमशास्त्राचे शिक्षक व परूशी त्याच्यावर लक्ष ठेवून होते. यासाठी की त्यांना आरोप ठेवण्यासाठी काहीतरी कारण मिळावे.
宗教老师和法利赛人想看看耶稣会不会在安息日治病,希望找到借口控告他。
8 परंतु तो त्यांचे विचार जाणून वाळलेल्या हाताच्या मनुष्यास म्हणाला, “ऊठ आणि सर्वांसमोर उभा राहा,” आणि तो मनुष्य उठून तेथे उभा राहिला.
耶稣知道他们的想法,就对手残疾的人说:“起来吧,站在大家的面前!”那人就起身站在那里。
9 येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हास विचारतो, शब्बाथ दिवशी कोणत्या गोष्टी करायला परवानगी आहे? चांगले करणे की वाईट करणे? कोणते कायदेशीर आहे, एखाद्याचा जीव वाचवणे का त्याचा नाश करणे?”
然后耶稣转身对他们说:“问你们一个问题:在安息日做什么才对?是拯救生命,还是害人性命?”
10 १० मग त्याने सभोवती त्या सर्वांकडे पाहीले आणि म्हणाला, “तू आपला हात लांब कर.” तेव्हा त्याने तसे केले आणि त्याचा हात बरा झाला.
他环视周围众人,然后对那个男人说:“伸出你的手来!”那人把手一伸,手就复原了。
11 ११ पण परूशी व नियमशास्त्राचे शिक्षक खूप रागावले व येशूविषयी काय करता येईल याविषयी आपसात चर्चा करू लागले.
但宗教老师和法利赛人却勃然大怒,商量着怎样对付耶稣。
12 १२ त्या दिवसात असे झाले की, येशू प्रार्थना करण्यासाठी डोंगरावर गेला. त्याने ती रात्र देवाची प्रार्थना करण्यात घालवली.
不久之后的一天,耶稣到山上去祷告,他整晚待在那里,向上帝祷告。
13 १३ जेव्हा दिवस उगवला, तेव्हा त्याने शिष्यांना आपणाकडे बोलावले. त्याने त्यांच्यातील बाराजणांना निवडले व त्यांना ‘प्रेषित’ असे नाव दिले.
天亮之后,他把跟随他的人叫来,从中挑选了十二人,称他们为十二门徒,他们分别是:
14 १४ शिमोन ज्याला पेत्र हे सुद्धा नाव दिले तो अंद्रिया (पेत्राचा भाऊ), याकोब आणि योहान, फिलिप्प, बर्थलमय,
西门(耶稣又称他为彼得)和他弟弟安得烈,以及雅各、约翰、腓力、巴多罗迈、
15 १५ मत्तय, थोमा, अल्फीचा पुत्र याकोब, शिमोन ज्याला जिलोत म्हणत,
马太、多马、亚勒腓的儿子雅各、激进派西门、
16 १६ याकोबचा पुत्र यहूदा व यहूदा इस्कर्योत, जो पुढे विश्वासघात करणारा निघाला.
雅各的儿子犹大和出卖主的加略人犹大。
17 १७ तो त्यांच्याबरोबर डोंगरावरून खाली उतरला व सपाट जागेवर उभा राहिला आणि त्याच्या अनुयायांचा मोठा समुदाय तेथे आला व यहूदीया प्रांत, यरूशलेम शहर, सोर आणि सिदोनच्या समुद्रकिनाऱ्याकडचे असे पुष्कळसे लोक तेथे आले होते.
耶稣和十二门徒下了山,站在一处平坦的地方,一大群信众和他的门徒都聚在这里,还有很多人从犹太全地、耶路撒冷和推罗以及西顿海边赶来,听耶稣讲道,也希望耶稣把他们的疾病医好。
18 १८ ते तेथे त्याचे ऐकण्यास व आपल्या रोगांपासून बरे होण्यास आले व ज्यांना अशुद्ध आत्म्यांची बाधा होती त्यांनाही त्यांच्या व्याधीपासून मुक्त करण्यात आले.
那些被恶灵附体之人也痊愈了。
19 १९ सगळा लोकसमुदाय त्यास स्पर्श करू पाहत होता, कारण त्याच्यामधून सामर्थ्य येत होते आणि सर्वांना ते बरे करत होते.
每个人都想方设法触摸他,因为他身上传递出一股力量,可以治愈众人。
20 २० मग येशूने आपल्या शिष्यांकडे पाहिले व म्हणाला, “अहो दिनांनो, तुम्ही धन्य आहात कारण देवाचे राज्य तुमचे आहे.
耶稣看着门徒,对他们说:
21 २१ अहो जे तुम्ही आता भूकेले आहात, ते तुम्ही धन्य आहात, कारण तुम्ही तृप्त व्हाल. अहो जे तुम्ही आता रडता, ते तुम्ही आशीर्वादित आहात कारण तुम्ही हसाल.
“你们贫穷之人有福了,因为上帝之国是你们的。你们饥饿之人有福了,因为你们会吃饱。你们哀哭之人有福了,因为你们将开怀大笑。
22 २२ जेव्हा मनुष्याच्या पुत्रामुळे लोक तुमचा द्वेष करतील आणि जेव्हा ते आपल्या समाजातून तुम्हास दूर करतील व तुमची निंदा करतील व तुमचे नाव ते वाईट म्हणून टाकून देतील आणि मनुष्याच्या पुत्रामुळे तुम्हास नाकारतील, तेव्हा तुम्ही धन्य आहात.
如果因为我是人子的缘故,你们被憎恨、排斥、羞辱和诅咒,你们就有福了。
23 २३ त्यादिवशी आनंद करून उड्या मारा, कारण खरोखर स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे! कारण त्यांच्या पूर्वजांनी संदेष्ट्यांना सुद्धा तसेच केले.
当那一天到来,欢喜吧,快乐地跳跃吧,因为你们在天堂获得了慷慨的赏赐,别忘了,他们的祖先就是这样对待先知的。
24 २४ पण श्रीमंतानो, तुम्हास दुःख होवो कारण तुम्हास अगोदरच सर्व सुख मिळाले आहे.
但你们富有之人有祸了,因为你们已经得了奖励。
25 २५ जे तुम्ही तृप्त आहात त्या तुम्हास दुःख होवो, कारण तुम्ही भूकेले व्हाल. जे आता हसतात त्यांना दुःख होवो कारण तुम्ही शोक कराल आणि रडाल.
你们饱足之人有祸了,因为你们将面临饥饿。你们正在欢笑的人有祸了,因为你们将要痛哭哀嚎。
26 २६ जेव्हा सर्व तुमच्याविषयी चांगले बोलतील तेव्हा तुम्हास दुःख होवो कारण त्यांच्या वाडवडिलांनी खोट्या संदेष्ट्यांना असेच केले.”
你们受众人夸赞之人有祸了,别忘了,你们的祖先也是这样夸赞假先知。
27 २७ “परंतु तुम्हा ऐकणाऱ्यांस मी सांगतो, तुमच्या शत्रूंवर प्रीती करा. जे तुमचा द्वेष करतात, त्यांचे चांगले करा.
但我想告诉那些聆听之人:要爱你们的敌人,善待憎恨你们的人。
28 २८ जे तुम्हास शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या. जे तुमचा अपमान करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा.
如果有人咒诅你,要为他们祝福;如果有人凌辱你,要为他们祷告;
29 २९ जर कोणी तुमच्या एका गालावर मारतो तर त्याच्यासमोर दुसराही गाल करा. जर कोणी तुमचा अंगरखा घेतो तर त्यास तुमची बंडी ही घेऊन जाण्यास मना करू नका.
有人打你一边的脸,转过另一边脸给他打;有人如果拿你的外衣,连里面的衣服也送给他。
30 ३० जे तुम्हास मागतात त्या प्रत्येकाला द्या आणि जो तुमची वस्तू हिरावून घेतो त्याच्यापाशी ते परत मागू नको.
别人想要你的东西,就给他;有人拿去你的东西,不必再要回来。
31 ३१ आणि जसे मनुष्यांनी तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा असेल तसेच तुम्हीही त्यांच्याशी वागा.
想要其他人如何对待你们,你们就应当如何对待其他人。
32 ३२ तुमच्यावर जे प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती करा, तर त्यामध्ये तुमचा उपकार तो काय? कारण पापी लोकही आपणावर प्रीती करणाऱ्यांवर प्रीती करतात.
如果只爱那些爱你的人,你这样做又有什么不同呢?罪人也爱那些爱他们的人。
33 ३३ तुमचे जे चांगले करतात, त्यांचे जर तुम्ही चांगले करता तर तुम्हास काय लाभ? पापीसुद्धा असेच करतात.
如果只善待那些善待你的人,你这样做又有什么不同呢?罪人也会这样做。
34 ३४ ज्यांच्याकडून तुम्हास परत मिळेल अशी आशा असते, त्यांना जर उसने देता तर तुम्हास काय लाभ? पापीसुद्धा परत मिळावे या उद्देशाने दुसऱ्या पाप्याला उसने देतात.
如果你借人钱财,又指望别人偿还,你这样做又有什么不同呢?罪人借钱给其他罪人,也会要求如数归还。
35 ३५ परंतु तुम्ही आपल्या शत्रूंवर प्रीती करा व त्यांचे बरे करा आणि निराश न होता उसने द्या म्हणजे तुमचे प्रतिफळ मोठे होईल व तुम्ही परात्पराचे पुत्र व्हाल कारण तो अनुपकारी व वाईट यांच्यावर तो दया करणारा आहे.
不能这样:要爱你们的敌人,善待他们。借出去的东西不要指望偿还,这样你们才能获得巨大恩赐。你们会成为至高上帝的儿子,因为上帝也会善待不懂得感恩之人和恶人。
36 ३६ जसा तुमचा स्वर्गीय पिता दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू व्हा.”
你们要仁慈,就像你们天父一样仁慈。
37 ३७ “दुसऱ्यांचा न्याय करू नका, म्हणजे तुमचाही न्याय होणार नाही. दुसऱ्यांना दोषी ठरवू नका म्हणजे तुम्हास दोषी ठरवले जाणार नाही. दुसऱ्यांची क्षमा करा म्हणजे तुमचीही क्षमा केली जाईल.
不可评判他人, 否则你也会被他人评判;不可决定他人的罪,否则你也会被定罪;饶恕他人,就会被人饶恕;
38 ३८ द्या म्हणजे तुम्हास दिले जाईल. चांगले माप दाबून, हालवून व शीग भरून तुमच्या पदरी घालतील कारण ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हास परत मापून देण्यात येईल.”
要给予,才会有慷慨回报,而且是加倍的回报。在衡量应该给你多少时,会将其压实,以便可以添加更多,能从顶部溢出,倒在你的腿上!因为你付出多少将决定你得到多少。”
39 ३९ त्याने त्यांना एक दाखला सांगितला, “एक आंधळा दुसऱ्या आंधळ्याला मार्ग दाखवू शकेल काय? ते दोघेही खड्डयात पडणार नाहीत काय?
耶稣又讲了一个比喻:“盲人怎能给盲人领路呢?两个人不都会掉在坑里吗?
40 ४० कोणताही शिष्य त्याच्या गुरुपेक्षा थोर नाही. पण प्रत्येक शिष्य जेव्हा पूर्ण शिकतो तेव्हा तो गुरुसारखाच होतो.
信徒的知识怎能多于老师?只有他们学会了所有知识,才能和老师一样。
41 ४१ स्वतःच्या डोळ्यातील मुसळ ध्यानात न आणता तू आपल्या भावाच्या डोळ्यातील कुसळ का पाहतोस?
为什么你看得见兄弟眼中的灰尘,却看不到自己眼中的木头?
42 ४२ अथवा तू आपल्या डोळ्यातले मुसळ न पाहता आपल्या भावाला कसे म्हणशील की, भाऊ, तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे? अरे ढोंग्या, प्रथम तुझ्या डोळ्यातील मुसळ काढ मगच तुला तुझ्या भावाच्या डोळ्यातील कुसळ काढताना चांगले दिसेल.”
你看不见自己眼中的木头,怎能对你的兄弟说:‘兄弟,让我来把你眼中的灰尘取走’?这是伪君子的行为!要先拿走自己眼中的木头,才能看得清楚,才能取走兄弟眼中的灰尘。
43 ४३ कोणतेही चांगले झाड नाही की जे वाईट फळ देते किंवा कोणतेही वाईट झाड नाही की जे चांगले फळ देते.
因为好树不能结坏果,坏树不能结好果。
44 ४४ कारण प्रत्येक झाड हे त्याच्या फळावरुन ओळखले जाते. लोक काटेरी झुडुपातून अंजीरे गोळा करीत नाहीत तसेच काटेरी झुडुपातून ते द्राक्षे गोळा करीत नाहीत.
你可以根据果子识别树木,不能从荆棘上采无花果,也不能从蒺藜中摘葡萄。
45 ४५ चांगला मनुष्य त्याच्या अंतःकरणात ज्या चांगल्या गोष्टी साठवलेल्या असतात त्याच काढतो आणि दुष्ट मनुष्य त्याच्या अंतःकरणात जे वाईट आहे तेच बाहेर काढतो कारण अंतःकरणात जे भरले आहे तेच मुखावाटे निघणार.
良善之人因为心存善念而做善事,邪恶之人因为心存恶念而做坏事。因为心中所念,口中必言。
46 ४६ “तुम्ही मला ‘प्रभू, प्रभू,’ म्हणता, पण जे मी सांगतो ते तुम्ही का करीत नाही?
为什么你们称我‘主啊!主啊!’却不遵行我的吩咐?
47 ४७ प्रत्येकजण जो माझ्याकडे येतो व माझी वचने ऐकून त्या आज्ञा पाळतो तो कसा आहे हे मी तुम्हास दाखवितो.
让我举个例子:有一个人来到我面前,他听了我的指引并照做。
48 ४८ तो एका घर बांधणाऱ्या मनुष्यासारखा आहे. त्याने खोल खोदले आणि खडकावर पाया बांधला. मग पूर आला आणि पाण्याचा लोंढा घरावर आदळला, पण पाण्याने ते हलले नाही, कारण ते चांगले बांधले होते.
这人就像在建造房屋,深挖地基,把地基建在牢固的岩石上。大水泛滥时,湍流冲刷房屋也不能让它倒塌,因为它建造得很牢固。
49 ४९ पण जो कोणी माझी वचने ऐकतो पण ती पाळीत नाही तो ज्याने आपले घर पाया न घालता जमिनीवर बांधले त्या मनुष्यासारखा आहे, त्या घरावर पाण्याचा लोंढा आदळला आणि ते लागलेच पडले व त्या घराचा मोठा नाश झाला.”
但听到我的教导却不遵守,就好比在沙子上建屋,没有根基,急流一冲就会倒塌,彻底毁坏。”

< लूक 6 >