< लूक 4 >

1 येशू पवित्र आत्म्याने पूर्ण भरून यार्देन नदीहून परतला. मग आत्म्याने त्यास अरण्यात नेले.
さてイエス聖 靈にて滿ち、ヨルダン河より歸り、荒野にて四十 日のあひだ御靈に導かれ、
2 तेथे सैतानाने त्याची चाळीस दिवस परीक्षा घेतली. त्या दिवसात येशूने काहीही खाल्ले नाही आणि ती वेळ संपल्यानंतर येशूला भूक लागली.
惡魔に試みられ給ふ。この間なにをも食はず、日 數 滿ちてのち餓ゑ給ひたれば、
3 तेव्हा सैतान त्यास म्हणाला, जर तू देवाचा पुत्र आहेस तर या दगडाची भाकर हो, अशी आज्ञा कर.
惡魔いふ『なんぢ若し神の子ならば、此の石に命じてパンと爲らしめよ』
4 येशूने त्यास उत्तर दिले, “पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, मनुष्य फक्त भाकरीनेच जगेल असे नाही.”
イエス答へたまふ『「人の生くるはパンのみに由るにあらず」と録されたり』
5 मग सैतान त्यास उंच जागेवर घेऊन गेला आणि एका क्षणांत जगातील सर्व राज्ये त्यास दाखविली.
惡魔またイエスを携へのぼりて、瞬間に天下のもろもろの國を示して言ふ、
6 सैतान त्यास म्हणाला, “मी तुला या सर्व राज्याचे अधिकार व वैभव देईन कारण ते मला दिलेले आहे आणि मी माझ्या मर्जीनुसार ते देऊ शकतो.
『この凡ての權威と國々の榮華とを汝に與へん。我これを委ねられたれば、我が欲する者に與ふるなり。
7 म्हणून जर तू मला नमन करशील आणि माझी उपासना करशील तर हे सर्व तुझे होईल.”
この故にもし我が前に拜せば、ことごとく汝の有となるべし』
8 येशूने उत्तर दिले, “पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे. प्रभू तुझा देव याचीच उपासना कर आणि केवळ त्याचीच सेवा कर.”
イエス答へて言ひたまふ『「主なる汝の神を拜し、ただ之にのみ事ふべし」と録されたり』
9 नंतर सैतानाने येशूला यरूशलेम शहरास नेले आणि परमेश्वराच्या भवनाच्या टोकावर त्यास उभे केले आणि तो त्यास म्हणाला, “जर तू देवाचा पुत्र आहेस तर येथून खाली उडी मार!
惡魔またイエスをエルサレムに連れゆき、宮の頂上に立たせて言ふ『なんぢ若し神の子ならば、此處より己が身を下に投げよ。
10 १० शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘तुझे रक्षण करण्यास तो आपल्या दूतास तुझ्याविषयी आज्ञा करील,
それは「なんぢの爲に御使たちに命じて守らしめ給はん」
11 ११ आणि तुझा पाय दगडावर आपटू नये म्हणून ते तुला आपल्या हातावर झेलून धरतील.’”
「かれら手にて汝をささへ、その足を石に打當つる事なからしめん」と録されたるなり』
12 १२ येशूने उत्तर दिले, “पवित्र शास्त्रात असेही म्हणले आहे; तुझा देव परमेश्वर याची परीक्षा पाहू नकोस.”
イエス答へて言ひたまふ『「主なる汝の神を試むべからず」と云ひてあり』
13 १३ म्हणून सैतानाने प्रत्येक प्रकारे परीक्षा घेण्याचे संपविल्यावर योग्य वेळ येईपर्यंत तो येशूला सोडून गेला.
惡魔あらゆる嘗試を盡してのち、暫くイエスを離れたり。
14 १४ मग पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने येशू गालील प्रांतास परतला आणि त्याच्याविषयीची बातमी सगळीकडे पसरली.
イエス御靈の能力をもてガリラヤに歸り給へば、その聲聞あまねく四方の地に弘る。
15 १५ त्याने त्यांच्या सभास्थानात शिकविले आणि सर्वांनी त्याची स्तुती केली.
かくて諸 會堂にて教をなし、凡ての人に崇められ給ふ。
16 १६ मग जेथे तो लहानाचा मोठा झाला होता त्या नासरेथांत तो आला आणि शब्बाथ दिवशी त्यांच्या प्रथेप्रमाणे सभास्थानात जाऊन ग्रंथ वाचण्यासाठी उभा राहिला,
偖その育てられ給ひし處のナザレに到り、例のごとく安息 日に會堂に入りて、聖書を讀まんとて立ち給ひしに、
17 १७ आणि यशया संदेष्ट्याचा ग्रंथपट त्यास देण्यात आला. त्याने ते पुस्तक उघडले आणि जो भाग शोधून काढला, त्याठिकाणी असे लिहिले आहे,
預言者イザヤの書を與へたれば、其の書を繙きて、かく録されたる所を見出し給ふ。
18 १८ “प्रभूचा आत्मा मजवर आला आहे, कारण, गरिबांना सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला आहे. कैदी म्हणून नेलेल्यांस स्वातंत्र्याची घोषणा करण्यासाठी, आणि आंधळ्यांना दृष्टी पुन्हा मिळावी, ज्यांच्यावर जुलूम झाला आहे त्यांची सुटका करण्यासाठी
『主の御靈われに在す。これ我に油を注ぎて貧しき者に福音を宣べしめ、我をつかはして囚人に赦を得ることと、盲人に見ゆることとを告げしめ、壓へらるる者を放ちて自由を與へしめ、
19 १९ आणि प्रभूच्या कृपेच्या वर्षाची घोषणा करण्यासाठी त्याने मला पाठवले आहे.”
主の喜ばしき年を宣傳へしめ給ふなり』
20 २० मग त्याने ग्रंथपट बंद करून सभास्थानाच्या सेवकाला परत करून तो खाली बसला. सभास्थानातील प्रत्येकजण त्याच्याकडे रोखून पाहत होता.
イエス書を卷き、係の者に返して坐し給へば、會堂に居る者みな之に目を注ぐ。
21 २१ त्याने त्यांच्याशी बोलण्यास सुरुवात केली की, “तुमच्या ऐकण्यामुळे आज हा शास्त्रलेख पूर्ण झाला आहे.”
イエス言ひ出でたまふ『この聖書は今日なんぢらの耳に成就したり』
22 २२ तेव्हा सर्व लोक त्याच्याविषयी साक्ष देऊ लागले आणि त्याच्या मुखातून येणाऱ्या कृपेच्या शब्दांबद्दल ते आश्चर्यचकित झाले आणि ते म्हणाले, हा योसेफाचाच मुलगा नव्हे काय?
人々みなイエスを譽め、又その口より出づる惠の言を怪しみて言ふ『これヨセフの子ならずや』
23 २३ येशू त्यांना म्हणाला, “नक्कीच, तुम्ही मलाही म्हण लागू कराल; हे वैद्या, तू स्वतःलाच बरे कर. कफर्णहूमात ज्या गोष्टी तू केल्याचे आम्ही ऐकले त्या गोष्टी तुझ्या स्वतःच्या गावातसुद्धा कर.” मग तो पुढे म्हणाला,
イエス言ひ給ふ『なんぢら必ず我に俚諺を引きて「醫者よ、みづから己を醫せ、カペナウムにて有りしといふ我らが聞ける事どもを、己が郷なる此の地にても爲せ」と言はん』
24 २४ “मी तुम्हास खरे सांगतो, कोणीही संदेष्टा त्याच्या स्वतःच्या नगरात स्वीकारला जात नाही.
また言ひ給ふ『われ誠に汝らに告ぐ、預言者は己が郷にて喜ばるることなし。
25 २५ मी तुम्हास खरे सांगतो, इस्राएलात एलीयाच्या काळात पुष्कळ विधवा होत्या, जेव्हा साडेतीन वर्षापर्यंत आकाशातून पाऊस पडला नाही आणि सर्व प्रदेशात मोठा दुष्काळ पडला होता.
われ實をもて汝らに告ぐ、エリヤのとき三年 六个月、天とぢて、全地 大なる饑饉なりしが、イスラエルの中に多くの寡婦ありたれど、
26 २६ तरीही एलीयाला इतर कोणत्याही विधवेकडे पाठविण्यात आले नाही. त्यास सिदोन प्रांतातील सारफथ येथील विधवेकडेच पाठविण्यात आले.
エリヤは其の一人にすら遣されず、唯シドンなるサレプタの一人の寡婦にのみ遣されたり。
27 २७ अलीशा संदेष्ट्याच्या वेळेस इस्राएलात अनेक कुष्ठरोगी होते परंतु त्यापैकी कोणीही शुद्ध झाला नाही. केवळ सूरीया येथील नामान कुष्ठरोग्यालाच शुद्ध करण्यात आले होते.”
また預言者エリシヤの時、イスラエルの中に多くの癩病人ありしが、其の一人だに潔められず、唯シリヤのナアマンのみ潔められたり』
28 २८ हे एकूण सभास्थानातील सर्व लोक संतापले.
會堂にをる者みな之を聞きて憤恚に滿ち、
29 २९ ते लोक उठले आणि त्यांनी येशूला शहराबाहेर घालवून दिले आणि ज्या टेकडीवर त्यांचे गाव वसले होते, त्या कड्यावरून त्यास लोटून देण्यास तेथवर नेले.
起ちてイエスを町より逐ひ出し、その町の建ちたる山の崖に引き往きて、投げ落さんとせしに、
30 ३० परंतु तो त्यांच्यातून निघून आपल्या वाटेने गेला.
イエスその中を通りて去り給ふ。
31 ३१ नंतर तो गालील प्रांतातील कफर्णहूम गावी गेला. तो शब्बाथ दिवशी सभास्थानात त्यास शिक्षण देत होता.
かくてガリラヤの町カペナウムに下りて、安息 日ごとに人を教へ給へば、
32 ३२ ते त्याच्या शिकवणीने आश्चर्यचकित झाले, कारण त्याचे बोलणे अधिकारयुक्त असे.
人々その教に驚きあへり。その言、權威ありたるに因る。
33 ३३ त्यादिवशी सभास्थानात, अशुद्ध आत्मा लागलेला एक मनुष्य होता आणि तो मोठ्याने ओरडून म्हणाला,
會堂に穢れし惡鬼の靈に憑かれたる人あり、大聲に叫びて言ふ、
34 ३४ हे नासरेथकर येशू, तू आमच्यामध्ये का पडतोस? तू आमचा नाश करण्यासाठी आला आहेस काय? तू कोण आहेस हे मला माहीत आहे! देवाचा पवित्र! तो तूच आहेस.
『ああ、ナザレのイエスよ、我らは汝となにの關係あらんや。我らを亡さんとて來給ふか。我はなんぢの誰なるを知る、神の聖者なり』
35 ३५ येशूने त्यास धमकावून म्हटले, “शांत राहा आणि त्याच्यातून नीघ!” तेव्हा त्या अशुद्ध आत्म्याने त्या मनुष्यास जमिनीवर खाली पाडले व त्या मनुष्यास काहीही इजा न करता तो त्याच्यातून बाहेर निघाला.
イエス之を禁めて言ひ給ふ『默せ、その人より出でよ』惡鬼その人を人々の中に倒し、傷つけずして出づ。
36 ३६ तेव्हा सर्वजण आश्चर्यचकित झाले व एकमेकांशी बोलू लागले, हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत? अधिकाराने आणि सामर्थ्याने तो अशुद्ध आत्म्याना देखील आज्ञा करतो व ते बाहेर येतात.
みな驚き語り合ひて言ふ『これ如何なる言ぞ、權威と能力とをもて命ずれば、穢れし惡鬼すら出で去る』
37 ३७ अशाप्रकारे त्याच्याविषयीची किर्ती चहुकडील प्रदेशात पसरत गेली.
ここにイエスの噂あまねく四方の地に弘りたり。
38 ३८ येशू सभास्थानातून निघून शिमोनाच्या घरी गेला. शिमोनाची सासू तापाने आजारी होती. त्यांनी तिला बरे करण्याविषयी त्यास विनंती केली.
イエス會堂を立ち出でて、シモンの家に入り給ふ。シモンの外姑おもき熱を患ひ居たれば、人々これが爲にイエスに願ふ。
39 ३९ येशू तिच्याजवळ उभा राहिला व त्याने तापाला धमकावले आणि तिच्यातून ताप निघाला. ताबडतोब उठून ती त्यांची सेवा करू लागली.
その傍らに立ちて熱を責めたまへば、熱 去りて女たちどころに起きて彼らに事ふ。
40 ४० सूर्य मावळत असतांना, निरनिराळ्या रोगांनी आजारी असलेल्या सर्व मनुष्यांना त्याच्याकडे आणले. त्याने प्रत्येकाच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना बरे केले.
日のいる時、さまざまの病を患ふ者をもつ人、みな之をイエスに連れ來れば、一々その上に手を置きて醫し給ふ。
41 ४१ कित्येकांमधून अशुद्ध आत्मे बाहेर आले. ते अशुद्ध आत्मे ओरडत होते आणि म्हणत होते, तू देवाचा पुत्र आहेस. परंतु तो ख्रिस्त आहे हे त्यांना माहिती असल्याने त्याने त्यांना दटावले व काही बोलू दिले नाही.
惡鬼もまた多くの人より出でて叫びつつ言ふ『なんぢは神の子なり』之を責めて物 言ふことを免し給はず、惡鬼そのキリストなるを知るに因りてなり。
42 ४२ दिवस उगवताच, तो एकांत स्थळी गेला. पण लोक त्यास शोधत होते. तो जेथे होता तेथे ते लगेच आले आणि त्यांच्यातून त्याने निघून जाऊ नये म्हणून त्यांनी प्रयत्न केले.
明くる朝イエス出でて寂しき處にゆき給ひしが、群衆たづねて御許に到り、その去り往くことを止めんとせしに、
43 ४३ परंतु तो त्यांना म्हणाला, “देवाच्या राज्याची सुवार्ता मला इतर गावांमध्येही सांगितली पाहिजे कारण याच कारणासाठी मला पाठवले आहे.”
イエス言ひ給ふ『われ又ほかの町々にも神の國の福音を宣傳へざるを得ず、わが遣されしは之が爲なり』
44 ४४ मग तो संपूर्ण यहूदीया प्रांतातील सभास्थानामध्ये उपदेश करीत गेला.
かくてユダヤの諸 會堂にて教を宣べたまふ。

< लूक 4 >