< लूक 3 >
1 १ आता तिबिर्य कैसराच्या कारकिर्दीच्या पंधराव्या वर्षी, जेव्हा पंतय पिलात यहूदीया प्रांताचा शासक होता आणि हेरोद चौथाई गालील प्रांताचा शासक असताना आणि त्याचा भाऊ फिलिप्प हा चौथाई इतुरीया व त्राखोनीती या देशांचा शासक व लूसनिय हा चौथाई अबिलेनेचा शासक होता.
La quinzième année du règne de Tibère César, — Ponce Pilate étant gouverneur de la Judée, Hérode tétrarque de la Galilée, Philippe, son frère, tétrarque de l'Iturée et de la province de la Trachonite, et Lysanias tétrarque de l'Abylène,
2 २ आणि हन्ना व कयफा हे मुख्य याजक लोक होते, तेव्हा अरण्यात देवाचे वचन जखऱ्याचा पुत्र योहान याच्याकडे आले.
Anne et Caïphe étant souverains sacrificateurs, — la parole de Dieu fut adressée à Jean, fils de Zacharie, dans le désert.
3 ३ तो यार्देनेच्या सभोवतालच्या सर्व परिसरात पापांच्या क्षमेसाठी पश्चात्ताप करून बाप्तिस्मा घ्यावा अशी घोषणा करत फिरला.
Alors Jean parcourut toute la contrée voisine du Jourdain, prêchant le baptême de la repentance, pour la rémission des péchés,
4 ४ यशया संदेष्ट्याच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे हे झालेः “रानात घोषणा करणाऱ्याची वाणी झाली ती अशी, ‘परमेश्वराचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा सरळ करा.
ainsi qu'il est écrit dans le livre des paroles du prophète Ésaïe: «Une voix crie dans le désert: Préparez le chemin du Seigneur; aplanissez ses sentiers.
5 ५ प्रत्येक दरी भरली जाईल, आणि प्रत्येक डोंगर व टेकडी सपाट केली जाईल, वांकडी सरळ होतील, आणि खडबडीत मार्ग सपाट केले जातील
Toute vallée sera comblée, toute montagne et toute colline seront abaissées; les chemins tortueux seront redressés, les chemins raboteux seront aplanis;
6 ६ आणि सर्व मनुष्यप्राणी देवाचे तारण पाहतील.’”
et toute créature verra le salut de Dieu.»
7 ७ त्याच्याकडून बाप्तिस्मा करून घेण्यासाठी येणाऱ्या जमावाला योहान म्हणाला; “अहो, विषारी सापाच्या पिलांनो, येणाऱ्या क्रोधापासून सुटका करून घेण्यासाठी तुम्हास कोणी सावध केले?
Il disait donc à la foule qui venait pour être baptisée par lui: Race de vipères, qui vous a appris à fuir la colère à venir?
8 ८ पश्चात्तापास योग्य अशी फळे द्या आणि आपल्या मनात असे म्हणू नका की, ‘अब्राहाम आमच्या पित्यासारखा आहे.’ कारण मी तुम्हास सांगतो की, अब्राहामासाठी या दगडापासून मुले निर्माण करण्यास देव समर्थ आहे.
Produisez donc des fruits dignes d'une vraie repentance! Et n'allez pas dire en vous-mêmes: Nous avons Abraham pour père. Car je vous dis que, de ces pierres. Dieu peut faire naître des enfants à Abraham.
9 ९ आताच झाडांच्या मुळांशी कुऱ्हाड ठेवलेली आहे. म्हणून प्रत्येक झाड जे चांगले फळ देत नाही ते तोडून अग्नीत टाकले जाईल.”
Déjà la cognée est mise à la racine des arbres. Tout arbre qui ne produit pas de bons fruits va être coupé et jeté au feu.
10 १० नंतर जमावातील लोकांनी त्यास विचारले, “आता आम्ही काय करावे?”
Alors la foule lui demanda: Que ferons-nous donc?
11 ११ त्याने उत्तर दिले, “ज्याच्याकडे दोन अंगरखे असतील त्याने ज्याला नाही त्यास एक द्यावा आणि ज्याच्याकडे अन्न आहे त्यानेही तसेच करावे.”
Il leur répondit: Que celui qui a deux tuniques, en donne une à celui qui n'en a point; et que celui qui a de quoi manger agisse de même.
12 १२ काही जकातदारही बाप्तिस्मा करून घ्यावयास आले होते. ते म्हणाले, “गुरुजी, आम्ही काय करावे?”
Il vint aussi des péagers pour être baptisés; et ils lui dirent: Maître, que ferons-nous?
13 १३ तो त्यांना म्हणाला, तुम्हास जे नेमून दिले आहे त्यापेक्षा जास्त पैसे घेऊ नका.
Il leur répondit: N'exigez rien au delà de ce qui vous est ordonné.
14 १४ काही शिपायांनीसुद्धा त्यास विचारून म्हटले, “आणि आमच्या बद्दल काय, आम्ही काय करावे?” तो त्यांना म्हणाला, “कोणाकडून जबरदस्तीने पैसे घेऊ नका, कोणावरही खोटा आरोप करू नका, तुम्हास मिळणाऱ्या पगारात समाधानी राहा.”
Des gens de guerre lui demandèrent aussi: Et nous, que ferons-nous? Il leur répondit: N'usez ni de violence ni de fraude envers personne; mais contentez-vous de votre solde.
15 १५ तेव्हा लोक उत्सुकतेने वाट पाहत असता प्रत्येकजण आपल्या अंतःकरणात हाच ख्रिस्त असेल काय म्हणून विचार करीत असत.
Comme le peuple était dans l'attente, et que tous se demandaient en leur coeur si Jean ne serait pas le Christ,
16 १६ त्या सर्वांना योहानाने उत्तर दिले, “मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो, पण एकजण जो माझ्यापेक्षाही सामर्थ्यशाली आहे तो येत आहे आणि त्याच्या वहाणांचे बंद सोडण्यासही मी पात्र नाही, तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने व अग्नीने करील.
Jean, prenant la parole, dit à tous: Pour moi, je vous baptise d'eau; mais il vient, celui qui est plus puissant que moi! Je ne suis pas digne de délier la courroie de ses chaussures; c'est lui qui vous baptisera d'Esprit saint et de feu.
17 १७ त्याचे खळे अगदी स्वच्छ करायला व गहू त्याच्या कोठारात साठवायला त्याचे सूप त्याच्या हातात आहे, पण तो भूस न विझणाऱ्या अग्नीत जाळून टाकील.”
Il a son van dans sa main, il nettoiera parfaitement son aire et amassera le froment dans son grenier; mais il brûlera la paille au feu qui ne s'éteint point.
18 १८ योहानाने इतर पुष्कळ उत्तेजन देणाऱ्या शब्दांनी त्यांना बोध करून सुवार्ता सांगितली.
Il adressait encore plusieurs autres exhortations au peuple, en lui annonçant la bonne nouvelle.
19 १९ योहानाने चौथाईचा शासक हेरोद याची कानउघडणी केली कारण त्याचे त्याच्या भावाच्या पत्नी हेरोदीया हिच्याशी अनैतिक संबंध होते, तसेच इतर अनेक वाईट गोष्टी त्याने केल्या होत्या.
Mais Hérode le tétrarque, étant repris par Jean au sujet d'Hérodias, femme de son frère, et au sujet de tous les crimes qu'il avait commis,
20 २० हे सर्व करून सुद्धा त्याने आणखी एक दुष्कर्म केले ते म्हणजे त्याने योहानाला तुरुंगात टाकले.
ajouta encore à tous les autres celui de faire mettre Jean en prison.
21 २१ तेव्हा असे झाले की, जेव्हा सर्व लोकांचा बाप्तिस्मा योहानाद्वारे केला जात होता, तेव्हा येशूचा ही बाप्तिस्मा होऊन तो प्रार्थना करीत असता आकाश उघडले गेले.
Or, comme tout le peuple se faisait baptiser, Jésus se fit baptiser, lui aussi. Pendant qu'il priait, le ciel s'ouvrit,
22 २२ आणि पवित्र आत्मा देहरूपाने कबुतराप्रमाणे त्याच्यावर उतरला आणि आकाशातून अशी वाणी झाली की, “तू माझा प्रिय पुत्र आहेस, मी तुझ्याविषयी फार संतुष्ट आहे.”
et le Saint-Esprit descendit sur lui, sous une forme corporelle, comme une colombe; et il vint du ciel une voix qui dit: Tu es mon Fils bien-aimé, en qui j'ai mis toute mon affection!
23 २३ जेव्हा येशूने त्याच्या कार्यास सुरुवात केली तेव्हा तो सुमारे तीस वर्षांचा होता. लोक त्यास योसेफाचा मुलगा समजत. योसेफ एलीचा मुलगा होता
Jésus avait environ trente ans, lorsqu'il commença son ministère. Il était, à ce que l'on croyait, fils de Joseph, fils d'Héli,
24 २४ एली मत्ताथाचा, मत्ताथ लेवीचा, लेवी मल्खीचा, मल्खी यन्रयाचा, यन्रया योसेफाचा मुलगा होता.
fils de Matthat, fils de Lévi, fils de Melchi, fils de Janné, fils de Joseph,
25 २५ योसेफ मत्तिथ्याचा मुलगा होता. मत्तिथ्य अमोसाचा, अमोस नहूमाचा, नहूम हेस्लीचा, हेस्ली नग्गयाचा,
fils de Mattathias, fils d'Amos, fils de Nahum, fils d'Esli, fils de Naggé,
26 २६ नग्गय महथाचा, महथ मत्तिथ्याचा, मत्तिथ्य शिमयीचा, शिमयी योसेखाचा, योसेख योदाचा मुलगा होता.
fils de Maath, fils de Mattathias, fils de Siméin, fils de Josech, fils de Joda,
27 २७ योदा योहानानाचा मुलगा होता. योहानान रेशाचा, रेशा जरूब्बाबेलाचा, जरूब्बाबेल शल्तीएलाचा, शल्तीएल नेरीचा,
fils de Joanan, fils de Rhésa, fils de Zorobabel, fils de Salathiel, fils de Néri,
28 २८ नेरी मल्खीचा, मल्खी अद्दीचा, अद्दी कोसोमाचा, कोसोम एल्मदामाचा, एल्मदाम एराचा,
fils de Melchi, fils d'Addi, fils de Cosam, fils d'Elmadam, fils d'Er,
29 २९ एर येशूचा, येशू अलिएजराचा, अलिएजर योरीमाचा, योरीम मत्ताथाचा, मत्ताथ लेवीचा मुलगा होता.
fils de Jésus, fils d'Éliézer, fils de Jorim, fils de Matthat, fils de Lévi,
30 ३० लेवी शिमोनाचा मुलगा होता. शिमोन यहूदाचा, यहूदा योसेफाचा, योसेफ योनामाचा, योनाम एल्याकीमाचा,
fils de Siméon, fils de Juda, fils de Joseph, fils de Jonam, fils d'Éliakim,
31 ३१ एल्याकीम मल्लयाचा, मल्लया मिन्नाचा, मिन्ना मत्ताथाचा, मत्ताथ नाथानाचा, नाथान दाविदाचा,
fils de Méléa, fils de Menna, fils de Mattatha, fils de Nathan, fils de David,
32 ३२ दावीद इशायाचा, इशाय ओबेदाचा, ओबेद बवाजाचा, बवाज सल्मोनाचा, सल्मोन नहशोनाचा मुलगा होता.
fils de Jessé, fils de Jobed, fils de Booz, fils de Sala, fils de Naasson,
33 ३३ नहशोन अम्मीनादाबाचा मुलगा होता. अम्मीनादाब अदामीनचा, अदामीन अर्णयाचा, अर्णय हेस्रोनाचा, हेस्रोन पेरेसाचा, पेरेस यहूदाचा,
fils d'Aminadab, fils d'Admin, fils d'Arni, fils d'Esrom, fils de Pharez, fils de Juda,
34 ३४ यहूदा याकोबाचा, याकोब इसहाकाचा, इसहाक अब्राहामाचा, अब्राहाम तेरहाचा, तेरह नाहोराचा,
fils de Jacob, fils d'Isaac, fils d'Abraham, fils de Thara, fils de Nachor,
35 ३५ नाहोर सरुगाचा, सरुग रऊचा, रऊ पेलेगाचा, पेलेग एबराचा, एबर शेलहाचा मुलगा होता.
fils de Séruch, fils de Ragaù, fils de Phalek, fils de Héber, fils de Sala,
36 ३६ शेलह केनानाचा मुलगा होता. केनान अर्पक्षदाचा, अर्पक्षद शेमाचा, शेम नोहाचा, नोहा लामेखाचा,
fils de Caïnam, fils d'Arphaxad, fils de Sem, fils de Noé, fils de Lamech,
37 ३७ लामेख मथुशलहाचा, मथुशलह हनोखाचा, हनोख यारेदाचा, यारेद महललेलाचा, महललेल केनानाचा,
fils de Mathusala, fils d'Hénoch, fils de Jared, fils de Maléléel, fils de Caïnam,
38 ३८ केनान अनोशाचा, अनोश शेथाचा, शेथ आदामाचा, आदाम देवाचा पुत्र होता.
fils d'Énos, fils de Seth, fils d'Adam, fils de Dieu.