< लूक 23 >

1 मग त्यांचा सर्व समुदाय उठला व त्यांनी येशूला पिलाताकडे नेले.
ततः सभास्थाः सर्व्वलोका उत्थाय तं पीलातसम्मुखं नीत्वाप्रोद्य वक्तुमारेभिरे,
2 व ते त्याच्यावर आरोप करू लागले. ते म्हणाले, “आम्ही या मनुष्यास लोकांची दिशाभूल करताना पकडले. तो कैसराला कर देण्यासाठी विरोध करतो आणि म्हणतो की, तो स्वतः ख्रिस्त, एक राजा आहे.”
स्वमभिषिक्तं राजानं वदन्तं कैमरराजाय करदानं निषेधन्तं राज्यविपर्य्ययं कुर्त्तुं प्रवर्त्तमानम् एन प्राप्ता वयं।
3 मग पिलाताने येशूला विचारले, तू यहूद्यांचा राजा आहेस काय? येशू म्हणाला, “आपण म्हणता तसेच.”
तदा पीलातस्तं पृष्टवान् त्वं किं यिहूदीयानां राजा? स प्रत्युवाच त्वं सत्यमुक्तवान्।
4 मग पिलात मुख्य याजकांना आणि जमावाला म्हणाला, या मनुष्यावर दोष ठेवण्यास मला काही कारण आढळत नाही.
तदा पीलातः प्रधानयाजकादिलोकान् जगाद्, अहमेतस्य कमप्यपराधं नाप्तवान्।
5 पण त्यांनी आग्रह धरला. ते म्हणाले, “यहूदीया प्रांतातील सर्व लोकांस तो आपल्या शिकवणीने चिथावित आहे, त्याने गालील प्रांतापासून सुरुवात केली आणि येथपर्यंत आला आहे.”
ततस्ते पुनः साहमिनो भूत्वावदन्, एष गालील एतत्स्थानपर्य्यन्ते सर्व्वस्मिन् यिहूदादेशे सर्व्वाल्लोकानुपदिश्य कुप्रवृत्तिं ग्राहीतवान्।
6 पिलाताने हे ऐकले, तेव्हा त्याने विचारले की, “हा मनुष्य गालील प्रांताचा आहे काय?”
तदा पीलातो गालीलप्रदेशस्य नाम श्रुत्वा पप्रच्छ, किमयं गालीलीयो लोकः?
7 जेव्हा त्यास समजले की, येशू हेरोदाच्या अधिकाराखाली येतो, तेव्हा त्याने त्यास हेरोदाकडे पाठवले. तो त्या दिवसात यरूशलेम शहरामध्येच होता.
ततः स गालील्प्रदेशीयहेरोद्राजस्य तदा स्थितेस्तस्य समीपे यीशुं प्रेषयामास।
8 हेरोदाने येशूला पाहिले तेव्हा त्यास फार आनंद झाला, कारण त्याने त्याजविषयी ऐकले होते व त्यास असे वाटत होते की, तो एखादा चमत्कार करील व आपल्याला तो बघायला मिळेल अशी आशा त्यास होती.
तदा हेरोद् यीशुं विलोक्य सन्तुतोष, यतः स तस्य बहुवृत्तान्तश्रवणात् तस्य किञि्चदाश्चर्य्यकर्म्म पश्यति इत्याशां कृत्वा बहुकालमारभ्य तं द्रष्टुं प्रयासं कृतवान्।
9 त्याने येशूला अनेक प्रश्न विचारले, पण येशूने त्यास उत्तर दिले नाही.
तस्मात् तं बहुकथाः पप्रच्छ किन्तु स तस्य कस्यापि वाक्यस्य प्रत्युत्तरं नोवाच।
10 १० मुख्य याजक लोक आणि नियमशास्त्राचे शिक्षक तेथे उभे राहून त्याच्याविरुध्द जोरदारपणे आरोप करीत होते.
अथ प्रधानयाजका अध्यापकाश्च प्रोत्तिष्ठन्तः साहसेन तमपवदितुं प्रारेभिरे।
11 ११ हेरोदाने त्याच्या शिपायांसह येशूला अपमानास्पद वागणूक दिली, त्याची थट्टा केली. त्यांनी त्याच्यावर एक तलम झगा घातला व त्यास पिलाताकडे परत पाठवले.
हेरोद् तस्य सेनागणश्च तमवज्ञाय उपहासत्वेन राजवस्त्रं परिधाप्य पुनः पीलातं प्रति तं प्राहिणोत्।
12 १२ त्याच दिवशी हेरोद आणि पिलात एकमेकांचे मित्र बनले त्यापुर्वी ते एकमेकांचे वैरी होते.
पूर्व्वं हेरोद्पीलातयोः परस्परं वैरभाव आसीत् किन्तु तद्दिने द्वयो र्मेलनं जातम्।
13 १३ पिलाताने मुख्य याजक लोक, पुढारी आणि लोकांस एकत्र बोलावले.
पश्चात् पीलातः प्रधानयाजकान् शासकान् लोकांश्च युगपदाहूय बभाषे,
14 १४ “हा मनुष्य लोकांस फितवणारा म्हणून याला तुम्ही माझ्याकडे आणले; आणि पहा, ज्या गोष्टींचा आरोप तुम्ही याच्यावर ठेवता त्यासंबंधी मी तुमच्यासमक्ष चौकशी केल्यावर मला या मनुष्याकडे काहीही दोष सापडला नाही.
राज्यविपर्य्ययकारकोयम् इत्युक्त्वा मनुष्यमेनं मम निकटमानैष्ट किन्तु पश्यत युष्माकं समक्षम् अस्य विचारं कृत्वापि प्रोक्तापवादानुरूपेणास्य कोप्यपराधः सप्रमाणो न जातः,
15 १५ हेरोदालाही आरोपाविषयी काहीही आधार सापडला नाही कारण त्याने त्यास परत आमच्याकडे आणले आहे. तुम्हीही पाहू शकता की, मरणाची शिक्षा देण्यास योग्य असे त्याने काहीही केलेले नाही.
यूयञ्च हेरोदः सन्निधौ प्रेषिता मया तत्रास्य कोप्यपराधस्तेनापि न प्राप्तः।पश्यतानेन वधहेेतुकं किमपि नापराद्धं।
16 १६ म्हणून मी याला फटके मारून सोडून देतो.”
तस्मादेनं ताडयित्वा विहास्यामि।
17 १७ कारण त्यास त्या सणात त्यांच्याकरिता एकाला सोडावे लागत असे.
तत्रोत्सवे तेषामेको मोचयितव्यः।
18 १८ पण ते सर्व एकत्र मोठ्याने ओरडले, “या मनुष्यास ठार करा! आणि आम्हासाठी बरब्बाला सोडा!”
इति हेतोस्ते प्रोच्चैरेकदा प्रोचुः, एनं दूरीकृत्य बरब्बानामानं मोचय।
19 १९ बरब्बाने शहरात खळबळ माजवली होती. त्याने काही लोकांस ठारही केले होते, त्यामुळे त्यास तुरुंगात टाकले होते.
स बरब्बा नगर उपप्लववधापराधाभ्यां कारायां बद्ध आसीत्।
20 २० मग पिलात येशूला सोडण्याची इच्छा धरून फिरून त्यांच्याशी बोलला.
किन्तु पीलातो यीशुं मोचयितुं वाञ्छन् पुनस्तानुवाच।
21 २१ पण ते ओरडतच राहिले, “त्याला वधस्तंभावर खिळा, त्यास वधस्तंभावर खिळा!”
तथाप्येनं क्रुशे व्यध क्रुशे व्यधेति वदन्तस्ते रुरुवुः।
22 २२ पिलात तिसऱ्यांदा त्यांना म्हणाला, “का? या मनुष्याने असा कोणता गुन्हा केला आहे? मरणाची शिक्षा देण्यायोग्य असे मला याच्याविरुद्ध काहीही आढळले नाही. यास्तव मी याला फटक्याची शिक्षा सांगून सोडून देतो.”
ततः स तृतीयवारं जगाद कुतः? स किं कर्म्म कृतवान्? नाहमस्य कमपि वधापराधं प्राप्तः केवलं ताडयित्वामुं त्यजामि।
23 २३ पण याला वधस्तंभावर खिळाच असा त्यांनी मोठ्याने ओरडून आग्रह चालविला आणि त्यांच्या ओरडण्याला यश आले.
तथापि ते पुनरेनं क्रुशे व्यध इत्युक्त्वा प्रोच्चैर्दृढं प्रार्थयाञ्चक्रिरे;
24 २४ तेव्हा पिलाताने त्यांच्या मागण्याप्रमाणे व्हावे असे ठरवले.
ततः प्रधानयाजकादीनां कलरवे प्रबले सति तेषां प्रार्थनारूपं कर्त्तुं पीलात आदिदेश।
25 २५ जो मनुष्य दंगा आणि खून यासाठी तुरुंगात टाकला गेला होता व ज्याची त्यांनी मागणी केली होती त्यास त्याने सोडून दिले. पिलाताने त्यांच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी येशूला त्यांच्या हाती दिले.
राजद्रोहवधयोरपराधेन कारास्थं यं जनं ते ययाचिरे तं मोचयित्वा यीशुं तेषामिच्छायां समार्पयत्।
26 २६ ते त्यास घेऊन जात असताना, कुरेनेकर शिमोन नावाचा कोणीएक शेतावरून येत होता त्यांनी त्यास धरले व त्याने येशूच्या मागे चालून वधस्तंभ वाहावा म्हणून तो त्याच्यावर ठेवला.
अथ ते यीशुं गृहीत्वा यान्ति, एतर्हि ग्रामादागतं शिमोननामानं कुरीणीयं जनं धृत्वा यीशोः पश्चान्नेतुं तस्य स्कन्धे क्रुशमर्पयामासुः।
27 २७ लोकांचा व स्त्रियांचा मोठा समुदाय त्याच्यामागे चालला, त्या स्त्रिया त्याच्यासाठी ऊर बडवून शोक करीत होत्या.
ततो लोाकारण्यमध्ये बहुस्त्रियो रुदत्यो विलपन्त्यश्च यीशोः पश्चाद् ययुः।
28 २८ येशू त्यांच्याकडे वळून म्हणाला, “यरूशलेमच्या कन्यांनो, माझ्यासाठी रडू नका, तर आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या मुलांबाळांसाठी रडा.
किन्तु स व्याघुट्य ता उवाच, हे यिरूशालमो नार्य्यो युयं मदर्थं न रुदित्वा स्वार्थं स्वापत्यार्थञ्च रुदिति;
29 २९ कारण असे दिवस येत आहेत, जेव्हा लोक म्हणतील, धन्य त्या स्त्रिया ज्या वांझ आहेत आणि धन्य ती गर्भाशये, ज्यांनी जन्मदिले नाहीत व धन्य ती स्तने, ज्यांनी कधी पाजले नाही.
पश्यत यः कदापि गर्भवत्यो नाभवन् स्तन्यञ्च नापाययन् तादृशी र्वन्ध्या यदा धन्या वक्ष्यन्ति स काल आयाति।
30 ३० तेव्हा ‘ते पर्वतास म्हणतील, आम्हावर पडा आणि ते टेकड्यांस म्हणतील. आम्हास झाका’
तदा हे शैला अस्माकमुपरि पतत, हे उपशैला अस्मानाच्छादयत कथामीदृशीं लोका वक्ष्यन्ति।
31 ३१ ओल्या झाडाला असे करतात तर वाळलेल्यांचे काय?”
यतः सतेजसि शाखिनि चेदेतद् घटते तर्हि शुष्कशाखिनि किं न घटिष्यते?
32 ३२ आणि दुसरे दोघे जण अपराधी होते त्यांनाही त्यांनी त्याच्याबरोबर जिवे मारण्यास नेले.
तदा ते हन्तुं द्वावपराधिनौ तेन सार्द्धं निन्युः।
33 ३३ आणि जेव्हा ते गुन्हेगारांसमवेत “कवटी” म्हटलेल्या ठिकाणी आले, तेथे त्यांनी त्यास व त्या अपराध्यांस, एकाला त्याच्या उजवीकडे व एकाला डावीकडे असे वधस्तंभावर खिळले.
अपरं शिरःकपालनामकस्थानं प्राप्य तं क्रुशे विविधुः; तद्द्वयोरपराधिनोरेकं तस्य दक्षिणो तदन्यं वामे क्रुशे विविधुः।
34 ३४ नंतर येशू म्हणाला, “हे पित्या, त्यांची क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही.” त्यांनी चिठ्ठ्या टाकून त्याचे कपडे वाटून घेतले.
तदा यीशुरकथयत्, हे पितरेतान् क्षमस्व यत एते यत् कर्म्म कुर्व्वन्ति तन् न विदुः; पश्चात्ते गुटिकापातं कृत्वा तस्य वस्त्राणि विभज्य जगृहुः।
35 ३५ लोक तेथे पाहत उभे होते आणि पुढारी थट्टा करून म्हणाले, त्याने दुसऱ्यांना वाचवले, जर तो ख्रिस्त, देवाचा निवडलेला असेल तर त्याने स्वतःला वाचवावे!
तत्र लोकसंघस्तिष्ठन् ददर्श; ते तेषां शासकाश्च तमुपहस्य जगदुः, एष इतरान् रक्षितवान् यदीश्वरेणाभिरुचितो ऽभिषिक्तस्त्राता भवति तर्हि स्वमधुना रक्षतु।
36 ३६ शिपायांनीही त्याची थट्टा केली. ते त्याच्याकडे आले आणि त्यांनी त्यास आंब दिली.
तदन्यः सेनागणा एत्य तस्मै अम्लरसं दत्वा परिहस्य प्रोवाच,
37 ३७ आणि ते म्हणाले, “जर तू यहूद्यांचा राजा आहेस तर स्वतःला वाचव!”
चेत्त्वं यिहूदीयानां राजासि तर्हि स्वं रक्ष।
38 ३८ त्याच्यावर असे लिहिले होते “हा यहूदी लोकांचा राजा आहे.”
यिहूदीयानां राजेति वाक्यं यूनानीयरोमीयेब्रीयाक्षरै र्लिखितं तच्छिरस ऊर्द्ध्वेऽस्थाप्यत।
39 ३९ तेथे खिळलेल्या एका गुन्हेगाराने त्याची निंदा केली. तो म्हणाला, तू ख्रिस्त नाहीस काय? स्वतःला व आम्हासही वाचव!
तदोभयपार्श्वयो र्विद्धौ यावपराधिनौ तयोरेकस्तं विनिन्द्य बभाषे, चेत्त्वम् अभिषिक्तोसि तर्हि स्वमावाञ्च रक्ष।
40 ४० पण दुसऱ्या गुन्हेगाराने त्यास दटावले आणि म्हणाला, “तुला देवाचे भय नाही का? तुलाही तीच शिक्षा झाली आहे.
किन्त्वन्यस्तं तर्जयित्वावदत्, ईश्वरात्तव किञ्चिदपि भयं नास्ति किं? त्वमपि समानदण्डोसि,
41 ४१ पण आपली शिक्षा योग्य आहे कारण आपण जे केले त्याचे योग्य फळ आपणास मिळत आहे. पण या मनुष्याने काहीही अयोग्य केले नाही.”
योग्यपात्रे आवां स्वस्वकर्म्मणां समुचितफलं प्राप्नुवः किन्त्वनेन किमपि नापराद्धं।
42 ४२ नंतर तो म्हणाला, “येशू, तू आपल्या राज्यात येशील तेव्हा माझी आठवण कर.”
अथ स यीशुं जगाद हे प्रभे भवान् स्वराज्यप्रवेशकाले मां स्मरतु।
43 ४३ येशू त्यास म्हणाला, “मी तुला खरे सांगतो, आज तू मजबरोबर सुखलोकात असशील.”
तदा यीशुः कथितवान् त्वां यथार्थं वदामि त्वमद्यैव मया सार्द्धं परलोकस्य सुखस्थानं प्राप्स्यसि।
44 ४४ त्यावेळी जवळ जवळ दुपारचे बारा वाजले होते आणि तीन वाजेपर्यंत सर्व प्रदेशावर अंधार पडला. त्यादरम्यान सूर्य प्रकाशला नाही.
अपरञ्च द्वितीययामात् तृतीययामपर्य्यन्तं रवेस्तेजसोन्तर्हितत्वात् सर्व्वदेशोऽन्धकारेणावृतो
45 ४५ आणि परमेश्वराच्या भवनातील पडदा मधोमध फाटला आणि त्याचे दोन भाग झाले.
मन्दिरस्य यवनिका च छिद्यमाना द्विधा बभूव।
46 ४६ येशू मोठ्या आवाजात ओरडला, “पित्या, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो.” असे बोलून त्याने प्राण सोडून दिला.
ततो यीशुरुच्चैरुवाच, हे पित र्ममात्मानं तव करे समर्पये, इत्युक्त्वा स प्राणान् जहौ।
47 ४७ जेव्हा रोमी शताधीपतीने काय घडले ते पाहिले तेव्हा त्याने देवाचे गौरव केले आणि म्हणाला, “खरोखर हा नीतिमान मनुष्य होता.”
तदैता घटना दृष्ट्वा शतसेनापतिरीश्वरं धन्यमुक्त्वा कथितवान् अयं नितान्तं साधुमनुष्य आसीत्।
48 ४८ हे दृष्य पाहण्यासाठी जमलेल्या लोकांनी घडलेल्या गोष्टी पाहिल्या, तेव्हा ते छाती बडवीत परत गेले.
अथ यावन्तो लोका द्रष्टुम् आगतास्ते ता घटना दृष्ट्वा वक्षःसु कराघातं कृत्वा व्याचुट्य गताः।
49 ४९ परंतु त्याच्या ओळखीचे सर्वजण हे पाहण्यासाठी दूर उभे राहिले. त्यामध्ये गालील प्रांताहून त्याच्यामागे आलेल्या स्त्रियाही होत्या.
यीशो र्ज्ञातयो या या योषितश्च गालीलस्तेन सार्द्धमायातास्ता अपि दूरे स्थित्वा तत् सर्व्वं ददृशुः।
50 ५० तेथे योसेफ नावाचा एक मनुष्य होता. तो यहूदी सभेचा सभासद व चांगला आणि नीतिमान मनुष्य होता.
तदा यिहूदीयानां मन्त्रणां क्रियाञ्चासम्मन्यमान ईश्वरस्य राजत्वम् अपेक्षमाणो
51 ५१ त्याने त्याच्या कामाला व विचारला संमती दिली नव्हती. तो यहूदीया प्रांतातील अरिमथाई नगराचा होता. तो देवाच्या राज्याची वाट पाहत होता.
यिहूदिदेशीयो ऽरिमथीयनगरीयो यूषफ्नामा मन्त्री भद्रो धार्म्मिकश्च पुमान्
52 ५२ हा मनुष्य पिलाताकडे गेला आणि त्याने येशूचे शरीर मागितले.
पीलातान्तिकं गत्वा यीशो र्देहं ययाचे।
53 ५३ ते त्याने वधस्तंभावरुन खाली काढले आणि तागाच्या वस्त्रात गुंडाळले. नंतर ते खडकात खोदलेल्या कबरेत ठेवले. ही कबर अशी होती की, जिच्यात तोपर्यंत कोणालाही ठेवले नव्हते.
पश्चाद् वपुरवरोह्य वाससा संवेष्ट्य यत्र कोपि मानुषो नास्थाप्यत तस्मिन् शैले स्वाते श्मशाने तदस्थापयत्।
54 ५४ तो तयारीचा दिवस होता आणि शब्बाथ सुरु होणार होता.
तद्दिनमायोजनीयं दिनं विश्रामवारश्च समीपः।
55 ५५ गालील प्रांताहून येशूबरोबर आलेल्या स्त्रिया योसेफाच्या मागे गेल्या. त्यांनी ती कबर व तिच्यामध्ये ते शरीर कसे ठेवले ते पाहिले.
अपरं यीशुना सार्द्धं गालील आगता योषितः पश्चादित्वा श्मशाने तत्र यथा वपुः स्थापितं तच्च दृष्ट्वा
56 ५६ नंतर त्या घरी गेल्या व त्यांनी सुगंधी मसाले आणि लेप तयार केला. शब्बाथ दिवशी त्यांनी आज्ञेप्रमाणे विसावा घेतला.
व्याघुट्य सुगन्धिद्रव्यतैलानि कृत्वा विधिवद् विश्रामवारे विश्रामं चक्रुः।

< लूक 23 >