< लूक 22 >

1 नंतर बेखमीर भाकरीचा सण ज्याला वल्हांडण म्हणतात, तो जवळ आला.
Na wo nyori, duklume ma ci ca cari to yoten diker kunkar wiyeu, ci cuwoti yabkau dadom.
2 मुख्य याजक लोक आणि नियमशास्त्राचे शिक्षक, येशूला कसे मारता येईल या बाबतीत चर्चा करीत होते कारण त्यांना लोकांची भीती वाटत होती.
Liyab wabebo kange nob mulangkabo, cin mwerkan dor, na ci fiya ci twalum Yeecu, La ci nuwa tai nibeti.
3 तेव्हा बारा प्रेषितांपैकी एकात, म्हणजे यहूदात इस्कर्योतामध्ये सैतान शिरला.
La bwekelkele dokenmor Yahuda Iccariyati, wo wiin mor kwob culombo yobeu.
4 यहूदा मुख्य याजक लोक व परमेश्वराच्या भवनाचे अधिकारी यांच्याकडे गेला आणि त्यांच्या हाती येशूला कसे धरुन देता येईल याविषयीची बोलणी केली.
Yahuda ya Liyab wabebo kange nabarub kwenebo nin, cin tokkangi kambo ca miyam Yeecu ti cineneu.
5 त्यांना फार आनंद झाला व त्यांनी त्यास पैसे देण्याचे मान्य केले.
Cin bilangi, takeu cin ciya ciyan ne co kyemer.
6 म्हणून त्याने संमती दर्शविली आणि तो येशूला गर्दी नसेल तेव्हा धरुन त्यांच्या हाती देण्याची संधी शोधू लागला.
Con ciya, La co do nurewo ca nekeng co ti cinen neu wo kebo tiber nubereu.
7 बेखमीर भाकरीचा सण, ज्या दिवशी वल्हांडणाचे कोकरु मारावयाचे तो दिवस आला.
8 तेव्हा त्याने पेत्र व योहान यांना सांगून पाठवले की, “जा आणि आपणासाठी वल्हांडण सणाचे भोजन तयार करा म्हणजे आपण ते खाऊ.”
Nyori Yecu twom Bituru kange yuwana, yici ti, “kom ya ko ka bati cari yabka ko, wo ba catiye.
9 पेत्र व योहान येशूला म्हणाले, “आम्ही त्याची तयारी कोठे करावी अशी तुमची इच्छा आहे?”
Cin yii co, “Fee mu cwiti nyo ka bati cuwe?”
10 १० तो त्यांना म्हणाला, “तुम्ही नगरात प्रवेश कराल तेव्हा पाण्याचे भांडे घेऊन जाणारा एक मनुष्य तुम्हास भेटेल. तो ज्या घरात जाईल तेथे जा.
Con ciya ci, “to no kom doken cinar lor di, kange wabkan nii kangetum ki tabwir mwenger, ko bwanten co luwe ca domtiye.
11 ११ आणि त्या घरमालकास सांगा, ‘गुरुजींनी तुम्हास विचारले आहे की, माझ्या शिष्यांसह वल्हांडण सणाचे भोजन करता येईल ती पाहुण्यांची खोली कोठे आहे?’
“Ko yii nii luwe kom ki, “nii meranka yinen “fe ku fabubeu, fiye ma cam cari ti kange bi bei tomange me?”
12 १२ तो मनुष्य तुम्हास माडीवरील सजविलेली खोली दाखवील तेथे तयारी करा.”
Can nung kimen kuwe dur ywelum ywela dii. Kom ka batiyo wi.
13 १३ तेव्हा पेत्र व योहान तेथून निघाले. जसे येशूने सांगितले तसेच सर्व घडले तेव्हा त्यांनी वल्हांडणाच्या भोजनाची तयारी केली.
La cin ya, cin fiya dong-dong na wo co yii ciye, cin kam bati cari yabkako.
14 १४ वेळ झाली तेव्हा येशू त्याच्या प्रेषितांसह भोजनास बसला.
Fiya ca ka cariko lam, con yiken kange bi bei tomange ceu.
15 १५ तो त्यांना म्हणाला, “मी दुःख भोगण्यापूर्वी तुमच्याबरोबर वल्हांडण सणाचे भोजन घ्यावे अशी माझी फार इच्छा होती.
Con yii ci, “mi dilanti ducce nan ca corito wo kange kom, nyim re nan nuwa, dotange.
16 १६ कारण मी तुम्हास सांगतो की, देवाच्या राज्यात हे परिपूर्ण होईपर्यंत मी पुन्हा हे भोजन करणार नाही.”
min yi kom, “ma ma cati tak yaken ciko bi diye Liyar kwama a dim tiye.
17 १७ नंतर येशूने पेला घेऊन व उपकारस्तुती करून तो म्हणाला, “हा घ्या आणि आपसात याची वाटणी करा.
Yeecu tu kweleu, bwikoko ca ne buka kange ri, cin tiki, “tu wo na kom tikangum bwiti kime.
18 १८ कारण मी तुम्हास सांगतो की, देवाचे राज्य येईपर्यंत यापुढे मी द्राक्षरस घेणार नाही.”
Min yi kom man ma no mwem bi tutti ti tak yaken ciko bi diye Liyar kwamaro a boutiye,
19 १९ नंतर त्याने भाकर घेऊन व उपकारस्तुती करून ती मोडली आणि त्यांना देऊन म्हटले, “हे माझे शरीर आहे जे तुम्हासाठी दिले जात आहे. माझ्या आठवणीसाठी हे करा.”
Yeecu tu carito bwiko ca bu kange ri con wulangum cin neci, yi ci ti, “wo bwimi ci ne komme, ko ma wo na bulanka mi ko ce.
20 २० त्याचप्रमाणे त्यांचे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेतला आणि म्हणाला, “हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे, जो तुमच्यासाठी ओतला जात आहे.
Cin tu kweleu bwiko cariko, con toki, “kwele wo na norro fwir ceu, bwiyale mi wo ci a corti ker kimereu.
21 २१ परंतु पाहा! माझा विश्वासघात करणाऱ्याचा हात माझ्याबरोबरच मेजावर आहे.
Dii ko ti yora, kang niwo ko a miye, ye tiye wii kange mo fiye caka cari.
22 २२ कारण मनुष्याचा पुत्र ठरल्याप्रमाणे जातो खरा पण ज्याच्या हातून तो धरून दिला जातो त्या मनुष्याची केवढी दुर्दशा होणार.”
Bi bwe nifire an cu na wo ci yowe. La kwannen mo nii wo ma miye tiyeu.
23 २३ आणि ते आपापसात एकमेकाला प्रश्न विचारु लागले, “हे करणारा आपणापैकी कोण असावा?”
La cin yoten ci ti tokkangi bwitici we nii curo a miye co tiye.
24 २४ तसेच, त्यांच्यामध्ये अशासंबंधी वाद निर्माण झाला की, त्यांच्यामध्ये सर्वांत मोठा कोण आहे.
Kwalkange kwenu more ciye dor, we nii na dure.
25 २५ तेव्हा त्याने त्यांना म्हटले, “परराष्ट्रीयांचे राजे त्यांच्यावर प्रभूत्व करतात आणि जे त्यांच्यावर अधिकार गाजवतात त्यांना ते परोपकारी असे वाटतात.
Con yi ci, Liyab nubo nyombo kwama, teluwe dor cir kange buro ki bi kwang kere dor cireu, ciki cuwo ci ki nubo ma dikero keng tiye.
26 २६ परंतु तुम्ही तसे नाही. त्याऐवजी तुमच्यातील सर्वांत मोठा असलेल्याने सर्वांत लहान व्हावे व जो अधिकारी आहे त्याने सेवक व्हावे.
Mani a yilati nyo kange kom, nyori nii wo na dur more kime ri a yilam bwe biduware, kange nii wo yori La gwammeu, a yilam canga.
27 २७ तेव्हा मोठा कोण जो मेजावर बसतो तो की जो सेवा करतो तो? जो मेजावर बसतो तो नाही का? परंतु मी तुम्हामध्ये सेवा करणाऱ्यासारखा आहे.
Nyori wo na dur gwammeu, co ci yime kaka na wo canga makimen nangen tiye?
28 २८ परंतु माझ्या परीक्षेमध्ये माझ्या पाठीशी उभे राहिलेले असे तुम्हीच आहात.
Kimeu kom kange mo, cuwa mik.
29 २९ ज्याप्रमाणे माझ्या पित्याने माझी नियुक्ती केली तशी मी तुमची नियुक्ति राज्यावर करतो.
Min yoti kom dor liyarek na wo temi yoti ye dor Liyareu,
30 ३० म्हणून तुम्ही माझ्या राज्यात माझ्या मेजावर खावे व प्यावे आणि आसनावर बसून इस्राएलाच्या बारा वंशाचा न्याय करावा.
na ko ca, nako no kange mo, mor Liyare mi, kom yi kutile dumbo kwob culombo yob wo Iciraila ceu.
31 ३१ शिमोना, शिमोना, ऐक! सैतानाने तुम्हास गव्हासारखे चाळावे म्हणून मागितले आहे.
Siman, siman, bulangi, Bwekelkele do a neco mo, na co kwom nen na bi kate.
32 ३२ परंतु शिमोना, तुझा विश्वास ढळू नये, म्हणून मी तुझ्यासाठी प्रार्थना केली आहे आणि तू पुन्हा माझ्याकडे वळलास म्हणजे तुझ्या भावांस स्थिर कर.”
Min kwob mwen dilo bilenkere mwe a yarde, no mo yilau tak ri, ne keb mwebo be kwamer.
33 ३३ परंतु शिमोन पेत्र त्यास म्हणाला, “प्रभू, मी तुझ्याबरोबर तुरुंगात जाण्यासाठी व मरण्यासाठी तयार आहे.”
Bituru yi co, “teluwe min kam bati man ya kange mo Fucina kange bwar.
34 ३४ पण येशू म्हणाला, “पेत्रा, मी तुला सांगतो, तू मला ओळखतोस हे तीन वेळा नाकारशील तोपर्यंत आज कोंबडा आरवणार नाही.”
Yeecu yi co, “min yii neng Bituru, fiya na bicake mob kiyange ri, mwan ko nyomka mik kiriti taar.
35 ३५ येशू शिष्यांना म्हणाला, “जेव्हा मी तुम्हास थैली, पिशवी व वहाणांशिवाय पाठवले, तेव्हा तुम्हास काही कमी पडले का?” ते म्हणाले, “काहीही नाही.”
La Yeecu yi ci, “Fiyo cuwo ma twom kom, man ki Liinge, cwaye kime kange tau, ye ka fiya be? Cin ciya co, “Mani”
36 ३६ तो त्यांना म्हणाला, “पण आता, ज्याच्याजवळ थैली आहे त्याने ती घ्यावी व त्याने पिशवीसुद्धा घ्यावी आणि ज्याच्याजवळ तलवार नाही त्याने आपला झगा विकावा आणि ती विकत घ्यावी.
La con yi ci, “caneko, wo ki cwaye kimere ca tu, kange cwaye kulene. Wo man ki yari ca miyem belle ce ca tiyenu.
37 ३७ मी तुम्हास सांगतो, तो अपराध्यांत गणलेला होता, असा जो शास्त्रलेख आहे तो माझ्याठायी पूर्ण झाला पाहिजे कारण माझ्या विषयीच्या गोष्टी पूर्ण होत आहेत.”
Mi yii komti, “dike mulangum dor mire an dim.
38 ३८ ते म्हणाले, “प्रभू, पहा, येथे दोन तलवारी आहेत.” तो त्यांना म्हणाला, “तेवढे पुरे!”
La cin yi co ki, “teluwe, to kero kange wo yob”. Con yi ci, “La dim”.
39 ३९ मग तो निघून आपल्या रीतीप्रमाणे जैतूनाच्या डोंगराकडे गेला व शिष्यही त्याच्या मागोमाग गेले.
Yecu cu bang zaitun na wo ciki mare, bi bei tomange ce bwanten co.
40 ४० तेव्हा त्याठिकाणी आल्यावर त्याने त्यांना म्हटले, “तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा.”
La ci Lamri, Yecu yi ci, “kom kwob dilo kati kom doken mor cuwaka.
41 ४१ तो त्यांच्यापासून दगडाच्या टप्प्याइतका दूर गेल्यानंतर त्याने गुडघे टेकले आणि अशी प्रार्थना केली,
Con dubam ci kutanbo yora, con cunken bitine, kwob dilo,
42 ४२ “पित्या, जर तुझी इच्छा असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर. तरी माझ्या इच्छेप्रमाणे नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.”
ki. “Te no mun ciya ri, tum kwele wo minen, kebo cwika mik, womweu a mani.
43 ४३ स्वर्गातून एक देवदूत आला व तो त्यास सामर्थ्य देत राहिला
La bi bwe tomange kwama wusake cerkangu dii cinen, neco bikwanti.
44 ४४ दु: खाने ग्रासलेला असतांना त्याने अधिक कळकळीने प्रार्थना केली आणि त्याचा घाम रक्ताच्या थेंबासारखा जमिनीवर पडत होता.
La co mor dotange dur, con yokten kwobka diloko, La mukti cero yilam na bwiyale yaru ti bitine.
45 ४५ आणि जेव्हा प्रार्थना करून तो उठला आणि शिष्यांकडे आला तो पाहा ते खिन्न झाल्यामुळे झोपी गेलेले त्यास आढळले.
La con kwenu fiye kwobka diloko nin, con yilaken fiye bi bei tomange ce nin. Co fiya ci da dumti wori ciki fir neret.
46 ४६ तो त्यांना म्हणाला, “तुम्ही का झोपत आहात? उठा आणि परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा.”
Con me ci, “Ye bwi ki da dumtiye? Ko kwen ko kwob dilo kati kom doken mor cuwala.
47 ४७ तो बोलत असतांनाच लोकांचा जमाव आला व बारा शिष्यातील यहूदा इस्कर्योत म्हटलेला एकजण त्यांच्यापुढे चालत होता. येशूचे चुंबन घेण्यासाठी तो त्याच्याजवळ आला.
Co tok kero ti wiri, nubo ducce cerkangu kange Yahuda, wiin mor kwob culombo yobe ti cinen kaba. Con bou bidom kange Yecu con korkan co.
48 ४८ परंतु येशू त्यास म्हणाला, “यहूदा, चुंबन घेऊन मनुष्याच्या पुत्राचा विश्वासघात करतोस काय?”
La Yecu yi co “Yahuda, muki miye bi bwe nifire ki kor kanka ka?”
49 ४९ त्याच्याभोवती जे होते ते काय होणार हे ओळखून त्यास म्हणाले, “प्रभू, आम्ही तलवार चालवावी काय?”
La nubo woro wari kange Yecu to dike wo bwitiye ri, cii ki, “teluwe nyo to ci ki kuleng ka?”
50 ५० त्यांच्यापैकी एकाने महायाजकाच्या नोकरावर वार केला आणि त्याचा उजवा कान कापला.
La wiin more ciye to canga liya wabe, to cewo caktiyereu mwatam.
51 ५१ येशूने उत्तर दिले, “हे पुरेसे असू द्या.” आणि त्याने त्याच्या कानाला स्पर्श केला व त्यास बरे केले.
Yecu ki, “Cuwati nyo”, con ke tu ceu, nyori twam”.
52 ५२ नंतर येशू मुख्य याजक लोक, परमेश्वराच्या भवनाचे मुख्य अधिकारी आणि वडील जे त्याच्यावर चालून आले होते, त्यांना म्हणाला, “तुम्ही तलवारी आणि सोटे घेऊन माझ्यावर चालून आलात, जसा काय मी लुटारु आहे.
Yecu yi liya nob wabe kange nubo durko bi kur kwamareu kange nubo durko ci ciya co beu, 'ki, ka ceru ki kulenti kange danti ka ta nii kuye ka?
53 ५३ मी तर तुम्हाबरोबर दररोज परमेश्वराच्या भवनात असे आणि तुम्ही माझ्यावर हात टाकला नाही. परंतु ही तुमची वेळ आणि अंधाराची सत्ता आहे.”
Fiya cuwa mika kom kang-kang mor bi kur kwama reu ka yo bo kang minen. Wo kakuk kimek, kange bikwan kumtacile.
54 ५४ त्यांनी त्यास अटक केली व ते त्यास महायाजकाच्या घरी घेऊन गेले. पेत्र दुरून त्यांच्यामागे चालला.
Cin tam co, cin yaken ki co Lo nii wabe durko. Bituru bwen cinen ti kutang.
55 ५५ त्यांनी अंगणाच्या मध्यभागी विस्तव पेटविला आणि त्याच्याभोवती बसले व पेत्रही त्यांच्यात बसला.
Biko ci kwerum kira tiber lor bolange reu, cin cin yironken yiye, Bituru yiken tiber ciyer.
56 ५६ तेव्हा कोणाएका दासीने तेथे त्यास विस्तवाच्या उजेडात बसलेले पाहिले. तिने त्याच्याकडे निरखून पाहिले आणि ती म्हणाली, “हा मनुष्यही त्याच्याबरोबर होता.”
Kange nawiye canga to co, wori ci yim cunga kirak, con to co ti con toki, “Nii wuro wii kange co”.
57 ५७ पेत्र ते नाकारुन म्हणाला, “बाई, मी त्यास ओळखत नाही.”
La Bituru webkangum, ki nawiye ma nyom cobo.
58 ५८ थोड्या वेळानंतर दुसऱ्या मनुष्याने त्यास पाहिले आणि म्हणाला, “तू सुद्धा त्यांच्यापैकी एक आहेस!” पण पेत्र म्हणाला, “गृहस्था, मी नाही!”
Bi cor di, kange to co, yi ki. “Mo wiin more ciye” Bituru ki “bwayile, ma kebo”
59 ५९ नंतर सुमारे एक तास झाल्यावर आणखी एकजण ठामपणे म्हणाला, “खात्रीने हा मनुष्यसुद्धा त्याच्याबरोबर होता, कारण हा गालील प्रांताचा आहे.”
Bwiko kene wiineu, kange ywim metenco, “Bilenke, nii wo wii kange co.
60 ६० परंतु पेत्र म्हणाला, “गृहस्था तू काय बोलतोस ते मला कळत नाही!” तो बोलत असतांना त्याच क्षणी कोंबडा आरवला.
Bituru ki, nii man nyom bo dike mo tok tiye”, dancan ca dibo tokka kereko bar bi cake mob kiyange.
61 ६१ आणि प्रभूने वळून पेत्राकडे पाहिले तेव्हा पेत्राला प्रभूने उच्चारिलेले वाक्य आठवले, “आज कोंबडा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील,” असे सांगितलेले त्यास आठवले.
Teluwe, yila to Bituru, La Bituru kwa ki kero Yecu yi ceu, fiya cuwo ci wariyeu, “Fiya na bi cake mob kiyange duwen ri, mwan wengkan ye kiriti taar.
62 ६२ मग तो बाहेर जाऊन मोठ्या दुःखाने रडला.
Bituru yaken kale cii wiye kambo ken.
63 ६३ येशूवर पहारा देणाऱ्या लोकांनी त्याचा उपहास करायला व त्यास मारायला सुरुवात केली.
La nubo ci yo to Yecu tiye buwo malli co.
64 ६४ त्यांनी त्याचे डोळे बांधले व त्यास प्रश्न विचारु लागले. ते म्हणाले, “ओळख बघू! तुला कोणी मारले?”
Kambo fini celtiye ri, nubo dur nibero mwerkangi fiye wiin, Liya nob wabe bo kange nob mulangkab, cin doken kico fiye nyime ciye, ciki, “no mo kiritti di yi nyo”
65 ६५ आणि ते त्याची निंदा करण्यासाठी आणखी पुष्कळ काही बोलले.
La con yi ci, “no nyikom di mani ka ciyati”,
66 ६६ दिवस उगवला तेव्हा वडील लोकांची म्हणजे त्यामध्ये दोन्ही प्रकारचे लोक, मुख्य याजक लोक व नियमशास्त्राचे शिक्षक यांची सभा भरली आणि ते त्यास त्यांच्या सभेत घेऊन गेले.
Kakaa me kom di kan kar men ti.
67 ६७ ते म्हणाले, “जर तू ख्रिस्त आहेस तर आम्हास सांग” येशू त्यांना म्हणाला, जरी “मी तुम्हास सांगितले तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही.
Min yi ki no mwo Krisiti ri yi nyo, La con yi ci ki “No yi komri mani ka yonmti.
68 ६८ आणि जरी मी तुम्हास प्रश्न विचारला तरी तुम्ही उत्तर देणार नाही.
Tano mwe kom kerdi mani ka yiye ti
69 ६९ पण आतापासून मनुष्याचा पुत्र सर्वसमर्थ देवाच्या उजवीकडे बसलेला असेल.”
Fo ya ciko kab, mi bwe nifire an yiken kanko caktiyer kwama.
70 ७० ते सर्व म्हणाले, तर मग तू देवाचा पुत्र आहेस काय? त्याने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही म्हणता की, मी आहे.”
La gwam ciye cin yi co ki, mo bi bwe kwama ka? Yecu kar cinen “Kom ka tiki nye”.
71 ७१ मग ते म्हणाले, “आता आपल्याला आणखी साक्षीची काय गरज आहे? आपण स्वतः त्याच्या तोंडचे शब्द ऐकले आहेत.”
La cin toki, “ye bwi ba do kange warke tiye? Bo ki bwibi ban nuwa nyi co”

< लूक 22 >